Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07
नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !
खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मौसम बिता जाये!!!!!!!
मौसम बिता जाये!!!!!!!
बघून झाली.
बघून झाली.
>>आधी चुकून इंग्रजी ऑडिओ
>>आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला <<
आणि वाला! मुंबईत पाय ठेवल्यासारखं वाटलं (थँक्स टु अमितव!)
वीकांता ला बघेन. हे मीम
वीकांता ला बघेन. हे मीम खूपच प्रसिद्ध झाले आहे.
गिरीश कुलकर्णीचा अॅक्सेंट,
गिरीश कुलकर्णीचा अॅक्सेंट, बोलणं इथे पॉलिटिशियन म्हणून खपलंय पण अदर्वाईज हिंदीत त्याचा निभाव लागायचा नाही. त्याला अॅक्सेंटवर काम करायची गरज आहे.
Sacred games वर काहीतरी केस
Sacred games वर काहीतरी केस टाकलीय. लवकर बघून घ्या.
का बरं?
का बरं?
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/complaint-against-n...
हे वाचून बरं मग? असं वाटलं.
गिरीश कुलकर्णीचा अॅक्सेंट,
गिरीश कुलकर्णीचा अॅक्सेंट, बोलणं इथे पॉलिटिशियन म्हणून खपलंय पण अदर्वाईज हिंदीत त्याचा निभाव लागायचा नाही. त्याला अॅक्सेंटवर काम करायची गरज आहे. याअगोदर तलाश वगैरे हिन्दी सिनेमात त्याच्या कामाची खूप वाखाणणी झालेली आठवतेय
आठव्या भागाचा शेवट ( सीझन
आठव्या भागाचा शेवट ( सीझन फिनाले ) अर्धवट किंवा कन्फ्युझिन्ग वाटला . १-३ एपिसोड वेग छान आहे कथेचा . ४-६ बोअरिन्ग होतो थोडासा आणि कामुक दृष्ये संपूर्णतः अनावश्यक वाटली . भाषा मात्र योग्य आहे . शिव्यांमुळे झणझणीत वास्तवता आली आहे शो मध्ये
Malcolm म्हणजे समीर
Malcolm म्हणजे समीर धर्माधिकारी वाटलेला काही scenes मध्ये
तलाशमध्ये गिरिश कुलकर्णीचा
तलाशमध्ये गिरिश कुलकर्णीचा काय रोल होता? त्याला पाहिल्याचं अजिबात आठवत नाही.
Acting credits
Acting credits
Year Film Role Language
2006 Badha Bevda Marathi
2008 Valu Jeevan Marathi
2009 Gabhricha Paus Kisna Marathi
2009 Gandha Mangesh Marathi
2009 Vihir Bhavasha Mama Marathi
2011 Deool Keshya Marathi
2012 Masala Revan Patil[6] Marathi
2013 Pune 52 Amar Aapte Marathi
2014 Ugly Vijay Jadhav Hindi
2013 Postcard Postman
2015 Highway Shekhar Marathi
2016 Jaundya Na Balasaheb Balasaheb Marathi
2016 Dangal Wrestling Coach Pramod Kadam Hindi
2017 Kaabil Inspector Nalawade Hindi
2017 Faster Fene Appa Marathi
|2018 |"Sacred Games"
सॉरी तलाश नाही "अग्ली"
दंगल सुद्धा.
दंगल सुद्धा.
माझी अजून सगळी बघून झाली नाही
माझी अजून सगळी बघून झाली नाही. ५ भाग झालेत. पण मजा येते आहे. अनुराग कश्यप ने वासेपूर ची आठवण करून दिलीच पुन्हा.
नवाजुद्दीन बेस्ट आहे. सैफ ला चांगले रोल मिळाले की चमकतो एकदम. छान झालेय त्याचेही काम.
राधिका आपटे मात्र जरा मिसफिट वाटतेय असे वाटले तिथे. दुसरी कोणीतरी हवी होती.
