कभी कभी लगता है अपुन ही भगवान है ! (सेक्रेड गेम्स )

Submitted by कटप्पा on 10 July, 2018 - 18:07

नेटफ्लिक्स वर सेक्रेड गेम्स आले आहे. आधी चुकून इंग्रजी ऑडिओ मध्ये सुरू केले, मग ऑप्शन चेंज करून हिंदी घेतला आणि नवाज चा पहिलाच डायलॉग -
कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !

खतरनाक वेब सिरीज. चर्चेसाठी हा धागा !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी स्वयपाक की अन्य कामाला असते ती तिथे. त्याला एक दोनदा कहीतरी सुनावतेही ती. नंतर हॉस्पिटलात जातो तेव्हा ती त्याला ती गुरुची अंगठी घालते.मंगळसूत्र पाहिल्य्याचे मलाही आठवतेय.

हो.

राजिव गांधीं समर्थकांचा काय प्रॉब्लेम आहे नक्की?
त्या शहाबानो मध्ये कोर्टाचा निकाल त्यांनी फिरवला म्हणून फट्टू म्हटलं ह्या एका वाक्यावरुन इतका मोठा इश्यू करतायत? कठिण आहे!!!
आत्तापर्यंतच्या कथेनुसार पुढच्या सिझनमध्ये हिंदुत्त्ववाद्यांवर रोख येणारे असं दिसतंय. त्यावेळी ते आणखी मोठा गोंधळ घाततील तेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वरुन बोंब ठोकायची असेल तर आत्ता पत्ते खिशात ठेवायची अक्कल कधी येणार!

त्या शहाबानो मध्ये कोर्टाचा निकाल त्यांनी फिरवला म्हणून फट्टू म्हटलं ह्या एका वाक्यावरुन इतका मोठा इश्यू करतायत? कठिण आहे!!!>> बघा ना. जे घडले तेच दाखवले आहे.

https://www.moneycontrol.com/news/india/bjp-it-cell-chief-tweets-scenes-...

माँ मरी तो बेटा PM बन गया, बनते ही बोफोर्स का घोटाला किया। अपुन सोचा जब देश के PM (Rajiv Gandhi) का ही कोई ईमान नहीं तो अपुन सीधे रास्ते जा के क्या करेगा...

माझ्या माहितीनुसार या डायलॉग मुळे प्रॉब्लेम आहे. भाजप नेत्यांनी संधीचा मस्त फायदा घेतलाय. पुढचा सिझन २०१९ च्या निवडणुकांच्या आधी येईल असं वाटत नाही. मग तेव्हसाठी पत्ते खिशात ठेऊन काय फायदा? काँग्रेस साठी आताच विरोध करणे गरजेचं आहे.

>>बघा ना. जे घडले तेच दाखवले आहे.

ते दाखवायचा प्रॉब्लेम नाहिये काँग्रेसला, राजीव गांधीला pussy म्हटलेल्याचा प्रॉब्लेम आहे

आत्तापर्यंतच्या कथेनुसार पुढच्या सिझनमध्ये हिंदुत्त्ववाद्यांवर रोख येणारे असं दिसतंय. >>> यस तसेच दिसत आहे. तेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे आणायची संधी काँग्रेसवाले आत्ता घालवत आहेत.

भाजपने या सिरियल मधला मुद्दा धरुन प्रचार सुरु केलाय का? Biggrin
जर हे खरं असेल आणि लोक त्यावरुन आजच्या घडीला प्लस/ मायनस पॉईंट देत असतील तर इट्स अ लॉस्ट बॅटल. कोर्टात ही केस जिंकणं शक्य नाही. (अर्थात कोण काय युक्तिवाद करतय आणि काय होतय ते कळेलच, पण सिरियल बघुन मला तरी काहीही वावगं वाटलं नाही.)
हसं करुन घेतील फुकट.
भाजपा हुषार असेल तर या रा. गां. प्रोटेस्टरना पाठिंबा देउन ही चकमक हरायचा प्रयत्न करतील. आणि कोर्टाकडे जोरदार अपिल करुन सिरियल मधून तो भाग वगळायला लावेल. त्यायोगे मोठी लढाई अर्थात इंटरनेट माध्यमातुन कंटेंट रिलिज करायला सध्या जो सेन्सॉर नाही ते लावायला मदत पदरात पाडून घेईल.

