रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.
मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.
आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.
इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.
तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?
इतक्यातच उदयास आलेली अशी एक
इतक्यातच उदयास आलेली अशी एक अंधश्रद्धा आहे.
फेसबूकवर 'हिमायलन क्लब' मधल्या इतरेजनांनी टाकलेल्या फोटोंना लाईक केलं तर लवकरात लवकर हिमालयात जायला मिळतं
हर्पेन तुम्हारे मुह मे घी ,
हर्पेन तुम्हारे मुह मे घी , गुड, शक्कर,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी गेल्या २-३ वर्षापासुन 'हिमालयन क्लब' मधले बहुतेक फोटो लाईक करत असते.
आर्या, मला माझ्या सकट आणखी
आर्या, मला माझ्या सकट आणखी अनेक मित्र मैत्रीणी माहिती आहेत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तिथे एखादाच असा फोटो असेल जो आवडणार नाही.
आमच्या इकडे सापसुरळी च्या
आमच्या इकडे सापसुरळी च्या शेपटीला हात लावला की पैसे सापडतात. अशी अंधश्रद्धा आहे.
आम्ही एकदा वीस पंचवीस जण पहाटे धावायला गेलो होतो. एकाला सापसुरळी दिसली मग काय सगळ्यांनी हात लावले आणि तिची शेपटी शेवटी तुटून शरीरापासून वेगळी झाली.
रात्री शिट्टी वाजवू नये. असं पण म्हणतात. ह्याच कारण विचारल्यावर म्हणे चोर एकमेकांना शीट्टीच्या भाषेत आवाज देऊन बोलावतात.
मांजरी समोर लहान मुलांना दूध देऊ नये मांजर खार खाते.
अंगात चमक भरली किं पायाळू माणूस बोलावून त्याचा पाय लावतात. ही अंधश्रद्धा की ह्यामागे शास्त्रीय कारण हे नाही माहीत.
एकाच ब्यक्तीने दहन, माती, व
एकाच ब्यक्तीने दहन, माती, व तेराव्याला जाऊ नये. असे म्हणतात. यामागचे शास्त्र काय आहे.
वेगवेगळ्या व्यक्तींनी विभागणी
वेगवेगळ्या व्यक्तींनी विभागणी करण्याऐवजी एकच व्यक्ती ओव्हरलोडेड होते. मनात प्रचंड उदास भावना येतात.तसेच ही व्यक्ती खूप काळ मदतीला राहिल्याने घरच्यांना व्यवस्थित अगत्य होत नाहीय म्हणून गिल्ट येऊ शकतो.(मला खरे कारण माहिती नाही.हे फक्त अंदाज.)
अंगात चमक भरली किं पायाळू
अंगात चमक भरली किं पायाळू माणूस बोलावून त्याचा पाय लावतात. ही अंधश्रद्धा की ह्यामागे शास्त्रीय कारण हे नाही माहीत. >>> येस येस... हे पाहीलयं आणि फरक पडतो हे ही निरिक्षणात आहे. (पायाळू व्यक्तीची लाथ खावी म्हणतात पाठीत चमक वगैरे भरली तर... )
चावलेला विंचू मंत्राने
चावलेला विंचू मंत्राने ऊतरवतात किंवा चढवतात. आता ही अंधश्रद्धा आहे की नाही माहित नाही पण माझ्यासमोर बहिणीला चावलेला विंचू स्पर्श न करता काही वेळात ऊतरवलेला पाहिला आहे.
मला स्वत:ला विंचू चावल्यावर फारशा वेदना होत नाही. टॉवेल मध्ये असलेला विंचू मला पाठीवर तिन वेळा चावला. मी त्याला मारले आणि आईला दाखवले की हा बघ, तिन वेळा चावला तर आईला चक्कर आली होती. काहीतरी रक्तगटाचे कारण असावे. (मी पोटात असताना आईला विंचू चावला होता असं ती म्हणते.
