Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये
विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये गेली बरेच वर्ष खूप वाद आहेत.
२००३-०४च्या सुमारास बोर्डानी digicel कंपनीसोबत करार केला, पण बऱ्याच खेळाडूंची cable & wireless सोबत काँट्रॅक्टस होती. तेव्हापासून कॉन्फ्लिक्टस सुरू झाले
बोर्डानी खेळाडूंना इग्नोर करणे, पैसे नीट न देणे वगैरे सुरू झालं. आणि नंतर तीच पद्धत रुळली. बोर्डाविरुद्ध बोलणाऱ्या / कमी मोबदल्याबद्दल तक्रार करणाऱ्या खेळाडूंना टीममधून वगळणं, या वगळलेल्या खेळाडूंनी अधिक मोबदल्यासाठी टी२० लीग्ज खेळणं, न वगळलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय संघापेक्षा लीग्जना महत्व देणं हेही नित्याचं बनल.
आत्ताच्या संघाला बोर्डानी नीट सपोर्ट केलं तर एक दीड वर्षात फरक दिसू शकेल. पण त्यासाठी बोर्ड अन खेळाडू दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला हवेत.
आज एका वे.इंडिजच्या जुन्या
आज एका वे.इंडिजच्या जुन्या खेळाडूने तिथल्या खेळाच्या अधोगतीला आयपीएलला जबाबदार धरलय ! ( अर्थात, हे कारणही आर्थिकच म्हणायला हवं ) >>
हल्ली क्रिकेट मधए काहीही झाले कि IPl च्या नावाने खापर फोडायचे हि फॅशन रुळली आहे. ९५ पासून २००८ पर्यंत काय कारण विंडीजची अधोगती व्हायला होते हे विचारायला हवे होते त्याला कोणी तरी. Richardson कप्तान असताना सुरू झालेले वाद नडले. (९६ च्या World Cup मधला अतिशय गलथान नि बेज्बाबदार प्रकार आठवतो का ? World Cup जिंकायची सुवर्ण संधी personal हेव्यादाव्यांसाठी वाया घालवली होती ) खरं तर IPL मधे मिळालेल्या पैशाने तिथे सुरू झालेली CPL स्थानिक खेळाडूंना परत क्रिकेट कडे वळवायला उपयोगी पडते आहे. बास्केट बॉल मधे मिळणार्या पैशामागे लागलेले मुले क्रिकेट कडे पण बघायला लागली आहेत. अँकी ने लिहिलय तसे बोर्ड नि खेळाडूंमधला वाद दशकानुदशके चिघळू देणे फारसे उपयोगी ठरत नाही. त्यामूळे गेल किंवा ब्राव्हो त्यांच्या ऐन उमेदी च्या काळात खेळू शकले नाहित, हे विसरू नका.
"९६ च्या World Cup मधला अतिशय
"९६ च्या World Cup मधला अतिशय गलथान नि बेज्बाबदार प्रकार आठवतो का ? World Cup जिंकायची सुवर्ण संधी personal हेव्यादाव्यांसाठी वाया घालवली होती" - काय आठ्वना झालंय. लायटी मारा भौ.
बाकी खेळ खेळाडूंपेक्षा मोठा असतो हे मान्य करून सुद्धा, गेल, ब्राव्हो वगैरे न खेळल्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट चं खरच खूप नुकसान झालं.
वॉर्नने अशक्य मॅच खेचून काढली
वॉर्नने अशक्य मॅच खेचून काढली होती ना? रिचर्ड्सनला आउट करून आणि मग पुढे विकेटी काढून?
त्या मॅचमध्ये अॅम्ब्रोज अन वॉल्शने खतरनाक पहिला १० ओवरचा स्पेल टाकला होता. ऑस्ट्रेलियाला काय खेळताच येत नव्हतं
हा, ते सगळं आठवतय. शेन ली आणी
हा, ते सगळं आठवतय. स्टुअर्ट लॉ आणी मायकल बेव्हन ने कसाबसा २००+ स्कोअर करून दिला होता पहिल्या ४ विकेट्स पडल्यावर. पण असामी जे काही म्हणतोय, ते नाही आठवत.
