मीना प्रभु

Submitted by सायो on 21 July, 2008 - 00:32

मीना प्रभूंचं 'माझं लंडन', ऍमेझॉनवरचं पुस्तक(नाव लक्षात नाही), ग्रिकांजली, तुर्कनामा, इजिप्तायन वाचून संपवलं आहे. बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं. बाकी ऐतिहासिक़ उल्लेख नी माहितीचा ओवरडोस असतो त्यांच्या प्रवासवर्णनात(निदान माझ्याकरता तरी.शाळेत इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं). पण तरीही विकत घेऊन आवर्जून वाचते नेहमी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं<>
राहवलं नाही म्हणून लिहितोय..
मीना प्रभूंच्या सफरी भरपूर पैसे देऊन इंटरनेटवरून आखलेल्या असतात.
व्यवस्थित गाईड, उत्तम हॉटेल्स असं सगळं असतं.
एखाद्या स्त्रीने २१व्या शतकात, विमानाने, टॅक्सीने, एकटं फिरणं यात नावीन्य काय, हे माझ्या आकलनापलिकडचं आहे. माझ्या काही फ्रेंच व जपानी मैत्रिणी दरवर्षी भारतात येऊन एकट्या फिरतात.
मीना प्रभूंना मिळणार्‍या कुठल्याही सुविधा अस्तित्वात नसताना आफ्रिका, किंवा मध्य-पूर्व आशिया पालथा घालणार्‍या असंख्य स्त्रिया आहेत.
स्त्री असणं अथवा मराठीतून लिहिणं हाच जर निकष असेल तर केसरी/सचिन ट्रॅव्हल्सच्या अनेक टूर कंडक्टर्स या मुली आहेत, आणि मीना प्रभू जसं लिहितात, त्याच दर्जाचं वर्णन रविवारी लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांत वाचायला मिळतं.
उद्या जर मी पुण्याला पहिल्यांदा गेलो, माझ्याकडे पुणं 'बघायला' एकच दिवस, माझ्या गाईडबुकात लिहिलेलं असतं की पर्वती, शनिवारवाडा, दगडुशेठ गणपती पहावा. मी धावतपळत ही तीन स्थळं उरकतो, ब्रिटीश लायब्ररीतून त्यांचा इतिहास मिळवतो, आणि पुणं पाहिलं असं जाहीर करून टाकतो.
दुर्दैवानं अशा प्रकारच्या लिखाणाला चांगल्या प्रवासवर्णनाचा दर्जा मिळतो.
असो.

Chinoox,
स्त्री असणं किंवा एकटीने फिरणं किंवा मराठीत लिहीणं याचा बडेजाव जितका चुकीचा आहे, तितकाच
>> मीना प्रभूंच्या सफरी भरपूर पैसे देऊन इंटरनेटवरून आखलेल्या असतात/व्यवस्थित गाईड, उत्तम हॉटेल्स असं सगळं असतं.
म्हणून त्यांची प्रवासवर्णनं सुमार हा निष्कर्ष.
.
गाईड वापरणं, इंटरनेटवरून संदर्भ मिळवणं यात काय वाईट आहे मला समजलं नाही.
तुम्हाला आवडत नसतील, तसं म्हणा. (आणि इतकी प्रवासवर्णनं वाचल्यावर तसं वाटणं स्वाभाविक असेलही कदाचित.) पण हे काही कारण असू शकत नाही.

<<मीना प्रभूंच्या सफरी भरपूर पैसे देऊन इंटरनेटवरून आखलेल्या असतात/व्यवस्थित गाईड, उत्तम हॉटेल्स असं सगळं असतं.
म्हणून त्यांची प्रवासवर्णनं सुमार हा निष्कर्ष.>>
मला असं वाटतं, हा निष्कर्ष आपण कसा काढलात?
'इंटरनेटवरून संदर्भ मिळवण्याबाबत' मी काहीही लिहिलेले नाही.
गाईड, आखलेला प्रवास, राहण्याची बहुतांश वेळा झालेली आयती सोय, या पार्श्वभूमीवर त्यांचा एकटा प्रवास करणं अजिबात ग्रेट ठरत नाही. माझ्या आधीच्या पोस्टमध्येही मला हेच म्हणायचे होते.

गाईड, आखलेला प्रवास, राहण्याची बहुतांश वेळा झालेली आयती सोय, या पार्श्वभूमीवर त्यांचा एकटा प्रवास करणं अजिबात ग्रेट ठरत नाही. >>>>> असेल कदाचित... पण ह्या सारख्या सोई तुमच्या आमच्या सारख्यांकडे असूनही आपल्या पैकी कितीजण महिन दिड महिना प्रवासाला जातात???? आहेत सोई (आणि मुख्य म्हणजे पैसा) म्हणून वापरलं तर बिघडलं कुठे.. किती ही हालात केलेले प्रवास आणि हा असा प्रवास ह्यात उत्साह हा एकाच दर्जाचा असतो.. अर्थात माझं मत..
.
उद्या जर मी पुण्याला पहिल्यांदा गेलो, माझ्याकडे पुणं 'बघायला' एकच दिवस, माझ्या गाईडबुकात लिहिलेलं असतं की पर्वती, शनिवारवाडा, दगडुशेठ गणपती पहावा. मी धावतपळत ही तीन स्थळं उरकतो, ब्रिटीश लायब्ररीतून त्यांचा इतिहास मिळवतो, आणि पुणं पाहिलं असं जाहीर करून टाकतो. >>>>> बरोबर आहे.. Happy
.
स्त्री असणं अथवा मराठीतून लिहिणं हाच जर निकष असेल तर केसरी/सचिन ट्रॅव्हल्सच्या अनेक टूर कंडक्टर्स या मुली आहेत, आणि मीना प्रभू जसं लिहितात, त्याच दर्जाचं वर्णन रविवारी लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांत वाचायला मिळतं. >>> अगदी तुम्ही लिहिलेल्या english लेखकांच्या तोडीची नसली तरी इतकी सुमार दर्जाची नसतात हो त्यांची पुस्तकं... Happy आणि ही पुस्तक फार अपेक्षा न ठेवता एखादा ब्लॉग वरचा अनुभव वाचतोय असं मनात ठेवून वाचली तर घटका भर करमणूक नक्कीच होते..

