पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे ।
आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही
कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे
बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे ।
आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही
कुणी खात असेल तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे
अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे ।
आता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही
कुणी बडबडत असेल तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी सदासर्वदा मित्रमैत्रिणी जोडत असे
जिवाभावाच्या मोठ्या फ्रेंड्सग्रुप मध्ये वावरत असे ।
आता नवीन कुणाशी मैत्री करण्यास मन धजावत नाही
कुणी हात पुढे केला तर आवडतही नाही ।।
-------------------------------------------------------------------------------------------------------
का कोण जाणे, गेल्या काही दिवसांत उदास वाटत आहे. स्वच्छ आकाशावर ढगांचं मळभ दाटून आल्यासारखं!
त्या उदासीनतेत वरील शब्द सुचलेत, कविता समजून सहन करा.
मला कविता करता येत नाहीत हे तर आपण जाणताच!
लेखन निर्दोष असावे म्हणून काही चुका असतील तर नक्की सांगा.
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------
छान आहे..
छान आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण कविता न वाटता लेख वाटतोय ..
पण कविता न वाटता लेख वाटतोय .
छान आहे >>> धन्स![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पण कविता न वाटता लेख वाटतोय ..> तेच तर...
मलाही असच वाटल होत
ही कविता होती
ही कविता होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साँरी मी लेख समजुनच वाचुन काढलं
चांगलाच घोळ घातलाय का मी?
चांगलाच घोळ घातलाय का मी?
चांगलाच घोळ घातलाय का मी?>>
चांगलाच घोळ घातलाय का मी?>>
माझ्यामते नाही. ९०% कविता गद्यच वाटतात.
कवितेबद्दल: फेज ऑफ लाईफ. वाटतं असं अधून मधून.
पण खाण्याबद्दल नेहमी बाहेरचे खाऊन खाऊन असे वाटू शकते, शरीर स्वीकारतही नाही असे खाणे.
वय झालंय का?
वय झालंय का?
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वय झालंय का>> आताशा दिसत नाही
वय झालंय का>> आताशा दिसत नाही हो नीट, की ऐकु येत नाही.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खरच वय झालय
माझ्यामते नाही. ९०% कविता
माझ्यामते नाही. ९०% कविता गद्यच वाटतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कवितेबद्दल: फेज ऑफ लाईफ. वाटतं असं अधून मधून>>>>
खुप खुप धन्स मानवजी
छान !
छान !
मस्त
मस्त
किल्ली, मला प्रचंड रिलेट झालं
किल्ली, मला प्रचंड रिलेट झालं. माझ्याबाबतीत 'का' चं उत्तर माझ्याकडे आहे पण आता मागे जाणं नाही
मला प्रचंड रिलेट झालं. >> हो
मला प्रचंड रिलेट झालं. >> हो का
'का' चं उत्तर>> नाहीये माझ्याकडे , उगाच बोर झालय
रिलेट झालं.
रिलेट झालं.
असं जास्त वाटायला लागलं की मी फ्रेंड्स चे एपिसोड बघते.माझं सगळं वाटणं परत कमी होऊन जगायची एनर्जी रिचार्ज होते.
किल्ली, जसा जातोय तसा वेळ जाऊ
किल्ली, जसा जातोय तसा वेळ जाऊ दे. सर्व नीट होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जसा जातोय तसा वेळ जाऊ दे.
जसा जातोय तसा वेळ जाऊ दे. सर्व नीट होईल>>> ओके.. बघुया, काळाच औषध आहेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फ्रेंड्स चे एपिसोड> पाहिले नाहीत, ऐकलय खुप ह्याबद्दल.. कुठे मिळतील?
छान लिहिलय
छान लिहिलय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किल्लीतै भारी जमलीय कविता..
किल्लीतै भारी जमलीय कविता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फ्रेंड्स चे एपिसोड> पाहिले
फ्रेंड्स चे एपिसोड> पाहिले नाहीत, ऐकलय खुप ह्याबद्दल.. कुठे मिळतील?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>
असं नाही बोलू, पाप लागतं
मला लिंक सापडली की देते, मी फ्रेण्ड्स ची पारायणं केलीयेत, इतकंच काय तर फक्त फ्रेण्ड्स बघता यावं म्हणुन दर महिन्याला मी नेट्फ्लिक्सचे १९$ चुपचाप भरते
धन्स रिया
धन्स रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असं नाही बोलू, पाप लागतं>> अय्या हो का? स्वारी हं
मला लिंक सापडली की देते>> हो द्या
फक्त फ्रेण्ड्स बघता यावं म्हणुन दर महिन्याला मी नेट्फ्लिक्सचे १९$ चुपचाप भरते>> इतकं भारीये का? पाहिलच पाहिजे आता तर
धन्स
जुई आणि पण्डितजी ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)