)
"Of the 1,000+ known species
"Of the 1,000+ known species of scorpion, only 25 have venom that is deadly to humans; "
२५ डेडली असतील पण प्रत्येक
२५ डेडली असतील पण प्रत्येक विंचू फार वेदना देतो हे नक्की.
When it comes to scorpions,
When it comes to scorpions, bigger the better, smaller are deadly इति इंडि जोन्स
दय्या रे दय्या रे चढ गयो पापी
दय्या रे दय्या रे चढ गयो पापी बिचुवा..
When it comes to scorpions,
When it comes to scorpions, bigger the better, smaller are deadly
खरंय.... तात्या विंचू
केवढासा होता तो बाहुला.. आणि कसला डेंजर
लोल भास्कर
लोल भास्कर
काहीतरी रक्तगटाचे कारण असावे.
काहीतरी रक्तगटाचे कारण असावे. (मी पोटात असताना आईला विंचू चावला होता असं ती म्हणते. Happy )
>>>>>> सेम हिअर... याच कारणामुळे मलाही माझी आई म्हणते तुला विंचू चावला तरी चढणार नाही... कधी कधी वाटतं पडताळा घ्यावा
पण विषाची परिक्षा कोण घेणार ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आसा. परीक्षा कोण, कोणाची
आसा. परीक्षा कोण, कोणाची घेणार - तुम्ही, विंचू का विष?
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मांत्रिक उतरावतात तो
मांत्रिक उतरावतात तो बिनविषारी असणार म्हणजे, त्यांना माहीत असणार .
विषारी असो किंवा बिनविषारी,
विषारी असो किंवा बिनविषारी, मांत्रिकाकडे जाणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा.
काही माणसे पनौती असतात.
काही माणसे पनौती असतात. माझ्या ऑफिसमधे एक होता, मला जे काही चांगले सांगायचा, उदा. तेरा प्रमोशन होगा, सॅलरी बढेगी व्गैरे
पण जे काही बोलायचा बरोबर त्याच्या उलटेच, निगेटिव्हच घडायचे.
शेवटी मी त्याला माझ्याबद्द्ल काही बोलायचीच मनाई केली. नंतर ती कंपनी सोडली.
आधी मला पण हे असे का होतेय ते उमगले नव्हते, पण नंतर शांतपणे विचार केल्यावर संगती लक्षात आली.
कट्टापा कटाप झाले का?
कट्टापा कटाप झाले का?
हो विनिता..माझा भाऊ तसा आहे..
हो विनिता..माझा भाऊ तसा आहे...कुठे निघालं की याला नेमके उलट बोलायची हुक्की येते.... म्हणजे आज आपण बोट ऐवजी st ने जाऊया??? ( st कोणाला च आवडत नाही आमच्याकडे आणि बोटीने जाताना खूप मजा येते )
की काहीतरी होतं च म्हणजे अचानक कळत बोट बंद आहे आणि मग त्याला हवं तेच होतं..
कधी काही कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना बोलेल हे होणार च नाही...आम्ही नस्तर्या बोलतो त्याला
पृथ्वी गोल आहे ही अंधश्रद्धा.
पृथ्वी गोल आहे ही अंधश्रद्धा. नमोभक्ताचे आव्हान
https://www.youtube.com/watch?v=0BSmesyULbA
आणि हे वैज्ञानिक
आणि हे वैज्ञानिक स्पष्टीकरण
https://www.youtube.com/watch?v=t9U50EChiDk
मी पाहिलेली अंधश्रद्धा:
मी पाहिलेली अंधश्रद्धा: "हिंदू खतरें में है"
सत्यः हिंदूत्ववाद्यांची दुकाने खतरें में है
आसा. परीक्षा कोण, कोणाची
आसा. परीक्षा कोण, कोणाची घेणार - तुम्ही, विंचू का विष? >>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages