अंगूर-आदी सिनेमे - अनेक जुळ्यांची धमाल

Submitted by भोजराज on 3 September, 2018 - 00:15

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा "अंगूर" पाहिला आणि ह-ह-पु-वा झाली.

देवेन वर्मांचा रश्शीचा भाव करतानाचा सीन म्हणावं किंवा संजीव कुमारांचा "जोकर आ गयाSSS" चं टाईमिंग - सगळंच अफलातून.

सिनेमाच्या सुरुवातीला उत्पल दत्त आणि शम्मीजींचे छान डायलॉग आहेत:
उत्पल दत्त : सच्ची बात बोलूं? मुझे तैराना नहीं आता. इसीलिये पानीमें (जहाजसे) सफ़र करते हुये मुझे डर लागता हैं.
ह्यावर शम्मी यांचा सुरेख जवाब
शम्मीजी : और मैं एक बात बोलू? मुझे उडना नहीं आता. इसीलिये हवामें सफ़र करते हुये डर लागता हैं. Lol Lol

चार जुळ्यांचा हा सिनेमा बहुधा एकमेवाद्वितीय असा असावा. किंवा माझ्या ज्ञानात तरी दुसरा ४ जुळ्यांचा सिनेमा नाही.

नाही म्हणायला अमिताभचा "महान" आठवतो ज्यात अमिताभने ट्रिपल रोल केला होता.

असे आणखी कोणते सिनेमे आहेत ज्यात एका जोडीपेक्षा जास्तं जुळी पात्रं आहेत? भाषेचं बंधन नाही.

हे जाणून घेण्याकरिता हा धागा. ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, लिंक द्यावी. मी शोधण्याचा प्रयत्नं केला, पण मला काही सापडलं नाही.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जय लव कुश हा ट्रिपल रोल असलेला तेलुगू चित्रपट
Junior NTR चा

अनेक जुळे असलेला एक चित्रपट म्हणजे 'हमशकल' ( कसा काय पाहिला मी देव जाणे.).

ट्रिपल रोल असलेले चित्रपट:

हमजोली - मेहमूद
बैराग - दिलीपकुमार
जॉन जॉनी जनार्दन - रजनीकांत.

मी बघितले नाहीत हे, ऐकून माहितीय.

दो दुनी चार - किशोरकुमार असित सेन. हाही कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित.

कॉमेडी ऑफ एरर्सच्या विकी पेजवर अन्य भारतीय भाषांतल्या चित्रपटांची नोंद आहे.

गोविंदाच्या ऑ़खेंमध्ये आणखी डबल रोल नाहीए का?

शेम टू शेम
लक्श्या चा...मराठी अर्थात

बिवी ओ बिवी : - संजीवकुमारचा अफलातुन कर्नल, सोबत रणधीर कपूरची भोळसट अ‍ॅक्टिंग. जबरी आहे हा. जेव्हा लागेल तेव्हा चुकवत नाहीच. तुफान कॉमेडी !

धन्यवाद सगळयांना आपल्या सूचनांबद्दल. ह्यातले बरेचसे सिनेमे बघायचे आहेत. लिस्टवर टाकलेत आता.

दिलीपकुमार चा बैराग आज दुपारी बघायला घेतला होता.
जवळपास अर्धा पाहिला आणि सोडून दिला. अजिबात ग्रिप नाही चित्रपटाला.

अंगुर मी देखील पाहिलाय, कोणताही सिन ह ह पु वा नाहीय, खूप ओव्हर रेटेड चित्रपट आहे.
गोलमाल, चुपके चुपके जास्त चांगले आहेत.

अर्जुन कपूर = मुबारका
मकडी
धनुश= रावडी हिरो 2
चालबाज
अप्पूराजा
नंबर वन जुडवा(सचिन खेडेकर विलन आहे)
Jackie chan चा twin dragons

अंगूर सारखा धम्माल चित्रपट गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि पुढेही होणे नाही Happy
जोक अपार्ट, हा चित्रपट फार म्हणजे फारच भारी जमला आहे. मी अगणितवेळा पाहिला आहे.
येथे जुळ्यांच्या कथेवर आधारित चित्रपटांची यादी करत आहात तर हे दोन कसे विसरता येतील
राम और श्याम
सीता और गीता

बडे मिया- छोटे मिया - यात बिग बी आणि गोविन्दाचा डबलरोल होता.

हिरालाल-पन्नालाल- यात मिथुन चक्रवती आणि जॉनी लिव्हरचा डबलरोल आहे.

आंखें - यात गोविन्दा, राज बब्बर, आणि कादर खान डबलरोल मध्ये आहेत.

जत्रा- भरत जाधव आणि विजय चव्हाण

डॉन

बोल राधा बोल - रुशि कपूर चा डबल रोल.
अफलातून - अक्शय कुमार चा डबल रोल.
सन्जीव कुमार आणि जया बच्चन चा रात और दिन मधे सन्जीव कुमार चे ७ (कि ९??) रोल
करन - अर्जुन - सलमान खान आणि शाह-रुख खान डबल रोल.
जुड्वा - सलमान खान डबल रोल.
जुडवा २ - वरुण धवन डबल रोल.

