तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ जपान मधली टॉयलेट्स हा एका लेखाचा विशय आहे. त्यात सगळं बटणांनी ऑपरेट होतं. परत थंड, गरम, मेल, फीमेल असे अनेक ऑप्शन्स असतात. बाय्का व पुरुषां साठी बरोब्बर जागे वर पाणी येतं. ( हा हा हा)....

हे असे अनेक आहेत.... वरचे वानगी दाखल.....
नवीन Submitted by मोहन की मीरा on 4 July, 2018 - 21:04 }}}

जपानी टॉयलेट्सचं विस्तृत वर्णन "व्हाय हिम?" या सिनेमात आहे. त्याशिवाय इतरही अनेक कल्चरल शॉक्स आहेत त्यात. प्रत्येक मुलीच्या बापाने पाह्यलाच हवा असा सिनेमा असल्याचे मित्राने सांगितले त्यामुळे पाहिला. जावई माझा भला या नाटकाची वेस्टर्न एडिशन वाटला.

बाप रे! त्या आज्या आपल्या पाळतीवर होत्या हे तुम्हाला माहीत होते काय! >> त्यांना नेमल होत की काय अशी पण शंका मनाला चाटून गेली. Happy

आमचे वरातीमागून घोडे.

- पुस्तकांवर पाय ठेवणे हा लगेच दिसणारा कल्चरल शॉक इथे. त्यात काहीच हेतू नसतो. इतर गोष्टींवर पाय ठेवतात तसे पुस्तकांवर.
- कोणी निघताना सोडायला न येणे हा आणखी एक. आपल्याकडे कधी पार स्टेशनपर्यंत, कधी बस स्टॉप पर्यंत, सोसायटी वगैरे असेल तर खाली गाडीपर्यंत वगैरे सोडायला जाणे कॉमन आहे. इथे फार पाहिले नाही. आम्हीच कधीकधी जातो गाडीपर्यंत, पण ते ही नेहमी नाही. सवय लागली.
- "डिनर टाइम" संध्याकाळी ६ वाजता हा भारतातून आल्यावर क. शॉ च होता. मग सुरूवातीला 'तेव्हा तर आम्ही चहा पितो" वगैरे जोक्स मारून झाले. मात्र नंतर नंतर तेच चांगले आहे, आणि इथल्या रूटीन मधे शक्यही आहे असे जाणवल्यावर आमचीही जेवणाची वेळ बदलली. अगदी सहा नाही, तरी शक्य तितक्या लौकरच जेवतो.
- पब्लिक स्वतःची स्पेस ठेवते आणि दुसर्‍याचीही. कोठेही अगदी चिकटून उभे राहात नाहीत. सहसा आपल्या हातातल्या बॅग्ज सुद्धा दुसर्‍याला लागणार नाहीत असे उभे राहतात.
- बँक्स, पोस्ट ऑफिस, सरकारी कार्यालये वगैरे सर्वत्र काउण्टर वरची माणसे आपल्या बोलावेपर्यंत लाइनीतच लोक उभे राहतात. मग त्याने/तिने बोलावले की मग जातात. आधीच तेथे समोर उभे राहून आता कधी याच्या/हिच्या अटेन्शन ची कृपा आपल्यावर होते याची वाट पाहात बसत नाहीत. ते काउन्टरवरचे लोक ही एकदा कस्टमर समोर आला की दुसर्‍या कोणालाही अटेन्शन देत नाहीत. दुसरे काही करण्यात बिझी असतील तर तसे आपल्याला सांगून थोडे थांबायला सांगतात.
- त्याहून महत्त्वाचे म्हणजे अशा सर्व ठिकाणचे काउण्टरवरचे लोक हे त्या त्या कंपनीचे/डीपार्टमेण्टचे खरोखरच "प्रतिनिधी" असल्यासारखे वागतात. एखादा प्रॉब्लेम आला किंवा खटकण्यासारखा अनुभव आला, तर आधीच "I/we apologize for the trouble..." ने सुरूवात करतात. "ते त्या काउण्टरला जा" छाप उत्तरे फार क्वचित ऐकली आहेत.

