Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाढदिवसानिमित्त छोटंसं गेट
वाढदिवसानिमित्त छोटंसं गेट टुगेदर ठेवलंय. १० मोठे आणि ५ लहान मुलं असतील.सगळे मराठीच आहेत. पोळ्या मला नीट जमत नाहीत आणि तयार पोळ्या मिळणं शक्य नाही. फक्त भाताचा प्रकार असलेला मेन कोर्स नको वाटतोय. काय बेत करता येईल ?
इडली-चटणी-साबार
इडली-चटणी-साबार
पाव भाजी ,पुलाव
मिसळ-पाव
जोडिला ढोकळा,कॉकटेल समोसा, बटाटेवडे अस अॅड करता येइल
धन्यवाद प्राजक्ता लगेच
धन्यवाद प्राजक्ता लगेच रिप्लाय दिल्याबद्दल. पाव भाजी सोडून (आत्ताच एका ठिकाणी झालाय तो बेत म्हणून) बाकी बघते . बरं तुम्ही लोकं भाजी वगैरे गरम कसं ठेवता? कि ऐन वेळेला परत गरम करायची?
तिखट मिठाच्या पुऱ्या, बटाटा
तिखट मिठाच्या पुऱ्या, बटाटा सुकी भाजी पण करता येईल. मदत हवी मात्र कारण पुऱ्या खूप करायला लागतील.
धन्यवाद अन्जू . पुऱ्या होतं
धन्यवाद अन्जू . पुऱ्या होतं तसं लक्षात, जमतील पण. पण तेच, खूप लागतील आणि तो तेलकट वास घरभर राहील ते वेगळंच. तो वास जायलाच २ दिवस लागतील.
सगळी मराठी मंडळी म्हणजे नुसता
सगळी मराठी मंडळी म्हणजे नुसता भात नाही चालणार.
टॉर्टिला थोडं तूप लावून भाजून देता येतील.
पाव बटर लावून ओव्हनमधे गरम करून, ग्रेवी बरोबर.
पुर्यांचा कुटाणा खूप होतो. आम्ही १२ मोठे आणि ८ लहान होतो, तर २-२.५ तास पुर्याच तळत होतो.
मिसळपाव , वडापाव व दहीबुत्ती
मिसळपाव , वडापाव व दहीबुत्ती . गोड काय ठरवलंय ?
Please suggest menu for 20
Please suggest menu for 20 ladies .. want to serve around 11 am for Ganpati darshan ..>>>>>>>
मी नुकताच हा मेनू ठेवला होता
१. लेमन राईस्
२. अळूवडी (फ्रोझन होती ती कापून शॅलो फ्राय केली)
३. तळणीचे मोदक (आधी करून ठेवले होते)
फक्त भाताचा प्रकार असलेला मेन कोर्स नको वाटतोय. काय बेत करता येईल ?
मिसळ-पाव, शेवटी दही बुत्ती (गोड मधे केक असेल असं गृहीत धरलेय कारण वाढदिवसाची पार्टी आहे)
समोसा-चाट किंवा कचोरी -चाट आणि दही बुत्ती
सगळी मराठी मंडळी म्हणजे नुसता
सगळी मराठी मंडळी म्हणजे नुसता भात नाही चालणार.>> म्हणूनच नुसता भाताचा मेन कोर्से नको आहे.
टॉर्टिला थोडं तूप लावून भाजून देता येतील.>> कल्पना चांगली आहे, पण चव कशी लागेल ? मागे मक्याचे टॉर्टिला आणलेले , भयाण लागत होते.
काल परवाच गव्हाचे टॉर्टिला पाहिले , पण चवीबद्दल शंका आहे.
गोड काय ठरवलंय ?>> केक आहे म्हणून गोड अजून काही नसेल.
गोड मधे केक असेल असं गृहीत धरलेय कारण वाढदिवसाची पार्टी आहे >+१
जर टॉर्टिला असतील तर काकडी-कांदा-टोमॅटो सलाड ,दही बुत्ती, पंजाबी छोले, एक कोरडी भाजी , डाळ तडका आणि जीरा राइस
टॉर्टिला नसेल तर मिसळ-पाव, पुलाव , दही बुत्ती
हा मेनू कसा वाटतोय ?
