बराच वेळ सलग रायडींग झाल्यावर राधाने मागेपुढे असलेल्यांना ब्रेक घ्यायची खूण केली. एक टपरीवजा दुकान होतं. सगळे थांबले. मस्त कडक चहा आणि मॅगी खाऊन पुढचा रस्ता सुरु झाला. अखेर संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करायला सगळे थांबले. ते एक लहानसं खेडं होतं. ग्रुपचा मुक्काम तिथल्याच एका होमस्टे मध्ये होता. दिवसभराच्या रायडिंगमुळे सगळेच दमले होते. सर्वांनी फ्रेश होऊन जेवणावर ताव मारला. जेवण साधंच होतं पण ते दिवसभराच्या थकव्यानंतर निशाला खूप आवडलं. झोपण्यापूर्वी सगळ्यांना राधाने परत उद्याच्या सूचना दिल्या. निशाला झोप आली नव्हती. इतक्या दिवसांनी आपण असं मस्त फिरतोय ह्या जाणीवेनंच तिला उल्हसित वाटत होतं. ती रूममधून बाहेर आली. त्यांना किचनमध्ये स्वतःचं जेवण बनवायची मुभा देण्यात आली होती. निशाने खाली किचनमध्ये जाऊन तिची आवडती कॉफी करून घेतली आणि ती बाहेर अंगणात येऊन बसली. एक लहान टेबल आणि ३-४ खुर्च्या ठेवलेल्या होत्या तिथे. तिथे निवांत मांडी घालून बसली निशा. हळूहळू कॉफीचे घोट घेत. किती बरं वाटत होतं तिला तिथे. अगदी शांत. आनंदी. स्वतःच्याही नकळत निशा गाणी गुणगुणायला लागली
“इतना ना मुझसे तू प्यार बढा
के मैं इक बदल आवारा
कैसे किसीका सहारा बनू
मैं खुद एक बेघर बेचारा”
निशा तल्लीन होऊन गात होती.
अचानक तिला जाणवलं मागे कोणीतरी उभे आहे. निशाने झटकन मागे पाहिलं
“I’m sorry if I have disturbed you” एक मुलगा मागच्या कॉरिडॉरमधून बाहेर येत म्हणाला.
तिच्या शेजारी एक चेअर सोडून तो बसला.
“I’m really sorry” तो पुन्हा म्हणल्यावर निशा हसून म्हणाली “it’s ok I was a little loud”
“Not at all. You have nice voice. बाय द वे मी सत्यजित” म्हणून तोही हसला.
“मी निशा” निशा म्हणाली.
निशा शांत बसून राहिली. तोही. आकाश ताऱ्यांनी डवरलं होतं. बऱ्याच वेळाने निशा उठून झोपायला निघाली. सत्यजित तसाच ताऱ्यांकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. शांत, तृप्त असल्यासारखं.
“बाय. गुड नाईट” निशा म्हणाली.
“बाय. गुड नाईट” त्यानेही हसून मान डोलावली.
सकाळी उठल्यावर नाश्ता करून सगळे पुढे लेहला जायला निघणार होते. निशा नाश्ता करायला गेली तर तिला पुन्हा सत्यजित भेटला.
“हाय निशा”
“हाय”
“तू काल गुणगुणत होतीस ते गाणं तलतचं आहे ना?” सत्यजितने विचारलं.
“हो. मला खूप आवडत ते गाणं” निशा म्हणाली.
“सुंदर आहे. मी ऐकलं रात्री शोधून परत”
नाश्ता करून सगळे पुढे निघाले. निशाला जाणवलं आज सिद्धार्थ कुठे दिसत नाहीये.
लेहला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर निशा प्रचंड दमली होती. राधाने सगळ्यांना खाऊन घेऊन आराम करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशीचा काहीच प्लॅन नव्हता. लेहच्या अल्टीट्युड ला acclamatize होण्यासाठी सगळ्यांनी सक्तीचा आराम करायचा होता. जेवण जेवून निशा गाढ झोपली. सकाळी अमळ उशिराच जाग आली तिला.
नाश्ता करायला पोहोचली तर काही खाण्याचा मूड नव्हता.