आणि हे दोन तीन इथून भारतात राहायला परत गेल्यावर आलेले
- प्रायमरी स्कूलची मुख्याध्यापिका किंडरगार्टन मधे अ‍ॅडमिशन घ्यायला आलेल्या कुटुंबाकडे बघून तर सोडाच, त्या लहान मुलाकडे सुद्धा एकदाही हसून न बघणे. या शाळेत काहीतरी एक्सायटिंग आहे अशी जराशी सुद्धा शंका येणार नाही अशी "मुलाखत"
- जून मधे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी, ४ ते ८ वर्षांची १००-२०० मुले ज्या गेटमधून आत जाणार आहेत, त्या गेटच्या बरोब्बर समोर रस्त्याचे काम काढलेले. तेथे भयंकर काळा धूर सोडणारे डांबराशी संबंधित यंत्र त्या गेटच्या अगदी जवळ आणि सर्व मुले आणि पालकांचे त्या धुराने स्वागत होणे. शाळेसमोर गाडी लावून अक्षरशः त्या धुरातून चालत गेटवर जायला लागले होते.
- लहान मुलांच्या दवाखान्यात दारातून आत गेल्यावर चपलांचा खच पडलेला. तेथेच रिसेप्शनिस्ट ढिम्म पणे बसलेली - किंवा या लोकांना सांगून थकलेली आणि नाद सोडून दिलेलीही असेल. तेथे एक अगदी एक दोन महिन्यांच्या बाळाला हातात धरून एक बाई च्या चपलांच्या ढिगातून चालत दार उघडायला गेली. आम्ही दार उघडून धरले इथल्यासारखे पण ते करताना असे लक्षात आले की तेथील सोशल पॅटर्न पेक्षा आपण वेगळे काहीतरी करतोय.
- किमान दोन तीन दवाखाने/डॉ ची ऑफिसेस असलेल्या बिल्डिंग च्या गॅलरीत उभे राहून खाली बघितले - बिल्डिंगच्या मागच्या बाजूस, तर ऑल्मोस्ट कचर्‍याने भरलेला तो सगळा भाग. एकूणच कोणत्याही दर्शनी भागात कचरा, गंजलेल्या/मोडक्या गोष्टी, किंवा एकूणच ज्याला इथे "eyesore" म्हणतात अशा गोष्टी दिसणे

यातील सर्व गोष्टी पूर्वी जाणवल्या नसतील. पण एकदा परदेशात राहून परत आल्यावर उठून दिसतात.

>>प्रायमरी स्कूलची मुख्याध्यापिका किंडरगार्टन मधे अ‍ॅडमिशन घ्यायला आलेल्या कुटुंबाकडे बघून तर सोडाच, त्या लहान मुलाकडे सुद्धा एकदाही हसून न बघणे. या शाळेत काहीतरी एक्सायटिंग आहे अशी जराशी सुद्धा शंका येणार नाही अशी "मुलाखत">> Lol

किमान दोन तीन दवाखाने/डॉ ची ऑफिसेस असलेल्या बिल्डिंग च्या गॅलरीत उभे राहून खाली बघितले - बिल्डिंगच्या मागच्या बाजूस, तर ऑल्मोस्ट कचर्‍याने भरलेला तो सगळा भाग. एकूणच कोणत्याही दर्शनी भागात कचरा, गंजलेल्या/मोडक्या गोष्टी, किंवा एकूणच ज्याला इथे "eyesore" म्हणतात अशा गोष्टी दिसणे>>>>

हे प्रचंड कॉमन आहे इथे. माझ्या दाराबाहेरच्या गोष्टींशी माझा संबंध नाही. त्यामुळे मी तिथे घाण करणार व ती सोसायटीने/मुन्सीपालटीने/सरकारने उचलावी. नाही उचलली तर मी टीका मात्र करणार.

