|| शुभ दिपावली ||

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.

panati2.JPGPanati1.JPGpanati3.JPGpanati4.JPG

पुढच्यावेळी कोणाला हव्या असतील तर सांगा, पुढच्यावर्षी दिवाळीसाठी फराळाच्या बदल्यात पणत्या योजना अमलात आणायचा विचार चालू आहे. Happy

त्यानंतर आला आकाशकंदील. मायकेल्स मधुन बांबुच्या काड्या, कागद, डिंक असे सगळे सामान आणले आणि बनवला.

Akashkandil.jpg

बाकी मी केलेला फराळ मात्र फोटो काढण्यालायक झालेला नाही त्यामुळे आईने पाठवलेले फराळाचे पार्सल आले की मग त्याचा फोटो टाकेन. Happy
|| शुभ दिपावली ||

रुनी, पणत्या प्रचंड सुंदर आणि त्यावरची कलाकुसरही तेवढीच तोलामोलाची.
कंदिल रेसिपी तू मला देणार आहेस. काल मायकेल्स मधून साध्या कंदिलाचं सामान आणलं. पण आमच्या इथलं मायकल्स काही ग्रेट नाही अशी माझी समजूत आहे. साध्या साध्या गोष्टी शोधायला कित्तीतरी वेळ लागला Sad
माझा कंदिल तुझ्या नी अमृताच्या तुलनेत इयत्ता पहिलीतला वाटतोय. Proud

मस्त!!
दिवाळीच्या शुभेच्छा! Happy
(यातल्या काही पणत्या मला मिळालेल्या आहेत, टुकटुक Wink ) टी लाईट्स ठेवलेले फोटोही मस्त आलेत. एकात तेल वात घालून बघते.

कातील झाल्यात पणत्या. खूपच छान. अशा पणत्या देणार असशील तर पुढच्या वर्षी मी सगळा फराळ घरी बनवायला तयार आहे Happy

रुनी, पणत्या खूपच सुरेख.
तुम्हा दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्याही कडे विकत आणलेल्या भरपूर डिझायनर पणत्या आहेत त्यात तेल वगैरे घातलं तर वाटच लागेल त्यांची पण टी लाईटस घालून मस्तच दिसतात.
रुनी, पुढच्या वर्षी वेगवेगळे शेप्स करायला शिक.

मस्त, खुप सुंदर्..मलाही पटेल कडे यंदा सही पणत्या मिळाल्यात पण, स्वतः केलेल्या पणत्यांची बातच और आहे..
ऑर्डर घ्या.

फारच सुरेख झाल्यात पणत्या. ग्लेझ चढवून भट्टीत भाजून केलेल्यांत तेल घालता येतं. पण तुझ्या हातानं रंगवलेल्या फार फार सुंदर दिस्ताहेत.

रुनी,

एक विसरले विचारायला, ते जरा दुकांनाची नाव सांगशील का? म्हणजे ते बांबू,तो पेपर वगैरे नक्की कुठून पटपट व चांगले मिळेल? मी काल रात्री मायकल, जोअ‍ॅन्स मध्ये गेले पण एक वस्तू धडपणे अशी पटपट मिळत न्हवती. काल इथले वाचून विचार चालू आहे कंदील बनवायचा म्हणून आज रात्री जमले तर. Happy

रुनी, जबरी आहेत पणत्या !!!!
फोटोवरुन नजरच हटत नाहिये Happy
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

उत्स्फुर्त प्रतिकियांबद्दल धन्यवाद सगळ्यांना.

पुढच्यावर्षी सगळ्यांसाठी ऑर्डरी घेईन पणत्यांच्या (तेवढ फराळाचे मात्र लक्षात ठेवा :))

अ.गो. मायबोलीवरचे कराडकर, फ, लिंबुटींबु, आरती कोपरकर आणि बरेच जण करतात मातीकाम. त्यांच्या मानाने मी ज्यु. आर्टीस्टच आहे ग.

मंजु, धनु पाठवेन की भारतात पण. Happy

मृ. ग्लेझींग करायलापण काही पणत्या ठेवल्यात पण त्यात रंग फार लिमीटेड असतात, आणि माझ्यासाठी ग्लेजींग हा एक जुगार आहे (कधी मटका लागेतो तर कधी नाही), मुख्य म्हणजे चित्रविचीत्र रंगकामाची हौस भागत नाही म्हणून मग साधे अ‍ॅक्रीलीक कलर वापरले.

मनु पॉटरी क्लास मध्ये सगळी सोय असते पॉटरी व्हील, भाजण्यासाठी भट्टी, ग्लेझींग इ. साठी.

सायो, मनु मायकेल्स मधुन आणले सामान आकाशकंदीलाचे पण कुठल्याच मायकेल्स मध्ये ते सगळे एकाच जागी मिळत नाही, बर त्या दुकानदाराला आकाशकंदीलाचे सामान द्या असेही काही सांगता येत नाही. जरा शोधाशोध करावीच लागते. त्यातल्या बांबुसारख्या काड्या मला क्राफ्ट सेक्शन मध्ये मिळाल्या, तर लागणारा रंगीत पातळ पेपर गीफ्ट रॅपींग पेपरच्या जवळच्या रॅकमध्ये.

रूनी, अतिशय सुरेख झाल्यात पणत्या! टी लाईट लावून तर अजूनच सुंदर दिसताहेत! दिवाळीच्या शुभेच्छा!

पणत्या आणी कंदील दोन्ही अप्रतीम!!
तुला आणी तुझ्या परीवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा!! Happy

Pages