यातुन शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो ... न होवो.
असो, हे वाहत्या पानावर बोलू इकडे सिरियलवर बोलूया.

बाय द वे याबाबतीत राहुल गांधींचा रिस्पॉन्स सेन्सिबल आहे.

"My father lived and died in the service of India. The views of a character on a fictional web series can never change that," Mr Gandhi tweeted on Saturday.

उलट बाकीचेच राजापेक्षा राजनिष्ठ पणा दाखवत आहेत.

आत्तापर्यंतच्या कथेनुसार पुढच्या सिझनमध्ये हिंदुत्त्ववाद्यांवर रोख येणारे असं दिसतंय. ---- मला नवल वाटतंय की ह्याच सिझन मध्ये किती तरी hindu bashing आहे आणि कोणी काही बोलत नाहीये. असो.

गायतोंडे तिच्याशी लग्न करीन असं कांताबाईला म्हणतो तेव्हा पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं.->मी पण बायकोला म्हणालो कि मंगळसूत्र आहे कि. तर ती म्हणाली कि काळ्या मण्याची माल आहे..मंगळसूत्र नाहीये.

दूसर्या भागात , जेन्व्हा बंटी येतो गगा ला भेटायला , तेन्व्हा काही लोक बाहेर कॅरम खेळत असतात .
त्यात आहे का ती सुभद्रा , तेन्व्हा काळं दिसतं तिच्या गळ्यात .

कदाचित तिचं लग्न झालेलं असावं पण टिकलं नसावं आणि ते मंसू काढलेलं नाही. गायतोंडेच्या लग्नात तिच्या गळ्यात मंसू नाहीये.

तळपायावर फटके खाऊन नंतर गायतोंडे मॉर्निंग वॉक ला चालतात तसा रांगेत येऊन उभा रहातो, पाठीवर पट्ट्याने मार खात असताना थाई मसाज साठी पहुडल्यासारखा निवांत वाटतो. यांना नायकन मधला पोलिसांनी फोडलेला कमल हासन दाखवला पाहिजे.

पुन्हा ते गणवेशातले दोन पोलीस अधिकारी उठसूट एकमेकांना मारतात ते पण हाताखालच्या कॉन्स्टेबल समोर हे पण हजम नाही झालं

सगळ्यात अस्सल फक्त जितेंद्र जोशी वाटला

मला पण जितेन्द्र जोशी आवडला. पारुळेकर चे पात्र कन्फ्युज्ड आहे का ? सैफ ने "सर देश के लिये नही तो अपने लिये अपना काम किजिये " वगैरे उचकावले तर लगेच गिकु ला जाऊन कन्फ्रन्ट केले त्याने शेवटच्या भागात, ते जरा ऑड वाटले.

मै - त्यात "फायदा होगा' असे पुढे आहे. त्यात त्याचाही फायदा आहे असे सैफ सांगतो. कदाचित पुस्तकात क्लिअर असेल. सिरीज मधे ते ठळकपणे पुढे येत नाही. म्हणजे कॉन्शन्स क्लिअर झाला असे नाही, पण स्वतःचा फायदा दिसला म्हणून.

अर्थात, तो जर उलटला तर गिकु कडेही त्याच्याबद्दल बरेच मटेरियल असू शकते. तो लूज एण्ड वाटला मला. बघू पुढे काही आहे का त्याबद्दल.

काटेकरची बायको कोण आहे? ती आधी पण कोणत्या सिरीयल मध्ये होती.>>>>>> नेहा शितोळे. फु बाई फु मधे होती बहुतेक

लोकसत्तेच्या बातमीत म्हटलंय कि पुढचा सीझन दाखवणार नाहि, (अर्थात भारतामध्ये.). त्यात किती तथ्य आहे? असं करु शकतील का? ते फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनवाले चवताळुन उठतील काय?..

पुढचा सीझन तयार करा आणि इकडे तरी दाखवा म्हणावं. असं अर्ध्यावर सोडू नका. नेटफ्लिक्सने अपलोड केला पुढचा सीझन तर सरकार बॅन करणार आहे का? कुठल्या कारणावर? ऑनलाईन कंटेंटला सेंन्सॉर नाही, मग बघायच्या आधी किंवा नंतर बंदी कशी घालणार? का नॅशनल सिक्युरिटी धोक्यात येणार आहे? Wink अमेरिकेची कॅनडा मेक्सिको इयु मधुन स्टील/ अल्यु. इंपोर्ट करुन आली तशी?

