बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा "अंगूर" पाहिला आणि ह-ह-पु-वा झाली.
देवेन वर्मांचा रश्शीचा भाव करतानाचा सीन म्हणावं किंवा संजीव कुमारांचा "जोकर आ गयाSSS" चं टाईमिंग - सगळंच अफलातून.
सिनेमाच्या सुरुवातीला उत्पल दत्त आणि शम्मीजींचे छान डायलॉग आहेत:
उत्पल दत्त : सच्ची बात बोलूं? मुझे तैराना नहीं आता. इसीलिये पानीमें (जहाजसे) सफ़र करते हुये मुझे डर लागता हैं.
ह्यावर शम्मी यांचा सुरेख जवाब
शम्मीजी : और मैं एक बात बोलू? मुझे उडना नहीं आता. इसीलिये हवामें सफ़र करते हुये डर लागता हैं.
चार जुळ्यांचा हा सिनेमा बहुधा एकमेवाद्वितीय असा असावा. किंवा माझ्या ज्ञानात तरी दुसरा ४ जुळ्यांचा सिनेमा नाही.
नाही म्हणायला अमिताभचा "महान" आठवतो ज्यात अमिताभने ट्रिपल रोल केला होता.
असे आणखी कोणते सिनेमे आहेत ज्यात एका जोडीपेक्षा जास्तं जुळी पात्रं आहेत? भाषेचं बंधन नाही.
हे जाणून घेण्याकरिता हा धागा. ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, लिंक द्यावी. मी शोधण्याचा प्रयत्नं केला, पण मला काही सापडलं नाही.
बादशाह चित्रपटात बादशाह
बादशाह चित्रपटात बादशाह नावाचे तीन जण होते. त्यातला एक आपला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह शाहरूख., दुसरा सीबीआय ऑफिसर आणि तिसरा व्हिल्लन.
वन टू थ्री नावाच्या एका चित्रपटात सुद्धा लक्ष्मीनारायण नावाचे तीन जण होते. सुनिल शेट्टी, परेश रावल आणि जितेंदर का बेटा तुश्शार कपूर..
दोन्ही चित्रपटात नामसाधर्म्यावरून उडणारी गडबड मस्त दाखवलेली. असे आणखी काही चित्रपट होते का? असतील तर येऊद्या तेद्सुद्धा
काश मायबोली एक सिनेमा होती.
काश मायबोली एक सिनेमा होती. यहापे पल पल मेलोड्रामा है, गॅन्गवाॅर है. पुनर्जन्म है. पिछले जनम के बदले है. सस्पेन्स है etc etc.
और ना भुलो सबसे जादा जुडवा/ तुडवा/.... है.
आणि अंगुर खरच इतका कॉमेडी
आणि अंगुर खरच इतका कॉमेडी नाही आहे, नॉर्मल smile असते बघताना पण ह ह पु वा असे काही मला वाटले नाही.>>>>>>> च्र्पस +१
एक हसु कायम असतं चेह्र्यावर हा पिच्चर बघताना.
काही सीनला फिस्स्कन हसु पण येतं. पण हहपुवा नाही.
एकंदर पिच्चर मस्त आहे. मला आवडतो.
जीवन चा डबल रोल असलेला पिक्चर
जीवन चा डबल रोल असलेला पिक्चर ओळखा पब्लिकहो. तेथे ते जुळे भाउच असतात बहुधा. रॉबर्ट आणि अल्बर्ट. अत्यंत लोकप्रिय चित्रपट आहे >>>> अमर अकबर अॅन्थनी. बरोबर?
जॉन जानी जनार्दन-
जॉन जानी जनार्दन- रजनीकान्तचा ट्रिपल रोल
मेयरसाब- कमल हासन डबलरोलमध्ये.
हिन्दुस्थानी- कमल हासन
दशावतारम- कमल हासची दहा रुपे
खुदा गवाह- श्रीदेवी. एक आई, एक मुलगी
सन्जीव कुमार आणि जया बच्चन चा
सन्जीव कुमार आणि जया बच्चन चा रात और दिन मधे सन्जीव कुमार चे ७ (कि ९??) रोल >>>> तो नया दिन नयी रात. सन्जीव कुमारचे ९ रोल्स.
अंगूर हा मला तरी खदखदून
अंगूर हा मला तरी खदखदून हसवणारा सिनेमा आहे. अनेक वेळा पाहिला आहे आणि पुढेही पाहिन.
एकंदरीत ह्या सिनेमाची कहाणी ओढून ताणून निर्माण केली आहे. एकसारख्या दोन जुळ्यांच्या जोड्या, त्या वेगळ्या होणे आणि जवळपास रहात असूनही एकमेकांबद्दल माहिती नसणे. पण त्याचे सादरीकरण इतके उत्तम आहे आणि कलाकार इतके तयारीचे आहेत की तो सिनेमा जमून गेला आहे. संजीव कुमार, देवेन वर्मा, अरूणा इराणी, मौशमी, युनुस परवेझ, दीप्ती नवल, दुबे सगळ्यांनी कामे मनापासून केली आहेत. युनुस परवेझने रंगवलेला, कायम उर्दू शेरो शायरीवाली भाषा बोलणारा मुस्लिम कारागिर माझा ह्या सिनेमातला अत्यंत आवडता आहे.
जाने भी दो यारो वा तत्सम सिनेमांप्रमाणे हा एक कल्ट क्लासिक आहे असे माझे मत.
सुलू_८२ - परफेक्ट
सुलू_८२ - परफेक्ट
रोबो मधील शेकडो रजनीकांत एकाच
रोबो मधील शेकडो रजनीकांत एकाच वेळी... ही कॉमेंट आवडली..!!
माझ्यासाठी ह ह पु वा म्हणजे
माझ्यासाठी ह ह पु वा म्हणजे गोलमाल जुना आणि नवीन सुद्धा, चुपके चुपके जुना , अंदाज अपना अपना, हेराफेरी.
जाने भी दो yaro सेकंड हाफ ह ह पु वा आहे .
इश्क पहिला हाफ ह ह पु वा आहे.
शाहरूख घेऊन येतोय अंगूरचा
शाहरूख घेऊन येतोय अंगूरचा रिमेक. रोहीत शेट्टी सोबत. देवेन वर्मा कोण असेल?
Shahrukh Khan In Rohit Shetty's "Angoor" Remake | Blockbuster की तैयारी
https://www.youtube.com/watch?v=C8Ee81GzvvY
इश्क चा आमिर खान चा पाईप वरून
इश्क चा आमिर खान चा पाईप वरून राम राम म्हणत चालण्याचा सीन मला खूप हसवतो नेहमीच...
र्तो राम राम वाला सीन चांगलाच
र्तो राम राम वाला सीन चांगलाच होता. पण ईश्कमधील काही आचरट सीन्सवर सुद्धा हसायला येते. कॉमेडीचा नेमका फॉर्म्युला शोधणे अवघड आहे.
लहानपणी लक्ष्या महेशचे चित्रपटही तुफान हसवायचे. लक्ष्याने त्याची टिपिकल अॅक्टींग सुरू करताच आधीच उगाचच हसायला यायचे. मनापासून आणि खळखळून हसायला यायचे.
हिंदीतही ही कमाल गोविंदा आणि डेविड धवन जोडीला जमली होती. आता ते पिक्चर पाहताना टुक्कार वाटतात. मात्र तेव्हा खूप हसवलेय या लोकांनी.
बर्याच
खूप चित्रपटांची नावे जमा झालीत.
किशोरकुमारचा दो दूनी चार पाहिला. एकाच कथेवर आधारीत पण वेगळ्या काळात वेगळ्या प्रकारे बनवलेले दोन चित्रपट पहायला गंमत वाटली. काही सिन्स बरेच सारखे आहेत, तर काही फारच वेगळे.
