Submitted by सायो on 21 July, 2008 - 00:32
मीना प्रभूंचं 'माझं लंडन', ऍमेझॉनवरचं पुस्तक(नाव लक्षात नाही), ग्रिकांजली, तुर्कनामा, इजिप्तायन वाचून संपवलं आहे. बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं. बाकी ऐतिहासिक़ उल्लेख नी माहितीचा ओवरडोस असतो त्यांच्या प्रवासवर्णनात(निदान माझ्याकरता तरी.शाळेत इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं). पण तरीही विकत घेऊन आवर्जून वाचते नेहमी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं मी मेल केलाय तुला. वाट
अगं मी मेल केलाय तुला. वाट तिबेटची वाचलं आणि आईलाही दाखवलं , सांगितलं की मी वर्षु वर्षु म्हणतो ती हीच! पण तुम्हाला ग्रहण नाही बघायला मिळालं.
मी त्यांचे दक्षिण अमेरिकेचा
मी त्यांचे दक्षिण अमेरिकेचा प्रवास असलेले पुस्तक वाचले. खूप अड्चणी आल्या आहेत प्रवासात. एवढा खर्च व त्रास सहन करून त्यांनी मुलांसोबत प्रवास केला आहे. मा हिती म्हणून चांगले वाटले.
मी पण त्यांचे दक्षिणरंग
मी पण त्यांचे दक्षिणरंग वाचतोय, तिसर्यांदा. खुप छान आहे वर्णन
मला नेहमी वाटतं मीना प्रभूंची
मला नेहमी वाटतं मीना प्रभूंची "एकटीची" परिभाषा "नवर्याशिवाय " ही असावी.
मला त्यांची पुस्तकं नाही आवडली.
मी त्यांचं एकच पुस्तक वाचलं.
मी त्यांचं एकच पुस्तक वाचलं. वाट तिबेटची. मला आवडलं.
मी त्यांचं एकच पुस्तक वाचलं.
मी त्यांचं एकच पुस्तक वाचलं. वाट तिबेटची. मला आवडलं.>>>>> हे आवडलं तर बाकीची पण नक्की आवडतील खास करुन दक्षिणरंग, ग्रीकांजली, चीनी माती.
मला नेहमी वाटतं मीना प्रभूंची "एकटीची" परिभाषा "नवर्याशिवाय " ही असावी>>>> अक्षरी पहीली दोन पुस्तके सोडली तर बाकीकडे त्यांच्याबरोबर कोणीच नव्हते.
अगा सुजा... तू चिनी माती
अगा सुजा... तू चिनी माती वाचलंस कि नै... खूप आवडेल तुला...
हो त्यानिमित्तानं वर्षुच़ं
हो त्यानिमित्तानं वर्षुच़ं चीन पहायला मिळेल
मी चिनीमाती वाचलंय. त्यातली
मी चिनीमाती वाचलंय. त्यातली http://readerwrites.blogspot.com/2010/10/blog-post_5466.html ही माहिती मला अतिशय रोचक वाटली.
चिनीमातीच्या प्रवासवर्णनात त्यांची कन्या बॅरिस्टर वर्षा काळे त्यांच्या सोबत होती असे लिहीलेले आढळले. अर्थात प्रवास एकट्याने केला की दुकट्याने यावर प्रवास करणार्याचे कौतूक अवलंबून राहते असे मला वाटत नाही. कारण जशी दुसरी व्यक्ति तुमची काळजी घ्यायला सोबत असल्याचा फायदा असतो त्याचप्रमाणे त्या व्यक्तिची काळजी घेण्याची जबाबदारीही काही अंशी का होईना तुमच्यावर पडतेच ना? (चीनच्या प्रवासात सोबत तरूण कन्येला घेऊन फिरताना लेखिकेला चिंता वाटली असणारच) परक्या भूमीत जायला अनेकांना भीती / कंटाळा वाटू शकतो. या पार्श्वभूमीवर इतकं फिरावंसं वाटणं आणि त्याप्रमाणे फिरणं हे कौतुकास्पद आहेच. पैसा खर्च करण्याविषयी इतकंच म्हणता येईल की तो त्यांचा स्वकष्टार्जित (त्या पुण्यातील बीजे मधून डॉक्टर झालेल्या आहेत) पैसा आहे आणि त्या खर्चाबद्दल आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही.