वर कुणेतरी म्हटले तसे काही काही दृष्ये उगीच वाटली खरी. जसे त्या कुक्कू चा टोयलेट मधला सीन पुरेसा होता तिची आय्डेन्टिटी कळायला. त्याच्या नंतरचा एक्सपोज केलेला सीन प्रेक्षकांना दाखवण्याची गरज नव्हती.
गिकु इथे सूट झालाय की. त्याच्या हिंदी अॅक्सेन्ट चा त्रास नाही होत इथे.
तेच म्हणतेय वर की गिकु इथे
तेच म्हणतेय वर की गिकु इथे पॉलिटिशियन म्हणून त्याच्या अॅक्सेंटसह चालून गेलाय पण एरवी नाही (रोलवर डिपेंड करतं). थोडं परश्यासारखं वाटलं त्याचं हिंदी.
परश्यासारखं वाटलं त्याचं
परश्यासारखं वाटलं त्याचं हिंदी >> दंगल मध्ये असं अजिबात वाटलं नव्हतं. उलट त्याचा तो चिडकू कोच जाम डेंजर वाटलेला. गिकूचा सध्या सगळ्यांत आवडलेला रोल फाफे मधला. काय जरबेनं म्हणतो "ए फेणे" !!
Ugli मधला सिन खूप हिट आहे.
Ugli मधला सिन खूप हिट आहे.
टॉयलेट सीन होता का? माझा मिस
टॉयलेट सीन होता का? माझा मिस झाला मग. कुक्कू अॅपिअरन्स वरुन ट्रांस असेल असं वाटत होतंच, पण एक्सपोज सीनही खटकला नाही. फक्त हे असं आहे हे कित्येक दिवस/ वर्षे माहितच नसणे (आपल्याला नाही. ग. गा ला.. ते) खटकले.
रादर मला कुठलेच न्यूड सीन्स खटकले नाहीत. कथेत हवे तितके आणि योग्यप्रमाणात वाटले, ते घातले नसते तर कथा अधुरी वाटली असती. वर्चस्व दाखवायला सेक्शुअल साईड वापरतात, त्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे तो आणि तो टिपिकल हिंदी सेंसॉर प्रमाणे बथ्थड नाही दाखवला त्या बद्दल संबंधितांचे अभिनंदन आणि आभार.
सिरियल आवडली आहे. पुढच्या सीझनच्या प्रतिक्षेत.
यापुढे चांगल्या कंटेंटचा पिक्चर नेटफ्लिक्स ओरिजिनल असाच रीलीज करत जावे, तुलनेने जास्त आपल्या टर्मस वर लेखक दिग्दर्शक काम करु शकतील हे प्रकर्षाने वाटलं.
नो स्मोकिंग पाहिलाय का कश्यप
नो स्मोकिंग पाहिलाय का कश्यप चा.
कश्यप ला नेटफ्लिक्स ची खरच गरज होती ☺️
अमित- हो कथेच्या
अमित- हो कथेच्या गरजेप्रमाणे काहीही बघायची सवय असल्याने न्यूडिटी खटकते असे अजिबात नाही पण कुक्कू मेन्स युरीनल युज करताना दाखवल्यावर पुढच्याच सीन मधे पुन्हा त्याला समोरून दाखवण्याच्या सीन ची गरज नव्हती प्रेक्षकाच्या दृष्टीने असे नक्कीच वाटले.
न्युडिटी खटकली नाही. अमितच्या
न्युडिटी खटकली नाही. अमितच्या पोस्टशी सहमत. फक्त इंडियन ड्रामामध्ये बघायची सवय नसल्यामुळे चक्रवायला झालं.
व्हॉटसपवर नॉनवेज ग्रूप्स वर
व्हॉटसपवर नॉनवेज ग्रूप्स वर नवाझुद्दीनचे अश्लील सीनचे विडिओ कालपरवापासून फिरत आहेत. मी अजून डालो करून पाहिले नाहीत. ते याच चित्रपटाचे असावेत असे वाटते..