चिनुक्स
हा मुद्दा ही पटलेला नाही. भरपूर पैसे देउन, आलिशान हॉटेलात राहून प्रवास केला म्हणजे तो ग्रेट नाही अन बिन-तिकीट किंवा बिन-रिझर्वेशन प्रवास केला, व युथ होस्टेलमधे दिवस काढले म्हणजेच ग्रेट का? का आरामशीर प्रवास करणार्‍यांनी प्रवास वर्णन लिहुच नये? असा पैसा ओतून प्रवास करणार्‍यांव ही अडचणी येऊ शकतातच.

<<मीना प्रभूंच्या सफरी भरपूर पैसे देऊन इंटरनेटवरून आखलेल्या असतात.
व्यवस्थित गाईड, उत्तम हॉटेल्स असं सगळं असतं.
एखाद्या स्त्रीने २१व्या शतकात, विमानाने, टॅक्सीने, एकटं फिरणं यात नावीन्य काय, हे माझ्या आकलनापलिकडचं आहे.>>
हे माझं मूळ पोस्ट.
यात माझा आक्षेप 'स्त्री असून एकटं फिरणं' यावर आहे.
'इंटरनेटचा वापर चूक', 'पैसा खर्च करू नये', 'हॉटेलमध्ये राहू नये', असं मी म्हटलेलं नाही.
सगळं काही व्यवस्थित आखलेलं असताना, बराचसा प्रवास हा एखाद्या टुरिस्ट कंपनी/गृपबरोबर केलेला असताना 'एकटं फिरते', असं कशाला?
दिमतीला टॅक्सी असते, वाटाड्या असतो, मग 'एकटं असणं' याला कितपत महत्त्व उरतं?
'स्त्री असून एकटं फिरते' हा मुद्दा त्यांच्या पुस्तकांसंदर्भात बरेचदा पुढे केला जातो. आणि त्यांची प्रवासवर्णनं आवडण्यामागचं एक कारण, म्हणून तो दिला जातो.
<किती ही हालात केलेले प्रवास आणि हा असा प्रवास ह्यात उत्साह हा एकाच दर्जाचा असत<>
इथे परत किती हाल होतात हा मुद्दा नाही. 'एकटं फिरणं' हा आहे.
<मीना प्रभूंना मिळणार्‍या कुठल्याही सुविधा अस्तित्वात नसताना आफ्रिका, किंवा मध्य-पूर्व आशिया पालथा घालणार्‍या असंख्य स्त्रिया आहेत.>
या माझ्या विधानामागेदेखील हाच मुद्दा होता. त्यांचं स्त्री असणं/एकटं फिरणं हा एकविसाव्या शतकात पराक्रम असू शकत नाही.

मी इतरत्र सुचवलेल्या इंग्रजी पुस्तकांचा उल्लेखसुद्धा अस्थानी आहे. ती पुस्तकं मला आवडतात म्हणून मीना प्रभूंची पुस्तकं वाईट, हे बरोबर नाही. ती मला आवडलेली पुस्तकं आहेत. इतरांनीही वाचावीत म्हणून यादी दिली होती.

<पण ह्या सारख्या सोई तुमच्या आमच्या सारख्यांकडे असूनही आपल्या पैकी कितीजण महिन दिड महिना प्रवासाला जातात<>
हल्ली जातात बरीच जणं. अगदी विदर्भ, मराठवाड्यातल्या छोट्या शहरातली मंडळी भरपूर प्रवास करतात.
अनिल दामले अनेक ज्येष्ठ नागरीकांना घेऊन नियमितपणे दक्षिण धृवावर जाऊन येतात.

<मीना प्रभूंच्या सफरी भरपूर पैसे देऊन इंटरनेटवरून आखलेल्या असतात/व्यवस्थित गाईड, उत्तम हॉटेल्स असं सगळं असतं.
म्हणून त्यांची प्रवासवर्णनं सुमार हा निष्कर्ष.>
स्वातीने केलेले हे विधान माझे नाही. प्रवासवर्णनाच्या गुणवत्तेबद्दल मी लिहिलेलं नाही.
लोकसत्ता, सकाळच्या ज्या लेखांचा मी उल्लेख केलाय, ते लेख खरोखरंच अप्रतिम होते. ललिता धरप, वासंती घैसास, लिली जोशी यांची ही प्रवासवर्णनं बरीच गाजली होती.

मीना प्रभू यांची पुस्तकं का आवडतात, याला 'त्या एकट्या फिरतात' हे उत्तर मी बरेचदा ऐकलं आहे.
शिवाय 'मी एकटं फिरते' हे विधान आपल्या प्रवासवर्णनांसंदर्भात खुद्द मीना प्रभू यांनी लोकसत्तेत यशोधरा भोसले यांच्याशी झालेल्या वादात अनेकदा केलं आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाशी संबंधीत असलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित कसा होऊ शकतो?

chinoox मला वाटते तुझ्या post च्या शेवटी हे वाक्य आहे त्याला लोकांचा आक्षेप आहे.
"दुर्दैवानं अशा प्रकारच्या लिखाणाला चांगल्या प्रवासवर्णनाचा दर्जा मिळतो."