परक्या भूमीत जायला अनेकांना
परक्या भूमीत जायला अनेकांना भीती / कंटाळा वाटू शकतो. या पार्श्वभूमीवर इतकं फिरावंसं वाटणं आणि त्याप्रमाणे फिरणं हे कौतुकास्पद आहेच. पैसा खर्च करण्याविषयी इतकंच म्हणता येईल की तो त्यांचा स्वकष्टार्जित (त्या पुण्यातील बीजे मधून डॉक्टर झालेल्या आहेत) पैसा आहे आणि त्या खर्चाबद्दल आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही.>>>>>>> अगदी खरं.
चेतन+१
चेतन+१
bookganga.com वर मीना प्रभू
bookganga.com वर मीना प्रभू यांच्या ११ पुस्तकांचा संच Rs. 1480 ला available आहे . online booking केल्यास home delivery मिळू शकते. मी संचाचे online booking केले आहे.
सामी ती स्कीम बंद झाली. मला
सामी ती स्कीम बंद झाली. मला मेल आला होता बुकगंगेकडुन.
पुस्तके छान आहेत. इतिहास नको
पुस्तके छान आहेत. इतिहास नको असेल तर वाचू नये.
इजिप्त मधे एकटे हिडणे अवघड. श्अक्यतो असे हिडू नये. तसेच कधी खूप कष्ट घेउन जागा बघितल्या आहेत. हे स्वत बघितल्यावर किती अवघड असते ते क्ळेल. हवेची कमतरता, ऊची, अति गारठा या सग्ळ्या गोष्टीत फिरणे नक्कीच अवघड. मराठी वाचकाना नक्कीच बाहेरच्या जगाची माहिती झाली. बी एम एम मध्ये कळले की त्यानी ब्रेल मध्ये पण रूपातर केले आहे हे नक्कीच प्रशसनीय. तिबेट बद्दल छान बोलल्या.
मला त्याची पुस्तके आवडतात. इतिहास जास्त झाला तर सोडून देते. त्याना भेटले तेव्हा भारताबद्दल लिहा अशी विनति केली होती बघू येते का पुस्तक....
वर्षू, मी खरं तर घरी जाऊन
वर्षू, मी खरं तर घरी जाऊन पुरवून पुरवून वाचायचे असे ठरवले होते, पण एकाच बैठकीत वाचून संपवले. (तूझा अनेकवेळा केलेला उल्लेख वाचून खुप आनंद झाला.)
पुस्तक छानच आहे, पण तिबेटमधे इतके सोने कुठून आले, त्याचा खुलासा नाही दिलेला. शिवाय चित्रे पण कमीच वाटली.
मी त्यांची गाथा
मी त्यांची
गाथा इराणी
मेक्सिकोपर्व
ग्रीकांजली
माझे लंडन वाचली आहेत.
गाथा इराणी मध्ये सर्व प्रवास त्यांनी एकटीने केला, प्रयत्नपुर्वक त्या इराणी महिलेच्या घरी राहिल्या. त्यांच्या उत्सवात त्यांनी भाग घेतला. मला तर गाथा इराणी मध्ये असंख्य माणसे त्यांचे राजकीय विचार. इराणची भारताशी असलेली नाळ जोडण्याचा प्रयत्न. जहांगीरचे इराण मधी वास्तव्य आणि तिथला इतिहास तिकडच्या माणसांकडुन जाणुन घेण्याचे प्रयत्न फार जाणवले. तिथे त्या एका वरिष्ठ मुल्लाना पण जाउन भेटल्या.