सुलू_८२ - परफेक्ट - धन्स,
सुलू_८२ - परफेक्ट - धन्स, फारएण्ड
तो नया दिन नयी रात. सन्जीव
तो नया दिन नयी रात. सन्जीव कुमारचे ९ रोल्स. Happy
कसा आहे तो चित्रपट सुलू_८२?
बाहुबलीमध्ये प्रभास -एक वडील
बाहुबलीमध्ये प्रभास -एक वडील आणि एक मुलगा
बाहुबलीमध्ये प्रभास -एक वडील
बाहुबलीमध्ये प्रभास -एक वडील आणि एक मुलगा
नवीन Submitted by सुश्या on 9 September, 2018 - 20:02
>>>>>>
आणि आजोबा पण.
बाहुबली २मधे एका शाॅटमधे बाहुबली (बाबा) च्या वडिलांचे चित्र दाखवले आहे ज्यात प्रभास च आहे.
किशोर कुमार आसित सेनच्या दो
किशोर कुमार आसित सेनच्या दो दुनी चार च्या वेळेस गुलजार सहाय्यक दिग्दर्शक होता.
त्यावरून अंगुर बनला
धर्मेंद्रचा डबल रोल असलेला एक
धर्मेंद्रचा डबल रोल असलेला एक सिनेमा ज्यात एक मरतो आणि भूत होतो.>>>>> तो गजब नावाचा सिनेमा होता का? ज्यात रेखा पण होती, आणी धर्मेंद्रचे दात फराळ्यासारखे पुढे असतात.
तो नया दिन नयी रात. सन्जीव
तो नया दिन नयी रात. सन्जीव कुमारचे ९ रोल्स. Happy
कसा आहे तो चित्रपट सुलू_८२? >>>> मस्त आहे.
तो गजब नावाचा सिनेमा होता का? >>>> हो
यापेक्षा जास्त डबल रोल
यापेक्षा जास्त डबल रोल चित्रपट करणारा कोणी हिरो असेल तर दाखवा.
अमिताभचे किती आहेत?
>>>>>>
अमिताभचे डबल रोल्स -
१. डॉन
२. बंधे हात
३. अदालत
४. कस्मे वादे
५. द ग्रेट गॅम्बलर
६. देश प्रेमी
७. सत्ते पे सत्ता
८. बेमिसाल
९. महान (३ रोल्स)
१०. आखरी रास्ता
११. तूफान
१२. बडे मिया छोटे मिया (अमिताभ आणि गोविंदा दोघांचे डबल रोल्स)
१३. सूर्यवंशम
१४. लाल बादशाह (हरे राम!)
१५. हम कौन है?
ज्यांनी नांदतीजागती पेशवाई पाहिली आहे, त्यांना शनिवारवाड्याचे कौतुक सांगू नका.
जीतेंद्रने तर तब्बल १६ सिनेमात डबल रोल्स केलेत. अमिताभपेक्षाही जास्त...
जिगरी दोस्त, रुप तेरा मस्ताना, जैसे को तैसा, दुल्हन, ज्योती बने ज्वाला, मेरी आवाज सुनो, प्यासा सावन, फर्ज और कानून, मवाली, जस्टीस चौधरी, मांग भरो सजना, सरफरोश (आमिर खानचा नाही), कामयाब, सिंहासन (हिंदीतला), दांव पेच, तहकीकात.
धर्मेंद्रच्या वर उल्लेख केलेल्या गजब सिनेमाव्यतिरिक्त त्याने आणखीन १३ सिनेमात डबल रोल केला आहे.
इज्जत, यकीन, समाधी, प्रतिज्ञा, फांदेबाज, झूठा सच, जीने नहीं दूंगा, करिश्मा कुदरत का (कपूर नाही :हाहा:), शहजादे, पाप की आंधी, वीर, जीयो शान से, डबल दी ट्रबल
आणखीन कोणाचे हवे आहेत?