एक कोरडी भाजी : मटार-बटाटा, अजून काय ऑपशन्स आहेत?
(सगळे लहान मुलं भाजी-पोळी(च) आवडीने खाणारे आहेत. गुणी बाळं!)
धन्यवाद
तुम्ही कुठे आहात? भारतात असाल
तुम्ही कुठे आहात? भारतात असाल तर पोळ्या केंद्र कुठे तरी असेलच असं आपलं मला तरी वाटतं.
दक्षिणेत नसतं. आणि
दक्षिणेत नसतं. आणि रेस्टॉरंटमध्ये मिळत असतील तरी कशा मिळतील याची खात्री नसते. ठराविक ठिकाणीच चांगल्या मिळतात.
तुम्ही कुठे आहात? भारतात असाल
तुम्ही कुठे आहात? भारतात असाल तर पोळ्या केंद्र कुठे तरी असेलच असं आपलं मला तरी वाटतं.> भारताबाहेर.
भारताबाहेर असाल तर फ्रोझन
भारताबाहेर असाल तर फ्रोझन सेक्षन बघा. पराठे / कुलचे नक्की मिळतील. फक्त गर म करायला लागतात. बरोबर छोले, जिरा राईस किंवा बुट्टी चालेल. शिवाय सामोसे/ अळूवडी / ढोकळा ह्यापैकी काही साईड डिश म्हणुन पण चालेल
25-30 जण जेवायला येणार आहेत
25-30 जण जेवायला येणार आहेत.महाराष्ट्रीयन मेनू सुचवा ना. बहुतेक सर्व सिनीयर सिटीझन आहेत.
भाज्यांचा पुलाव, रायते
भाज्यांचा पुलाव, रायते/कोशिंबीर, चपात्या, एखादी भाजी, उसळ, वरणाचा एखादा प्रकार, साधा भात, हिरवी चटणी, लिंबु, गाजर हलवा/फ्रुट सलाड.
पुलाव/मसालेभात,फुलके/चपात्या
पुलाव/मसालेभात,फुलके/चपात्या,ओल्या वाटण्याची उसळ,वरण भात,का.ची.को/ओल्या नारळाची चटणी,गोड म्हणून शेवयांची खीर/गुलाबजाम.कुरडया किंवा पापड ऐच्छिक.
रायाला मम! वरणाचा प्रकार असेल
रायाला मम! वरणाचा प्रकार असेल तर थोडा मऊसर भात ! पुलाव मोकळा व फडफडीत असतो त्यापेक्षा दहीबुत्ती किंवा माझी रिक्षा
https://www.maayboli.com/node/68235#new हा भात मऊ व ओलसर होतो. जेनासाठी योग्य
गोडात शिरा, रवा / शेव ई/लाल भोपळा खीर , गुजा, रसगुल्ले
भरपूर वेऴ आणि मदत असेल तर
भरपूर वेऴ आणि मदत असेल तर
घड्याळातल्या बाराच्या आकड्यापासून मागे -
ं मीठ, लिंबाची फोड, गाजर / फ्लावर/ मटारचं लोणचं , कोथिंबीर चटणी, काकडी कोशिंबीर नाहीतर मुळ्याचा चटका , वांगी / फ्लावर / बटाटे / फरसबी या पैकी एक सुकी भाजी . मेथी / पालक./ अळू / अंबाडी या पैकी एक ,; पानात मध्यावर साध्या भाताची मूद = त्यावर साधं वरण, तूप, ; २-३ वाजताच्या पोझिशनला कुरड्या, सांडगे , पापड, त्याच्या खाली पोळी / फुलका / पुरी ;
ताटाबाहेर उजवी कडे वाटीत टॉमेटो सार किंवा शेवग्याच्या शेंगांची आ मटी,
गोड पदार्थ -श्रीखंड, जिलबी, पुरण पोळी , बासुंदी, उकडीचे मोदक यापैकी जे जमेल ते
इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय,
इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय, आपण काही साधं सोपं करायचा ट्राय मारला की ज्येनांच्या दृष्टीनं ते रीड - फालतू असतं.
मेन्यू
२५-३० लोक्स म्हणजे पूर्ण जेवण हवं.
