Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५-६२
५-६२
कप्तान आणि त्याचा लाडका तंबूत
६-६२
शंभर होतील??
६२/५???? पंड्या नेमकं काय करत
६२/५???? पंड्या नेमकं काय करत होता? टॅस्ट मॅच चा पहिला दिवस आहे हा. शास्त्री ला सिरियसली हाकलायला हवं
फेफ, असामी टोटल फॉर्म मधे!
फेफ, असामी
टोटल फॉर्म मधे!
मला वाटलं सामना आजच्या
मला वाटलं सामना आजच्या दिवसासाठी रहीत झाला ( गूगल ने तसा समज करून दिला). जें चाललंय तें पहावं का ?
"जें चाललंय तें पहावं का ?" -
"जें चाललंय तें पहावं का ?" - त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे, जे चाललंय ते पहावतंय का?
८५/७? ३५-४० ओव्हर्स तरी टिकतील का?
मला वाटलं सामना आजच्या
मला वाटलं सामना आजच्या दिवसासाठी रहीत झाला ( गूगल ने तसा समज करून दिला). जें चाललंय तें पहावं का ? >>> भाऊ, स्टॉक मार्केट ४००-५०० पॉईण्ट्स कोसळले की सर्किट ब्रेकर लावतात तसे काही झाले असावे का?
मला भारताचा २०११ चा दौरा
मला भारताचा २०११ चा दौरा आठवतोय. द्रविड नंतर एकदम भुवनेश च बॅटींग करायचा. तसं सद्ध्याच्या टीम मधे कोहली नंतर एकदम अश्विनच बॅटींग करतो.
'प्रत्येक पीच हे आमच्यासाठी होम-पीच च असेल' अशी एक वल्गना शास्त्रीबुवांनी केली होती, ती आठवली. कुठे तो रवी (शास्त्री) आणी कुठे हा रवी (अश्विन)!
आज रात्री पण असाच बदाबदा पाऊस
आज रात्री पण असाच बदाबदा पाऊस पडो नि उद्या इंग्लंड बॅटींग करताना बॉल बनाना स्विंग होउ दे अशी प्रार्थना नं. ५.
"बॅटींग करताना बॉल बनाना
"बॅटींग करताना बॉल बनाना स्विंग होउ दे" - आपण २ स्पिनर्स खेळवले आहेत. आणी झालाच बॉल स्विंग, तरी आपल्या बॉलर्स ना सातत्यानं, योग्य टप्प्यावर बॉलिंग करण्याची सुबुद्धी मिळो ही प्रार्थन क्र. ५-ए
आपण २ स्पिनर्स खेळवले आहेत.
आपण २ स्पिनर्स खेळवले आहेत. >> अश्विन आहे ना अर्धा
निष्काम शास्त्रीला, स्टोक्सला
निष्काम शास्त्रीला, स्टोक्सला जाता येता स्लेज करण्याचे काम लाऊन द्या.... स्टोक्सचे टाळके फिरले आणि त्याने शास्त्रीला दोन चार तडाखे ठेऊन दिले की...साप भी मर जायेगा और बासुरी भी ना बजेगी... सिरिज बंद..
अश्विन? तो आणी कुलदीप धरून च
अश्विन? तो आणी कुलदीप धरून च मी २ स्पिनर्स म्हट्लं होतं. पंड्या म्हणायचं आहे का तुला?
"निष्काम शास्त्रीला,
"निष्काम शास्त्रीला, स्टोक्सला जाता येता स्लेज करण्याचे काम लाऊन द्या' -
अरे गडबड झाली मी. अश्विन
अरे गडबड झाली मी. अश्विन अर्धा स्विंग बॉलर असा म्हणत होतो रे.
निष्काम शास्त्रीला, स्टोक्सला जाता येता स्लेज करण्याचे काम लाऊन द्या. >> शात्रीला कमी समजू नकोस, तो स्लेज करतोय हेच मूळात समजणार नाही स्ट्रोक्स ला. अशा बाबतीमधे शास्त्रीबुवा उस्ताद आहेत.
एकंदरीत भारताची सेंच्युरी
एकंदरीत भारताची सेंच्युरी झालीये, तर सगळ्या टीम चं नाव लॉर्ड्स च्या ऑनर्स बोर्डावर (पाण्यात भिजवेलेल्या खडूनं) लिहावं का?
पंड्या डबल हॅटट्रिक घेवो..
पंड्या डबल हॅटट्रिक घेवो..
इंग्रज ५० धावत सर्वबाद होवो..
दुसऱ्या डावात अश्विन शतक करो
आत्ता पाहिले हायलाइट्स.
आत्ता पाहिले हायलाइट्स. खतरनाक स्विंग होत होता बॉल. किमान तीन कॅचेस सोडले इंग्लंडने, नाहीतर ५०-६० मधेच गुंडाळले असते आपल्याला. विजय ची विकेट सर्वात भारी होती. आउटस्विंगर वर बोल्ड! चौथा बॉल फ्लिक करायला गेला हीरो या कंडिशन्स मधे.
आज रात्री पण असाच बदाबदा पाऊस
आज रात्री पण असाच बदाबदा पाऊस पडो नि उद्या इंग्लंड बॅटींग करताना बॉल बनाना स्विंग होउ दे अशी प्रार्थना नं. ५.