आमच्याकडे वेंगुर्ला, सावंतवाडी भागात साखरपुड्याला नवर्यामुलीला दीर अंगठी घालतो>>>>><

हो. साखरपुड्याला मुलगा गेला नाही तरी चालते, जे काय विधी करायचे ते दिर करतो. पण आता हे बदललंय. सुरवात मुलाने हट्ट धरून बसण्याने झाली की मीच अंगठी घालणार, मग आई विनवण्यात व वडील भडकण्यात वेळ जायचा व इतरांची करमणूक व्हायची. आता मुलगा अंगठिपूरता बसतो, बाकी पोशे बिशे मारायचे काम आजही दिरच करवून घेतो. Happy Happy

>>प्रायमरी स्कूलची मुख्याध्यापिका किंडरगार्टन मधे अ‍ॅडमिशन घ्यायला आलेल्या कुटुंबाकडे बघून तर सोडाच, त्या लहान मुलाकडे सुद्धा एकदाही हसून न बघणे.

माझ्या मुलाला (वय वर्षे तीन किंवा चार असेल तेंव्हा) प्रवेश घेताना त्या मॅडमनी त्याला आपल्या टेबलवर बसवून घेतले. आणि पेन हातात देऊन काहीतरी लिहायला सांगितले. लिहायचे तर दूरच, त्यांचा रागीट चेहरा पाहून याने त्यांना पेन फेकून मारला होता Biggrin विशेष म्हणजे तरीही अ‍ॅडमिशन मिळाले होते Happy

>> बँक्स, पोस्ट ऑफिस, सरकारी कार्यालये वगैरे सर्वत्र काउण्टर वरची माणसे आपल्या बोलावेपर्यंत लाइनीतच लोक उभे राहतात

युकेमध्ये एक कल्चर आहे जे मला प्रचंड आवडले. कोणतेही ठिकाण जिथे एकापेक्षा अधिक काउंटर आहेत तिथे क्यू मात्र एकच असतो आणि क्यू मध्ये जो/जी सर्वात पुढे आहे ती व्यक्ती जो काउंटर उपलब्ध होईल तिथे जाते. किती साधी सोपी पण शिस्तबद्ध पद्धत आहे हि. यामुळे एखादा काउंटर स्लो असेल, एखाद्याच्या कामाला वेळ लागत असेल किंवा तिथला कर्मचारी उठून जरी गेला असेल तरी एकूण क्यू ला फार फरक पडत नाही वा कोणावर अन्याय पण होत नाही.

हेच आपल्याकडे जितके काउंटर तितके क्यू. त्यामुळे कोणीतरी आपल्या नंतर आला आणि दुसऱ्या काउंटरच्या क्यू मधून त्याचे लवकर काम झाले. किंवा आपण उशिरा येऊनही केवळ आपल्या काउंटरचा क्यू भरभर पुढे सरकल्याने आपले काम लवकर झाले, असे अनुभव येतात. त्यात आणि एखादा काउंटर बंद झाला तो कर्मचारी निघून गेला कि त्या काउंटरच्या क्यू ची इतर काउंटरकडे पाहून चरफड होणे असले प्रकार घडत असतात.

मला या युकेच्या क्यू कल्चरची आपल्याकडे पण लोकांना सवय लागली पाहिजे असे अनकेदा तीव्रतेने वाटते. विशेषकरून टोलसाठी प्रत्येक बूथला ज्या वेगवेगळ्या रांगा लागतात आणि कमी वाहने पाहून तिथे जायची प्रत्येक वाहनचालकाची धडपड आणि तिथे गेल्यानंतर नेमके त्याच बुथवर नंतर काहीतरी बोंब होते Lol वगैरे सगळे वैताग आणणारे प्रकार नित्यनेमाने घडत असतात.

कॉलेज संपेपर्यंत रोज नित्यनेमाने एका तथाकथित राष्ट्रप्रेमी संघटनेत शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून जात असलेला मित्र, आमची राष्ट्रीय स्वाभिमानवर प्रसंगी लेक्चर्स घेणारा मित्र, पंधरा वर्षांनी बाहेरून आल्यावर जेव्हा "यु यासहोल्स वोन्ट एवर चेंज, यु ब्लडी देसी क्रिप्स" म्हणाला होता तेव्हा जबरी धक्का बसला होता, ना बाप बडा न भय्या, सबसे बडा डॉलर/रुपया हे किती खरे असेल हे असे दिसणे एक कल्चरल शॉक होता.

