Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नाही वाटत बॅटींगसाठी व
मला नाही वाटत बॅटींगसाठी व विकेट किपींगसाठी एकाच खेळाडूच्या reflexesचा वेग वेगवेगळा असतो असं. >> reflexes boolean नसल्यामूळे एकतर आहेत किंवा नाहित असे होत नाही. कमी होत असतील तर त्यांचा वापर किती लागतोय ह्यानुसार काय केले जातेय ह्यावर परीणाम होऊ शकतो. बॅटींग मधे स्टंपिंग पेक्षा slow झालेले reflex जास्त impactful ठरतात असे मला वाटते. स्टंपिंग करताना बॉल अगदी हातांच्या तळव्याममधे १००% नाही बसला नि ८०% बसला तरी स्टांपिंग करता येउ शकते पण बॅटींग मधे हे २०% म्हणजे शॉट मिड्विकेट च्या बाजूने जाणे नि मिड्विकेट कडे जाणे ह्यात फरक पडू शकतो. हे मी फक्त वैयक्तिक अनुभववारून लिहितोय.
असामीजी , मुद्दा बरोबर आहे ,
असामीजी , मुद्दा बरोबर आहे , तुम्ही छान मांडला आहे व बव्हंशी पटला पण आहे .
खेळाडूना , कप्तानाला , निवड
खेळाडूना , कप्तानाला , निवड समितीला सल्ले देणे, हा कोणत्याही रसिकाचा मूलभूत हक्क आहे. Wink
पण performance नसलेल्या खेळाडूला तो नसतो...
>>
performance नसलेला खेळाडू रसिक नसतो हे कशावरून??
त्यातून तो आजही व्हाईस कॅप्टन आहे. तो अधिकार ऑन पेपर आहे त्याला.
चला, राहुलबुवा चालले परत पहिल्याच ओव्हरमधे.
एक रिव्ह्यू खाऊन...
पृथ्वीने उत्क्रुष्ट पंच मारून
पृथ्वीने उत्क्रुष्ट पंच मारून पहिली धाव मिळविली टेस्ट मॅच मधली!
पण राहुलचा भोपळा नाही फुटला! रिव्यु पण वाया घालविला!
पृथ्वी रॉक्स ६१ नाबाद
पृथ्वी रॉक्स ६१ नाबाद स्ट्राइक रेट १००
थोड आगाऊपणाचं होईल पण पुजारा
थोडं आगाऊपणाचं होईल पण पुजारा - पृथ्वी जोडी, बराच फरक असूनही , सरदेसाई- सुनीलची आठवण करून देते, हें मात्र खरं . देव करो व तसंच घडो !
पृथ्वी जेवणाच्या वेळेपर्यंत
पृथ्वी जेवणाच्या वेळेपर्यंत नाबाद ७५!!! मैदानात चौफेर फटकेबाजी!
पृथ्वी शॉ .... पदार्पणात शतक
पृथ्वी शॉ .... पदार्पणात शतक ! शाब्बास !
पदार्पणाच्या पहिल्याच डावात
पदार्पणाच्या पहिल्याच डावात शतक!! अभिनंदन पृथ्वी शॉ!!!
अभिनंदन पृथ्वी शॉ..
अभिनंदन पृथ्वी शॉ..
सरदेसाई- सुनीलची>>wow !
सरदेसाई- सुनीलची>>wow !
पृथ्वी शॉ भारीच. (आमरे आठवला)
पृथ्वी शॉ भारीच. (आमरे आठवला)
पदार्पणात शकत करणार्यांची कारकीर्द किती यशस्वी असते? (फार नसते) असा एक स्टॅट्स रिपोर्ट पाहिला होता मागे.
अर्थात अपवाद आहेतच.. पृथ्वीही असेलच.
"सरदेसाई- सुनीलची आठवण करून
"सरदेसाई- सुनीलची आठवण करून देते," - इंटरेस्टींग! बघायला हवं. शॉ मस्त खेळतो. त्याला रणजी, अंडर-१९ आणी आयपीएल मधे बघितलं होतं. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे, त्याची स्टाईल मला तेंडुलकरच्या सुरूवातीच्या दिवसांसारखी वाटते.
"असामीजी , मुद्दा बरोबर आहे , तुम्ही छान मांडला आहे व बव्हंशी पटला पण आहे ." - भाऊ यु टू?