>>
म्हनजे मेरिटवर लढायची हिम्मत नाही तुमची आणि तुमच्या संघाची.कळ्ळा तुमचा दर्जा
“म्हनजे मेरिटवर लढायची हिम्मत
“म्हनजे मेरिटवर लढायची हिम्मत नाही ” - मेरिट आहेच बाबा. आरक्षण नाही, पावसाचं संरक्षण मागतोय असामी
बॉलिंग चांगली झालीये. अश्विन-कुलदीप कशी बॉलिंग करतात ते बघायचं.
खतरनाक स्विंग होत होता बॉल >>
खतरनाक स्विंग होत होता बॉल >> हो नि अँडरसन is best to there is, when that happens. He himself agreed that England would have bundled out any team cheap including England itself in those conditions.
पाऊस नाही आला तर डावाचा पराभव
पाऊस नाही आला तर डावाचा पराभव निश्चित करतोय Bairstaw
हो असामी. टॉस जिंकून भारताला
हो असामी. टॉस जिंकून भारताला बॅटिंग ला बोलवायचा निर्णय त्यामुळेच घेतला असेल. नाहीतर फार क्वचित असे करतात.
मला एक गोष्ट जाणवली, बॉल जर
मला एक गोष्ट जाणवली, बॉल जर असा स्विंग होत असेल तर ऑफ स्टांपवर किंव अजून थोडा बाहेर गार्ड घेणे हे अतिशय कॉमन आहे. कोहली ने पहिल्या टेस्ट मधे केले होते, राहाणे पण करतो. ह्या टेस्ट मधे जवळजवळ प्रत्येकाने पहिल्या सेशन मधे करणे जरुरी होते जे झालेले दिसले नाही. परत अँडरसनज्ची लेंग्थ बघून क्रीज बाहेर १ फूट गार्ड घेणे असे काही कोणिच ट्राय नाही केले हे जरा ऑड वाटले. ५ स्लिप्स लावल्या आहेत नी तुम्हाला टेक्निक ची गॅरंटी नाही हे दिसतेय हे बघून काहीच वेगळे ट्राय न करणे खटकले.
आणि टॉप ऑर्डर हुकत असताना,
आणि टॉप ऑर्डर हुकत असताना, बॅट च्या कडांना बॉल टच करून जात असताना अश्विन मात्र अगदी बरोब्बर बॅट च्या मध्यावर बॉल येइल असा अचूक खेळत होता
त्याचे फटके एखाद्या ओपनर सारखे होते. तो एरव्ही खेळतो हे माहीत आहे पण कालच्या कंडिशन्स मधे हे करणे सोपे नाही.
आता खेळपट्टी फलंदाजांना
आता खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होत चालली आहे की आपली गोलंदाजीच चांगली नाहीये?
आपली फलंदाजी जमली तर निदान सामना अनिर्णित तरी ठेवता येईल!
वोक्स चे अभिनंदन. पहिले शतक
वोक्स चे अभिनंदन. पहिले शतक, नि तेहि लॉर्ड्सवर.
एके काळी लॉर्ड्स ला फार महत्व होते, आता माहित नाही.
एक डाव आणि काही धावांनी
एक डाव आणि काही धावांनी हरविण्याची शक्यता! आता केवळ पाऊस वाचवू शकतो.
लागोपाठ ४ षटकात वोक्स ने
लागोपाठ ४ षटकात वोक्स ने शेवटच्या चेंडूला १ किंवा ३ धावा काढून खेळी स्वतः कडे ठेवली. नि जेंव्हा संधि मिळाली तेंव्हा बिचारा बेअर्स्टो बाद झाला!
बाकी कार्थिकने झेलहि छान घेतला.
आता खेळपट्टी फलंदाजांना
आता खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होत चालली आहे >> हो, कालच्या पेक्षा आज बॅटींग करणे अधिक सोपे आहे. अर्थात आपल्या बॉलर्स कडे जे काही पिच मधे आहे त्याचा लाभ उठ्वण्याचा वकूब कमी आहे हेही तितकेच खरे आहे. पण अर्थात हे थोडेसे त्यांच्यावर अन्याय करणारेही आहे. तीन पैकी दोन बॉलर्स हे नॅचरली शॉर्ट पिच टाकणारे आहेत नि शमी सिवंग करू शकण्याच्या लेंग्थ वर टाकणारा असला तरी त्याची अचूकता नि सातत्य ह्यात कमी आहे, फिटनेसचा अभाव आहे. भुवी असता तर बराच फरक पडला असता.
लॉर्ड्सवर भारतीयांनी ४२, ९३,
लॉर्ड्सवर भारतीयांनी ४२, ९३, ९६ असे स्कोअर ह्यापूर्वीच केलेले असल्याने १०७ म्हणजे मोठी इंप्रूव्हमेंट आहे. ९६ची मॅच तर ड्रॉही केली होती. त्यामुळे ही मॅचही ड्रॉ होईल असे अगदी नक्की खात्रीपूर्वक छातीठोकपणे वाटते. विजय आणि राहुलसारखे खंदे ओपनर गडी आपल्याला नक्कीच आश्वासक सुरवात करून देतील असा विश्वास वाटतो आहे.
Pages