कितीही गर्दी असेल तरी एकही हॉर्न ना वाजवता गाडी चालवतात हे बघून हि अचंबा वाटला होता . हॉर्न वाजला म्हणजे दुसऱ्याची चूक झालेली असणार ..
असे इतर वेळी रस्त्यावरून कधीही/उगाचच हॉर्न न वाजवणारे हे लोक ; लग्नं झालेल्या जोडीची वरात काढतात तेव्हा जोरजोरात हॉर्न वाजवत जातात .. हॉर्न हाच ढोल आणि हॉर्न हाच ताशा ! Lol
किंवा एखादा जर PHD झाला असेल तर त्याची पण अशी जोरजोरात हॉर्न वाजवत वरात काढतात !!

कॉलेज संपेपर्यंत रोज नित्यनेमाने एका तथाकथित राष्ट्रप्रेमी संघटनेत शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून जात असलेला मित्र, आमची राष्ट्रीय स्वाभिमानवर प्रसंगी लेक्चर्स घेणारा मित्र, पंधरा वर्षांनी बाहेरून आल्यावर जेव्हा "यु यासहोल्स वोन्ट एवर चेंज, यु ब्लडी देसी क्रिप्स" म्हणाला होता तेव्हा जबरी धक्का बसला होता, ना बाप बडा न भय्या, सबसे बडा डॉलर/रुपया हे किती खरे असेल हे असे दिसणे एक कल्चरल शॉक होता.

नवीन Submitted by जेम्स वांड on 6 July, 2018 - 12:07

मस्तच , वर्मावर बोट ठेवलेत एकदम

अमेरिकेत तसे बरेच cultural शॉक्स बसलेत, आतापर्यंत वर न लिहिलेले -

१, ऑफिसमध्ये स्टाफ साठी लंच ऑर्डर आल्यावर मॅनॅजरने जोरात ओरडून सांगितलं 'Lunch is here, Dig in' . नवीन असल्यानें जाऊ कि नको असा विचार करत होते तोच दुसरा कलीग म्हणाला 'यू डोन्ट वॉन्ट तो ईट ऑर व्हॉट?' मी आपली विचार करत होते सवय नाही रे बाबा अस आग्रहाशिवाय खाण्याची .

२. आमच्या गॅस स्टेशनसाठी cigarate liecence काढायला गेलो. एक फॉर्म भरला आणि पैसे दिले. १५ मिनिटात लायसन्स हातात. नो bribe , नो agent , नो timepass.

३, हॉस्पिटलमधून नवजात बाळाला घरी आणताना गाडीपर्यंत सोडायला आलेल्या volunteerला पैसे देऊ केले तर त्याने अजिबात घेतेले नाहीत. नवऱ्याने सांगितले 'This is our tradition' तर म्हणाला 'Ok माझ्या चर्च ला donate करा'.

आमच्या गॅस स्टेशनसाठी cigarate liecence काढायला गेलो. एक फॉर्म भरला आणि पैसे दिले. .......>>>>
अमेरिकेत पेट्रोल पंपाला gas station म्हणतात ते माहित होतं, पण हे cigarate license काय प्रकार आहे???

गॅस स्टेशनवर इकडे ९९% छोटे कन्विनिअन्स स्टोअर टाईप दुकानं असतात. (गॅस स्टेशन बरोबर हे पण घ्यावंच लागतं की काय कोण जाणे कारण नुसतंच पेट्रोल पंप मला आजपर्यंत ८ वर्षात कोणत्याच स्टेट मधे दिसले नाही. )तर तिथे सिगरेट, दुध, फळं, पाण्याच्या बाटल्या अशा गोष्टि विकायला ठेवतात. सिगारेट्स विकायला हे लायसन्स लागत असेल.

फार मस्त धागा आहे. किस्से / अनुभव वाचायला पण मजा येतेय.

माझा पहिल्यांदा परदेशाचा कल्चरल शॉक युके - नॉटींगहॅम - दर फ्रायडे नाईटला फार उधाण आलेलं अस्तं पब्लिकला. उघड्यावर चालणारे सिन्स बघुन कसेतरीच झाले.