शेवटी जगात काय म्हटलय, ह्यापेक्षा कुणी म्हटलय ह्यालाच महत्व अधिक आहे (संदर्भः असा मी, असामी - हा कोट त्या वन लायनर च्या धाग्यावर पण जाऊ शकतो). 
पदार्पणात शकत करणार्यांची
पदार्पणात शकत करणार्यांची कारकीर्द किती यशस्वी असते? (फार नसते) असा एक स्टॅट्स रिपोर्ट पाहिला होता मागे.
अर्थात अपवाद आहेतच.. पृथ्वीही असेलच.
>>>>>
५० - ५० % दोन्ही आहेत असा अंदाज आहे.
भारताचाच विचार केला तर पदार्पणात सेंच्युरी ठोकलेले पण पुढे अपयशी झालेल्यांपैकी चटकन आठवणारी नावं - सुरींदर अमरनाथ, प्रवीण अमरे, सुरेश रैना, काही प्रमाणात शिखर धवन आणि रोहित शर्मा.
पण पदर्पणात सेंच्युरी ठोकल्यावर बरीच वर्ष गाजलेले भारतीय बॅट्समन - विश्वनाथ, अझरुद्दीन, गांगुली, सेहवाग.
इतर देशातील बॅट्समनपैकी पहिल्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारे बहुतेक सर्व बॅट्समन पुढे बरीच वर्ष टेस्ट्समध्ये खेळत होते. त्यांच्यापैकी काही आठवलेले - गॉर्डन ग्रिनीज, डग वॉल्टर्स, ग्रेग चॅपल, लॉरेन्स रो, कालिचरण, जावेद मियांदाद, सलीम मलिक, केपलर वेसल्स, मार्क वॉ, अँड्यू हडसन, युनुस खान, स्ट्राऊस, मायकेल क्लार्क, अॅलिस्टर कूक, मॅट प्रायर, जोनाथन ट्रॉट, केन विल्यमसन, फ्रान्सवाल ड्युप्लेसीस
हायलाईट्स पाहिले. मस्त खेळले
हायलाईट्स पाहिले. मस्त खेळले शॉ, पुजारा कोहली आणी जितका वेळ खेळला, तितका वेळ रहाणे. आता विको चं आणखीन एक शतक उद्या होईल.
एक निरीक्षणः शॉ शॉट्स मारताना हात थोडे एक्स्टेंड करून, मग कोपर्यात वाकवून बॉल वर येतो -अजित आगरकर सारखं. अर्थात आगरकर ची ही मूव्हमेंट जास्त pronounced होती. शॉ ची मिनीमल आहे.
रहाणे ने ह्या सिरीज मधे खरच खोर्याने रन्स करायला हवेत - त्याच्या कॉन्फिडन्स साठी. ह्यानंतर ऑस्ट्रेलिया टूर आहे. राहूल चा प्रॉब्लेम काय आहे कुणास ठाऊक? तो सातत्यानं बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होतोय.
वेस्ट इंडीज ही नवीन श्रीलंका आहे का आपल्यासाठी?
हूल चा प्रॉब्लेम काय आहे
हूल चा प्रॉब्लेम काय आहे कुणास ठाऊक? तो सातत्यानं बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होतोय. > > तो इनिंग्सच्या सुरूवातीच्या काळात एकदम अनिश्चित माईंड सेट मधे असतो फूट मूव्हमेंट्स बद्दल, त्यामूळे बॉल सोडावा कि टटवावा ह्यात भयंकर गडबड होते. फर्नांडॉ ने लंकेमधे नि आता इंङ्लंडमधे ह्यामूळे तो आत येणार्या बॉल्स वर पायचीत होतो किंवा बोल्ड होतो. माझ्या मते ऑस्ट्रेलिया मधे स्टार्क नि हेझ्लवूड हे पुरेपूर एक्ष्स्पोज करणार, त्यामूळे पुढच्या टेस्ट मधे मयांकला संधी द्यायला हवी नि राहुला टॅस्ट मधे मधल्या फळी मधे पाच- सहासाठी (मेन किंवा बॅकप म्हणून) तयार करायला हवे.
शेवटी जगात काय म्हटलय, ह्यापेक्षा कुणी म्हटलय ह्यालाच महत्व अधिक आहे >> मी नम्रपणे आपल्या दोघांच्या आयडी कडे तुझे लक्ष जावे असे सुचवतो
मी हा कोट तिथे लिहून उडवला होता.
