|| शुभ दिपावली ||

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी यावर्षीच्या दिवाळीची तयारी १ महिन्याआधीच चाकावर पणत्या करण्यापासून झाली. मग त्या पणत्या वाळवुन, भट्टीतुन भाजून आणल्या आणि घरी रंगवल्या. चाकावर मातीकाम करायला लागुन फार दिवस झाले नाहीत आणि पणत्या पहिल्यांदाच करत होते त्यामुळे विश्वास नव्हता की खरच बनवता येतील की नाही ते, आता पुढच्यावर्षी अजून जास्त बनवेन.

panati2.JPGPanati1.JPGpanati3.JPGpanati4.JPG

पुढच्यावेळी कोणाला हव्या असतील तर सांगा, पुढच्यावर्षी दिवाळीसाठी फराळाच्या बदल्यात पणत्या योजना अमलात आणायचा विचार चालू आहे. Happy

त्यानंतर आला आकाशकंदील. मायकेल्स मधुन बांबुच्या काड्या, कागद, डिंक असे सगळे सामान आणले आणि बनवला.

Akashkandil.jpg

बाकी मी केलेला फराळ मात्र फोटो काढण्यालायक झालेला नाही त्यामुळे आईने पाठवलेले फराळाचे पार्सल आले की मग त्याचा फोटो टाकेन. Happy
|| शुभ दिपावली ||

रुनी, ग्रेट आहेस गं तू. माझ्या माहितीत तरी मातीकाम येणारी तू पहिलीच आहेस. फारच सुरेख झाल्या आहेत पणत्या आणि कंदीलही. पार्ल्यात दिवाळीत ग्राहकपेठ लागायची त्याची आठवण करुन दिलीस Happy

भारीच आहेस ग पणत्या बनवल्यास म्हणजे.आकाशदिवा पण खूप सुंदर झाला आहे.मायकेल्स माझं पण आवडतं दुकान.तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा !!

रुनी,
झकास! पणत्या व कंदील तर फंटूस. Happy

मी पुढच्या वर्षी ट्रेड ऑफ करायला तयार आहे पणती व कंदीलाच्या बदल्यात फराळ. ह्यावर्षी कंदील करायचा विचार होता पण अजुन फराळ पुर्ण नाही तर कंदील कधी करणार? ऑफीसवरून येवून फराळ करायला रोज २ वाजताहेत. आजच पणत्या घेवून आल्या. सहाच आणल्या.

भारी! Happy

पणत्या आणि कंदिल खूपच छान. रंग संगती पण सुंदर केली आहे.
मागच्या वर्षी मी पण पणत्या बनवल्या होत्या पण त्या तळाशी जाड राहील्या होत्या.

मनुस्विनी मातीकामाचे (pottery) क्लास मध्ये भट्टी असते. तिथे येतात भाजता.

सर्वात आवडली ती रंगसंगती- पणत्या आणि कंदील दोन्ही आकर्षक रंगसंगतीमुळे खूपच उठावदार दिसत आहेत.. फार सुंदर.

अहो शुक शुक, भारतात माल पोचवणार का? Wink

रुनी, एकदम सोल्लीड झाल्यात पणत्या आणि आकाशकंदिल पण..

तुला दिवाळीच्या भरघोस शुभेच्छा!!

रुनी
पाय कुठेत तुमचे? माझा आ झालेला अजुन मिटला नाही. काय सॉलिड केल्या आहेत पणत्या. आणि रंगवल्यापण किती सुरेख . शब्द अपुरे पडतिल. ग्रेट ग्रेट ग्रेट. फोटो पण किती सुरेख आलेत.
मस्तच. मला पण हव्यात. मी पण मंजुसारखच विचारतेय, भारतात माल पोचवणार का? अरे हो आकाश कंदिल पण सुरेख .
धनु.

(कितीही वेळा बघितलं तरी समाधानच होत नाहिये.)

Pages