अरे Richardson ला कॅप्टन
अरे Richardson ला कॅप्टन करण्याबाबत भयंकर वाद झाले होते, बहुतेकांचा वॉल्शला पाठिंबा होता पण बोर्डाने Richardson ला ढकलले होते. तो आधी मधे कधीतरी कॅप्टन होता नि World Cup मधे नाईलाजाने त्याने ती जबाबदारी घेतली होती (नीट डीटेल्स आठवत्नाहीत पण त्याची तयारी नव्हती पण काही तरी compromise म्हणून तो तयार झाला होता) सेमी फायनल मधे Aus ला वॉल्श नि अँब्रोजने अतिशय कमी धांवांमधे गुंडाळले होते - दोनशेच्या आसपास . त्यानंतर विंडीज १ विकेट गमावून एकदम जवळ आला होता. बहुतेक चंदरपॉल ने ७०-८० नि लारा ने पन्नासेक धावा केल्या होत्या. जिंकणे फक्त formality होती. त्या वेळी लारा बाद झाला. बहुतेक चंदर पॉल पण लगेच गेला. रिचर्डसन स्वतः नीट खेळत होता. समोर कोणी तरी नुसते उभे राहण्याची गरज होती पण प्रत्येक जण अक्षरशः हवे तसे खेळून बाद झाला होता. रिचर्डसन येणार्या प्रत्येक नव्या खेळाडूला सांगत होता पण काहीही उपयोग झाला नाही, बाद झालेले खेळाडू निवांतपणे हसत खेळत कसलाही remorse नसल्यासारखे ड्रेसिंग रूम मधे विनोद करत बसले होते. मला त्याबद्दल कॉमेंट्रेटर ने केलेले कमेट्स पण आठवतात. Aus अशा वेळी जसे रुथलेसली असू शकतील अर्थातच तसे होते
हे सापडले पहा
https://www.cricketcountry.com/series/wills-world-cup-1995-96-976/live-s...
ओह ओके. हे नव्हतं आठवत अजिबात
ओह ओके. हे नव्हतं आठवत अजिबात.
आपण
प्रतिभा व मेहनत इतर खेळाडूंच्या तोडीची असूनही , वे.इंडिजच्या खेळाडूंची जीवनशैली बघतां , सामने अतिशय गंभीरपणे खेळणयासाठी त्याना इतर देशांच्या खेळाडूंपेक्षा ' मोटीव्हेशन 'चा डोस खूपच मोठा द्यावा लागत असावा. वाॅरेल, सोबरस व लाॅईड हेच फक्त तो डोस पाजूं शकले , अशी माझी भाबडी समजूत आहे.
भाऊ, व्यंगचित्र मस्त आहे.
भाऊ, व्यंगचित्र मस्त आहे.
वन-डे साठी पण रिषभ पंत ची वर्णी लागलीये. मनीष पांडे परत आलाय आणी कार्थिक बाहेर आहे. रायडू आणी राहूल ने जागा टिकवलीये. मिडल ऑर्डर काही ठरत नाहीये.
परवा वेस्ट इंडीज विरूद्ध टेस्ट मधे पंत ने देखील हात मागे न नेता एक स्टंपिंग केलं. जर पंत हे करू शकत असेल, आणी ६० पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ने बॅटींग करू शकत असेल, तर फक्त एक डीआरएस रिव्ह्यू कन्सल्टंट ची गरज आहे, प्लेयिंग ११ मधे
तसं झालं तर लायट्निंग स्टंपिंग एक्स्पर्ट, डीआरएस रिव्ह्यू सल्लागार, अखिल भारतीय बोले तैसा न चाले संघटनेचा पदाधिकारी अशी अनेक पदं विभुषित करणार्या ज्येष्ठांचं कसं होणार?
