रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.
मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.
आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.
इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.
तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?
तुमचे विविध विषय हाताळण्याचे
तुमचे विविध विषय हाताळण्याचे कसब आणि टीआरपीचे ज्ञान अफलातून आहे.
घुबड.
घुबड.
नॉर्थ इंडिया मध्ये घुबड लकी, आपल्याकडे अशुभ आहे.
नॉर्थ मध्ये घरात घुबडांचे फोटो, शो पीस दिसतात.
बेसिक- मांजर आडवं गेल्यास 5
बेसिक- मांजर आडवं गेल्यास 5 पावले मागे जाणे. त्यात पुन्हा काळं मांजर असेल तर सरळ मागे फिरून घरी येणे.
संध्याकाळी दूध, दही, मीठ अशा पांढर्या वस्तू काही ठिकाणचे दुकानदार देत नाहीत. का ते अजूनही माहीती नाही मला.
१३ नंबर अशुभ मानतात पण काही
१३ नंबर अशुभ मानतात पण काही देशात हां शुभ समजला जातो
अमावस्या कुठल्याही कार्यारंभास अशुभ मानतात पण तेच दिवाळीचा पहिला दिवस हां अमावस्या असतो.
असे अनेक विरोधाभास आढळून येतात.
थोडक्यात म्हणजे मानवी मनाचे दुष्ट विचार/कल्पना सोडून ह्या जगात अशुभ असे काहीही नसते.
आणखी एक- माझा मित्र कार सुरू
आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.>>>
हसून हसून पार वाट लागली बुवा!!!
एक दिवस त्याच्या नकळत त्याच्या गाडीच्या चारही टायरच्या पुढील बाजूस दगड वगैरे काहीतरी ठेवा.
नजर लागू नये म्हनून काळा टीका
नजर लागू नये म्हनून काळा टीका लावणे बाळाला.
पिरियडस मध्ये बायकांनी किचन मध्ये न येणे - ( काही घरात बघितले आहे)
आमच्या गावातील मंदिरात एक
आमच्या गावातील मंदिरात एक मतिमंद व्यक्ती आहे. त्याला बरेच अडाणी लोक देव मानतात. आणी त्याला आपल्या अडिअडचणी सांगुन उपाय सुचवायला लावतात्. तो हि इथे लिंबु टाका तिथे टाका असले उपाय सांगतो त्याबदल्यात २०-३० रु मिळतात. त्याची संध्याकाळी जाऊन दारु पितो.
माझा साखरपुडा झाला तेव्हा ची
माझा साखरपुडा झाला तेव्हा ची गोष्ट.....साखरपुड्यात नवऱ्याकडून जी साडी दिली जाते ती साडी नंतर नवरी च्या करवली ला दिली जाते.. ( द्यावी च लागते ) का??? तसं न केल्याने सासू आंधळी होते
आमच्याकडे असले प्रकार नसतात. त्यामुळे मी साडी कोणाला दिली नाही सासू चे दोन्ही डोळे छान आहेत.
आम्ही हसून मेलो होतो तेव्हा हे ऐकून...
बारमध्ये दारू पिणारया बरेच
बारमध्ये दारू पिणारया बरेच जणांना बघतो, दारूत एक बोट बुडवून दोनचार थेंब हवेत उडवतात आणि मगच कार्यक्रम सुरू करतात.
एका पिणारया मित्राला याबद्दल विचारले तर त्याने सांगितले की ते लोकं अतृप्त आत्मे शांत करतात. अंधश्रद्धाळू असतात मेले.
आणि असे बोलून त्याने गळ्यातली माळ काढून खिश्यात ठेवली आणि दारू प्यायला सुरूवात केली..
सासू आंधळी होते >> लोल...
सासू आंधळी होते
>> लोल...
लोकं लग्न करताना सुट्टीचा
लोकं लग्न करताना सुट्टीचा दिवस, हॉलची उपलब्धता, लोकांची सोय गैरसोय न बघता मुहुर्त बघतात.
आणि मग त्या मुहुर्तांना सारे हॉल फुल्ल असतात.
आमच्याकडे मीच घरी सोयीनुसार दिवस काढून दिला आणि म्हणालो आता या दिवसात हवा तो मुहुर्त काढा. मग संध्याकाळचा एक निघाला तसे माझे लग्न लाऊन टाकले.
तसेही आधी रजिस्टर झालेलेच. त्यात कसला मुहुर्त बघायचा प्रश्नच नव्हता.
तो लिंबू मिरची टाचणी टोचून एक
तो लिंबू मिरची टाचणी टोचून एक भन्नाट प्रकार असतो.