<,उद्या जर मी पुण्याला पहिल्यांदा गेलो, माझ्याकडे पुणं 'बघायला' एकच दिवस, माझ्या गाईडबुकात लिहिलेलं असतं की पर्वती, शनिवारवाडा, दगडुशेठ गणपती पहावा. मी धावतपळत ही तीन स्थळं उरकतो, ब्रिटीश लायब्ररीतून त्यांचा इतिहास मिळवतो, आणि पुणं पाहिलं असं जाहीर करून टाकतो.
दुर्दैवानं अशा प्रकारच्या लिखाणाला चांगल्या प्रवासवर्णनाचा दर्जा मिळतो.>
माझ्या शेवटच्या वाक्याचा हा संदर्भ आहे.
मीना प्रभूंची 'गाथा इराणी' वगळता सगळी पुस्तकं मी वाचली आहेत.
त्यात 'प्रसिद्ध स्थळं आणि त्यांचा इतिहास' हेच माझ्या अधिक लक्षात राहिलं.
मला कुठेही मेक्सिकन, चिनी, ग्रीक माणसं दिसली नाहीत.
sayonara, adm यांचीही बहुधा हीच मतं आहेत.
मीना प्रभूंनी आपल्या पुस्तकांची तुलना Bill Bryson च्या पुस्तकांशी (अप्रत्यक्षपणे) केली आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांतील स्थलवर्णन (इतर त्रुटींसह) माझ्या जास्तच नजरेत भरलं.

कदाचित 'चांगल्या' या शब्दाऐवजी 'उत्तम' हा शब्द वापरायला हवा होता.
केवळ ब्लॉगवरील लिखाणाप्रमाणे ही पुस्तकं वाचायची असतील तर काहीच हरकत नाही. पण 'मौज'ने प्रकाशित केलेल्या, अतिशय गाजलेल्या पुस्तकांकडून अपेक्षाभंग होतो, हे खरे.

मी फार काही प्रवासवर्णनं वाचली नसतील.. पण मीना प्रभूंची सगळी पुस्तकं मला आवडतात.. मराठी मधे तरी इतकी माहीती , एखाद्या प्रवासवर्णनामधे मी वाचली नाहीये.. आणि एकट्या फिरतात याचं कौतुक आहे मलाही.. कितीही प्रवास आखलेला, सगळं मॅनेज्ड असलं तरी एकट्याने फिरणं हे मला सोप्पं वाटत नाही.. जरी त्या केवळ पुस्तक लिहीण्याच्या दृष्टीने फिरत असल्या तरी.. उलट मला तेच अवघड वाटतं.. पुस्तक लिहीण्यासाठी म्हणून कोणी इतकी उस्तवार करतं का? निदान मी केली नसती..आणि त्या करत आहेत वर्षानुवर्षं, नवीन-नवीन देशात जात आहेत, म्हणून कौतुक.. नवीन माहीती मिळते हे ही एक कारण..
पण आत्तापर्यंत मीना प्रभूंच पुस्तक माझ्या हातात आलंय आणि मी ते खालीही न ठेवता संपवलं नाहीये असं झालं नाहीये.. याचं कारण नाही माहीत.. म्हणूनच मला ती सुमार नक्कीच वाटत नाहीत.. आणि त्यांना मी निदान मराठी मधील चांगलं प्रवासवर्णन असा दर्जा देखील देईन..

    बाकी दिनेशदा, 'गाथा' हा शब्द पारसी आहे हे वाचून खूपच मजा वाटली! म्हणजे तुकाराम गाथा वगैरे म्हणतो तो शब्द मराठीमधला नाहीये!? आणि तसंच, इराणचं नाव, आर्यनाम क्षेत्रम? कमाल आहे!

    मी तुर्कनामा वाचलंय आणि बाकी वर्णने येथे वाचली आहेत, त्यात एक मात्र जाणवले (वरच्या 'गाथा' वरून ही), एखादा शब्द त्या फिरलेल्या देशात आणि भारतात प्रचलित असला की तो त्या तेथूनच भारतात आला हे कसे ठरवतात? त्यांच्या त्या महिन्याच्या प्रवासात हे नक्की कसे कळते? कदाचित दोन्ही भाषांतील शब्दांचे मूळ एकच असेल किंवा येथूनच तिकडेही गेलेला असू शकतो? अगदी पुना ओक सारखे नाही, पण हे दुसरे टोक वाटते Happy

    बापरे, किती तो काथ्याकुट माझ्या एका वाक्यावर. त्या स्त्री आहेत की पुरुष ह्याच्याशी मला काही देणंघेणं नाही.' त्या एकट्याने फिरतात' हे मी फक्त ह्या अर्थाने लिहिलं होतं की तशा त्या वयाने फार तरुण नाहीत. आणि कुठेही बरोबर जायला कंपनी नाही म्हणून त्यांचं घोडं पेण खात नाही. आणि त्यांच्या बाकीच्या सोयी सुविधांशी माझा काय संबंध? राहिनात का कुठेही.

    >>>एखाद्या स्त्रीने २१व्या शतकात, विमानाने, टॅक्सीने, एकटं फिरणं यात नावीन्य काय, हे माझ्या आकलनापलिकडचं आहे. माझ्या काही फ्रेंच व जपानी मैत्रिणी दरवर्षी भारतात येऊन एकट्या फिरतात.