- साधा भात, गोडं वरण आणि वर लोणकढ्या तुपाची धार
- मसाले भात / फ्लॉवर किंवा तोंडली घालून मस्तच होईल
- भातात फ्लॉवर नसेल तर फ्लॉवर + बटाटा + मटार अशी परतून भाजी नं १
- पालकाची चिंच - गूळ घातलेली पातळ भाजी नं २
(भाजी नं २ च्या ऐवजी एखादी उसळही करता येऊ शकेल जरा रस राखलेली. पण माझ्यामते पातळ भाजी जास्त चांगली)
- कांदा खात असतील तर कांद्याची खेकडा भजी नाही तर काहीही कुककुरीत तळलेला आयटम (मिक्स डाळ वडा इ) किंवा पापड कुरडया + अळूवडी / खमण
- पोळी - फुलके किंवा घडीच्या
- बाजूला वाटीत ताक / मठ्ठा / कढी
- काकडीची दह्यातली कोशिंबीर किंवा खमंग काकडी किंवा गाजराची कोशिंबीर
- हिरवी चटणी
- मीठ, लिंबू
- गोडात खव्याच्या पोळ्या, गुलाबजाम, इ पण खव्याच्या पोळ्या जास्त भाव खातील.
<<इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय
<<इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय, आपण काही साधं सोपं करायचा ट्राय मारला की ज्येनांच्या दृष्टीनं ते रीड - फालतू असतं. Wink>>
अगदी खरे आहे
25-30 जण जेवायला येणार आहेत
25-30 जण जेवायला येणार आहेत.महाराष्ट्रीयन मेनू सुचवा ना. बहुतेक सर्व सिनीयर सिटीझन आहेत. >>>> घरी करणार आहात का???? ईतक्या लोकांसाठी जेवण बनवायला खुप वेळ अन कष्ट लागतात त्यापेक्षा सरळ कॅटरर ला ऑर्डर द्यायची, ते सुचवितात छानसा मेनु. अन मुख्य म्हणजे आपले त्रास वाचतात
<इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय, आपण काही साधं सोपं करायचा ट्राय मारला की ज्येनांच्या दृष्टीनं ते रीड - फालतू असतं. Wink>> नुसते ज्येनाच नाहीतर बहुतेक सर्वच जणांचे म्हणाने असते की आपण काय नेहमी येतो का??? करायच की काहितरी चांगले
विबिंचा प्रतिसाद १००टक्के
विबिंचा प्रतिसाद १००टक्के पटला. केट ररला ऑर्डर देणे सगळ्यात उत्तम. एवढ्या लोकांचा स्वयंपाक म्हणजे खूप दमछाक होते.
माझ्याकडे १५ लोकांचे get together
होते तेव्हा मी तेच केलं. केट रर अतिशय उत्तम निघाला.
अगदी साग्रसंगीत महाराष्ट्रीयन जेवण.
मुगाची / मिक्स डाळींची मसाला
मुगाची / मिक्स डाळींची मसाला खिचडी - कढी, पापड- कुरडया, मेथी पराठे, टोमॅटॉ- मटार- फ्लॉवर- बटाटा रस्सा, मिनी बटाटेवडे- चटणी, गुलाबजाम किंवा गाजर हलवा किंवा पाईनॅपल शीरा......
काल रात्री दोन अडीचला हे
काल रात्री दोन अडीचला हे मेन्यू वाचून इतके क्रेविंग आले. आज वरण भात व फ्लावर बटाटा मटार भाजी करणार आहे घरी जाउन.
इतक्या छान मेनू ला फालतू कसे म्हणू शकते कोणी? त्यात मेहनत किती आहे. मेधा यांची पोस्ट परफेक्ट आहे.
इतक्या छान मेनू ला फालतू कसे
इतक्या छान मेनू ला फालतू कसे म्हणू शकते कोणी? >>> फालतु कोणी म्हणत नसावे पण हे सगळॅ रोजच्या जेवणातिल प्रकार आहेत, त्यामुळे जेव्हा कोणी दुसरीकडे जातात तेव्हा नेहमी पेक्षा वेगळे काहितरी अपेक्षित असते बर्याच जणांना.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आमच्याकडे पाहुणे आले की मटण / चिकन सोबत भाकरी / चपाति च्या जागी ईडली असते, अन ते पाहुण्यांना आवडते असे ते स्वतः सांगतात की आवडतो हा प्रकार
<<इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय
<<इथेच कुठेतरी वाचलेलं आठवतंय, आपण काही साधं सोपं करायचा ट्राय मारला की ज्येनांच्या दृष्टीनं ते रीड - फालतू असतं. Wink>>
<<
सहमत.