मी रस्त्यात कुठे दिसले की हमखास चिरडून जातो. गेला बाजार फूटबॉल तरी खेळूनच पुढे जातो.
आम्ही मंदीरात जातो तेव्हा
आम्ही मंदीरात जातो तेव्हा बरेचदा माझे काम चपला सांभाळायचेच असते. बायको शिवभक्त असल्याने शंकराच्याच मंदिरात जाणे होते. शंकराची पूजा करणे हा आस्तिक विचार समजू शकतो. पण नंदीच्या कानात हळूवारपणे काहीतरी बोलताना लोकं दिसतात तेव्हा खरेच गंमत वाटते. मी सुद्धा तेवढाच टाईमपास म्हणून चार गोष्टी बोलतो नंदीशी. मन हलके होते. म्हणजे अगदीच अंधश्रद्धा बोलता येणार नाही.
लहान मुलांच्या डोक्यावरून
लहान मुलांच्या डोक्यावरून गेले की त्यांची ऊंची वाढत नाही म्हणतात.
आणि चुकून गेले की उलटे जावे असे म्हणतात.
तसेच डोक्याला डोके लागले की टकली बायको वा टकला नवरा मिळतो असे बोलतात.
ते नको असल्यास पुन्हा एकदा डोक्याला डोके आपटावे किंवा थोडेसे थुंकावे.
ज्यांना डोक्यावर केसांमध्ये
ज्यांना डोक्यावर केसांमध्ये दोन भवरे असतात त्यांना दोन बायका मिळतात असे एक फार फेमस होते.
आम्हा भावंडात एकाला दोन भवरे होते. त्याला आम्ही फार चिडवायचो आणि तो जाम वैतागायचा.
थोडे मोठे झालो तसे त्याला दोन बायकांची स्वप्ने पडून गालावर दोन खळ्या पडू लागल्या आणि आम्ही त्याच्यावर जळू लागलो.
थोडे आणखी मोठे झाल्यावर आम्हाला अक्कल आली आणि असे काही नसते हे समजले.
सध्या आम्ही त्याच्या बायकोला चिडवतो की जपून राहा नाहीतर तुझी राधिका व्हायची.
उंची च मला ही माहीत आहे...
उंची च मला ही माहीत आहे... आमच्या कडे उलट झालं...माझी भयानक वाढणारी उंची थांबवायला हे प्रकार केले गेले पण माझी उंची जास्त च वाढली....हाहाहा
हॉस्टेलला असताना आम्ही रात्री
हॉस्टेलला असताना आम्ही रात्री बारानंतर बाहेर बाथरूमला जायला घाबरायचो.
भूतांच्या भितीने.
पण मग रात्री तीन वाजता रामाचा रथ निघतो आणि भुते पळून जातात असे एक फेमस होते. मग बिनधास्त जायचो.
अर्थात माझा यावर विश्वास नव्हताच. पण विश्वास ठेवण्यात मजा यायची.
1 rs टाकला की रक्कम शुभ होते.
1 rs टाकला की रक्कम शुभ होते.
उदा -101,501,1001.
आजकाल इन्वेलोप पण 1 rs जोडलेले मिळतात अलरेदी.
काय लॉजिक आहे कोण जाणे. पण ते
काय लॉजिक आहे कोण जाणे. पण ते चिकटवलेले 1 रुपयाचं नाणं निघत नाही लवकर
काढायचं कशाला, तेच पाकीट
काढायचं कशाला, तेच पाकीट नेक्स्ट टाईम पास करायचं दुसर्यांना.
मीठ खाली सांडू नये म्हणतात...
मीठ खाली सांडू नये म्हणतात... देवाघरी गेल्यावर पापणीच्या केसांनी उचलून द्यावं लागतं म्हणे
चोरून साय-साखर खाऊ नये म्हणतात डोळ्याला मांजोळी होते
कुणाची वाट पाहात असतांना दाराला आतल्या बाजुने पळी/डाव अडकवून ठेवावा 'ती' व्यक्ती लवकर घरी येते असं ऐकलंय
पीरीअड्स असलेल्या बाईच्या हातून काही खाऊ नये फार मोठं पाप लागतं म्हणतात
उपासाला शेंगतेल चालत नाही त्याच शेंगदाण्याचा कूट चालतो (असो, काय 'चालतं' अन काय नाही यात अजून एका शंभरीवाल्या धाग्याचं पोटेन्शिअल आहे)
चपला उलट-सुलट कश्याही ठेवू नये
लहानपणी आम्ही म्हणजे आम्ही
लहानपणी आम्ही म्हणजे आम्ही तीन मित्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पेटीतून काड्या करत पैसे चोरायचो.