    नावीन्य कुणाला वाटतंय त्यात चिनुक्स? मलाही माहितेय की जॅपनीज लोकं आणि फिरंगी लोकं/एकेकट्या बायकाही दुनिया पालथी घालतात ते.
    पण त्यात मीना प्रभुंच्या जनरेशनच्या भारतीय बायका बोटावर मोजण्याइतक्याच असतील, नाही कां?

    <बाकी दिनेशदा, 'गाथा' हा शब्द पारसी आहे हे वाचून खूपच मजा वाटली<>
    'गाथा' हा शब्द पारसी नाही.
    देवस्थळी, जोशी संपादीत संस्कृत कोषानुसार याचं मूळ 'गाथ' या शब्दात आहे. याचा अर्थ 'गाणे'.
    गाथिक = गवई
    गाथिका = स्तोत्र
    गाथा = श्लोक

    झारतुष्ट्राने रचलेल्या स्तोत्रांना 'गाथा' असे म्हणतात. पण ही 'पारसी' भाषा नाही. ही प्राचीन अवेस्तन भाषा आहे. Indo-Iranian भाषांपैकी एक असलेली ही भाषा संस्कृतला अतिशय जवळ आहे.
    अवेस्तन व संस्कृतमधून बरेच शब्द पर्शियन भाषेत आले. उदा: क्षात्र - क्षात्रवैर्य - शहरीवर.
    फारसी/पर्शियन भाषेचा आणि अवेस्तन भाषेचा (काही शब्दांच्या उसनवारीव्यतिरीक्त) संबंध नाही. (संदर्भ-विकी)

    ओके.. बरं झालं अर्थ सांगितलास ते.. पटत नाही,'गाथा' शब्द पारशी! Happy

    मला कुठेही मेक्सिकन, चिनी, ग्रीक माणसं दिसली नाहीत.
    sayonara, adm यांचीही बहुधा हीच मतं आहेत. >>>>>
    चिनुक्स...हो.. थोड्याफार प्रमाणात माझंही तेच मत आहे... त्यांची पुस्तकं खूप ग्रेट असतिलच अस नाही.. पण ज्याकारणा वरून तू (की तुम्ही???)त्यांच्यावर टिका करत होतास (किंवा तू करत नव्हतास पण आम्हाला तस वाटलं....!) ते पटलं नाही...
    .
    सायो... पूर्णपणे सहमत...
    .
    असो... Happy

    मला मीना प्रभूंची पुस्तके आवडत नाहित हे नमूद करून लिहितो. (कारण अज्ञात)
    .
    मला कुठेही मेक्सिकन, चिनी, ग्रीक माणसं दिसली नाहीत.>> मग काय झाले नक्कि ? माणसे असतील तर ते प्रवास वर्णन चांगले/उत्तम असा मापदंड नक्कीच नाही. शेकडा शंभर टक्के लोक शेवटी फिरायला जाताना तिथे काय "पटेलगिरी" करता येईल ह्याच शोधात असतात. माणसे भेटायला जाणार्‍यांची जातकूळी वेगळी.
    .
    अगदी "नुसते प्रसिद्ध स्थळ नि त्याचा इतिहास" एव्हढेच लिखाण करूनही बर्‍याच लोकांना ती पुस्तके आवडतात म्हणजे त्यात काहीतरी असेल असा संशयाचा फायदा मी तरी देईन. कदाचित साधी सरधोपट शैली आवडत असेल किंवा अगदी त्यात माणसांशी निगडित फारसे प्रसंग येत नाहीत हा भागही आवडत असेल. प्रत्येक व्यक्ती एकाच Type ची प्रवासवर्णन अपेक्षीत असेल असे जरूरी नाही. अगदी Holy Cow चेच उदाहरण बघ ना. आपल्या तिघांना त्यातले खटकणारे मुद्दे वेगळे होतेच की.
    .
    केवळ ब्लॉगवरील लिखाणाप्रमाणे ही पुस्तकं वाचायची असतील तर काहीच हरकत नाही. >> आणी हे माझ्या डोक्यावरून गेले. पुस्तके नि blog मधे काय कप्पाळ फरक असतो ? दोन्ही कडे "option आहे तेंव्हा घ्या लिहून" नि "कोणीतरी वाचतेय ना मग घाला रतिब" सापडतेच.

    कुणाला एखाद्या देशात काय काय बघण्यासारखे आहे हे जर माहिती करून घ्यायचे असेल तर मग संदर्भ म्हणून मीनाताईंची पुस्तकं उपयोगी येतात. प्रवास करून आणि मग जे काही पाहिलं ते लिहून काढणं हे खरच कौतुकास्पद आहे.

