Submitted by सायो on 21 July, 2008 - 00:32
मीना प्रभूंचं 'माझं लंडन', ऍमेझॉनवरचं पुस्तक(नाव लक्षात नाही), ग्रिकांजली, तुर्कनामा, इजिप्तायन वाचून संपवलं आहे. बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं. बाकी ऐतिहासिक़ उल्लेख नी माहितीचा ओवरडोस असतो त्यांच्या प्रवासवर्णनात(निदान माझ्याकरता तरी.शाळेत इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं). पण तरीही विकत घेऊन आवर्जून वाचते नेहमी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<केवळ
<<केवळ ब्लॉगवरील लिखाणाप्रमाणे ही पुस्तकं वाचायची असतील तर काहीच हरकत नाही. >> आणी हे माझ्या डोक्यावरून गेले. पुस्तके नि blog मधे काय कप्पाळ फरक असतो ? दोन्ही कडे "option आहे तेंव्हा घ्या लिहून" नि "कोणीतरी वाचतेय ना मग घाला रतिब" सापडत<<>>
माझी एक मैत्रिण कुठे ट्रिप ला जाऊन आली की सगळ्यांना वर्णन सांगत बसण्यापेक्षा ब्लॉग अपडेट करून त्यावर फोटोज ची लिंक देते आणि सग्ळयांना मेल करते. ज्यांना आवडतं किंव इंटरेस्ट वाटतो ते वाचतात.. तस बरेच जण आपले कुठलेतरी अनुभव ब्लॉग वर टकत असतात.. फ्क्त प्रवासवर्णन नाही... त्या द्रुष्टीने पाहून तर आवडलं तर पुस्तकं वाचावी त्यांची..
पध्दत नाही .. पण माहिती आणि आपल्यापैकी एका उत्साही मणसाने सांगितलेले ट्रिप चे वर्णन म्हणून आवडते... आणि वर कोणीतरी म्हणाल तसं एखाद्या देशात जाऊन काय्काय पहायचं ह्याची एकत्र माहिती त्यांच्या पुस्त्कात सापडते
माझ्या विधानामागे admच्या पोस्टचा संदर्भ होता. >>>>.
थोडं स्पष्टीकरण..
.
पुस्तकांना मार्केट आहे, म्हणून ही उस्तवार करणं त्यांना भाग आहे. त्यात विशेष ते काय? कारण नवीन देशात गेल्या नाहीत, तर नवीन पुस्तक कसे लिहिणार? आणि तीनेकशे पाने भरण्याएवढा मजकूर तयार करायचा असेल तर एक दीड महिना तरी फिरायला हवेच ना! तेव्हा तो त्यांच्या लेखनव्यवसायाचाच एक भाग झाला>>>>
श्र, हे त्यांच्या सुरुवातिच्या पुस्तकांमधे जाणव नाही... (e.g. चिनीमाती, दक्षिणरंग ) पण नंतर मात्र हे जाणवायला लागलं...
चिनीमाती, दक्षिणरंग ही मला तरी आवडली होती आणि त्या तिथे भेटलेल्या लोकांचे , त्यांच्या घराचे अगदी डिटेल मधे नसले तरी उल्लेख होते...
.
तसाच तुर्कनामा मध्ये जाणवलेला दुसरा मुद्दा 'कसं बै यांना इंग्लिश येत नाही?' >>>> सहमत... I think ह्या बद्द्ल आपलं एकदा गडावर बोलणं झालं होतं..
.
प्रवासवर्णन म्हण, प्रवास मार्गदर्शक म्हण, एका देशाच्या इतिहासाची (संदर्भग्रंथांतून आणि इंटरनेटवरून मिळवलेली) एकत्रित माहिती म्हण. मला ही माहिती वाचायला आवडते. >>>> स्वाती बरोबर..
असो.. बरेच चर्चा झाली की ह्यावर...
sayonara, माझे
sayonara,
माझे आक्षेप मी नोंदवलेले आहेत. प्रवासवर्णनांचे निकष वगैरे मुद्द्यांवर माझी मतं मी विस्ताराने लिहिली आहेत.
याहून अधिक काही मला सांगता येणार नाही.
tulip,
व्यवसाय म्हणून लेखन करण्यास मला वाटतं इथे कोणीही आक्षेप घेतलेला नाही.
थोडी
थोडी माहिती :
.
मीन प्रभूंच्या प्रवासवर्णनाची यादी: (याच क्रमाने ती प्रकाशित झाली आहेत.)
दक्षिणरंग
मेक्सिको पर्व
चिनिमाती
ईजिप्तायन
ग्रिकांजली
तुर्कनामा
गाथा ईराणी
.