मेक्सिकोपर्व मध्ये सर्व प्रवास त्यांनी गाइडबरोबर केला. सुप्रसिद्ध स्थळे बरीचशी टाळुन त्यांनी बर्याच आडगावांना भेट दिली. एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर अतिप्रसंग पण होता होता राहिला.
ग्रीकांजलीत तर त्या गेस्ट म्हणुन मैत्रिणीच्या मित्राकडे राहिल्या. तो मित्र तर शेवटी त्यान्च्यावर वैतागला होता आणि त्याने काहीवेळा तसे आडवळणाने बोलुनही दाखवले (बरेचसे इंग्रजी लेखक असे कुठेही रहातात आणि तिथले सर्व लोक त्यांचे प्रेमाने सर्व करतात यापेक्शा हे सर्व खरे वाटते ) पुढे एका बेटावरचा प्रवास पण त्यांनी अशीच ओळख काढुन एका तरुण मुलीबरोबर केला, हे सर्व अवघड आहे. फार थोड्या साठीच्या स्त्रियांनी असे प्रवास केले आहेत.
(पुल माझे प्रचंड आवडते लेखक आहेत आणि माझ्या आजोबांचे वर्गबंधु आणि घनिश्ठ मित्र) तरीही अपुर्वाइ आणि पुर्वरंग उत्तम विनोदी लिखाण असलीत तरी प्रवासवर्णन म्हणुन मीना प्रभुंच्या पुस्तकांपुढे काहिच नाहित. (किंवा आपण म्हणता आहात तशी प्रसिद्ध ठिकाणांची भोज्या आहेत).
माझे लंडन त्यांचे पहिले पुस्तक त्या मानाने सो सो होते. ते प्रवास वर्णन म्हणुन अघळ पघळच होते फार खास नाही पण लिहिण्याची हातोटी आणि आत्मियता जाणवली.
चिनुक्स आपला इतिहासाचा व्यासंग मोठा आहे त्यामुळे आपल्याला बर्याच गोष्टी माहित असतिलही पण अशी प्रवासवर्णने मी तरी मराठीत वाचली नव्हती (जर एवढी सहज होती तर याआधि व्हायला हवी होतीत)
मंत्रींची काही पुर्वीची प्रवासवर्णन ८०स मधली ठीक्ठाक होती पण त्यातही इतिहास आणि माणसे व त्यांच्याशी नाते वा धागा जोडण्याची धडपड कधी इतकी जाणवली नव्हती.
तुम्हाला त्यान्च्या पुस्तकात माणसे दिसली नाहित हे आश्चर्य आहे कारण मेक्सिकोत चौकात बसुन अक्खा दिवस केलेले अनोळखी माणसांशी संवाद, तिथल्या विविध पदार्थांचा घेतलेला आस्वाद, मोकळे पणा. तिथला इतिहास क्रांती याबाबत तिथल्या विविध भागातील लोकांची मते. ग्रीक फॅमिली बरोबर अनुभवलेला इस्टर. ग्रीक माणसांबरोबर उपभोगलेला ओलिम्पिकचा शेवटचा दिवस यातुन
जास्तित जास्त वाचकाला द्यायची धडपड जाणवली.
खुप नाही तरी बर्यापैकी कामानिमित्त प्रवास केल्यावर माझे तरी असे मत आहे की उत्तम प्रवासवर्णन करायचे असेल तर प्रचंड प्लॅनिंग पाहिजे.
Eat, prey Lave घ्या (उत्क्रुष्ठ नाही तरी सुप्रसिद्ध आहेच) यात लेखिकेने केलेला प्रवास जरी इन्स्टन्टेनियस वाटला तरी मीना प्रभुंपेक्षा जास्त प्लॅनिंग आणि खर्च तिच्या प्रकाशनसंस्थेने तिने पुस्तक लिहिण्याच्या आधिपासुन तिच्यावर केला होता, मग ती जर प्रसिद्ध होउ शकते तर मीना प्रभु का नाही?
निलिमा + १ दिनेश दा..
निलिमा + १
दिनेश दा..