    सगळं काही व्यवस्थित आखलेलं असताना, बराचसा प्रवास हा एखाद्या टुरिस्ट कंपनी/गृपबरोबर केलेला असताना 'एकटं फिरते', असं कशाला?
    दिमतीला टॅक्सी असते, वाटाड्या असतो, मग 'एकटं असणं' याला कितपत महत्त्व उरतं?
    'स्त्री असून एकटं फिरते' हा मुद्दा त्यांच्या पुस्तकांसंदर्भात बरेचदा पुढे केला जातो. आणि त्यांची प्रवासवर्णनं आवडण्यामागचं एक कारण, म्हणून तो दिला जातो.<<<<<<<<<<<<<<<
    याच्याशी मी पूर्णपणे सहमत. आणि वर नमूद केलेल्या या मुद्द्यांबद्दल: -
    .
    पण ह्या सारख्या सोई तुमच्या आमच्या सारख्यांकडे असूनही आपल्या पैकी कितीजण महिन दिड महिना प्रवासाला जातात???? आहेत सोई (आणि मुख्य म्हणजे पैसा) म्हणून वापरलं तर बिघडलं कुठे.. <<<<<<<<
    आणि एकट्या फिरतात याचं कौतुक आहे मलाही.. कितीही प्रवास आखलेला, सगळं मॅनेज्ड असलं तरी एकट्याने फिरणं हे मला सोप्पं वाटत नाही.. जरी त्या केवळ पुस्तक लिहीण्याच्या दृष्टीने फिरत असल्या तरी.. उलट मला तेच अवघड वाटतं.. पुस्तक लिहीण्यासाठी म्हणून कोणी इतकी उस्तवार करतं का?>>>>>>>>>>>>>>>>>>
    पुस्तकांना मार्केट आहे, म्हणून ही उस्तवार करणं त्यांना भाग आहे. त्यात विशेष ते काय? कारण नवीन देशात गेल्या नाहीत, तर नवीन पुस्तक कसे लिहिणार? आणि तीनेकशे पाने भरण्याएवढा मजकूर तयार करायचा असेल तर एक दीड महिना तरी फिरायला हवेच ना! तेव्हा तो त्यांच्या लेखनव्यवसायाचाच एक भाग झाला. (होय, त्या समाजसेवा म्हणून पुस्तके लिहित असतील, हे संभवत नाही.) मग उगीच 'मी एकटी फिरते' याचे भांडवल करता कामा नये. आणि दर पुस्तकात हा मुद्दा अधोरेखित करायची काही आवश्यकता नसते. (तसाच तुर्कनामा मध्ये जाणवलेला दुसरा मुद्दा 'कसं बै यांना इंग्लिश येत नाही?') दुर्दैवाने आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला भावनिक झालरी लावून टाकण्याची जुनी परंपरा आहे. मग कशी बिच्चारी बाई हालअपेष्टा सोसत एकटी फिरते, गैरसोयी सहन करते, असले मुद्दे पुस्तकाविषयीच्या चर्चेत यायला लागतात.
    .
    माझ्या मते, जेव्हा असल्या अवांतर मुद्द्यांचा आधार पुस्तकं गाजावीत, याकरता घेतला जातो, तेव्हाच पुस्तकांचा दर्जा स्पष्ट होतो.
    आणि मराठीत चांगल्या प्रवासवर्णनांची उणीव आहे, ही बाब ठळक होते एवढंच.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    'माता' रिटर्न्स.

    <<मला कुठेही मेक्सिकन, चिनी, ग्रीक माणसं दिसली नाहीत.>> मग काय झाले नक्कि ? माणसे असतील तर ते प्रवास वर्णन चांगले/उत्तम असा मापदंड नक्कीच नाही. शेकडा शंभर टक्के लोक शेवटी फिरायला जाताना तिथे काय "पटेलगिरी" करता येईल ह्याच शोधात असतात. माणसे भेटायला जाणार्‍यांची जातकूळी वेगळी.>>

    असा मापदंड आहे. निव्वळ प्रेक्षणीय स्थळांच्या जंत्रीला 'travel guides' असं म्हणतात.

    Voyages and visions - Towards a cultural history of travel : Ed. Jas Elsner & Joan - Pau Rubies या पुस्तकांतील अनेक लेखांत अशी गाईडबुकं व प्रवासवर्णनं याबाबत विस्तारानं लिहिलं आहे.
    गाईडबुकांत केवळ हॉटेल्सची यादी हवी असं नव्हे. Karl Baedeker ची गाईडबुकं 'literary guidebooks' म्हणून ओळखली जात. मीना प्रभूंची पुस्तकंही कदाचित याच श्रेणीत मोडतील.

    Between the woods & the water या प्रवासवर्णनाच्या प्रस्तावनेत Patrick Leigh Fermorने लिहिलंयः Fearing some details might have got out of sequence [after I lost my notebook] when I started writing the present book, I surrounded these passages with a cloud of provisos and lores. Then the thought that these pages were not a guidebook persuaded me that it did not matter at all, so I let the story tell itself free of debilitating details.

    Full Tiltच्या प्रस्तावनेत Devla Murphy लिहितात : [..] I have left my travel diary virtually unchanged. A few very personal or very topical comments or allusions have been excised, but the temptation to make myself sound more learned than I am, by gleaning facts and figures from an encyclopaedia and inserting them in appropriate places, has been resisted. For this reason the narrative which follows will be seen to suffer from information or statistic-deficiency; it only contains such experiences as any traveller might happen to pick up from day to day along my root.

    २००४ सालापर्यंत Thomas Cook Travel Book Awards दिले जायचे. विक्रम सेठ, नॉर्मन लेविस वगैरे प्रवासवर्णनकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेली काही पुस्तकं मी वाचलेली आहेत. एकाही पुस्तकात 'केवळ स्थळं व माहिती' हा प्रकार नाही. अकारण संदर्भग्रंथांची सूची नाही.
    हा पुरस्कार स्वीकारताना विक्रम सेठ यांनी केलेलं भाषणही 'चांगल्या प्रवासवर्णनाच्या ' लक्षणांबद्दल आहे.

    वरील उदाहरणांचा व माझ्या इंग्रजी वाचनाचा अकारण संबंध लावला जाऊ नये, म्हणून पुलंचं उदाहरण देतो. 'अपूर्वाई' च्या कुठल्याशा नवीन आवृत्तीच्या प्रस्तावनेत पुलंनी 'प्रवासवर्णनं व गाईडबुकांतील फरक न जाणणार्‍या एका मित्राचा' दाखला दिला आहे.

