तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< राजसी यांच्या पोस्ट मी वाचत नाही कारण वाचायला आणि समजायला त्रास होतो. एक तर त्यानी शुद्ध मराठी अथवा शुद्ध इंग्लिश मध्ये लिहावे. >>> +१

>>><<< राजसी यांच्या पोस्ट मी वाचत नाही कारण वाचायला आणि समजायला त्रास होतो. एक तर त्यानी शुद्ध मराठी अथवा शुद्ध इंग्लिश मध्ये लिहावे. >>>+१११११११

फक्त मधेच एक रेसिस्ट वाचून हसायला आले. ते कोणीतरी हे लिहलच पाहिजे का?
तो एक अनुभव होता.
आणि अनुभव भारताच्या बाहेरचे लिहिले तर रेसिस्ट नाही का?
कित्येकांनी वरती लिहुलेले अनुभव हे शॉक म्हणून लिहले असले तरी, तुलना जिथे घडते तिथे रेसिस्म असतोच. भारतात असं, तिथे तसं किंवा कुठल्याह बाबतीत.

तुम्ही मराठीत कधी लिहिणार ? रोज काय तीच कारणं फोनची..

राजसी, सारसोंका तेल वास रेसिस्ट आहे हे मान्य पण तो वास येतोच. माझ्या म्हाडाच्या घरी कॉमन गॅलरी होती, कोपऱ्यात बिहारी राहत होते. त्या घरी कोण आले /गेले हे आमचं दार बंद असले तरी वासावरून कळायचे. आम्हा सगळ्याला त्रास होतो हे लक्षात आल्यावर त्यांनी तेल वापरायचे बंद केले, पण कुणी पाहुणे तिकडे आले की वास यायचाच.

अनुभव लिहिताना प्रांत, माणूस, ज्या मुळे तो अनुभव आला ते कारण हे सगळे येणारच, जसे विशिष्ट प्रांत, विशिष्ट जात..वगैरे. यात रेसिसम शोधत बसलो तर अनुभव कथन कसे होणार व ते सगळे काढून अनुभव लिहिला तर तो अनुभव राहणार नाही.

वरती, तिथे (अमेरीकेत) कसा ढुं** पेपर वापरतात, गावात असंतसं , य जातीत्/गावात असे संबोधतात, असेच कंजुष वगैरे नावं ठेवली की कलचरल शॉक खाली...
कोणाच्य्स्स घरी असं तसं हे रेसिस्ट दिसले नाहि कोणाला.. मज्जाय.

आले का ,लगेच सगळे हे कसे रेसिस्ट आहे बोंबलायला. जज बनले लगेच.

स्वतःचे ते अनुभव्/कलचरल शॉक आणि दुसर्‍यांचे अनुभव ते रेसिस्म?
भरलेल्या गर्दीत, तापलेल्या हवेत राईचा वासाबद्दल तक्रार करणारे रेसिस्टच.. मग तो कलचरल वेगळेपणा येत नाही.
कारण तो दुसर्‍याचा अनुभव रेसिस्म म्हणून वगळणार..
खरे तर, हाच रेसिस्म आहे. आपण कसे संवेदन्शील आहे..

चालू द्या..

Now a days I access maayboli website through mobile browser. I downloaded maayboli app but I am not interested in sharing my location or giving access to my files. Without those permission, maayboli app is not allowing me to read also.
Earlier I started using google indic keyboard for typing devnagari. The keystroke history and because of that google suggestions became too creepy for me. Once I felt that I didn't search particular topic just talked and still without any reason Google prompted me what I had talked. My husband suggested I should stop using google keyboard and start using phone keyboard which doesn't store my search keystrokes history (my laymen term understanding). Unfortunately I didn't find my phone keyboard as acquainted / easier to devnagari writing as google Indic is.
I shall definitely try to use devnagari script but starting laptop takes too long. Mostly I read maayboli on the go.

Zampi, I have already wrote about caste specific cultural shocks and if possible avoid it. If you check first post about caste on this thread.