मीनाप्रभुला मी ऑफर केलंय..जर तिने कधी इंडोनेशिया वर लिहायचं ठरवलं तर मी तिची ऑफिशिअल गाईड आणी ट्रांसलेटर बनायला तयार आहे..
वर्षू: मला पण बरोबर ने ना. मी
वर्षू:
मला पण बरोबर ने ना. मी शहाण्या मुलीसारखी वागेन. तू "बहासा" पण बोलू शकतेस का?
निलिमा: एकदम झकास पोस्ट! पटली.
जनरली त्या खूप गोष्टीवेल्हाळ आहेत आणि त्यांना खूप गोष्टी सुद्धा माहित असतात. शिकागो बीएमएमच्या अधिवेशनाच्या वेळी त्यांना एअरपोर्ट वरून पिक अप केल आणि आम्ही शिकागोच्या फेमस ट्रॅफिक मध्ये अडकलो. त्यामुळे खूप गप्पा मारता आल्या. त्यांचा चौकस आणि काहिसा अग्रेसिव्ह स्वभाव (चांगला अग्रेसिव्ह) त्यांना एकट फिरायला खूप मदत करत असावा.
निलिमा +१ , वर्षुताई +१ मीना
निलिमा +१ , वर्षुताई +१
मीना प्रभु काही जणांन्ना सवंग वाटतात, तर काही जणांना अभ्यासु. मी त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचलं आहे.
मला चीनी माती आणि मॅक्सीकोपर्व अतिशय आवडली. त्यांच्या पुस्तकात माणसेच माणसे दिसतात. गाथा इराणी, ग्रीकांजली, चीनी माती सगळी कडे जिथे शक्य आहे तिथे तिथल्या माणसांचे उल्लेख त्यांन्नी केलेले आहेत. भाषा येत नसुन ही माणसांची संवाद साधायची त्यांची भुक ठायी ठायी जाणवते. तुर्कस्तान मधला उमीत असो नाही तर चीनी माती मधली साधी गाईड एस्थेल असो, जिथे मिळेल तिथे माणसांशी संवाद दिसतो. उलट चीन मध्ये त्यांची भाषा येत नसुनही जो जो इंग्लीश बोलणारा भेटेल त्याच्याशी संवाद साधुन घेतलेला आहे. मॅक्सीको पर्व मध्ये त्यांचा गाईड त्यांना अस्तेकांच्या चालीरीतीं बद्दल जेंव्हा सांगत असतो तो उतारा माझ्या अनेक आवडत्या उतार्यांपैकी आहे. तसेच त्यांन्ना आलेल्या अडचणी त्यांनी अगदी सविस्तर सांगीतल्या आहेत. भाषे मुळे येणार्या अडचणी, चुकलेली बस, कंटाळ वाणे प्रवास, होजे ह्या माणसाकडुन आलेला "एकटी बाई" म्हणुन आलेला अनुभव, हरवलेला पासपोर्ट, अनेक तंगड्तोड चाली.
त्यांचे संदर्भ ग्रन्थ सांगायला त्यांन्ना काहीच संकोच वाटत नाही. नेहेमीच ब्रिटीश लायब्ररीचे त्या कौतुक करतात. येवढा इतिहास कोणताच गाईड सांगु शकणार नाही. अनेक वेळा इमारतींचे वर्णन खुप जास्त होते उदा: रोम राज्य दोन्ही भाग. पण त्याला त्या तरी काय करणार!! रोम मध्ये प्रत्येक इमारतीला इतिहास आहे. म्हंटले तर फक्त मातीचा ढीगारा, म्हंटले तर वेदनीचा कल्लोळ असं प्रत्येक इमारतीचं आहे. कोलोसियम चा इतिहास माहिती असल्याने प्रत्यक्षात जेंव्हा तिकडे गेले तेंव्हा मला एक प्रकारची उदासी आली होती. मनावर एक दडपण होत. नाहीतरी इतिहास निर्जीव वस्तुंमधुनच शोधावा लागतो. मग ते गड असोत वा भव्य इमारती.