उद्या/परवा बघेन नया दिन नयी
उद्या/परवा बघेन नया दिन नयी रात.
जीवनात अचानक मला खूप वेळ मिळतोय, आणि मी चक्क ५ - ६ पिच्चर पाहिले गेल्या दहा दिवसात . पूर्ण. अर्धवटही तेवढेच बघितले.
इथे चित्रपटांची नावे लिहिताना शक्य असल्यास कसा वाटला हे पण लिहा.
रिव्हर्स स्वीप,
रिव्हर्स स्वीप,
बेमिसाल म्हणजे बच्चन्/मेहरा /राखीचा ना?
त्यात बच्चन ने कोणते दोन रोल्स केले आहेत? एक डॉक्टरचा मेन रोल आणि दुसरा कोणता ते आठवेना झालय.
नया दिन nayi रात दर्जाहीन
नया दिन nayi रात दर्जाहीन चित्रपट आहे. निराश व्हाल बघून.
माझ्यावर वैयक्तिक अटॅक व्हायचा आधीच लिंक देतो जिथे इतरांनाही आवडला नाहीय ☺️ -
https://www.maayboli.com/node/65655
बेमिसाल म्हणजे बच्चन्/मेहरा
बेमिसाल म्हणजे बच्चन्/मेहरा /राखीचा ना?
त्यात बच्चन ने कोणते दोन रोल्स केले आहेत? एक डॉक्टरचा मेन रोल आणि दुसरा कोणता ते आठवेना झालय.
>>>>>
एक रोल अर्थातच डॉ. सुधीर.
दुसरा त्याचा भाऊ अधीर, जो बापाच्या मृत्यूनंतर वेडा होतो. हा रोल तसा छोटासाच आहे.
च्रप्स, ओके.
च्रप्स, ओके.
तसंही मी नेटवरच बघतो, न झेपेलसा वाटला की बंद.
दुसरा त्याचा भाऊ अधीर, जो
दुसरा त्याचा भाऊ अधीर, जो बापाच्या मृत्यूनंतर वेडा होतो. हा रोल तसा छोटासाच आहे. >> ओके. पुसटसे आठवते आहे, रुढार्थाने महत्वाचा रोल नव्हता म्हणून विसरायला झाले. धन्यवाद.
बेमिसाल माझा बच्चनच्या आवडलेल्या तीन चार मोजक्या सिनेमांपैकी एक आहे. सिनेमा बच्चनमुळे आवडतो की मुखर्जींमुळे ते अजून थोडे संदिग्द्ध आहे, पण ह्या सिनेमातले बच्चनचे काम नक्कीच आवडते.
बेमिसाल मधली त्याची
बेमिसाल मधली त्याची राखीबरोबरची केमिस्ट्री आवडल्याचे आठवते. तो दुसरा भाउ, तो सूड वगैरे अगदीच अन-हृषिकेष मुखर्जी स्टाइल वाटले होते
अजून एक जनरल निरीक्षण म्हणजे डबल रोल पर्यंत ठीक असते. त्यापुढे जास्त रोल जेव्हा अगदी दिग्गज अभिनेते सुद्धा करायला जातात तेव्हा ते त्यांचे ते व्हॅनिटी प्रोजेक्ट होउन बसतात, पब्लिक फारसे स्वागत करत नाही त्यांचे.
नया दिन nayi रात दर्जाहीन
नया दिन nayi रात दर्जाहीन चित्रपट आहे. निराश व्हाल बघून.
>>>>>
खरे आहे, तो प्रियांकाबाईंचा व्हॉटसप युअर राशी बारा रोलवाला तरी परवडला. त्यात निदान प्रियांकाची १२ रुपे बघायला मिळाली होती..
Pages