    इथे 'माणसं दिसत नाहीत' याचा अर्थ त्या देशातील लोक, त्यांचं आयुष्य याचा लेखिकेशी अतिशय मर्यादीत संबंध येतो.
    या पुस्तकांत असलेली माहिती कुठल्याही चांगल्या इतिहासाच्या पुस्तकात मिळू शकते. 'माहिती मिळावी' म्हणून प्रवासवर्णनं शक्यतो लिहिली जात नाहीत. माझ्यासारख्या 'armchair travellers' ना तो प्रवास, तो देश, तिथली माणसं अनुभवायची असतात.
    गाईडबुकात लिहिलेल्या प्रक्षणीय स्थळाला भेट द्यायची, मग त्याचा इतिहास द्यायचा, असंच त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं स्वरूप आहे.
    .
    लोकांना ही पुस्तकं आवडतात म्हणून ती चांगली, किंवा मला आवडावीत असं नाही. लोकांना Paulo Coelho, Chetan Bhagat आवडतात. मला नाही. ती मला का आवडत नाहीत, किंवा ती लोकांना का आवडतात याची कारणं आहेतच.
    मात्र मीना प्रभू यांची पुस्तकं का आवडतात या प्रश्नावर 'त्या एकट्या फिरतात व माहिती मिळते' हेच उत्तर मिळतं.
    वरील काही प्रतिक्रीयांमध्येही हेच लिहिलं आहे.

    'एकटं फिरणं व माहिती मिळणं' हे प्रवासवर्णन चांगले असण्याचं कारण असू शकत नाही. आणि चांगल्या प्रवासवर्णनाचा तो निकषही नाही.

    <<केवळ ब्लॉगवरील लिखाणाप्रमाणे ही पुस्तकं वाचायची असतील तर काहीच हरकत नाही. >> आणी हे माझ्या डोक्यावरून गेले. पुस्तके नि blog मधे काय कप्पाळ फरक असतो ? दोन्ही कडे "option आहे तेंव्हा घ्या लिहून" नि "कोणीतरी वाचतेय ना मग घाला रतिब" सापडत<<>>

    माझ्या विधानामागे admच्या पोस्टचा संदर्भ होता.
    ज्या पद्धतीने मीना प्रभूंच्या पुस्तकाचं मार्केटींग होतं, त्यांची पुस्तकं 'मौज'तर्फे प्रकाशित होतात, त्या साहित्य संमेलनाच्या अधक्षपदावर दावा सांगतात, या पार्श्वभूमीवर 'चार घटका करमणूक' किंवा 'रतीब घालणं' जरा अयोग्य ठरतं.
    शिवाय मी आधी लिहिल्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या पुस्तकांची तुलना नावाजलेल्या प्रवासवर्णनांशी केली आहे. तेव्हा त्यांच्या पुस्तकांच्या गुणावगुणांची चर्चा व्हायलाच हवी.

    sayonara,
    माझ्या मूळ पोस्टमध्ये आपल्या विधानाचा संदर्भ असला तरी ते विधान सरसकट सगळेच करत असतात. 'ग्रीकांजली' व 'तुर्कनामाच्या' प्रकाशन समारंभाला श्री. मंगेश पाडगावकर यांनी केलेले भाषण, त्याला मीना प्रभू यांनी दिलेले उत्तर, महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांची मुलाखत, म.टा व लोकसत्तेतील पत्रव्यवहार या सगळ्यांत 'एकटं फिरणं' हाच महत्त्वाचा मुद्दा असतो.
    याबद्दल मी आधी लिहिलं आहे. त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.

    ...
    Virago book of women travellers मध्ये अशा 'एकट्या फिरणार्‍या स्त्रियांनी ' लिहिलेले लेख आहेत. ते वाचल्यास आपण मराठी वाचकांनी लावलेले निकष कसे तकलादू आणि वरवरचे आहेत, हे सहज लक्षात येतं.
    (Disclaimer: मी तुलना करतोय कारण हल्ली 'त्यांचं' आणि 'आपलं' असं फारसं काही राहिलेलं नाही. शिवाय मीना प्रभू गेली अनेक वर्षं परदेशात वास्तव्यास आहेत. मराठी मध्यमवर्गीय स्त्रियांपेक्षा त्यांचं आयुष्य निश्चितच वेगळं आहे. आणि 'एकटेपणाचा' बाऊ १००-२०० वर्षांपूर्वी केला गेला नाही, मग आज कशाला?)

    मराठीत या देशांवरचे फारसे लिखाण नाही म्हणून मी मीना प्रभूंची सर्व पुस्तके घेतली आहेत आणि वाचली आहेत.

    मात्र एकटी फिरते ही काही फार विशेष गोष्ट नाही असे वाटते, आजकाल जगभर कुठल्याही प्रवासात अशा एकट्या फिरणार्‍या मुली नेहेमी भेटतात. आणि एकटी फिरते याचे त्या स्वतःच जास्त भांडवल करत आहेत असे मला बर्‍याचदा त्यांचे लेखन वाचतांना वाटते. प्रवासवर्णन, स्वतःची मते, अनुभव, इतिहास असे सगळे असते त्यांच्या लेखनात पण तरी त्याचा यायला हवा तसा एकत्रित परिणाम साधला जात नाही, फार जास्त प्रयत्न करून लिहिल्यासारखे वाटते.

