युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद स्वाती.
उपमा, शिरा, नाचणीचं सत्व ताक घालून ट्राय करतो उद्यापासून. भात नाही खाल्ला त्यानं अजून एक-दोनदा ट्राय करेन. खिचडी खातो मात्र.

दात यायला लागलेत का? दात येताना खाण्यावरून मन उडतं काही मुलांचं - माझ्या लेकीचं झालं होतं तसं. बाकी वाढ नीट असेल आणि जनरल हसरं/खेळकर असेल तर त्या वेळी खाण्याची विशेष चिंता करायची नाही असा सल्ला डॉक्टरने दिला होता. त्यावेळी एखादाच घास तोंडात ठेवून चघळत बसायलाही आवडतं त्यांना. तोंडात पटकन विरघळणारी लहान मुलांची बिस्किटं मिळतात का बघ तिथे - इथे होता एक प्रकार.

>>>
येस दात आहेत ६! वर चार अन खालच्या ओळीत दोन ... कचकावून चावायला बरे पडतात सध्या त्याला!
टोस्ट सारखं काही दिलं तर बसतो खरा चघळत ते. ती बिस्किट्स पण पाहातंय या विकांताला.
बाकी वाढ उत्तम आणि नो त्रास. जरा त्याचं खाणं वाढावं एव्हढंच वाटतं.

>>> बाकी वाढ उत्तम आणि नो त्रास.
हो ना! मग काही काळजी करू नकोस. वाढेल खाणंही. Happy

खेळणी, दुपटी चावतो का? स्वच्छ दुपट्याचं टोक गार पाण्यात भिजवून द्यायचं - त्यांच्या हळव्या झालेल्या हिरड्यांना गार काहीतरी चावलं की बरं वाटतं.
टीदिंग टॉय्जही देतात गार करून.

ओके Happy

येस खेळणी, सोफे, कुशन्स काय घावेल ते चावतो. वॉटर फील्ड टीथर आणलं होतं; धारदार दातानी फोडून टाकलनं त्यानं...
नवीन सॉफ्ट मट्रेल च आहे, ते ही गार करून देऊन पाहातो

योकु :

वेगवेगळ्या भाज्यांची सूप्स
मॅश केलेला वरण-भात . डाळ-तांदुळाची खिचडी.
उकडून मॅश केलेलं रताळं दुधात कालवून
उकडून मॅश केलेलं सफरचंद
मॅश केलेलं सफरचंद घालून रव्याची किंवा नाचणीची खीर
दूध पोळी अगदी बारीक करून
तांदुळाची उकड

बाकी एक वर्षाच्या आत मुलांना साखर आणि वरचं दूध देता येईल का हे डॉक्टर ला तुम्ही विचारलंच असेल.

साखर, दूध खातो तो. नो प्रॉब्लेम देअर. हे सगळे प्रकार ट्राय करेन मी आता एकेक...

आपण खातो ते दे की. ते तर सगळ्यात बेस्ट. पोळी आणि भाजी कुस्करुन लहान लहान घास खातात मुलं.
उकडलेल्या भाज्या आवडतात पोरांना. उकडलेली ब्रोकोली, फ्लॉवर, गाजर, मटार दाणे, कॉर्न हे फिंगर फुड म्हणून एकटाही खाउ शकेल.

अमित, अरे त्याचं बाळ अजून वर्षाचं पण नाही ना? मटार दाणे, कॉर्न चोकिंग हॅझर्ड्स आहेत इतक्या लहान वयात. इतर पण काही दिलं असल्यास आपण समोर असतानाच द्यावं. टीदिंग खेळणी ज्या दातांनी तोडू शकतात त्या दातांनी गाजर, बिस्किट, टोस्टचा तुकडा तोडून नको ते घोळ घालूच शकतात या वयातली मुलं.

हो हो. सुपरविजन खाली दे. स्मॅश करुन दे.
सिरियल देतात का भारतात माहित नाही. गर्बरचे अनफ्लेवर्ड ओट्स/ राईस सिरियल आमच्या पोरांना फार आवडले. साखर नाही, दूध जातं. पोट गच्च भरतं, गपागप खातात... सो आपला वेळ जात नाही.
असेच गर्बरचे पफ मिळतात. ते पण चघळत बसतात.

