रवांडाला (आफ्रिका) ला कुणी भेट दिली आहे? अनुभव सांगा.

Submitted by राहुल बावणकुळे on 28 July, 2018 - 13:46

मी सध्या मुंबईत International Institute for Population Sciences (IIPS) मध्ये Ph.D. करत आहे. मला १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान किगली, रवांडा येथे पार पडणार्या International Conference on Family Planning (ICFP) 2018 मध्ये पेपर सादर करण्यासाठी यायचे आहे. सदर परिषदेसाठी संपूर्ण प्रवास खर्च, स्थानिक निवास व्यवस्था, विसा फी व दैनिक खर्च John Hopkins Bloomberg School of Public Health Baltimore (US) ही संस्था उचलणार आहे. ही परिषद द्विवार्षिक असून जगभरात विविध ठिकाणी John Hopkins Bloomberg School of Public Health Baltimore (US) व बिल मिलीनडा गेट्स फौंडेशन आयोजित करते.

तथापि मला परिषदेसाठी पहिल्यांदाच देशाबाहेर जाण्याची संधी भेटत असल्याने खूप उत्सुक असलो तरी पण एकटेच जायचे असल्याने भीतीच जास्त वाटत आहे. आपणापैकी कुणी रवांडा किंवा आफ्रिकेतील ईतर देशांना भेटी दिल्या असतील किंवा कुणी तिकडे वास्तव्यास असतील तर माझ्या खालील प्रश्नांचे/शंकांची निरसन कराल अशा विश्वास आहे. जसे,

  1. रवांडा हा देश भेट देण्यास सुरक्षित आहे?
  2. Nov मध्ये वातावरण व हवामान कसे असते? छत्री/स्वेटर किंवा इतर सरंक्षक ची गरज पडेल?
  3. मी तशी नुकतीच Yellow fever vaccine घेतली आहे, पण इतरही आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी?
  4. मी बहुधा Nairobi, Addis Ababa, किंवा Doha मार्गे जाण्याची शक्यता आहे तर सदर देशांसाठी transit visa ची गरज असेल का?
  5. सर्वात महत्वाचे खाण्याची काय काळजी घ्यावी? मी क्वचित नॉनव्हेज खात असलो मात्र तरी तिकडे मी शुद्ध शाकाहारी असणार आहे. तर जेवताना गैरसोय होण्याची शक्यता आहे का? प्रवासात इकडून Ready to cook जेवणाचे प्रकार नेता येतात? E/Immigration मध्ये अडचणी येतात का? खिचडीसाठी तांदूळ/डाळ/हळद नेता येईल?
  6. प्रवासात एकूण किती रक्कम जवळपास ठेवावी? मला आयोजकांकडून ४ दिवसांसाठी अंदाजे Per Diem USD ३५० भेटणार आहेत, ह्यामध्येच visa fee व taxi भाडे अंतर्भूत आहे. दोन्ही वेळेच्या विमानाची तिकीट आयोजकच पाठवणार आहेत, मला केवळ मुंबईहून/साठी निघायची दिवसं कळवायचाची आहेत. ह्याशिवाय registration ला लागलेले USD १५० सुद्धा reimburse करणार आहेत. तर देशातून स्वतःसोबत किती रक्कम नेणे योग्य असेल?
  7. तिकडे Airtel चालतो का? किंवा आंतरराष्ट्रीय रोमिंग न चालू करता स्थानिक कार्ड घ्यावे लागेल?
  8. भाषेची अडचण जाणवेल का? विमानतळाहून taxi ची सोय कशी आहे? जसे ओला/उबेर सारखे अॅप आहेत का? भारतातून किगलीला रात्री पोहोचणारे किंवा तिकडून मुंबईसाठी रात्री सुटणारे विमान घ्यावे का?
  9. ह्याशिवायही अनेक प्रश्न (किंबहुना ह्याहूनही महत्वाचे) सुटले असतील तर तुम्ही माहिती देऊ शकाल का?

आपल्यापैकी एक मायबोलीकर दिनेश शिंदे बर्याच वर्ष्यापासून आफ्रिकेत वास्तवास आहेत, मात्र ते सध्या मायबोलीवर सक्रीय नाहीत, तथापि त्यांना वि.पु. द्वारे मेल पाठवला आहे. तरी आपल्यापैकी कुणास अनुभव असल्यास त्यांनी कृपया माझ्या प्रश्नांचे/शंकांचे उत्तर द्यावीत ही विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिषदेसाठी आणि प्रवासासाठी शुभेच्छा,

अगदीच मोह आवरत नाही म्हणून.....
एक नरेंद्र दामोदरदास म्हणून गृहस्थ परवाच जाऊन आले तिकडे, ते अगदी फर्स्ट हॅन्ड लेटेस्ट माहिती देऊ शकतील Happy

कुणी गुजराती मित्र असल्यास त्याला विचारा. गुजराती लोक आफ्रिकन देशात गेल्या काही वर्षात गुंतवणूक करीत आहेत. पण रवांडा हा देश सुरक्षित नाही असे त्यांचेही म्हणणे आहे.

