यापूर्वीचा भाग पहिला : https://www.maayboli.com/node/64916
आरण्यक - हिरवाई (भाग – ०२ अ)
Aaranyak – Flora (Part -02 A)
“आरण्यक मधील सखे सोबती“ आपण गेल्या भागात पाहिले.
हे सखे सोबती ज्या हिरवाईमुळे जमले, वाढले, ती हिरवाई मात्र अतिशय कमी पाण्यामुळे फार कष्टाने विचारपूर्वक वाढवायला लागली आहे आहे. याचा तपशील कदाचित पुढे एखाद्या भागात येईलच.. . . . .
आता तर ह्या हिरवाईला फळं , फुलंही लागायला लागलीयेत.
जेव्हा जेव्हा तिथे मला जायची संधी मिळे तेव्हा आवड म्हणून या हिरवाईची प्रकाश चित्रे मी टिपत असे.
या हिरवाईची सध्याची आणि वेगवेगळ्या वेळी काढलेली प्रकाश चित्रे तुमच्यासाठी . .. . (भाग – ०२ अ)
प्रचि १: आरण्यक मधलं माझं एक लाडकं झाड म्हणजे कहांडोळ. याला पांढरीचं झाड असंही म्हणतात..
आणि पांढऱ्या सालीचं हे झाड रात्रीच्या अंधारात चमकत असल्यामुळे त्याला भुतांचं झाड असही म्हणतात.
प्रचि २: उन्हाळ्यात त्याला येणारी ही फळं ?
आणि त्याच्या वरचे Silk Cotton Tree Bugs. (हे खरं तर सावरीच्या झाडावर जास्त असतात).
प्रचि ३: हा त्या कहांडॊळच्या फळाचा क्लोज अप
प्रचि ४: माझं अजून एक लाडकं झाड म्हणजे कदंब
प्रचि ५: आणि हे त्याच फळ.
प्रचि ६: हा लाडका मोह
प्रचि ७: हे मोहांच्या फुलाचे देठ
प्रचि ८: आणि ही शिजवलेल्या आंबेमोहोर तांदळाचा वास येणारी धुंद करणारी मादक मोह-फुले
प्रचि ९: हा बाळ- मोह...
प्रचि १०: हे आकाशनीम म्हणजेच गगनजाई अर्थात बुचाचं झाड…..
प्रचि ११: आणि ही बारतोंडी अर्थात नोनी
प्रचि १२: हा लाडका बहावा
प्रचि १३: हे जांभळ्या कांचनाचे पान
प्रचि १४: हा उंदीरमार अर्थात गिरिपुष्पाचा बहर, तोही निळ्या नभाच्या पार्श्वभूमीवर
प्रचि १५: हे गिरिपुष्पाचे तुरे
प्रचि १६: आणि हा तुऱ्याचा क्लोज-अप
प्रचि १७: बोगनवेल – ०१
प्रचि १८: बोगनवेल – ०२
प्रचि १९: बोगनवेल – ०३
प्रचि २०: ही कुर्डूची फुलं (श्रावणातल्या कथांपैकी केनी कुर्डूची भाजी करतात ती हीच)
प्रचि २१: त्या फुलांवरची Hover Fly माशी.. Sometimes also called as Flower Fly..
प्रचि २२: Vernonia Cinerea चे फुल -०१
हे जांभळ्या रंगाच असतं पण हा फोटो सुकलेल्या फुलाचा आहे ज्यात म्हातारीचे केस आणि सुकलेल्या बिया आहेत..
प्रचि २३: Vernonia Cinerea चे फुल -०२
प्रचि २४: बाई मी लाजाळू गं लाजाळू...
प्रचि २५ : खुळखुळ्याचे फुल-०१, Showy Rattelpod (Clotolaria Family..)
प्रचि २६: खुळखुळ्याचे फुल-०२
प्रचि २७: खाजकुयलीच्या शेंगा
(क्रमश:)
यापूर्वीचा भाग पहिला : https://www.maayboli.com/node/64916
वेड. लावणारे फोटो.
वेड लावणारे फोटो.
कुठे आहे हे तुमचे आरण्यक?
कोदंडपाणी... पहिल्या वहिल्या
कोदंडपाणी... पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
आरण्यक बदलापूरला आहे...
आवडले असल्यास ही पहिल्या
आवडले असल्यास ही पहिल्या भागाची लिंक...
https://www.maayboli.com/node/64916
डोळे निवले तुमची प्रचि बघून.
डोळे निवले तुमची प्रचि बघून.
मे महिन्यात मुरबाड ते बदलापूर प्रवास केला बारवी डॅम मार्गे. त्या परीसरातून जाताना वाटत होते,आरण्यक इथेच असेल जवळपास.
डोळ्यांचे पारणे फिटले.
डोळ्यांचे पारणे फिटले. धन्यवाद हे फोटो शेअर केल्याबद्दल! अगोदरचा भागही सुरेखच होता. लेखाच्या खाली क्रमश: असलेलं मला आवडत नाही. पण तुमच्या लेखाखाली क्रमश: पाहून बरे वाटले. आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
आठ दिवसांपूर्वीच मीही बारवी डॅम जवळून गावी आलो. तो परिसर मला आवडतो.