या पैकि पहिल्या ३ पुस्तकातिल प्रवासात त्यांच्या बरोबर त्यांच्या घरच्या व्यक्ती संपुर्ण अथवा बराच काळ बरोबर होत्या. आणि शेवटचे ३ प्रवास त्यांनी एकटे केले आहेत. (ग्रिकांजली आणि तुर्कनामा ही एकाच प्रवासातील २ पुस्तके आहेत.)
.
त्या निव्वळ एकट्या प्रवास करतात यात मला तितके विशेष वाटत नाही पण त्या या वयात देशोदेशी एकट्या प्रवास करतात याचे मात्र विशेष वाटते. त्यांचे वय साठ च्या आसपास तरी नक्किच असेल. आपल्यातले अनेकांचे याच वयाचे असणारे भारतीय आईवडिल संधी मिळाली तरी या वयात एकटे फिरतील का शंका आहे.
.
बाकी त्यांच्या लिखाणा बद्दल नंतर.
हवे पहिले
हवे पहिले पुस्तक "माझे लंडन" ग.
ते (ही? )
ते (ही? :)) 'प्रवासाचं वर्णन' नाही रे. लंडनमधील वास्तव्याबाबतचं अनुभवकथन आहे. (अबब!)
असाम्या मी
असाम्या मी फक्त प्रवास वर्णनांची यादी दिली आहे.
लेखनव्यवस
लेखनव्यवसाय म्हणून प्रवास करणे ह्यात वावगं काहीच नाही>>>> आपल्यातले कितीतरी IT त आहेत. आपण नाही का जातो "onsite"
आपापल्या नोकरी-धंद्यासाठीच जातो ना 
.
असो, एकटे फिरण्या विषयी वाचक किंवा इतर लोक बोलले तर बरोबर. पण त्या स्वतःच ह्याचे भांडवल करत असतील तर चुक. असे आपले मला वाटते.
असो, एकटे
असो, एकटे फिरण्या विषयी वाचक किंवा इतर लोक बोलले तर बरोबर. पण त्या स्वतःच ह्याचे भांडवल करत असतील तर चुक. असे आपले मला वाटते.
>>>>>
पण "एकटी फिरते" असं सांगितलंच नाही तर लोकांना कळणार तरी कसं, त्याबद्दल बोलून कौतुक करायला? माझी आपली एक भाबडी शंका .. :p
लंडनमधील
लंडनमधील वास्तव्याबाबतचं अनुभवकथन आहे. (अबब!)>> म्हणजे ते उत्तम आहे असे तू म्हणतेयस का मग ?
या पैकि
या पैकि पहिल्या ३ पुस्तकातिल प्रवासात त्यांच्या बरोबर त्यांच्या घरच्या व्यक्ती संपुर्ण अथवा बराच काळ बरोबर होत्या. >>>>
कुठलं डोमेन ते विचारायला हवं.. प्रत्येक वेळी वेगवेगळया ठिकाणी "onsite" मिळत ह्यांना.. 
ह ह, म्हणजे त्या लिस्ट मधे मेक्सिकोपर्व पण आले ना... ?? मला जेव्हडं आठवतय त्या प्रमाणे मेक्सिकोपर्वात .. I mean मेक्सिको त पण त्या एकट्या होत्या..
आपल्यातले कितीतरी IT त आहेत. आपण नाही का जातो "onsite" आपापल्या नोकरी-धंद्यासाठीच जातो ना >>>>
adm, माझ्या
adm, माझ्या आठवणीप्रमाणे 'मेक्सिकोपर्वा'त त्यांचा मुलगा होता त्यांच्याबरोबर.
लोकांना
लोकांना कळणार तरी कसं, त्याबद्दल बोलून कौतुक करायला >>> अगं एकदा सांगितले तर सांगितले पण मी भांडवल करण्याबद्दल बोलत होते
कित्ती गं (भोळी) भाबडी तु 

.
तेच तर तुम्हा/आम्हा IT वाल्यांचं चुकतं. एकाच कुठल्या तरी डोमेनला धरुन बसता. त्यांच कसं घुमतं-फिरतं डोमेन आहे. म्हणुन तर प्रत्येक वेळी वेगवेगळया ठिकाणी "onsite" मिळतं. शिवाय टीम पण एकीचीच आहे. त्यामुळे हा गेल्या वर्षीच जाउन आला, आता दुसर्याला पाठवा अशी मारामारी पण नाही
गाथा इराणी
गाथा इराणी वरचे माझे मूळ पोस्ट इथे हलवले असते तर बरे झाले असते.
