प्रवासाचे अनुभव - भारताबाहेरचे

रॉकी माउंटन नॅशनल पार्क (RMNP)

Submitted by राणे१४४ on 8 October, 2018 - 01:33

एव्हाना आम्ही रॉकी माउंटन नॅशनल पार्क पर्यंत पोहोचलो होतो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत न्हवते. डेनवर प्रसिद्ध आहे त्याच्या तापमानातील फरकासाठी. हा आम्ही या आधीही डिसेंबर मध्ये अनुभवलं होतं. हि आमची एका वर्षातली दुसरी भेट होती डेनवरला.त्या ट्रिप मध्ये आम्ही डेनवर ला जरी असलो तरी आम्ही डेनवर मध्ये न राहता मोआब, उटाह येथे आर्चेस नॅशनल पार्क आणि कॅयॉन्सलँड नॅशनल पार्क ला भेट दिली होती. त्याचा सविस्तर वृत्तांत परत कधी तरी. तर, त्या ट्रिप नंतर बरेच दिवस प्रवास झाला न्हवता. कुठे जायचे ठरवत असतानाच कॅलिफोर्निया च्या मित्राचा फोन आला आणि परत डेनवर कोलोरॅडो निश्चित झाल.

रवांडाला (आफ्रिका) ला कुणी भेट दिली आहे? अनुभव सांगा.

Submitted by राहुल बावणकुळे on 28 July, 2018 - 13:46

मी सध्या मुंबईत International Institute for Population Sciences (IIPS) मध्ये Ph.D. करत आहे. मला १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान किगली, रवांडा येथे पार पडणार्या International Conference on Family Planning (ICFP) 2018 मध्ये पेपर सादर करण्यासाठी यायचे आहे. सदर परिषदेसाठी संपूर्ण प्रवास खर्च, स्थानिक निवास व्यवस्था, विसा फी व दैनिक खर्च John Hopkins Bloomberg School of Public Health Baltimore (US) ही संस्था उचलणार आहे. ही परिषद द्विवार्षिक असून जगभरात विविध ठिकाणी John Hopkins Bloomberg School of Public Health Baltimore (US) व बिल मिलीनडा गेट्स फौंडेशन आयोजित करते.

Subscribe to RSS - प्रवासाचे अनुभव - भारताबाहेरचे