    मीना प्रभुंचं गाथा ईराणी वाचलं मी. तेव्हडं एकच पुस्तक वाचलं आहे मी त्यांचं. ते ठीकठीक आहे. माणसं ही आली आहेत लिखाणात. पण उत्तम नक्कीच नाही. इन फॅक्ट त्यात त्यांच्या प्रवासवर्णनांची जंत्री (लिस्ट) पाहिल्यावर मला जाणवलं की मागणी तसा पुरवठा ह्या धर्तीवर लिहिलेली पुस्तकं असावित. लिहिण्याचा वकुब बेताचा आहे पण लेखक म्हणुन establish व्हायचयं. मग सोपं काय तर प्रवास वर्णनं.... मग एका पाठोपाठ वेगवेगळ्या देशांना भेटी देउन पुस्तकांचा कारखाना काढायचा ही झटपट लोकप्रियता मिळवण्याची युक्ती आहे.

    "माझ्यासारख्या 'armchair travellers' ना तो प्रवास, तो देश, तिथली माणसं अनुभवायची असतात.">> There you go. Guess similar can be said by others who like प्रभु. तुझा पूर्ण युक्तिवाद एका गटाच्या द्रुष्टिने प्रभू टाकाऊ लिहितात हे सिद्ध करतोय तसेच त्याला दुसरी बाजू आहे एव्हढेच. "
    .
    गाईडबुकात लिहिलेल्या प्रक्षणीय स्थळाला भेट द्यायची, मग त्याचा इतिहास द्यायचा, असंच त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं स्वरूप आहे." हे आवडणारा जो गट असतो त्याला तशी पुस्तके उत्तम वाटू शकतात असे बघ ना.
    .
    मी सध्या Sorcerer's Apprentice वाचतोय तेंव्हा मला chinoox ला काय सांगायचेय ह्याची कल्पना साधरणत: येतेय. पण नाण्याची दुसरी बाजू बघायचा प्रयत्न करत होतो.
    .
    असो, मलाच मूळात प्रभूंची पुस्तके आवडत नसल्यामूळे अधिक न बोलणे योग्य ठरेल Happy

    chinoox, तू दिलेल्यापैकी कुठलेच संदर्भ (पुस्तके / मीना प्रभूंच्या मुलाखती इ.) माझ्या वाचनात आले नव्हते. पुस्तके मिळवून अवश्य वाचेन आणि त्यानंतर माझं मत बदलल्यास नक्की आवर्जून कळवेन.
    .
    तरीही काही दिवसांच्या / महिन्यांच्या प्रवासात 'माणसं' म्हणजे काय भेटणार असतात आणि ते चित्रण 'प्रातिनिधिक' (मनुष्यसमूहाचं म्हणून तर जाऊच दे, पण त्या माणसाचं तरी) कसं काय असू शकतं यावर विचार करत आहे.
    माणसं भेटल्याचे, त्यांच्याशी झालेल्या encounters चे, त्यानुसार पक्क्या झालेल्या वा बदललेल्या त्यांच्या विचारांचे पडसाद त्यांच्या पुस्तकात उमटतात. ते काही वाचकांच्या दृष्टीने पुरेसे 'सखोल' नसतील कदाचित.
    .
    आणखी एक प्रश्न. नक्की मुद्दा काय आहे?
    मीना प्रभूंची पुस्तकं ही प्रवासवर्णनंच नाहीत (Literary Travel Guides आहेत), की ती 'उत्तम' प्रवासवर्णनं नाहीत? Happy
    मला लेबलमुळे फरक पडत नाही. प्रवासवर्णन म्हण, प्रवास मार्गदर्शक म्हण, एका देशाच्या इतिहासाची (संदर्भग्रंथांतून आणि इंटरनेटवरून मिळवलेली) एकत्रित माहिती म्हण. मला ही माहिती वाचायला आवडते. ती ज्या पद्धतीने लिहीली आहे ती पद्धत आवडते.

    <<आणखी एक प्रश्न. नक्की मुद्दा काय आहे?>>

    सुरुवातीला नक्की मुद्दा होता की 'एकटीने प्रवास' ही जाहिरातबाजी अयोग्य.:)
    मग दुसरा मुद्दा, त्यांच्या लेखनाची गुणवत्ता काय..

    पुस्तकं आवडलं की लेबलाने फरक पडत नाही, हे खरंय. पण बरेचदा 'वासरात लंगडी गाय' असंही होऊ शकतं.

    त्यांची स्वतःच्या पुस्तकाबद्दलची मतं (जी मला अतिशय धार्ष्ट्याची वाटली), त्यांची पुस्तकं आवडणार्‍या वाचकांची मतं बघता मला ज्या गोष्टी खटकल्या त्या मी लिहिल्या आहेत.

    <<गाईडबुकात लिहिलेल्या प्रक्षणीय स्थळाला भेट द्यायची, मग त्याचा इतिहास द्यायचा, असंच त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं स्वरूप आहे." हे आवडणारा जो गट असतो त्याला तशी पुस्तके उत्तम वाटू शकतात असे बघ ना.>>

    असं उत्तम वाटणारे वाचक आहेत, आणि त्यांना ती पुस्तकं उत्तम वाटण्याची कारणं असतातच.
    फक्त ती मला कारणं पुरेशी योग्य वाटली नाहीत, शिवाय माझ्या एका प्रवासवर्णनाकडून असलेल्या अपेक्षा या पुस्तकांनी पूर्ण केल्या नाहीत.
    असो.

    मीना प्रभुंची पुस्तकं वाचलेली नाहीत. तेव्हा ती आवडली की न आवडली हा भाग अलाहिदा. पण कुठल्याही पुस्तकाच्या गुणवत्तेचा निकष (की 'श') व्यक्तीसापेक्ष असतो असं वाटतं. 'एकटीनं' केलेला प्रवास हा 'घरची मंडळी किंवा मित्रगण बरोबर नसताना' असा पण घेता येतो. आणि स्त्रियांच्या एकटं फिरण्याबाबत कौतुक हा मुद्दा घेतला तर काही आखाती देशात तेही सोडा, पण आजही न्यु यॉर्कसारख्या जागी ब्राँक्झच्या काही भागात तीथेच जवळपास राहणार्‍या मुली सुध्दा एकट्या फिरकत नाहीत. तर एखाद्या बाईनी ठरवलं 'मध्यरात्रीनंतरचं ब्राँक्झ' असं काही ल्याहायचं तर?

