यापूर्वीचा भाग पहिला : https://www.maayboli.com/node/64916
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
Aaranyak – Flora (Part -02 A)
“आरण्यक मधील सखे सोबती“ आपण गेल्या भागात पाहिले.
हे सखे सोबती ज्या हिरवाईमुळे जमले, वाढले, ती हिरवाई मात्र अतिशय कमी पाण्यामुळे फार कष्टाने विचारपूर्वक वाढवायला लागली आहे आहे. याचा तपशील कदाचित पुढे एखाद्या भागात येईलच.. . . . .
आता तर ह्या हिरवाईला फळं , फुलंही लागायला लागलीयेत.
जेव्हा जेव्हा तिथे मला जायची संधी मिळे तेव्हा आवड म्हणून या हिरवाईची प्रकाश चित्रे मी टिपत असे.
या हिरवाईची सध्याची आणि वेगवेगळ्या वेळी काढलेली प्रकाश चित्रे तुमच्यासाठी . .. . (भाग – ०२ अ)
प्रचि १: आरण्यक मधलं माझं एक लाडकं झाड म्हणजे कहांडोळ. याला पांढरीचं झाड असंही म्हणतात..
आणि पांढऱ्या सालीचं हे झाड रात्रीच्या अंधारात चमकत असल्यामुळे त्याला भुतांचं झाड असही म्हणतात.
प्रचि २: उन्हाळ्यात त्याला येणारी ही फळं ?
आणि त्याच्या वरचे Silk Cotton Tree Bugs. (हे खरं तर सावरीच्या झाडावर जास्त असतात).
प्रचि ३: हा त्या कहांडॊळच्या फळाचा क्लोज अप
प्रचि ४: माझं अजून एक लाडकं झाड म्हणजे कदंब
प्रचि ५: आणि हे त्याच फळ.
प्रचि ६: हा लाडका मोह
प्रचि ७: हे मोहांच्या फुलाचे देठ
प्रचि ८: आणि ही शिजवलेल्या आंबेमोहोर तांदळाचा वास येणारी धुंद करणारी मादक मोह-फुले
प्रचि ९: हा बाळ- मोह...
प्रचि १०: हे आकाशनीम म्हणजेच गगनजाई अर्थात बुचाचं झाड…..
प्रचि ११: आणि ही बारतोंडी अर्थात नोनी
प्रचि १२: हा लाडका बहावा
प्रचि १३: हे जांभळ्या कांचनाचे पान
प्रचि १४: हा उंदीरमार अर्थात गिरिपुष्पाचा बहर, तोही निळ्या नभाच्या पार्श्वभूमीवर
प्रचि १५: हे गिरिपुष्पाचे तुरे
प्रचि १६: आणि हा तुऱ्याचा क्लोज-अप
प्रचि १७: बोगनवेल – ०१
प्रचि १८: बोगनवेल – ०२
प्रचि १९: बोगनवेल – ०३
प्रचि २०: ही कुर्डूची फुलं (श्रावणातल्या कथांपैकी केनी कुर्डूची भाजी करतात ती हीच)
प्रचि २१: त्या फुलांवरची Hover Fly माशी.. Sometimes also called as Flower Fly..
प्रचि २२: Vernonia Cinerea चे फुल -०१
हे जांभळ्या रंगाच असतं पण हा फोटो सुकलेल्या फुलाचा आहे ज्यात म्हातारीचे केस आणि सुकलेल्या बिया आहेत..
प्रचि २३: Vernonia Cinerea चे फुल -०२
प्रचि २४: बाई मी लाजाळू गं लाजाळू...
प्रचि २५ : खुळखुळ्याचे फुल-०१, Showy Rattelpod (Clotolaria Family..)
प्रचि २६: खुळखुळ्याचे फुल-०२
प्रचि २७: खाजकुयलीच्या शेंगा
(क्रमश:)
यापूर्वीचा भाग पहिला : https://www.maayboli.com/node/64916
अत्तीशय सुंदर फोटो। किती
अत्तीशय सुंदर फोटो। किती सुंदर झाडे आहेत। भाग्यवान आहात निरु तुम्ही।
अहाहा... डोळ्यान्ना सुखावणारी
अहाहा... डोळ्यान्ना सुखावणारी हिरवाई!! फारच सुन्दर! >>>>+११११११
सुंदर फोटो निरुदा, मज्जा आ
सुंदर फोटो निरुदा, मज्जा आ गया.
सुंदर फोटो निरुदा, मज्जा आ
.
मोहाला फुल कोणत्या सीझनमध्ये
मोहाला फुल कोणत्या सीझनमध्ये लागतात?
मोहाला फुल कोणत्या सीझनमध्ये
मोहाला फुल कोणत्या सीझनमध्ये लागतात?>> उन्हाळ्यात.. तरी फेब्रुवरी ते मे दरम्यान..
वेडोबा, kulu, प्रतिसादाबद्दल
वेडोबा, kulu, प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
ईनमीन तीन ..... तीन, तीन प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.. नांव सार्थ केलंस..
आणि मोहफुलांबद्दल टीना म्हणतेय ते बरोबर आहे..
टीना माझ्यावतीने आधीच (मलाच बघायला उशीर झाला) उत्तर दिलंस हे खरंच छान केलंस..
मी एक जरी प्रतिसाद आला तरी
मी एक जरी प्रतिसाद आला तरी धाग्यावर डोकावते निरु..
टीना माझ्यावतीने आधीच (मलाच बघायला उशीर झाला) उत्तर दिलंस हे खरंच छान केलंस.. >> भोचपणा करायची सवय आणि काय
नाही गं.. खरंच चांगलं केलंस..
नाही गं.. खरंच चांगलं केलंस... _/\_ _/\_
आज सगळे भाग पाहीले. मुरबाड
आज सगळे भाग पाहीले. मुरबाड बारवी डॅम, कल्याण प्रवास केलाय. सुंदरच आहे सारं पण जोपासणं तितकंच कठीण. तुम्ही खूप भारी काम केलंत. प्र.चि. अगदी बोलकी आहेत. धन्यवाद....
पाथफाईंडर, माहिती नाही कसल्या
पाथफाईंडर, माहिती नाही कसल्या शेंगा असत. जरा लवकरच उत्तर लिहिले आहे त्याबद्दल सॉरी.
दत्तात्रय साळुंके,
दत्तात्रय साळुंके,
प्रतिसादाबद्दल आभार...
अफाट
अफाट
Pages