त्यांनी हे सगळे लिखाण मराठीत आणले हे त्यांचं खरं कर्तुत्व. असं लिखाण मराठीत झालच न्हवतं. आपल्या मात्रुभाषेत शिक्षण झालेली जी पीढी आहे त्यांना हा माहितीचा स्त्रोत आहे. रमेश मंत्रींनी जे लिखाण केल आहे ते बरेचसे त्यांच्या अनुभवाचे चित्रण आहे. इतिहास वगैरे ओघाने आला आहे. ते स्वतः ब्रिटीश आर्मीत काही काळ नोकरी करत होते. त्या वेळचे त्यांचे अनुभव वाचण्या सारखे आहेत. ( त्यांची पुस्तके कुठे मिळतिल का? मागे आउट ऑफ प्रिंट सांगीतली)
त्यांची धर्मा बद्दलची मतं त्या मोकळेपणाने मांडतात. तरीही त्या नास्तिक नाहीत. त्यांची देवावर श्रध्धा नसेल, पण शक्तिवर आहे. प्रवासीनी देवीचे त्या वेळोवेळी आभार मानतात. हिमालय बघुन नतमस्तक होतात. अनेक निसर्ग चमत्कार बघुन नकळत हात जोडतात. म्हणजेच त्यांच मन सश्रध्द आहे. त्यांचा सगळा राग धर्म आणि त्यामुळे येणार वैचारिक पंगुत्व ह्यावर आहे. तो वेळोवेळी त्या आपल्या लिखाणातुन मांडतात.
त्यामुळे मराठीतिल एक प्रवास गाईड अशी त्यांच्या पुस्तकांचं वर्णन केलं की आष्चर्य वाटतं. ( "युरोप सहली चा सोबती " लेखिका कल्याणी गाडगीळ हे उत्क्रुष्ट प्रवास गाईड मराठीत आहे.)
वा वा वा. जरा चांगली मते बघुन
वा वा वा. जरा चांगली मते बघुन बरे वाटले, सगळीच माणसं काही अरसिक नाहीत म्हणायची.
धर्मा बद्दलची मतं त्या मोकळेपणाने मांडतात. तरीही त्या नास्तिक नाहीत. त्यांची देवावर श्रध्धा नसेल, पण शक्तिवर आहे. >>>>>>>> अगदी पटंलं. मी स्वतः त्या़ना सांगितले प्रत्यक्ष भेटीत आणि त्यानी ते मान्य पण केले, की त्या निसर्गशक्तीला मानतात.प्रार्थनास्थळाच्या जागी भरुन राहिलेल्या ऊर्जेला त्या मानतात.
मीराजी तुमचे मत अतिशय समर्पक आहे,पटंलं बुवा आपल्याला.
त्यांच्या पुस्तकातल्या इतिहासाबद्दल बोलायचे तर, ते चांगलेच आहे. आपल्यापैकी किती जणाना त्या त्या देशाचा सविस्तर इतिहास वाचायला वेळ असतो, त्यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने आवश्यक तेव्हढा इतिहास तरी कळतो.
आणि त्यांच्या प्रवासात त्या तेथील माणसांशी संवाद साधण्याचा , भाषा माहेत नसतानाही जो प्रयत्न करतात तो स्तुत्य आहे.
मोकिमी... _ तुला १००%
मोकिमी... _ तुला १००% अनुमोदन..
कल्पु ... बरंबरं... तू पण ये गं..
हो गं.. मला बाहासा खूप चांगली येते..
नीलिमा +१ वर्षु ग्रेट
नीलिमा +१ वर्षु ग्रेट
दिनेशदा मला पण तुमच्या सारखेच वर्षु चा उल्लेख वाचून खूप छान वाटले.