"मी नम्रपणे आपल्या दोघांच्या
"मी नम्रपणे आपल्या दोघांच्या आयडी कडे तुझे लक्ष जावे असे सुचवतो " -
अगदी harmless विनोद आहे रे.
भाऊ नेहेमीच त्यांच्या व्यंगचित्रातून कोपरखळी मारतात, तशी शब्दातून जमते का ते पाहिलं. no offence intended.
एनीवे. पण राहूल चं अपयश जाणवतय. मागच्या ऑस्ट्रेलिया टूर मधे छान खेळला होता, पण त्यानंतर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय. अगदी तसच काही कारण असल्याशिवाय २ इतके नवीन ओपनर्स नी आपण ऑस्ट्रेलिया टूर ची सुरूवात करणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे राहूल टिकेल आणी कदाचित - त्याचं आजचं बोलणं मनावर घेतलं नसेल तर- काऊंटी क्रिकेट मधे फॉर्म गवसलेला विजय सुद्धा परत येईल.
* भाऊ यु टू? Wink शेवटी जगात
* भाऊ यु टू? Wink शेवटी जगात काय म्हटलय, ह्यापेक्षा कुणी म्हटलय ह्यालाच महत्व अधिक आहे (संदर्भः असा मी, असामी * - असाच आणखीही एक मला भावलेला कोट आहे - ' आपण काय म्हणतो हें जरी आपल्याला सर्वांत महत्वाचं व खरं वाटत असलं , तरी तें इतराना तसं वाटेल किंवा तें तसं असेलच असं नाही ! '. म्हणून, मीं इतरांचही ऐकतो, पटलं तर स्विकारतो . तसं करताना समोरची असामी बडी आहे कीं छोटी , याचा संबंथ नसतो .
* एक निरीक्षणः शॉ शॉट्स मारताना हात थोडे एक्स्टेंड करून, मग कोपर्यात वाकवून बॉल वर यतो.....* मलाही हे जाणवलं , विशेषतः , तो बॅकफूटवर खेळताना . तें खूप elegant वाटत असलं तरीही त्यात धोका संभवतो, विशेषतः स्विंग होणारा वेगवान चेंडू खेळताना. पण कांहीं खेळाडूंचं टायमिंगच सवभाविकपणेच त्या बॅटच्या लयबद्ध फिरवण्यात असतं , हें ही खरं . आगरकर शिवाय द्रविडच्या square cuts , square drives ही त्यामुळेच मोहक व शैलीदार वाटत. पण सर्वात बोलकं उदाहरण म्हणजे विश्वनाथची जगभर गाजलेली square cut ! बॅट गोलाकार फिरवून जगातल्या तुफानी गोलंदाजांना तो सफाईने त्याचा हा सहजसुंदर फटका खेळाचया ! शाॅच्या बाबतीतही हे बॅटचं गोलाकार फिरणं त्याची स्वाभाविक लयबद्धता असावी .
no offence intended > अरे
no offence intended > अरे म्हणूनच म्हटल ना कि माझा आयडी काय आहे ते बघ. असामी
शॉ ला बघताना मजा येते हे खरे आहे.
सरांनी वहात्या गंगेत हात धुऊन
सरांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले घरच्या मैदानावर!
५६ डाव खेळल्यावर पहिले शतक झळकावले! अभिनंदन!
अरे कुठे गेले सगळे?
अरे कुठे गेले सगळे?
का आपली बॅटींग झाली की बॅट घेउन घरी?
बाय द वे, तो जडेजाने केलेला रनआउट बघितला का?
हसुन हसुन पुरेवाट!
भाऊ, अहो अजून एकहि व्यंगचित्र
भाऊ, अहो अजून एकहि व्यंगचित्र नाही? काय हे?
आतां जिऑलॉजिस्ट तर होणारच ना
आतां जिऑलॉजिस्ट तर होणारच ना तुम्ही ! इतकं संशोधन, विश्लेषण,
लिखाण व बडबड करायची पृथ्वी वर म्हणजे ......... !!!!