पुण्यातले:
२१-२२ वर्षांपूर्वी फर्ग्युसन कॉलेज रोडला एका मुलीला सिगरेट पिताना पाहून शॉक बसला होता. तेव्हा हे कल्चर फारच नवीन होते.

एका ऐतिहासिक स्थळी एक माणूस एका बाईला जोरजोरात ओरडत होता, त्याच्या संवादावरून कळले की त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. ती बाई असं चारचौघात असं ओरडू नका असं विनवत होती. विबासं हा दुसरा शॉक.

गॅस स्टेशन बरोबर हे पण घ्यावंच लागतं की काय कोण जाणे कारण नुसतंच पेट्रोल पंप मला आजपर्यंत ८ वर्षात कोणत्याच स्टेट मधे दिसले नाही. )
>>>लोल...अहो गॅस मध्ये काही प्रॉफिट नसतो, सगळा प्रॉफिट या स्टोर मधून मिळतो owner ला.

आमच्या गॅस स्टेशनसाठी cigarate liecence काढायला गेलो. एक फॉर्म भरला आणि पैसे दिले. .......>>>>
अमेरिकेत पेट्रोल पंपाला gas station म्हणतात ते माहित होतं, पण हे cigarate license काय प्रकार आहे???- अमेरिकेत cigarate, दारु विक्रीसाठी convenience store ला स्वतंत्र लायसन्स घ्यावं लागत. owner बदलला कि नवे liecence, लॉटरी मशीनचे पण liecence लागत. ह्या सगळ्या procedures खूप सोप्या आहेत. म्हणूनच cultural शॉक

आमच्याकडे वेंगुर्ला, सावंतवाडी भागात साखरपुड्याला नवर्यामुलीला दीर अंगठी घालतो>>>>><हो. साखरपुड्याला मुलगा गेला नाही तरी चालते, जे काय विधी करायचे ते दिर करतो. पण आता हे बदललंय. सुरवात मुलाने हट्ट धरून बसण्याने झाली की मीच अंगठी घालणार, मग आई विनवण्यात व वडील भडकण्यात वेळ जायचा व इतरांची करमणूक व्हायची. आता मुलगा अंगठिपूरता बसतो, बाकी पोशे बिशे मारायचे काम आजही दिरच करवून घेतो. >> हो आमच्या घरी तरी आम्ही ही पद्धत बदलली. नाहीतर बाहेरच्या लोकांना धक्का बसायचा.

<<< हा..... असले ट्रीकी शब्द असतात.
नॉर्थ मध्ये पुच्ची म्हणजे पप्पी.
पुच्ची दो बेटू असे लहान बाळाला म्हणणे खुप कॉमन आहे.

Submitted by च्रप्स on 4 July, 2018 - 23:28 >>>

हे कुणी सांगितले तुम्हाला? असे काही अज्जिबात ऐकिवात सुद्धा आलेले नाही. उत्तर प्रदेश मधून आलेले अनेक जन भेटलेत कोणी असे काही म्हणताना ऐकलेले नाही. काहीही सांगता का.

हे कुणी सांगितले तुम्हाला? असे काही अज्जिबात ऐकिवात सुद्धा आलेले नाही. उत्तर प्रदेश मधून आलेले अनेक जन भेटलेत कोणी असे काही म्हणताना ऐकलेले नाही. काहीही सांगता का.
>>> हे खूप कॉमन आहे. दिल्ली नोएडा मध्ये पण. तुम्हाला नाही भेटले आणि ऐकले नाही म्हणून हे खोटे होत नाही. हे रोज ऐकून आता विचित्र वाटणे बंद झालंय. आधी कानाला टोचायचे फार ☺️

<<< तुम्हाला नाही भेटले आणि ऐकले नाही म्हणून हे खोटे होत नाही >>>

माझे सोडून द्या पण आजकाल गुगलवर काही नाही असे होत नाही. दुर्मिळत दुर्मिळ गोष्ट सुद्धा आहे. हा शब्द गुगलवर या संदर्भाने शोधल्यास दुसरा कोणताही अर्थ किंवा उल्लेख मिळाला नाही म्हणून मला तसे वाटले. पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले तर आणि तुम्हला अनुमोदन पण दिले आहे तर असेल बुवा.

Pages