    मृ, मी तू म्हणतेस त्याच 'एकट्या' प्रवासाबद्दल बोलत होते.

    आणि चिनुक्स, त्यांना त्यांच्या पुस्तकांमध्ये स्थानिक लोकं या ना त्या रुपाने भेटली आहेतच की. गाईडच्या रुपात भेटलेला उमित, दिनिझ, आयच्या ह्यांच्याबद्दल वाचलंय आपण.मग आणखीन कोणते उल्लेख अपेक्षित आहेत?

    mrinmayee,
    मीना प्रभूंनी जे प्रवास केले त्यात 'एकटेपणा' अजिबात ग्रेट ठरत नाही.
    न्यू यॉर्क कशाला, दिल्लीतसुद्धा मुली एकट्या फिरत नाहीत. पण ही उदाहरणं इथे योग्य नाहीत, असं मला वाटतं.

    <गाईडच्या रुपात भेटलेला उमित, दिनिझ, आयच्या ह्यांच्याबद्दल वाचलंय आपण.मग आणखीन कोणते उल्लेख अपेक्षित आहेत<>

    आता महिनाभर एखाद्या परक्या देशात राहायचं म्हणजे लोकांशी संपर्क येणारच.
    त्या काही थोड्या लोकांबद्दल लिहिणं वेगळं. मीना प्रभूंचा प्रवास हा केवळ प्रेक्षणीय स्थळांचा प्रवास असतो.
    मला काय म्हणायचं आहे, ते याहून वेगळ्या पद्धतीनं नाही सांगता येणार.

    मराठीमधे अपूर्वाई/पूर्वरंग हे परदेश प्रवासवर्णनांचे मापदंड ठरवले जातात (जरी त्यात बहुतांशी पु.ल.च दिसत असले तरी) ते अर्थात बर्‍याचशा प्रमाणात खरेही आहे. त्यांच्यानंतर परदेश प्रवासावर फारशी अभ्यासपूर्ण प्रवासवर्णने निदान माझ्यातरी वाचनात आलेली नव्हती. मला मीना प्रभूंची सगळ्याच नाही तरी इजिप्तायन आणि चीनी माती ह्या दोन पुस्तकांनी बर्‍यापैकी इम्प्रेस केले होते. मराठीत काही तुरळक परदेश प्रवासवर्णने वाचली ह्या व्यतिरिक्त त्यात ठराविक टुरिस्ट स्पॉट्स,नाईटलाईफ्,खरेदीची ठिकाणे ह्याव्यतिरिक्त काहीही नव्हते. एकतर बहुतेकजण प्रवासी कंपन्यांसोबत जातात आणि मग हे पाहिलं वगैरे लिहितात. युरोप तर इतका एकसाची बघतात की ते हास्यास्पद वाटतं वाचतना. निदान मराठीमधे प्रभूंच्या पुस्तकांनी ही उणिव थोडीफार भरुन काढली. त्या एकट्या प्रवास करतात ह्यात वेगळं काही नसलं आणि त्या बॅकपॅक ट्रॅवलर जरी नसल्या तरी प्रवासी कंपन्यांमधून जाऊन वर्णने लिहिणार्‍या किंवा काही कारणांनी म्हणजे काही सेमिनार्/ऑफिसतर्फे दौरा ह्याकारणांनी परदेशात गेल्यावर लिहिलेल्या परदेश प्रवास्(?)वर्णनांच्या पुस्तकांपेक्षा मीना प्रभूंच्या पुस्तकांचा दर्जा चांगला ठरतो. पण तो मराठीत. वर कोणीतरी लिहिलय तसं वासरात लंगडी गाय म्हणूून. त्यांना साहजिकच मराठी वाचन विश्वात खपू फॅन्स आहेत.
    लेखनव्यवसाय म्हणून प्रवास करणे ह्यात वावगं काहीच नाही. ट्रॅव्हल रायटर्सना बहुतेकवेळा पब्लिशर्स कडून ह्या बुक असाइन्मेन्ट्स दिल्या जातात. उलट मराठीत तशा प्रकारची पद्धत आली तर चांगलच होईल.
    योग्य प्रकारे लिहिलेली ट्रॅव्हल गाईड्सही नाहीयेत मराठीत ट्रॅव्हल बुक्स तर सोडाच. मी हे परदेश प्रवासाबाबत म्हणतेय फक्त. देशांतर्गत केलेल्या प्रवासाची अगदी परदेशी प्रवासलेखकांच्या तोडीची अनेक पुस्तके आहेत,जरी त्यांना फार प्रसिद्धी नसली.
    मीना प्रभूंची पुस्तके त्या दर्जाच्या आसपास जात नाहीत हे नक्की.

    सॉरी, नाही कळलं तुमचा आक्षेप नक्की कशाला आहे ते!!!!!
    माझ्या मते त्या प्रेक्षणीय स्थळं बघायच्या उद्देशानेच बाहेर पडतात आणि त्याची माहिती देता देता त्यांना भेटलेल्या लोकांबद्दलही लिहितात जे मला पुरेसं वाटतं. नाहीतरी महिन्या दीड महिन्यात कोणताही देश नी तिथली लोकं पुरती कळत नाहीत.

    Pages