कुक्कू मेन्स युरीनल युज
कुक्कू मेन्स युरीनल युज करताना दाखवल्यावर पुढच्याच सीन मधे पुन्हा त्याला समोरून दाखवण्याच्या सीन ची गरज नव्हती >> हो हे असेल तर खरं आहे. पण मला हा युरिनल सीन आठवतच नाहीये. सो संत्र सोललं ते बरं झालं. पण आय अॅग्री. जरुरी न्हवती.
गायतोंडेला कुक्कुबद्दल कळायला
गायतोंडेला कुक्कुबद्दल कळायला इतका काळ जावा लागतो हे खरंच अविश्वसनीय वाटलं. राधिका आपटेऐवजी कोणीतरी जास्त धडाकेबाज घ्यायला हवी होती जी रॉ एजंट वाटली असती.
रॉ एजंट वाटली असती >> ती
रॉ एजंट वाटली असती >> ती मूळची अॅनॅलिस्टच असते ना. तिचा बॉस पण म्हणतो अॅनॅलिस्ट चं काम कर पण तिलाच फिल्डवर्क करायचे असते.
९०० पाणांचे पुस्तक सिरीज मधे
९०० पाणांचे पुस्तक सिरीज मधे उतरवलय नि तरीही प्रभावी ठेवलय (पुस्तकापेक्षा मुख्य पात्रे वेगळी होऊनही) ही मानण्यासारखी बाब आहे. बघताना थोड GoT सारखे झाले. सिरीजमधल्या त्रुटि पटकन जाणवल्या नाहित कारण पुस्तकात चपखल लॉजिक येते ते आठवले. नंतर विचार करताना जाणवले कि पुस्तक वाचलेले नसेल तर सहज जाणवणारे loopholes आहेत.
>>९०० पाणांचे पुस्तक सिरीज
>>९०० पाणांचे पुस्तक सिरीज मधे उतरवलय...<<
आठ एपिसोड्स पहिल्या सिझनमध्ये झाले, आता बाकि काय उरलंय? उलगडा व्हायचाय तो जोजो, झोया, त्रिवेदी, भोसले (परुळेकर) इ. मंडळींचा. इज दॅट बिग इनफ फॉर अनदर सिझन विथ अॅट्लिस्ट ८ एपिसोडस? माझ्या मते, बारा/तेरा एपिसोडस करुन संपवायला हवी होती, उगाच ताणलीय. आशा करुया टिपिकल इंडियन थ्रिलरच्या वाटेने जाणार नाहि...
कुठेतरी वाचलं त्याप्रमाणे
कुठेतरी वाचलं त्याप्रमाणे आत्ताशी फक्त १/४ पुस्तक संपलय. यावेगात अजुन तीन सिझन येतील. अधिकृत नाही, कोणी तरी लिहिलेलं वाचलंय.
भाग एक व दोन बघितले. मस्त
भाग एक व दोन बघितले. मस्त वाटले. सैफ चे काम सरप्रायजिंगली छान आहे. आर्ट डिरे क्षन जबरी. व नवाजुद्दीन तर अफलातून. मुंबईत आल्यावर बरेच धक्के खाल्ले असल्याने खूप ठिकाणी अगदी अग्दी झाले. काल मुम्बई बहुत गीला है निचोड ले मीम ट्रेंड होत होते. कारण खरेच पाउस होता.
खूपच वास्तव वादी चित्रण आहे. ती सेक्रेड गेम्स वाली चित्रे टायटल सिक्वेन्स मध्ये येतात ती पण आव्डली. एपिसोड च्या नावांचे पण लॉजिक आहे अश्वत्थामा, हलाहल व इतर. ट्विटर वर ही माहिती उपलब्ध आहे. एकुणात ग्रिपिन्ग.
Pages