आता गं बया.
रोमन लिपी होती ते पुरं नाही झालं म्हणून आता मिंगलीश स्पॅनिश आले होय ☺️☺️☺️☺️

I respect your views about privacy,
From my side i will help you by not reading your posts, that way your opinions will remain private too Wink

Once I felt that I didn't search particular topic just talked and still without any reason Google prompted me what I had talked. My husband suggested I should stop using google keyboard and start using phone keyboard which doesn't store my search keystrokes history>>>>

फोन की बोर्ड वापरून फरक पडला का? कारण मी जे वाचलंय त्यानुसार आपण कुठल्या साईट्स बघतो, शब्द टाइप करतो हे तर गुगल वाचतोच पण सोबत आपण जे वाचतो, आपल्याला आलेल्या मेल्स वगैरेही तो वाचतो. त्यामुळे आपण टाइप करायचे थांबवले तरी गुगलला फारसा फरक पडणार नाही असे वाटते.

मी आता ह्या सगळ्याचे क्रिपी फिलिंग यायचे मनावर घेणे बंद केलेय. अँड्रॉइड बेस स्मार्टफोन वापरायचा तर गुगल किंवा इतर अकाऊंट असणे आवश्यक आहेच, नाहीतर फोन वापरता येणारच नाही आणि apple सगळ्यांना परवडेल असे नाही. तसेही आपली माहिती गुगल काढतोच...त्यामुळे मी दुर्लक्ष करते. जी माहिती गुगलला कळू नये असे वाटते ती मोबाईलवरून ऍक्सेस करत नाही, ऑफिसचा लॅपटॉप वापरते. त्याच्यावर खूप स्ट्रॉंग फायर वाल्स आहेत. तरीही माहिती जात असेल तर आता पर्याय नाहीय. Sad Sad

I respect your views about privacy,
From my side i will help you by not reading your posts, that way your opinions will remain private too --- this is best Happy
my husband said same thing that I myself by posting opinion on internet making it public. Where is privacy?! I should stop posting altogether Happy and protect my privacy.

सध्या असं ठरवलंय मायबोलीवर फक्त गूगल इंडिक वापरायचा आणि मायबोली बंद केली की आधी कीबोर्ड बदलायचा. लक्षात ठेवून हाताला सवय लावावी लागणार! कितपत उपयोग होईल माहित नाही.

तुम्ही एक जरी गुगल चे प्रॉडक्ट वापरत असाल तर गुगल तुमच्या नकळत माहिती गोळा करू लागतो. आता युरोपिअन युनियन च्या GDPR मुळे साळसूदपणे विचारतो की तुमचा डेटा माझ्या कडे 1 वर्षे राहील, चालेल का?

बाकी देवनागरी व्यतिरिक्त इतर मेसेज वाचत नाही.

राजसी, इंडिक कीबोर्ड च्या सेटिंग मध्ये जाऊन "send usage statistics" बंद करा. तिथेच इनपुट या दुसऱ्या मेनू मध्ये जाऊन तुम्हाला नको असलेली ऑटो करेक्शन, वर्ड प्रोम्पटिंग इत्यादी सेटिंग्ज बदला.
फायरफॉक्स फोकस नावाचा प्रायव्हसी जपणारा ब्राउझर वापरा. अर्थात मायबोलीवर दर वेळी नव्याने लॉगिन करायची तयारी ठेवा.
नॉर्मल फायरफॉक्स वापरत असाल तर ghostery प्लगिन वापरा.

अजून उपाय हवे असल्यास वेगळा धागा काढा. इथे खूपच अवांतर होतंय

चालेल. कृपया दुसरा धागा काढा. आणि ही पोस्ट पण तिथे टाका. तोपर्यंत वरील गोष्टी वापरल्या आहेत बहुतेक, तरी cross check करते.

मी खूप आळशी आहे, तुमच्यासाठी नवा धागा काढायचे कष्ट मी नाही घेणार
>>>
खरंय, धागा काढणे हे उद्योगी माणसाचे काम असते Happy

पण खरेच काय ते नवीन धागा काढा, ईथल्या पोस्ट वाचायला मजा येत होती. पण अवांतर पोस्ट फार झाल्याने सर्वांचीच मजा जातेय.