पंत च्या एकंदर स्किल सेट मधे
पंत च्या एकंदर स्किल सेट मधे बेसिक गोष्टींमधे लोचा आहे असे किरमाणी म्हणतोय - त्याला स्पिनर्स च्या विरुद्ध भारतामधे कठीण जाईल म्हणे.
भाऊ, व्यंगचित्र आवडले.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी सामना चांगलाच रंगतदार झालेला दिसतोय. शेवटच्या तासात यासिर शहाने ३ विकेट घेउन सामन्यात रंगत आणली पण ऑस्ट्रेलियाने सामना वाचवला. ख्वाजाची अल्ट्रा-मॅराथॉन खेळी
*झालं तर लायट्निंग स्टंपिंग
*झालं तर लायट्निंग स्टंपिंग एक्स्पर्ट, डीआरएस रिव्ह्यू सल्लागार, अखिल भारतीय बोले तैसा न चाले संघटनेचा पदाधिकारी अशी अनेक पदं विभुषित करणार्या ज्येष्ठांचं कसं होणार? * - फेफजी, इथल्या ज्येष्ठावरचा राग तर तुम्ही त्या ज्येष्ठावर नाही ना काढत ?
"फेफजी, इथल्या ज्येष्ठावरचा
"फेफजी, इथल्या ज्येष्ठावरचा राग तर तुम्ही त्या ज्येष्ठावर नाही ना काढत ?" -

नाही हो. माझा खरच कुणावर राग वगैरे नाही. मी ह्याच धाग्यावर रोहित शर्मा, जडेजा, धोनी अशा कित्येक खेळाडूंना क्रीटीसाईझ पण केलय आणी त्यांचं कौतुक पण केलय.
भाऊ, व्यंचि मस्त!
भाऊ, व्यंचि मस्त!
शार्दूल ठाकूर पहिल्याच कसोटी पदार्पणात १.४ षटके गोलंदाजी करून जखमी निवृत्त!
वेस्ट इंडीज ने चांगली झुंज
वेस्ट इंडीज ने चांगली झुंज दिली. मॅच च्या निकालावर परिणाम व्हायची शक्यता कमी आहे, पण मला त्यांचं फायटींग स्पिरीट आवडलं.
शाॅ 70 (53 चेंडूत ) ! अप्रतिम
शाॅ 70 (53 चेंडूत ) ! अप्रतिम ! फालतू चेंडूवर बाद. प्रत्येक चेंडू फटकावलाच पाहिजे असा दंडक नाहीं , हे उमजेलच म्हणा लवकरच त्याला !
राहणे अन राहुलचं काय करायचं
राहणे अन राहुलचं काय करायचं
असून अडगळ नसून खोळंबा
राहणेचा कॉन्फिडन्स त्याच्या CEAT डीलपासून टायरमधे गेलाय
एकूणातच CEAT ,डील रोहित शर्मा सोडला तर कुणाला लाभलं नाही. रैना, राहणे, हरमनप्रीत कौर...
खेळला बाबा रहाणे एकदाचा. मला
खेळला बाबा रहाणे एकदाचा. मला वाटलं, आता फेअरवेल भाषण तयार करावं लागतय की काय! उमेश पण खेळला. छान झालं.
पंत आणी शॉ अनुभवानी अधिक परिपक्व होतीलच. पण दोघंही मस्त इंपॅक्ट प्लेयर्स आहेत.
एक विचार - प्रत्येक
एक विचार - प्रत्येक क्रमांकासाठी चांगले नवीन पर्याय तयार असण हें आश्वासक तर आहेच आहे पण त्यात एक धोकाही संभवतो. पर्यायाना संधी देण्याची घाई केली तर संघात असलेल्या खेळाडूंवर अवाजवी दडपण येण्याची दाट शक्यता निर्माण होते. निवडलेल्या प्रत्येक खेळाडूला निर्धास्त पणे स्वत:ला सिद्ध करण्याचा अवधी मिळणं त्याच्या व संघांच्या हिताचं असावं. कामगिरीतील सातत्याइतकंच महत्व जागतिक स्पर्धेत खेळण्याची त्याची कुवत अजमावण्याला दिलं जावं. निवडसमितीची खरी कसोटी तर हीच आहे ! तसं 5-10 डावातला स्कोअर बघून भाऊ नमसकर पण ठरवूं शकतो, कोणाला ठेवायचा व कोणाला काढायचा तें !