“गुड मॉर्निंग” तो सिद्धार्थ होता.
“हाय. गुड मॉर्निंग” निशा म्हणाली.
“मॅगी खाणार आहेस? मी बनवतोय” सिद्धार्थ म्हणाला.
“काही खायची इच्छा नाहीये रे” निशा म्हणाली.
“अगं खा गं. मी खूप छान बनवतो मॅगी” सिद्धार्थ म्हणाला.
“मॅगीमध्ये बनवण्यासारखं काय असत रे?” निशाने त्याला चिडवलं.
“ राहूदे. नको खाऊस” सिद्धार्थही चिडला.
“अरे बाबा चेष्टा केली. दे तुझी मॅगी. बरं एक सांग काल कुठे होतास तू दिवसभर?” निशाने हे वाक्य बोललं आणि चारदा जीभ चावली. पण आता काहीच उपयोग नव्हता. बाण सुटला होता आधीच.
“So you noticed?” सिद्धार्थने विचारलं. कंसातलं my absense निशाला व्यवस्थित कळलं. आता खोटं बोलून फायदा नव्हता.
“नाही म्हणजे दिसला नाहीस काल म्हणून विचारलं” निशाने सारवासारवीचं उत्तर दिलं.
“हो अगं. परवा त्या होमस्टेमधून रात्री बाहेर पडलो. रायडींग करत बराच पुढे आलो होतो. मग म्हटलं आता परत कशाला जा पुन्हा इथेच येण्यासाठी, मग पुढे आलो सरळ. मी आधीही हा रूट केलाय बाईकवर सो I know the place!त्यामुळे इकडे येऊनच थांबलो.” सिद्धार्थ सांगत होता.
“हाय निशा, हाय सिद्धार्थ” राधा मागून येत म्हणाली.
“व्वा.. तुझ्या हातची मॅगी?! एकटाच खाणारेस कि काय एव्हढी?” अस म्हणून राधाने त्यातली एक प्लेट घेऊन खायलाही सुरुवात केली.
“अगं..” सिद्धार्थ तिला सांगणार कि ती प्लेट निशासाठी आहे तेव्हढ्यात निशाने त्याला खुणेनेच असुदे म्हणून थांबवलं.
“हाय” तेव्हढ्यात सत्यजित तिथे आला.
“हाय सत्या” सिद्धार्थ म्हणाला.
“निशा हा माझा मित्र. सत्यजित.” सिद्धार्थने ओळख करून दिली.
“अरे झाली आमची ओळख काल” सत्यजित म्हणाला.
“काल? ओके!” सिद्धार्थने आपलं लक्ष मॅगीकडे वळवलं.
“राधा दुसऱ्यांनाही विचारत जा खाताना” सत्याने राधाला टोकलं.
“का? तुझं तू करून खाऊ शकतोस ना?” राधाही कावली.
“Guys प्लीज” सिद्धार्थने त्या दोघांकडे हे नेहमीचंच आहे असं बघितलं.
“निशा मी मॅगी करतोय, तू खाणारेस?” सत्याने विचारलं.
“हो मी खाईन” निशाने सांगितलं.
नाश्ता करून सगळे परत आपापल्या खोल्यांमध्ये आराम करायला गेले. रात्रीचं जेवण झाल्यावर निशा हॉटेलबाहेर फेऱ्या मारत होती.
“निशा...” सिद्धार्थने तिला हाक मारली.
“काय चाललंय?”
“काही नाही. बघतेय तारे” निशा.
“तारे इथे काय बघतेयस? तारे बघायचे असतील तर चल माझ्यासोबत. एक खूप मस्त जागा आहे.” सिद्धार्थ म्हणाला.
निशाने त्याच्याकडे पाहिलं, हो म्हणावं कि नाही, काहीच न सुचल्याने तिचा गोंधळ झाला होता.
“I’m sorry... तुला माझ्याबरोबर सेफ वाटणार नसेल तर नको येऊ. मी अगदी सहज विचारलं होतं. चल बाय” असं म्हणून सिद्धार्थ पाठमोरा होऊन गाडीकडे चालायला लागला देखील.