निरुदा, तुमच्या आरण्यकला भेट देऊ शकतो का?
काय सुंदर फोटो आहेत सगळेच!
काय सुंदर फोटो आहेत सगळेच! डोळे निवले अगदी!
मस्तच निरु..
मस्तच निरु..
निरु **चे अन छोट्या मोठ्या ध***च्या तसेच लो***ड आणि अश्या बर्याच काही फोटोंच्या प्रतिक्षेत (लिहिताना भान आलं अन म्हटल आपण स्पॉयलर द्यायला लागलोय कि काय..हे ना चॉलबे .. म्हणुन थांबली )
बरय लेखमालिका/प्रचिमालिका लिवायला घेताय ते.. सविस्तर फ्लोराचं वर्णन अन प्रचि येऊदेत..
Niru,
Niru,
Spraying sunder lekh ani photos.
Thanks for sharing.
धन्यवाद पाथफाईंडर...
धन्यवाद पाथफाईंडर...
तुमच्या मार्गांपासून जवळच आहे ते....
शाली प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
तुम्ही नक्कीच भेट देउ शकता.. कदाचित लवकरंच तशी संधी येईलंच..
वावे, दीपा जोशी...
वावे, दीपा जोशी... प्रतिसादाबद्दल आभार..
असे प्रतिसाद खरंच हुरूप वाढवतात..
निरु, काय सुंदर प्रचि!
निरु, काय सुंदर प्रचि! डोळ्याचे पारणे फिटले!
@निरू,
@निरू,
गुगल मॅपवर आरण्यक शोधले. सापडले नाही . कृपया अॅड कराल का?
वाह वाह निरू, भन्नाट आलेत
वाह वाह निरू, भन्नाट आलेत सगळेच फोटो. मोह सोडून सगळी झाडं लहानपणी आजूबाजूला होती त्यामुळे मस्त वाटलं फोटो पाहून. आरण्यक प्रत्यक्ष बघण्याचा चान्स मिसला पण पुन्हा कधीतरी
निरु, खूप सुंदर सगळेच फोटो.
निरु, खूप सुंदर सगळेच फोटो.
यांना खुळखुळे म्हणतात का??
यांना खुळखुळे म्हणतात का??
मंजूताई, मनीमोहोर... धन्यवाद.
मंजूताई, मनीमोहोर... प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
मॅगी... धन्यवाद... त्यावेळी आम्हीही मिसलं. ह्या वेळी बघू जमवता येईल का...?
पाथफाईंडर... आरण्यक खाजगी जागा आहे आणि तशीच राहू द्यायची आहे. त्यामुळे गूगल मॅप वर नाही अॅड केलंय..
टीना, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... आणि स्पाॅयलर ना चाॅलबे..
Kavita.., हो.. ह्या खुळखुळ्याच्या शेंगा..
निरू,खूपच सुंदर फोटो.
निरू,खूपच सुंदर फोटो..नेहमीप्रमाणे.
खूप सुंदर
खूप सुंदर
अहाहा... डोळ्यान्ना
अहाहा... डोळ्यान्ना सुखावणारी हिरवाई!! फारच सुन्दर!
अतिसुंदर फोटो
अतिसुंदर फोटो
कित्ती सुरेख आहेत सगळेच फोटो.
कित्ती सुरेख आहेत सगळेच फोटो..
आरण्यक ला भेट द्यायला नक्कीच आवडेल...
अहाहा ! काय सुरेख फोटो निरू
अहाहा ! काय सुरेख फोटो निरू दा !
खाजकुयलीच्या शेंगा!!! नको रे बाबा !!
दूर पळणारी भावली ...
sariva, वर्षे. , मी_आर्या,
sariva, वर्षू. , मी_आर्या, भागवत, स्मिता श्रीपाद, anjali_kool ...
अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
सुंदर. खुळ्खुळ्याच्या
सुंदर. खुळ्खुळ्याच्या सारख्याच अजुन एक प्रकारच्या शेंगा आठवत आहेत. त्या पाण्यात टाकल्यावर फटाफटा नाजुकपणे फुटायच्या. त्याच का या?ह
सुनिधी तुम्हाला अबोली च्या
सुनिधी तुम्हाला अबोली च्या बीया म्हणायच्या आहेत का?
निरुदा खुप सुंदर फोटो.
निरुदा खुप सुंदर फोटो.
सुनिधी तुम्हाला अबोली च्या
सुनिधी तुम्हाला अबोली च्या बीया म्हणायच्या आहेत का?>> अबोलीची फळं फुटतात.. बिया अंदर रयते हय
वो टिना जी भावनाओंको समझो.
वो टिना जी भावनाओंको समझो.
निरु, सगळे फोटो अप्रतिम. आता
निरु, सगळे फोटो अप्रतिम. आता परत एकदा आरण्याक भेट द्यायला हवीच...
@ साधना, धन्यवाद....
@ साधना, धन्यवाद....
<<आता परत एकदा आरण्यक भेट द्यायला हवीच...>>
Pages