अंगुर मी देखील पाहिलाय, कोणताही सिन ह ह पु वा नाहीय, खूप ओव्हर रेटेड चित्रपट आहे.
गोलमाल, चुपके चुपके जास्त चांगले आहेत.
>>>>>>

शक्यतो मी कधी कोणाबद्द्ल पर्सनल बोलत नाही, पण या आयडीबद्दल एकच म्हणेन की यांचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणीही लिहीलेली दुसरी कोणतीही गोष्ट यांना कायम ओव्हररेटेडच वाटत असते.

अंगूर हा शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरर्स नाटकावर आधारीत निखळ विनोदी सिनेमा आहे. हिंदीत या नाटकावर आधारीत हा दुसरा सिनेमा. पहिला म्हणजे वर उल्लेख केलेला किशोर कुमार - आसित सेन जोडीचा दो दूनी चार.

एकापेक्षा जास्त कलाकारांचे डबल रोल किंवा एकाच कलाकाराचे दोनपेक्षा जास्त रोल असलेले सिनेमे

व्हॉट्स युवर राशी (प्रियांका चोप्राचे १२ रोल्स - का आठवला हा सिनेमा?)
आमच्यासारखे आम्हीच (अशोक सराफ आणि सचिन)

एकाच कलाकाराचा डबल रोल असलेले अनेक सिनेमे आले आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यतिरिक्त चटकन आठवणारे -

हम दोनो (देव आनंद) - मै जिन्दगी का साथ निभाता चला गया...
वो कौन थी आणि मेरा साया (साधना)
आराधना (राजेश खन्ना)
आखरी रास्ता (अमिताभ)
अंदाज अपना अपना (परेश रावल) - आणखीन एक अफलातून कॉमेडी
कहो ना प्यार है (ह्रितिक रोशन)
मिथुन चक्रवर्तीचा एक अचाट आणि अतर्क्य सिनेमा. बहुतेक जल्लाद - आठवा अमावस आणि क्रांती!
धर्मेंद्रचा डबल रोल असलेला एक सिनेमा ज्यात एक मरतो आणि भूत होतो.
हिन्दुस्तान की कसम (अजय देवगण - पुन्हा एकदा का आठवला हा सिनेमा?)
चालबाज (श्रीदेवी)
किशन कन्हैया (अनिल कपूर)
दिल ही तो है (जॅकी श्रॉफ)
डुप्लीकेट (शाहरुख खान)
अनपेक्षित (अशोक सराफ)
अनिल कपूरच्या बथ्थड भावाचाही कोणता तरी एक सिनेमा होता डबल रोलवाला.
गीतांजली (रेखा)
आणि
सर्वात भयानक छळवाद
राजेंद्र कुमारचा डबल रोलवाला सिनेमा - झुक गया आसमान

शक्यतो मी कधी कोणाबद्द्ल पर्सनल बोलत नाही, पण या आयडीबद्दल एकच म्हणेन की यांचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणीही लिहीलेली दुसरी कोणतीही गोष्ट यांना कायम ओव्हररेटेडच वाटत असते.
>>> लोल. मी माझं मत सांगितले आहे.
मी व पु काळे ओव्हर रेटेड आहेत असे म्हटले होते आधी आणि ते खरे आहे. बऱ्याच लोकांनी सहमती दाखवली होती.
आणखी कोणत्या गोष्टीला ओव्हर रेटेड म्हणालो नाहीय ☺️

आणि अंगुर खरच इतका कॉमेडी नाही आहे, नॉर्मल smile असते बघताना पण ह ह पु वा असे काही मला वाटले नाही.

इट्स ओके
अंगुर न आवडण्याचा कोणालाही पूर्ण अधिकार आहे
बटाटा न आवडण्याचा पण
(मला कट्यार का घु, हॅरी पॉटर आवडत नाहीत..स्वगत: आता पळावे)☺️☺️

शाहरूखचे डबल रोल्स

१. डुप्लिकेट
२. करन अर्जुन
३. फॅन
४. डॉन
५. रा-वन
६. पहेली
७. ओम शांती ओम
८. ईंग्लिश बाबू देसी मेम

यापेक्षा जास्त डबल रोल चित्रपट करणारा कोणी हिरो असेल तर दाखवा.
अमिताभचे किती आहेत?

Michael Madana Kama Rajan नावाचा कमला हसनचा स्रिनिवास संगित राव ने दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. त्यात कमला हस्सन ने नावतल्या चार पात्रांचे रोल्स केले आहेत. अतिशय धमाल सिनेमा.

कमीने - शाहीद कपूर
सत्ते पे सत्ता, देशप्रेमी - अमिताभ बच्चन
संगीत - माधुरी दिक्षीत

मला वाटले हा एकापेक्षा जास्त जुळ्यांबद्दल बाफ आहे. पण माबो च्या लॉजिक प्रमाणे प्रतिसाद येतील तो विषय, त्यामुळे हरकत नाही.

जीवन चा डबल रोल असलेला पिक्चर ओळखा पब्लिकहो. तेथे ते जुळे भाउच असतात बहुधा. रॉबर्ट आणि अल्बर्ट. अत्यंत लोकप्रिय चित्रपट आहे Happy

रजनीकांतचे रॉबर्ट चित्रपटात जुळे तिळे नाही तर काही शे हजार रोल होते.
उगाच नाही रजनीकांतला रजनीकांत बोलत

robot rajnikant.jpg

Pages