{{{ एक नरेंद्र दामोदरदास म्हणून गृहस्थ परवाच जाऊन आले तिकडे, ते अगदी फर्स्ट हॅन्ड लेटेस्ट माहिती देऊ शकतील Happy
नवीन Submitted by सिम्बा on 29 July, 2018 - 00:15 }}}

भारताच्या माननीय पंतप्रधानांचा उल्लेख करताना किती तो आपलेपणा! किती ती जवळीक दाखविण्याची भावना!!

मायबोलीवर सिम्बा हा आयडी २०१४ पूर्वी का अवतीर्ण झाला नाही याचं सिंगसाबना किती दु:ख होत असेल नाही?

1.रवांडा हा देश भेट देण्यास सुरक्षित आहे?........होय... माझा मित्र ६ महिने राहून आल आहे मुलीकडे
2.Nov मध्ये वातावरण व हवामान कसे असते? छत्री/स्वेटर किंवा इतर सरंक्षक ची गरज पडेल?... गूगल करा
3.मी तशी नुकतीच Yellow fever vaccine घेतली आहे, पण इतरही आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी?.... मिनरल पाणी... या व्यतिरिक्त काही नाही
4.मी बहुधा Nairobi, Addis Ababa, किंवा Doha मार्गे जाण्याची शक्यता आहे तर सदर देशांसाठी transit visa ची गरज असेल का?.... नाही
5.सर्वात महत्वाचे खाण्याची काय काळजी घ्यावी? मी क्वचित नॉनव्हेज खात असलो मात्र तरी तिकडे मी शुद्ध शाकाहारी असणार आहे. तर जेवताना गैरसोय होण्याची शक्यता आहे का? प्रवासात इकडून Ready to cook जेवणाचे प्रकार नेता येतात? E/Immigration मध्ये अडचणी येतात का? खिचडीसाठी तांदूळ/डाळ/हळद नेता येईल?..... ३दिवसांसाठीए?????? गरज नाही
6.प्रवासात एकूण किती रक्कम जवळपास ठेवावी? मला आयोजकांकडून ४ दिवसांसाठी अंदाजे Per Diem USD ३५० भेटणार आहेत, ह्यामध्येच visa fee व taxi भाडे अंतर्भूत आहे. दोन्ही वेळेच्या विमानाची तिकीट आयोजकच पाठवणार आहेत, मला केवळ मुंबईहून/साठी निघायची दिवसं कळवायचाची आहेत. ह्याशिवाय registration ला लागलेले USD १५० सुद्धा reimburse करणार आहेत. तर देशातून स्वतःसोबत किती रक्कम नेणे योग्य असेल?.... ५०० यु एस डी खूप झाले
7.तिकडे Airtel चालतो का? किंवा आंतरराष्ट्रीय रोमिंग न चालू करता स्थानिक कार्ड घ्यावे लागेल चालतो पण खूप महाग.... आउट गोइंग १५० रु मिनिटाला... इन्कमिंग ७५
8.भाषेची अडचण जाणवेल का? विमानतळाहून taxi ची सोय कशी आहे? जसे ओला/उबेर सारखे अॅप आहेत का? भारतातून किगलीला रात्री पोहोचणारे किंवा तिकडून मुंबईसाठी रात्री सुटणारे विमान घ्यावे का?.... आयोजकांची मदत घ्या
9.ह्याशिवायही अनेक प्रश्न (किंबहुना ह्याहूनही महत्वाचे) सुटले असतील तर तुम्ही माहिती देऊ शकाल का?

आमच्या ग्रुपचा (इंडियन ओरिजिन) एक साखर कारखाना रवांडा मध्ये आहे. .

Kabuye Sugar Works SARL

http://www.kakirasugar.com/content/other-african-countries

जर माहिती मिळाली नसेल तर प्रश्नावली इंग्लिश मध्ये करून द्याल का!

किती ती जवळीक दाखविण्याची भावना!! >> हे देखील सिम्बाजी नरेन्द्रजीकडूनच शिकले असावेत, ते कसे कुठेही गेली की मिठ्या मारतात, बराssक अशी लाडीक हाक मारतात, तसेच आहे हे.

@ डबा बाटली, स्वस्ति, रेव्यु, बाबा कामदेव व सुन्याटुन्या: धन्यवाद!
दिनेशदादा मायबोली सोडून गेले असले तरी मायबोलीकरांवर पूर्वीइतकीच माया करतात. वि.पू. द्वारे पाठवलेल्या ईमेलला, सवड भेटताच त्यांनी सविस्तर माहिती दिली, किंबहुना त्यांना नव्याने काही कळताच अजूनही कळवत आहेत.
# धाग्याची गरज समजून त्याला भरकवटण्याचा प्रयत्न करू नका.
@ सुन्यटुन्या: मी वरील सगळी प्रश्न भाषांतरीत करून वि.पू. द्वारे रात्री पाठवतो.