मी स्वतः त्याना भेटलो आहे, त्यांच्याशी चर्चापण केली आहे.
पूस्तकात त्यानी जे लिहिलेय, त्यापेक्षा सांगण्यासारखे त्यांच्याकडे बरेच असते. आणि त्या ते अगदी छान सांगतात. त्यांच्याहि बोलणे हा पुस्तक वाचण्यापेक्षा फारच वेगळा अनुभव असतो.
मराठी पुस्तक प्रकाशन व्यवस्थेत कदाचित पुस्तकांच्या पानांवर वा त्यात छापल्या जाणार्या चित्रांवर मर्यादा येत असेल.
बाकि त्यांचे एकटे फिरणे, त्यासाठी लागणारा पैसा, आणि लेखिका म्हणुन त्यांच्या मर्यादा, मूळात हि उठाठेव त्या का करतात, याचीही चर्चा त्यानी केलीच आहे.
या पुस्त्कांव्यतिरिक्तही त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तेदेखील वाचनीय आहेत, पण त्यांचे संकलन झालेले नाही.
मी त्यांची सर्वच पूस्तके ( एक ललित सोडले तर ) विकत घेतली आहेत. माझं लंडन सोडले तर मला बाकिची सर्वच आवडली.
अच्छा
अच्छा म्हणजे मीना प्रभूना झोडायचे आहे अशी भूमिका घेऊन काही मंडळी आली आहेत आणि त्याला साहित्यसंमेलनाच्या वादाचीही छुपी पार्श्वभूमी आहे. आपल्याला बुवा आवडतात त्यांची पुस्तके! विकत घेऊन वाचतो. त्यांची शैली आपल्याला आवडते. खरं तर मराठी अन देवनागरी स्क्रिप्टात हे सगळं वाचायला खुपच सुखद वाटतं. पण त्याला साहित्य मूल्य नाही हे आज इथे पण्डितांच्या मान्दियाळीत आल्यावर कळले (तरीही त्या साहित्य सन्मेलनाचे अध्यक्षपद क्लेम करण्याची जुर्रत कशा काय करू शकतात?). पुलंची प्रवासवणनेही यथातथाच होती हेही ब्रम्हज्ञान आजच झाले. खरे तर पुलंना लोक साहित्यिक तरी का मानतात हेच आम्हाला आकळेनासे झाले आहे. अनन्त काणेकरांचे धुक्यातून लाल तार्याकडे हे तर हातात धरण्याच्या लायकीचेही नसावे. एक धडा शिकलो. आता प्रवास वर्णने वाचायची ती इंग्रजीच. त्याची सर एतद्देशिय नेटीवांच्या लिखानाला नाय. त्यासाठी इंग्रजी सुद्धा शिकायला लागले तरी बेहत्तर! आणि मराठी प्रवास्वर्णने लिहिणे त्यांचा व्यवसाय आहे. आता मराठीतला दळभद्री प्रकाशन व्यवहार पाहिलयावर त्यातून अगदी 'बेस्ट सेलर असले तरी प्रवासासाठीचा अर्धा खर्च तरी भरून निघेल का असाही प्रश्न पडला. बहुधा सस्त्यात लोकप्रियता आणि पुन्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी ह्या 'हुशार' बाईंनी किती पूर्वनियोजित कट केलाय नाही.?
आम्हाला आपलं वाटत होतं मराठी 'साहित्यात' मेक्सिको तुर्कादि आडगावची प्रवास वर्णने नाहीत म्हणूनही नाविन्य आहे पण कसले काय अन कसले काय ? एक तर ती प्रवासवर्णनेही नाहेत अन त्याला साहित्यमूल्यही नाही मग काय आहे? नुस्त्या ब्लॉग वजा चोपड्या हो!! किंवा पुणे गाईड सारखी गायडं हो! त्यापरिस केसरींच्या मुलींचं लिखाण उत्तम !(त्याला तरी साहित्य म्हणावे की नाही काय उमजत नाय बघा...) . प्रभूंच्या लिखाणाला चांगल्या प्रवास वर्णनाचा दर्जा तर आमी दिला बुवा. लैच वंगाळ आणि असंस्कृत झालं बगा. त्यो आता काडून घ्यावा लागेल असं दिसतया.
इच्या करतुय , तसंच गोडसे भटजीच्या चोप्ड्याला काय म्हणावं, मिलिन्द गुणाजीला काय म्हनाव, विनय देसाईच्या परदेसाईला काय म्हनावं या सगळ्याच प्रश्नाचा इंग्रजी साहित्याच्या पार्श्वभूमीवर तौलनिक अभ्यास करू पुन्यान्दा भेटू या, कस्सं?