या अशा-तशा कारणाने भावना दुखावल्या आणि प्रदर्शन बंद पाडलं आणि याला कोर्टाची फूस असेल तर भारतीय लोकांना ज्या डंब सिरियल आवडतात त्या प्रोड्युस करायला लागा म्हणावं ने आणि अ‍ॅ. ला
Q2 नंबर नंतर नेफ्लि आज १४% पडलाय आफ्टरआवर्स मध्ये. पुरेशी कस्टमर ग्रोथ नाही आणि मिडिऑकर कंटेंट, स्ट्रेंजर थिंग्स, हाऑकाचं पुढे काही आलं नाही इ. इ. कारणं म्हणतायत ग्रोथ न व्हायला. हा रिजनल शो आहे अर्थात .. पण पुरेसा हिट झाला आणि बझ तयार झाला तर नेफ्लि पुढचा सिझन नक्की काढेल.

मुळात जे गायतोंडे बोलताना दाखवत होते ते चुकीचं होतं का? चुकीचं असेल तर प्रूव्ह करा. नुसत्या भावना दुखवून काय उपयोग?
भारताबाहेर दाखवा पुढचे सिझन्स.

चुकीचं का बरोबर हा पॉईंटच नाहीये. ओपिनियन आहे तो त्याचा. कोणाचा काय ओपिनियन असावा ... जाऊद्या. वाफ दवडून काही फरक पडणार नाहीये.

बरं होईल खरंच बंद झाली तर. कसली कसली स्वातंत्र्य आहेत म्हणून कुणी भर चौकात वाट्टेल ते केलं तर चालेल का! सहसा ज्यांची अश्या सगळ्या स्वातंत्र्यांची गळचेपी होते, त्यांनाच बोलल्यावर सध्या अशी स्वातंत्र्य back burner वर. दुसऱ्या गृपवर पण शिंतोडे आहेत पण पहिल्या गृपला अगदीच चिखलात ढकललंय so त्यांच काम न बोलता होणार आहे. बाकी netflix ला पैसा मिळवायचा असेल 1 बिलियन+ लोकसंख्येची दाढी धरण्यवाचून गत्यंतर नाही. इथे चालतील अशाच सिरीयल बनवाव्या लागतील. आणि मी बाष्कळ नाही म्हणत आहे, good ओल्ड doordarshan days types serials.

मी भारतात पाहिली ही सिरीज. मला फार हिंसक वाटली नाही. अमरिकेत वेगळे व्हर्जन आहे का? नग्नता तर कुठेच दिसली नाही.

बरा अटेम्प्ट वाटला. फार ग्रेट नाही. भाराऊन जावे असे टोरेंतींनो फिलींग आले नाही. बाकी मुंबई एक पात्र म्हणून येते ही सत्यापासून सुरू झालेली कमेंट. इथे मुंबई कुठे दिसते? ब्लॅक फ्रायडे आणि सत्या मध्ये मुंबई खरेच एक पात्र आहे.

नग्नता तर कुठेच दिसली नाही??? Biggrin
अरे म्हणजे भारतासाठी एकदम वॉटर डाउन व्हर्जन केलेली दिसत्येय. काढून टाका त्यातुन भारतीय लोकांना काय काय नको आहे ते एकदाचं, खूष होतील म्हणजे. पण पुढचा भाग काढा ब्वॉ!
>>> netflix ला पैसा मिळवायचा असेल 1 बिलियन+ लोकसंख्येची दाढी धरण्यवाचून गत्यंतर नाही. >>> नेफ्लिला भारतातुन कितपत पैसा मिळतो प्रश्नच आहे. भारतीय बाजारपेठ नुसतीच मोठी आहे, त्यातुन पैसे फार मिळत नाहीत असं मध्यंतरी वाचलं. नेफ्लिचं बिझनेस मॉडेल सबस्क्रीपशन बेस्ड आहे सो त्यांना अजुन कठिण जाणारे. अर्थात फक्त ४-५ मेट्रो शहरातील टॉप ५- १०% इनकम अर्नर कव्हर केले तरी अनेक तिमाहींचे टार्गेट पूर्ण होईल इतके लोक आहेत यात वादच नाही.

Pages