Lol ऑन सिरियस नोट. साखर मीठ चव जितकी उशीरा देता येईल तेवढी दिली तर इतर चवी/ स्वाद समजुन आवडतात मुलांना हा अनुभव आहे.
आईस्क्रीम आणि उकडलेली ब्रोकोली यात चुकीची गोष्ट निवडणारी व्यक्ती घरात आहे. Happy

साखर पचवण्यासाठी म्हणे हाडांतून कॅल्शियम वापरलं जातं, खर-खोटं माहीत नाही. आपण खाऊ ते खायला मागत असेल तर बेस्ट. उकडलेल्या भाज्या बोर लागतात Sad दात यायला लागले तर मिक्सरमध्ये घोटून/वाटून काही खायला नको, हातानी मऊ केलेलं पण चालेल. आपण खाऊ ते खायची सवय आत्ता लावली तर उगीच नंतर वेगळा स्वयंपाक करायचे कष्ट वाचतात Happy मीठ, गोड, मसाला आणि मिरची प्रमाणात हवं पण!

योकु,

- ताज्या पोळीला घरचं तूप लावून त्याचे लहान लहान तुकडे त्याच्यासमोर ताटलीत ठेव. ते स्वतःच्या हाताने उचलून खायला मुलांना आवडतं. त्याची अर्धी पोळी चघळून होईपर्यंत तुझ्या माबोवर ८-१० पोस्टी टाकून होतील Proud
आपण जेवायला बसलो की आपल्या ताटात असे तुकडे करून मग ते त्याच्यासमोरच्या रिकाम्या ताटलीत वाढायचे. म्हणजे तर पोरं आणखी खूश होतात. आपण जेवतोय तेच त्यांना दिलंय असं त्यांना वाटतं. वाटल्यास आधी पाव पोळी आणि मग सेकन्ड सर्विंग द्यायचं.

- मऊ भात तूप-मीठ घालून चांगला कुस्करून त्याचे लहान लहान घास करून त्याला वेगळ्या ताटलीत दिलेस तरी तो आवडीने खाईल.

- घरच्या तुपावर जराशी जिरेपूड टाकून त्यावर चमचाभर जाड रवा खमंग भाजायचा आणि पाणी घालून शिजवायचा. मीठ आणि किंचित लिंबाचा रस घालून पातळसर भरवायचा. किंवा मऊसर उपमा करायचा. मुलं आवडीने खातात. जिरेपूड नसेल, तर जिरंही चालेल, वाटल्यास भरवताना जिर्‍याचे दाणे वगळून भरवायचं.
उपमा असेल, तर तो ही त्याला वेगळ्या ताटलीत दे. त्याचे हात-तोंड-कपडे बरबटतील, पण त्याला मजा येईल, पोटही भरेल.

- कणीक भाजून गूळ-वेलदोडा घातलेली दुधातली खीर

माझी मुले ९-१० महिन्यांची असताना मी सकाळी ओट्स दुधात शिजवुन, पेज वगैरे देत होते नाश्त्याला. मग जेवणाला मुगडाळीच्या गरम वरणार पोळी कुस्करुन किंवा बटाट्याची पातळ भाजी (फक्त पाणी, हळद्,हिंग टाकुन) त्यात पोळी कुस्करुन, मुगडाळीची आसट खिचडी, उकडलेले रताळे मिक्सीतुन बारिक करुन, मउ इडलि डाळीत कुस्करुन, रव्याची खीर. त्या आधी भोपळा, टॉमेटो, पालक एकत्र उकडुन प्युरी करुन, अ‍ॅपल उकडुन प्युरी करुन, रताळे उकडुन प्युरी करुन दोन महिने दिले होते. आपल्याला कसेतरी वाटले उकडलेले खाय्ला तरी मुलांसाठी नविन चवी असतात भाज्यांच्या त्यामुळे त्यांना आवडते.

मस्तच सजेशन्स. गोड खात नाही ना तो? नाहीतर एक भारी भारतीय सजेशन आहे. आपली जिलेबी फ्रिज मध्ये ठेवून गार करून द्यायची. पण ही ट्रीटच आहे. साखर देत नसाल तर प्रश्नच नाही. आपले एक नोंदवले. उक डलेल्या भाज्या व मॅश केलेली फळे बेस्ट. तुम्ही बनवलेले कमी तिखटाचे चालेल की त्याला.

==========================
जुने खोड.

केळं कुस्करुन त्यात साजुक तुप घालून द्यावं त्याने सर्दि होत नाही असं आई सांगते. माझ्या भाचीला केळी प्रचंड आवडतात. त्यामुळे तुप केळ नेहमी खाते.

माझ्या मुलीने मात्र वाफवलेल अ‍ॅपल कधीच खल्ल नाही. २ - ४ वेळा प्रयोग करुन पाहिला पण तोंडातून बाहेरच काढून टाकायची. शेवटी एकदा अखंड अ‍ॅपल धुवून पुसून हातात दिल तर बारीक दातानी छान कोरुन कोरुन खाल्लं.

वाफवलेलं सफरचंद औषधासारखं लागतं Happy मुलं नुसतं सफरचंद आवडीने खातात. दात येण्यापूर्वी मी किसून देत होते.
वरची सगळी सजेशन्स मस्त.
सोनकेळं/ वेलची केळं बाधत नाही म्हणतात.