---
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
टोणगा किती
टोणगा किती आवेश.. पुलंच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांविषयी कुणीच ब्र काढलेले नाही किंवा त्या पुस्तकांना कमी लेखलेले नाही. उलट ती प्रवासवर्णनांसाठी मापदंड आहेत असे एकीने इथे म्हंटले आहे
लोकहो,
लोकहो, वरची सर्व चर्चा(= वाद) चालू राहू द्या. फक्त मला थोडीशी मदत करा.
मला मीना प्रभु यांच्याबद्दल काही माहिती हवी आहे: जन्मदिनांक, जन्मस्थान, अल्पपरिचय वगैरे छाप. ही माहिती मराठी विकिपीडियाकरता हवी आहे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
धन्य रे....
धन्य रे.... किती ती चावाचावी आणि किसाकीसी... पुस्तकांचा पार लगदा झाला. हे मीना प्रभुनी वाचल तर तर परदेशात काय भाजी पण आणायला पण जाणार नाहीत घरा बाहेर.
असो कुणाला काय आवडेल ते आवडल, ज्याचा त्याचा प्रष्ण आहे.
सत्या
सत्या :))
.
पुस्तकांवर चर्चा व्हावी एवढी काही त्यांची पुस्तकं आवडली नाहीत मला.
-प्रिन्सेस...
साहित्य
साहित्य म्हणून त्यांचे लिखाण फार ग्रेट नाहि हे खरेच.पण ते मराठि मधे अत्यंत नविन आहे हे नक्कि.
आणि साहित्य संमेलनाचे अध्य्क्ष आता असेच लेखक होणार. पुढचा नंबर कदाचीत विणा पाटलांचा असेल.
***************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
अशी निन्दा
अशी निन्दा करने बरे नव्हे. पहता नाही आले तरी त्यानच्यामुळे निदान देश वाचता तरी येतात.
त्यांचे सगळे प्रवास काही
त्यांचे सगळे प्रवास काही पूर्णतः पूर्वनियोजित नसतात. म्हणजे थोडीबहुत आखणी केलेली असते पण प्रत्यक्षात बरेचदा खूप बदल घडतात, काही स्थळं पहाच असा आग्रह तिथल्या मंडळींकडून होतो म्हणून आयत्या वेळी त्यांचा समावेश करावा लागतो; तर कित्येकदा काही अडचणी आल्याने [हवामान, प्रवास-साहने न मिळणे इ.इ.] त्यांचा प्रत्यक्ष प्रवास आखणीपेक्षा खूपच वेगळा होतो असं त्यांची पुस्तकं वाचताना लक्षात येतं. असे कितीतरी अनपेक्षित वळसे आणि वळणं किंवा अपघाताते पाहिलेली स्थळं , योगायोगानं भेटलेली माणसं इ.इ. वाचायला मिळतं.
त्या त्या देशाचा इतिहास / सांस्कृतिक परंपरा आणि आजची समाज-व्यवस्था, राजकीय वातावरण ही माहिती मला नुसत्या भौगोलीक वर्णनांपेक्षा किंवा निसर्ग-चित्रणांपेक्षा अधिक वाचनीय वाटते. त्याही पेक्षा त्यांना भेटलेली माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांची कुटुंब-व्यवस्था, सण-वार साजरे करण्याच्या त्यांच्या पद्धती, त्यांची स्वप्नं, सुख-दुख्खं, आलेले अनुभव हे सगळं इंटरनेटच्या कुठल्याच साईटवर मिळण्याची शक्यता नाही. मला तर त्यांच्या पुस्तकांतला हा 'मानवी' भाग खूप आवडतो. 'इफ इट इज च्यूस्डे, धिस मस्ट बी बेल्जियम' सारखं एअरपोर्ट-हॉटेल-बस-हॉटेल-एअरपोर्ट असं भिंगरी लावल्यागत फिरणार्या एखाद्या पर्यटकाला हे सगळे अनुभव कसे येणार? आणि आलेले अनुभव, जमा केलेली माहिती सहज-सुंदर शैलीत लिहिणं, 'वाचनीय' करणं कितीशा लोकांना जमतं?
प्रवास-वर्णन हा साहित्य-प्रकार होतो अथवा नाही, अशी पुस्तकं लिहिणं हा लेखिकेचा व्यवसाय आहे का छंद, लेखिकेची सांपत्तिक स्थिती उत्तम नसती तर त्या हे सगळे प्रवास करू शकल्या असत्या का, साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी का आणि कशी लढवली हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून मी त्यांची पुस्तकं आवडीनं वाचतो कारण एक वाचक म्हणून मला 'त्या' सगळ्या मुद्द्यांशी काही देणं-घेणं नसतं.