निशाने एकदोन मिनिट विचार केला आणि सिद्धार्थला हाक मारली.
“सिद्धार्थ... थांब. मी येतेय” आणि ते दोघे निघाले. हॉटेलपासून थोडसं पुढे आल्यावर जरा गावातल्या लाईटस चा प्रकाश कमी झाला होता.तारे अधिक स्पष्ट दिसू लागले होते. सिद्धार्थने पुढे गेल्यावर एका वळणावर गाडी वळवली आणि ते थांबले. एक लहानसा उंचवटा होता तिथे रस्त्याला. त्यावर पायीच गेल्यावर एका मोठ्या दगडावर सिद्धार्थ बसला.निशालाही त्याने बस म्हणून खूण केली.
आणि समोरचं दृश्य बघून निशा हरखूनच गेली. लांबच लांब पसरलेलं जणू चंद्रावरच आहोत असं वाटणारं लेहचं landscape, आणि आकाशात हजारो तारे. निशा एकटक पाहत राहिली. कितीही पाहिलं तरी तिचं मन भरेना. आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. सिद्धार्थला तिच्या मनाची अवस्था जाणवली असावी बहुतेक. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर हलकेच थोपटलं. आता मात्र निशाला रडू आवरेना. सिद्धार्थने तिला मनमोकळं रडू दिलं. ती थोडी शांत झाल्यावर त्याने विचारलं, “पाणी?”
तिने मानेनेच हो म्हणून सांगितल्यावर त्याने सॅकमधून काढून पाणी दिलं.
पाणी पिल्यावर निशाला थोडी हुशारी वाटायला लागली.
“मी चुकले का रे? बाबा गेल्यावर मी स्वतःला अगदी जखडून घेतलं. ती पूर्वीची मी आणि आत्ताची मी खूप वेगळ्या आहोत.. असं वाटतंय कि खूप काही हातून निसटून गेलंय. जे परत कधीच येणार नाही.” निशा बोलत होती.
“निशा, जे होऊन गेलं ते तू बदलू शकत नाहीस आता. पण यापुढे काय व्हावं हे तरी तू ठरवू शकतेस ना? तुझ्या उद्याच्या आठवणी ह्या आजच्या निर्णयांवर अवलंबून असणार आहेत. सो don’t worry सगळं छान होईल. फक्त तू तसं ठरवायला हवंस. Life is beautiful if you see so” सिद्धार्थ तिला समजावत होता.
“Thank you सिद्धार्थ.” निशा एव्हढंच बोलली. आपण याच्यासमोर इतकं रडलो, हा काय विचार करत असेल आपल्याबद्दल असं निशाला वाटलं.
“तू रडलीस म्हणून guilty वाटून नको घेऊस निशा. मनात काही साचून देऊ नये. आता तुला बरं वाटतंय ना? बरं एक विचारू?” सिद्धार्थ म्हणाला.
“विचार”
“माझा हात तेव्हढा कधी सोडणार आहेस ते सांग. म्हणजे कसं आपल्याला परत निघत येईल ना” सिद्धार्थ हसत होता.
निशाने झटकन त्याचा हात सोडला. रडताना तिने कधी त्याचा हात धरून ठेवला हे तिही विसरली होती. शरमेने तिचे गाल लाल झाले.
“तुझं लाजून वगैरे झालं असलं तर निघायचं का?” सिद्धार्थने तिला टोकलं.
निशाने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं. पण तिला ते जमत नव्हतं. आणि सिद्धार्थ खळखळून हसला.
निशा आणि सिद्धार्थ परत हॉटेलवर आले तर राधा हॉटेलबाहेर त्यांची वाटच बघत असल्यासारखी थांबली होती.
“हाय राधा” निशा कसंबसं म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली. राधाने आपल्याला सिद्धार्थबरोबर येताना बघून अजून काही प्रश्न विचारू नयेत म्हणून निशा पटकन निघून गेली.
“सिद्धया.. नालायका.. काय चाललंय हे? इतका उशीर?” राधाने सिद्धार्थला विचारलं.
“राधे... you know me... मला रात्री फिरायाला आवडतं.” सिद्धार्थने खांदे उडवले.