ही सर्व चर्चा, माहिती किती छान आहे. ह्या बाफवर हरवून जाईल. वेगळा बाफ हवा. एकत्रित मिळेल. नाहीतर इथे शोधायला लागेल नंतर.

हो दात असतील तर सफरचंद नुसते द्यावं, आवडीने खातात मुलं. माझा मुलगा लहानपणी फिरायला बाहेर पडल्यावर सफरचंद आणि टोमाटो दिसले आम्ही भाजी फळे घेताना की तसंच ओढून उचलून खायचा दुकानदाराकडे. मला आपलं थोडं मनात यायचं की ते फळ धुतले नाही हा असाच उचलतो. मग एक रुमाल वेगळा ठेवायची त्याने नीट पुसून द्यायचे.

वेलची केळे नाही नडत, तेच द्यावं लहान मुलांना.

बेश्ट सजेशन्स मिळालीत... Happy
मी नाचणीच्या सत्वात आज एका चमच्या ऐवजी अर्धाच चमचा साखर घातली, तरी खाल्लंन त्यानं.
ते ताक-मिर्‍याचा प्रयोग करण्याकरता साधं नाचणी-सत्व आणायला हवं, जे घरी आहे ते वेलची-साखर वालं आहे.

आज टमाटो उकडून सूप सारखं दिलं ते आधी वाकडं तोंड केलं खरी पण मग बाटलीतून असल्यानी स्वतःहून पूर्ण संपवलं. भातही दिला मिठाचं बोट लावून आज नुसताच दिला उद्याला काही अ‍ॅड करून मग देऊन पाहील. हा ही खाल्ला नीट त्यानी. सो एकएक प्रयोग चालू केलेले आहेत.

मटारदाणा त्यानी एकदा डायरेक्ट गिळला आणि मग ठसकत होता; वाटलं लावतो धावाधाव करायला पण आपोआप च निघाला आणि धावणं वाचलं, सो हे प्रयोग सध्यातरी नाही करत.

अधनं मधनं टाईमपासला साळीच्या लाह्या, मुरमुरे ताटली घालून द्यायचे. एक एक लाही उचलून छान खातातं. मुख्य म्हणजे हाताने खाल्याच समाधान मिळतं Happy आपल्या घासाने एक घास दिला तरी त्यांना खुप होतो.

माझी लेक कच्ची भेंडी खायची. खायची म्हणण्यापेक्षा चापसात बसायची म्हणावं लागेल. कारण तुकडा मोडता यायचा नाही पण खायची तर असायची. मजा यायची

जे घरी आहे ते वेलची-साखर वालं आहे >>> मग अजून वरून साखर नाही घातली तरी चालेल. जे आहे ते पुरेसं खरं तर जास्तच गोड असतं, खाऊन बघ.

मटारदाणा दिलास तर त्याचं साल काढून आतल्या डाळिंब्या द्यायच्या. आधी मटार सोला मग एक एक दाणा सोला असा जरा कुटाणा होतो पण आवडत असतील मटार तर वर्थ आहे.

योकु , मंचकीन फ्रेश फूड फीडर असा सर्च करून बघ. त्यात भाज्या फळांचे तुकडे इत्यादी घालून सेफली देता येईल, शिवाय टीदर म्हणून पण फायदा होईल.

साखर पचवण्यासाठी म्हणे हाडांतून कॅल्शियम वापरलं जातं>> मी असं वाचलंय की साखर खाल्ली की अन्नातलं कॅल्शियम शरीरात शोषलं जात नाही. साखर ही कॅल्शियम रॉबर असते Happy त्यामुळे, नाचणी सत्त्व तर आपण कॅल्शियमसाठीच देतो तर त्यात साखर न घातलेलीच बरी!

मग अजून वरून साखर नाही घातली तरी चालेल. जे आहे ते पुरेसं खरं तर जास्तच गोड असतं, खाऊन बघ.>>>>>> + १००
काहीतरीच भयंकर गोड असतंय ते नाचणी सत्त्व. आणि त्यात वरुन एक कणही साखर घालु नका. त्यापेक्षा साखरविरहित नाचणी सत्त्व मिळतं ते आणा.

आज, एका वेगळ्या ताटलीत त्याला पोळीचा तुकडा दिला मस्त प्रयत्न करत होता तोडून खायचा. नंतर साधं वरण भातही हातानीच मौ करून तोही भरवला, अर्थात हे त्याच्या नेहेमीच्या खाण्यानंतर पण खाल्लं व्यवस्थित. इथले सल्ले खरोखरीच कामाला येतात. धन्यवाद!

दक्शे, भेट मला मुस्काड फोडी खेळू आपण ! Biggrin

Pages