आणि नंतर त्याच पैश्यात गाडीवर बड्याचे मटण आणि पाव खायचो.
बाकीचे सारे भ्रष्ट झालात, धर्म बुडवला म्हणून ओरडा करायचे.
आम्हा मुलांनाही तेव्हा बिल्डींगच्या दादरावर म्हणजे कॉमन पॅसेजमध्ये गणपती बसवायचा होता. मोठ्या लोकांनी गणपतीचे फार कडक असते, हा लहान मुलांचा खेळ नाही बोलत विरोध केला. पण आम्ही अखेर त्या सर्वांच्या विरोधात जात गणेशोत्सव साजरा केलाच.
त्याची एक आठवण ईथे सांगायची म्हणजे तेव्हा चाळीत ईस्त्रीचे कपडे द्यायला एक मुसलमान पोरगा यायचा. पोरांनी त्याला आरतीचा प्रसाद दिला. तसे तो मुसलमान म्हणून त्याने नकार दिला. तर पोरं लगेच त्याला मारायला गेली. सारेच धार्मिक श्रद्धाळू. तो सुद्धा आणि आमची पोरे सुद्धा. मी मात्र मध्ये पडून त्याचा मार वाचवणारयांमध्ये होतो.
हो ते प्रसाद खात नाहीत. मी
हो ते प्रसाद खात नाहीत. मी मात्र ईद मध्ये शीर कुरमा , गुलगुले मजेत खातो.
भास्करा, एका पोस्टीतच लिही की
भास्करा, एका पोस्टीतच लिही की सगळ्य अतुझ्या अंधश्रद्धा.
अने, सासु आंधळी हे लोल आहे, पहिल्यांदाच ऐकलं, आमच्यात नाहीये ही पद्धत
रीया, एका पोस्टीत लिहायचे
रीया, एका पोस्टीत लिहायचे झाल्यास मी आयुष्यभर ती पोस्टच लिहीत बसेन. जगात करोडो माणसे आहेत तर करोडो अंधश्रद्धा. एक पोस्ट केली की दुसरी आठवत होती, दुसरी पोस्ट केले की तिसरी..
आता आलोच आहे या धाग्यावर तर अजून एक लिहितो..
क्रिकेटचा सामना बघताना ठराविक जागा सोडू नये नाहीतर विकेट पडते ही अंधश्रद्धा पुर्ण भारतभर आढळते.
बरं पडली विकेट तर पडली. त्यात काय एवढे. या खेळाने देशातील लोकांना वेडे आणि खुळे दोन्ही एकाच वेळी करून ठेवले आहे.
तुर्तास शुभरात्री ...
साखरपुड्यात नवऱ्याकडून जी
साखरपुड्यात नवऱ्याकडून जी साडी दिली जाते ती साडी नंतर नवरी च्या करवली ला दिली जाते.. ( द्यावी च लागते ) << एखाद्या करवली ही प्रथा सुरु केली असेल![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
क्रिकेटचा सामना बघताना ठराविक जागा सोडू नये नाहीतर विकेट पडते ही अंधश्रद्धा पुर्ण भारतभर आढळते. << हे भारता बाहेर ही बघितले आहे
रीया, एका पोस्टीत लिहायचे
रीया, एका पोस्टीत लिहायचे झाल्यास मी आयुष्यभर ती पोस्टच लिहीत बसेन.
>>>☺️
माझी एक रूममेट म्हणायची की
माझी एक रूममेट म्हणायची की ताटात पदार्थ वाढून घेताना थोडा थोडा का होईना, पण दोनदा घ्यावा, नाही तर आपली सासू आंधळी होते ( एकूण सासू आंधळी होणे कॉमन दिसतंय
) .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
महत्त्वाचं काम करायला जाताना तिघांनी जाऊ नये असं माझ्या साबा म्हणतात. अगदीच चौथ्या माणसाला न्यायला जमत नसेल तर खिशात एक दगड ठेवावा म्हणे
रुन्म्याचा नविन आय्डी आहे का
रुन्म्याचा नविन आय्डी आहे का हा? जाणकारांनी प्रकाश टाकावा?
रिया मी पण लोल ले च होते
रिया मी पण लोल ले च होते तेव्हा..... माझ्या आत्या, मम्मी आणि मावशीने "तुझी सासू आणि सासरचे बावळट च आहेत " असा लुक दिलेला
Pages