“ते मला माहित आहे रे. मी निशाबद्दल बोलतेय. कुठे गेलेलास तू?” राधा वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती. तिचा आवाजही जरा चढला होता.
“राधे... उगाच काहीही विचारू नको. तुला सगळं माहित आहे कि, अगदी त्या राजस्थान ट्रीपपासून” सिद्धार्थला काही कळतच नव्हतं.
“ हो माहित आहे मला. पण जरा लयच भाव देतोयस तू तिला असं नाही वाटत का तुला?” राधा चिडली होती आता.
“राधा... मित्रमैत्रिणींनी आपल्या हद्दीतच राहावं” सत्या आला होता तिथे.
“ओके. मी झोपायला चाललोय, तुमच्या भांडणाचे एपिसोड्स नाही बघायचे मला” असं म्हणून सिद्धार्थ गेलासुद्धा.
“राधा...” सत्या काही बोलणार इतक्यात
“प्लिज सत्यजित. मला तुझं लेक्चर नकोय” म्हणून राधाही निघून गेली.
क्रमश:
कहानी मे सत्या, आपलं ट्विस्ट
कहानी मे सत्या, आपलं ट्विस्ट छान आहे
कहानीमे ट्विस्ट!!!! मस्त.
कहानीमे ट्विस्ट!!!!
मस्त.
मस्त !!!
मस्त !!!
सही! मस्त ट्विस्ट.
सही! मस्त ट्विस्ट.
छान ट्विस्ट आलंय कथेत... पण
छान ट्विस्ट आलंय कथेत... पण एक कळले नाही भांडण सिद्धार्थ आणि राधा मध्ये असताना... " ओके. मी झोपायला चाललोय, तुमच्या भांडणाचे एपिसोड्स नाही बघायचे मला” असं म्हणून सिद्धार्थ गेलासुद्धा."
हे सिद्धार्थ कसे म्हणतो
Chan interesting mode war
Chan interesting mode war aaliy Katha. Shewti conversation madhe naawanchi gadbad jhaliy asa waatla..
मस्त लिहताय तुम्ही...असेच
मस्त लिहताय तुम्ही...असेच लिहत राहा..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
सर्वांना खूप धन्यवाद
सर्वांना खूप धन्यवाद

उमानु, Vchi Preeti, तुमच्या प्रश्नांबद्दल >>>>> सत्या आणि राधा एकत्र आले कि भांडणारच असं गृहीतक आहे, जसं ते या भागाच्या सुरुवातीला भांडतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणतो मला तुमच्या भांडणाचे एपिसोड्स बघायचे नाहीत आणि निघून जातो.
राधा सत्याच्या बोलण्याला लेक्चर म्हणते आणि जाते त्यामुळे पुढचं भांडण टळतं
खूप छान... २ love triangles
खूप छान... २ love triangles आहेत कि काय... पुढचा भाग लवकर टाका ..
KATHA CHHAN CHALALI AHE...
KATHA CHHAN CHALALI AHE... KHUP AVADLI.
PUDHCHA BHAG LAVKAR TAKA...
मस्त सुरु आहे कथा !!!
मस्त सुरु आहे कथा !!!
पुढचा भाग लवकर टाका !!
मला पहिले भाग सापडत नाहियेत,
सगळे भाग वाचुन काधले एका दमात
https://www.maayboli.com/node
आधीच्या भागाच्या लिंक्स ...
https://www.maayboli.com/node/67353
https://www.maayboli.com/node/67392
https://www.maayboli.com/node/67521
https://www.maayboli.com/node/67659
पु. भा. प्र.
पु. भा. प्र.
वाह.... मस्तच.... खुपच आवडली
वाह.... मस्तच.... खुपच आवडली कथा
khup chhan.waiting for next
khup chhan.waiting for next part.
. .
.
.
सही...राधाची निगेटिव शेड
सही...राधाची निगेटिव शेड दिसून आली.
ती बाहेर अंगणात येऊन बसली. एक लहान टेबल आणि ३-४ खुर्च्या ठेवलेल्या होत्या तिथे. >>> बाप्रे.. वाचून मलाच हुडहुडी भरली.