सकाळच्या सत्रात होल्डर नी वाट
सकाळच्या सत्रात होल्डर नी वाट लावली पार.. फक्त 28चा लीड आणि 9 विकेट गेलेल्या आहेत. मॅच उत्कंठावर्धक होण्याची तयारी पूर्ण
गरीब बिच्चारे विंडीज..
गरीब बिच्चारे विंडीज..
वन डे मध्ये नक्की फाईट करतील!
*गरीब बिच्चारे विंडीज..* -
*गरीब बिच्चारे विंडीज..* - खरंय !
*वन डे मध्ये नक्की फाईट करतील!* - याबद्दल खात्री नाही;
पण वन डे फाईट करतील , हे नक्की.
300+ धांवा करूनही वे.इं.
300+ धांवा करूनही वे.इं. भारतासाठी आव्हान नाही ठरू शकले ! कोहली व शर्मा दोघांचीही शतकं !
.
इथे बहुतेक चालू एकदिवसीय
इथे बहुतेक चालू एकदिवसीय मालिकेवर अघोषित बहिष्कारच असावा ; तरी पण , आज वे.इं.विरुद्ध आपला दुसरा एकदिवसीय सामना आहे आंणि वे.इं.ला इतकं दुर्लक्षित करणं अयोग्य आहे !
वे.इं.ला इतकं दुर्लक्षित करणं
वे.इं.ला इतकं दुर्लक्षित करणं अयोग्य आहे ! >
अगदी!!
कदाचित आपण दुर्लक्षित केल्यास गाफिल राहून आणि त्याचा फटका बसू शकतो!
मागच्या सामन्यात ३२२ धावा तश्या जास्तच दिलेल्या गोलंदाजांनी!
काल श्रीलंकेने जाता जाता इंग्रजांना पाणी पाजले शेवटी!
*काल श्रीलंकेने जाता जाता
*काल श्रीलंकेने जाता जाता इंग्रजांना पाणी पाजले शेवटी!* - इंग्रज अशा वेळीं नेहमीचा आव आणतात ; " आम्ही फक्त 'अॅशेस' सिरियसली खेळतो. बाकी सारं 'अॅशेस'साठी प्रॅक्टीस म्हणून असतं ! " लबाड लेकाचे !!
कोहली , अरे बाबा पुढच्या
कोहली , अरे बाबा पुढच्या वर्षीच्या विश्वचषकासाठी कांहीं शतकं राखून ठेव ना !
पण विंडीज पेक्षा एक धाव कमीच
पण विंडीज पेक्षा एक धाव कमीच केली!
३२१.. विंडीज ने ३२२ केल्या होत्या.
अरे बाबा पुढच्या वर्षीच्या विश्वचषकासाठी कांहीं शतकं राखून ठेव ना>>
हो ना! नाही तर ऐनवेळी माझा कोटा संपला आता असे म्हणायचा!
Take a bow ViKo!! जबरदस्त
Take a bow ViKo!! जबरदस्त प्लेयर आहे!!
सोशल मिडीया वर फिरतय की सचिन चे २००, युवराज च्या सहा सिक्सेस, वर्ल्ड-कप २०११ आणी विराट चे वन-डे मधले १०,००० रन्स - प्रत्येक वेळी धोनी मैदानात होता.
मग सहज सुचलं, ८३ चा वर्ल्ड-कप, गावसकर चं विक्रमी ३० वं कसोटी शतक, सचिन ची २०० वी टेस्ट आणी रिटायरमेंट आणी कोहली चे १०K - प्रत्येक वेळी विंडीज प्रतिस्पर्धी होते.
मॅच टाय!!
मॅच टाय!!
खरे तर विंडीज जिंकले म्हणायला हवे..
Pages