मराठीतच तर अजिबात नाहीच पण इंग्रजीतही ह्या तोलामोलाची प्रवास-वर्णनं अभावानंच आढळतील असं माझं प्रामणिक मत आहे.
प्रभाकर [बापू] करंदीकर
झॉम्बी थ्रेड चालु केला गेलाय,
झॉम्बी थ्रेड चालु केला गेलाय, सायो! जागी हो
अरे जुना झाला धागा नी मीना
अरे जुना झाला धागा नी मीना प्रभू.
मी उत्साहात उघडलं पान,
मी उत्साहात उघडलं पान, "सायो"चं पान म्हणुन... तर काय केंकाबाक्का.... नान दा यो ?
कशाला उघडलं? शिर्षक बघून तरी
कशाला उघडलं? शिर्षक बघून तरी गप रहायचंस की नाही? आँ?
जाऊद्या राव.... पापं फेडायला
जाऊद्या राव.... पापं फेडायला लागतात ना कुठेतरी
तुच म्हणाय्चीस का ते कुफेहेपा? का ओडोमास सामा?
थोड्याच दिवसांपूर्वी
थोड्याच दिवसांपूर्वी ग्रीकांजली वाचून संपवलं आणि आता तुर्कनामा वाचतेय. दोन्हीही पुस्तकं आवडली. मला स्वतःला वेगवेगळे देश, त्यांचा इतिहास आणि संस्कृती ह्यांच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, आणि मला वाटतं मीना प्रभुंनी त्यांच्या पुस्तकांमध्ये ही माहिती देण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. मी तरी मराठी मध्ये एवढे डिटेल्स असलेली प्रवासवर्णनं वाचली नव्हती. मीना प्रभुंच्या प्रवासवर्णनांमध्ये त्या त्या देशांचा इतिहास पण मध्ये मध्ये खूप छान गुंफला आहे. शक्य त्या ठिकाणी स्थळांची ऐतीहासिक बाजू नमूद केल्याने त्यांची पुस्तक नुसती वरवरुन केलेली प्रवास वर्णन न राहता माहितीपुर्ण ही होतात. (काही वाचकांना जरी ते कंटाळवाणे वाटू शकते, पण फक्त 'मी इकडे फिरले, हे ठिकाण पाहिले आणि ते ठिकाण पाहिले... ' अश्या प्रकारच्या प्रवासवर्णनाने ज्यांना इतिहासातही रुची आहे असा वाचकवर्ग त्यांनी गमावला असता).
त्यांच्या उत्साहाचे, गोष्टी खोलात जाऊन पाहण्याच्या वृत्तीचे मला तरी कौतूक वाटले. फक्त ३०० पानं भरण्याकरता आणि पुस्तकांचा रतीब घालण्याकरता कोणी हे करेल असे वाटत नाही. लाखो लोकं जगभरातल्या विविध देशांना भेटी देतात, त्यातली किती पुस्तकं लिहितात? फिरण्याचा उत्साह, चिकित्सक वृत्ती आणि लिहिण्याची प्रतीभा ह्या तिन्ही गोष्टी असल्याशिवाय चांगली प्रवासवर्णनं निर्मीत करणं अवघड आहे.
असो, पुस्तकं आवडली एवढच लिहिलं असतं पण वरच्या काही चर्चा पाहून ४ ओळी जास्त लिहिल्या गेल्या!
मला पण आवडली त्यांची सगळीच
मला पण आवडली त्यांची सगळीच पुस्तके. ती प्रवासवर्णने वाचुन तिथे जाउन यावेसे वाटते, ह्यातच सगळे येते. विशेषतः गालापागोस चे वर्णन दक्शिणरंग मधील.. फारच छान आहे.
त्यांचे आत्ताचे वाट तिबेटची
त्यांचे आत्ताचे वाट तिबेटची मस्त आहे. चीनने तिबेटला कसे गिळले हे पाहुन असा राग येतो चीन चा कि बस!सगळीकडे नाक खुपसणारी अमेरीका ईथे कशी काय तटस्थ राहीली. बाकिचयुरोपिअय्यन देशानी पण काहीच सपोर्ट नाही दिला.
कुलू... कुठायेस तू.. वाट
कुलू... कुठायेस तू.. वाट तिबेट ची वाचलस एकदाचं तर..
Pages