स्वतःच्या घरात सुना रोज "पथ्याचं" करून गिळायला लावत असतात. बायको असली तरी बिच्चारी किचनची मालकिण नसल्याने तीही आहे तेच कसेबसे सहन करीत असते..
कित्ती सहन करावं पुरुषांनी म्हणतो मी! लहानपणी आज्जी मिठाचे बिन तिखटाचे वेगळे पोहे करून खाऊ घालणार. मग आई तव्यावरून ताटात गरम पोळ्या घालणार. बायको आल्यावर तिची चव आईइतकी आवडू लागायला म्हातारप्ण उजाडणार, अन मग डायरेक्ट सूनबाई येऊन म्हातार्यांना साधं सात्वीक???
सो, बाहेर जेवायला आलो की जरा लेट देम स्प्लर्ज. बाकी सगळं रेडिमेड मागवा. एकादा निगुतीने केलेला भर्पूर तेल-तूप तिखट मीठ साखरवाला पदार्थ बनवा.
अन्यथा,
सूनबाईने बनवल्या इतकंच ते फालतू अस्तं
त्यापेक्षा हॉटेलात जाऊन जेवा
त्यापेक्षा हॉटेलात जाऊन जेवा
हॉटेल, नक्कीच. पण मग कुणाकडे
हॉटेल, नक्कीच. पण मग कुणाकडे पार्टीला बोलावले जाण्यात काय प्वाइंट? मी आपला ज्येना प्वाइंट ऑफ व्ह्यू मांडला.
ज्येना प्वाइंट ऑफ व्ह्यू >>
ज्येना प्वाइंट ऑफ व्ह्यू >> हा फार लवचिक असतो ना पण . त्यांच्य्या मनात असलं तर टाको बार किंवा पास्ता वगैरे सुद्धा ' आम्हाला कधी खायला मिळणार असले भारी प्रकार ' म्हणत खातील. आणि होस्ट जर नावडत्या कॅटेगरीतले असले तर ' हे काय आम्ही रोज असलंच जेवतो' पासून काही ना काही खुसपटं काढणार. आयतं पानावर वाढलंय तर चार लोकांबरोबर गप्पा मारत खावं गुमान तर ते नाही :रागः
'आमच्यात ना'' अशाने सुरुवात होणार्या सर्वच भाषणांना वैतागलेली बाहुली ..
माझ्याकडे सुट्टीत दहा दिवस
माझ्याकडे सुट्टीत दहा दिवस साधारण दहा- बारा मंडळी राहायला येणार आहेत ( मामाच्या / काकाच्या गावाला जाऊया !) तर मामी / काकूला (पक्षी-मला) सकाळचे खाणे, आणि दोन्ही जेवणं असं बेत करून हवे आहेत. प्लिज मदत करा. मेनू सोपा हवा ही प्राथमिक गरज
सकाळचं खाणं - पोहे, सांजा, साबुदाणा खिचडी, शेवया उपमा, शिरा (अजून पाच आयडिया हव्यात म्हणजे तेच रिपीट केलं असे टोमणे मिळणार नाहीत)
आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हवंच
भाजी - कोबी, कांदा-बटाटा-मटार रस्सा, फ्लॉवर, छोटी वांगी रस भाजी, लाल-भोपळा, (अजून पाच-सहा आयडिया)
कोशिंबीर - काकडी,कांदा-टोमॅटो, बीट, गाजर, पाती कांदा, भोपळा भरीत (अजून पाच-सहा आयडिया)
रात्रीच जेवण मला खिचडी नाहीतर कढीभात सोडून काहीच सुचत नाहीय पण फक्त हेच चालनार नाही, one dish meal चालेल तर काय करू! (जितके सुचवाल तेवढं!)
Pages