मीनाप्रभुला मी ऑफर केलंय..जर
मीनाप्रभुला मी ऑफर केलंय..जर तिने कधी इंडोनेशिया वर लिहायचं ठरवलं तर मी तिची ऑफिशिअल गाईड आणी ट्रांसलेटर बनायला तयार आहे.. >>>
खरच आता मीनाताईंनी दुर्लक्षित देशांबद्दल लिहायला पाहिजे. उदा. भुतान, नेपाळ, मोरोक्को, इंडोनेशीया. मागे मी त्यांच्याशी बोलले होते ( माझ्या मेल वरील प्रतीसाद आवडला म्हणुन त्यांनी स्वतः फोन केला होता) तेंव्हा रशीया आणि इतर फुटलेले देश यांच्या बद्दल लिहिण्याची सुचना केली होती. बघु कधी लिहितात.
मीना प्रभुंविषयी, म्हणजे
मीना प्रभुंविषयी, म्हणजे त्यांच्या पुस्तकांविषयी मस्त चर्चा आहे. ही पुस्तके online वाचायला मिळतील का?
दिनेशदा मला पण तुमच्या सारखेच
दिनेशदा मला पण तुमच्या सारखेच वर्षु चा उल्लेख वाचून खूप छान वाटले.
>>
तिबेटचे आता वाचले पाहिजे
निलिमा.. तिबेट वरचं पुस्तक ही
निलिमा.. तिबेट वरचं पुस्तक ही छन आहे..मला ही या वेळी फोटो कमी वाटले.. पण या वयातही मीनाचा उत्साह बघून काँप्लेक्स येतो आपल्याला...
मीना प्रभूंनी मराठीमधे
मीना प्रभूंनी मराठीमधे तुर्कस्थान, मेक्सिको, इराण, ग्रीस, तिबेट अशा हुकमी पर्यटकी देश नसलेल्या जागांची माहीती आणली ही चांगली गोष्ट आहे.
पण त्यांची पुस्तके म्हणजे स्थळे, माणसे, घटना यांची एकपाठोपाठ येणारी भयंकर लांबलचक जंत्री असते. त्यांनी जर पुस्तकाचे विभाग केले, आम्हाला अनुक्रमणिका पुरवली, प्रकाशचित्रे विखरून दिली तर वाचकाला पुस्तक वाचताना येणारी भंजाळल्याची भावना कमी होईल.
मनरी मी काही त्यांचा वकिल
मनरी मी काही त्यांचा वकिल नाही, पण चाहता नक्कीच आहे.
मराठी पुस्तकात जर रंगीत प्रकाशचित्रे विखरुन दिली तर त्याची किंमत कायच्या काय होईल. मराठीत अशी पुस्तके (वारी, तमासगीर या विषयावरची ) आहेत आणि त्यांच्या किमती हजार रुपयाच्या वर आहेत.
त्या उत्तम फोटोग्राफर नाहीत, तसा त्या दावाही करत नाहीत पण पुस्तकात छापतात त्यापेक्षा कैक जास्त फोटो त्यांच्याकडे असतात. (मी स्वतः बघितले आहेत.) ते दिले तर पुस्तक खुपच मोठे होईल. रोमराज्यचे दोन भाग या कारणानेच झाले. ग्रीकांजली आणि तुर्कनामा वेगळेही याच कारणाने झाले.
अनुक्रमणिका नसली तरी विभाग असतात. बाकी सविस्तर लेखन आवडणे न आवडणे, हि प्रत्येकाची वैयक्तिक आवड आहे.
वर्षू नील , मीना प्रभूंच्या
वर्षू नील ,
मीना प्रभूंच्या पुस्तकात उल्लेख असलेल्या तुम्ही आहात का? मला आजच कळले हे. OMG . Nice to know this .
त्यांना भेटायच्या इच्छेमुळे मी आणि माझ्या मैत्रिणीने दोनदा त्यांना त्या मुंबईत असताना फोन केला होता . माझ्या मैत्रिणीला त्यानी स्वताहा फोन करून नेक्स्ट टाईम आपण नक्की भेटू असे सांगितले.
She is simply great. I hope to meet her soon.
तुम्हाला अनेक शुभेच्छा .
- सारिका
Double post .
Double post .
Pages