वेस्ट इंडीजची आजची अवस्था
वेस्ट इंडीजची आजची अवस्था पाहिली की त्यांचा सुवर्णकाळ आठवून खरोखरच फार दु:ख होते. प्रत्येक टीमला अप्स आणि डाऊन्स आलेत, अगदी ऑस्ट्रेलियालाही लिली, मार्श आणि ग्रेग चॅपल रिटायर झाल्यावर बॉर्डर - टेलर युग सुरु होण्यापूर्वी खराब दिवस होते, पण वेस्ट इंडीजइतकी दारुण अवस्था कोणाचीही झालेली पाहिली नाही. १९९५ - ९६ पासून त्यांना जी उतरती कळा लागली आहे ती ना लारा थोपवू शकला ना चँडरपॉल ना आणखीन कोणी.
राहता राहिला प्रश्नं या टेस्टचा, तर उद्या चार विकेट्स काढून भारताने विंडीजला फॉलो ऑन द्यावा आणि शनिवारी किंवा फारतर रविवारी इनिंग्जने मॅच आटपावी. शॉ, कोहली, जाडेजा यांच्याप्रमाणे सेंच्युरी ठोकण्याची चालून आलेली संधी पंतने फटकेबाजीच्या नादात गमावली. जाडेजाने केलेला तो रन-आऊट म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये विरुद्ध टीममधल्या खेळाडूला खिजवून आऊट करण्याचं इंटरनॅशनल व्हर्जन होते! अर्थात जाडेजाचा थ्रो स्टंपवर लागला नसता तर त्याला टीममधल्या इतरांकडून आणि जगभरातल्या प्रेक्षकांकडून जी काही 'पडली' असती त्याची कल्पनाही करवत नाही. आजही अमित मिश्राचा आयपीएलमधला रनआऊट किंवा फिल टफनेलने स्टीव्ह वॉला रनआऊट करण्याच्या प्रयत्नात केलेला धांदरटपणा आठवला की हसू आवरत नाही तोच प्रकार जाडेजाच्या बाबतीत झाला असता.
अमित मिश्रा आयपीएल - https://www.youtube.com/watch?v=chkT_szpW08 - १.४९ पासून बघा.
फिल टफनेल - स्टीव्ह वॉ - https://www.youtube.com/watch?v=ge1s7j2UASA
अगदीं खरंय ! वे. इंडिजच्या
अगदीं खरंय ! वे. इंडिजच्या या अवस्थेची संभाव्य कारणं -
बेटांचे आपसांतील वाद , लाॅईडसारख्या खमक्या कर्णधाराचा अभाव व तिथल्या तरूण पिढीला अधिकाधिक आकर्षित करणारा बास्केटबाॅलचा खेळ . अंडर 19 चषक जिंकल्यानंतर पुन्हा त्यांची सुवर्णयुगाकडे वाटचाल सुरु होईल , ही आशाही फोल ठरतेय. क्रिकेटची एक आगळीच शान लुप्त होण्याची भिती व दु :ख सगळ्याच क्रिकेट प्रेमीना आहे. कालाय तस्मै नम: !
वेस्ट इंडीज च्या अधःपतनाच्या
वेस्ट इंडीज च्या अधःपतनाच्या कारणांमधे, सगळ्यात मोठं कारण, मला वाटतं, आर्थिक आहे. मागे एकदा एव्हर्टन वीक्स चा मुलगा आणी माजी विकेटकीपर डेव्हिड मरे ड्रग्ज विकताना आढळला होता. टी-२० २०१६ वर्ल्ड कप साठी भारतात आलेल्या वेस्ट-इंडियन टीम ची कीट्स सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी आली होती.
गेले पाच डाव विंडीज भारता
गेले पाच डाव विंडीज भारता विरुद्ध ८० षटके खेळू शकलेले नाहीत. खूपच दुबळा संघ झालाय!
२३४ धावा
१६८
७८ षटके
४८
हे जास्ती जास्त आणि कमीत कमी आहे!
आज एका वे.इंडिजच्या जुन्या
आज एका वे.इंडिजच्या जुन्या खेळाडूने तिथल्या खेळाच्या अधोगतीला आयपीएलला जबाबदार धरलय ! ( अर्थात, हे कारणही आर्थिकच म्हणायला हवं )
संपला सामना!
संपला सामना!
जेमतेम सव्वातीन सेशन खेळले!!!
पहिल्या डावापेक्षा तब्बल २ षटके ५ चेंडू आणि १५ धावा जास्त केल्या!
भाऊ, धन्यवाद. मस्त.
भाऊ, धन्यवाद. मस्त.
Pages