पूर्वीच्या काळी डर्ट ब्लास्टर वाल्या सर्फ बद्दल बाई दार उघडून ब्लास्टर हो या प्लास्टर, नही चाहीये म्हणून दार बंद करते त्याप्रमाणेच गुगल ने फोन किंवा लॅपटॉप वर काही प्रश्न विचारला की त्याला खडूस पणे नही चाहीये म्हणून दार(डायलॉग खिडकी) बंद करणे हा त्यातल्या त्यात थोडे सुरक्षित राहण्याचा उपाय आहे.तोही फुलप्रूफ नाही.नंतर नंतर गुगल धमक्या चालू करतं 'हे तुम्ही स्वीकारलं नाही तर आम्ही ते नीट चालू करून देणार नाही' वगैरे.मग शिव्या घालत सेटिंग मध्ये जाऊन एक परवानगी वाढवावी लागते ☺️☺️☺️
हेमाशेअवांतरपो

काही दिवसांआधी मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हा शो बघत होतो, त्यातला एक जज कांगारूचे मास वापरून डिश बनवत होता, मग कळलं ऑस्ट्रेलियात राष्ट्रीय प्राण्याचे मास खाणे अवैध नाही. हा माझ्यासाठी खूप मोठा कल्चर शॉक होता!

माबोवर मी पहिला वहिला धागा काढला आणि तासाभराने प्रतिसाद बघायला आलो आणि बघतो तर काय?
माझ्या धाग्यावर विडम्बन धागा आलेला होता, आणि त्यात माझ्या धाग्यापेक्षा कितीतरी जास्त प्रतिसाद होते.

हा माझ्यासाठी एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. मला हा विडम्बन धागे प्रकार भारी आवडला.
मी ही काही प्रयत्न करुन पाहिले पण विशेष जमले नाहीत.

ब्राझिलमधे फूड मॉल मधे जेवण वजनावर देणारी उपहार गृहे आहेत. Happy

भारतीय लोकांच्या घरातून आणि त्यांच्या अंगाला येणार्‍या खाद्यान्नाच्या वासाने इतर जनतेला किती शॉक बसतो याची कल्पना आहे का कुणाला?. Happy

भारतीय लोकांच्या घरातून आणि त्यांच्या अंगाला येणार्‍या खाद्यान्नाच्या वासाने इतर जनतेला किती शॉक बसतो याची कल्पना आहे का कुणाला?. << आहे

चिनी लोक साप सर्रास खातात. अगदी विषारीही (फक्त त्यातील विषारी भाग टाकून देतात). पण विषारी जास्त चविष्ट असतो म्हणे! अमेरिकेतील एका चिनी सहकार्याने भारताबद्दल एक डॉक्युमेंटरी पहिली ज्यात नागपंचमीला टोपल्यात घालून नाग घरोघरी नेतात असे काही दाखवले होते. त्याने निरागसपणे विचारले की तुम्हीपण साप खाता का? त्याला वाटले फळांची टोपली असते तशी नागाची टोपली घेऊन तो माणूस घरोघरी हिंडतो. आवडला नाग तर तिथेच कापून देणार! मला त्यामागचे धार्मिक कारण सांगताना नाकी नऊ आले! त्याचे इंग्रजी यथातथा (अमेरिकेत राहूनही) आणि चीनमध्ये वाढल्यामुळे धर्म वगैरे फार कळत नव्हते. तशात नागासारखा चविष्ट पदार्थ(!) देव कसा काय हेही त्याच्याकरता अगम्य होते.
अशा प्रकारे गारुड्यांच्या नागाला अन्य लोक खाद्यपदार्थ समजतात हा एक मोठाच झटका होता.

>>>चिनी लोक साप सर्रास खातात. अगदी विषारीही (फक्त त्यातील विषारी भाग टाकून देतात). पण विषारी जास्त चविष्ट असतो म्हणे!<<<
हा खरे तर देशाबाहेरचा पहिला मोठा शॉक होता.
ते तर घरात माश्याच्या टॅंकप्रमाणे सापाची टँक ठेवतात.

पाण्यातील साप स्वस्त असतात खायला.. म्हणून ( इति चिनी कलिग)

त्याला वाटले फळांची टोपली असते तशी नागाची टोपली घेऊन तो माणूस घरोघरी हिंडतो. आवडला नाग तर तिथेच कापून देणार>>>>>
Happy Happy Happy

इंडोनेशियात काही रेस्टॉरंट मधे फिश टँक ठेवलेला असतो. तुम्ही आवडणारा मासा दाखवायचा. त्याला बिचार्‍याला झारीत पकडून किचनमधे रवानगी.

Pages