तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्तराचे दिवे सारखंच ज्ञानसागरातील शिंपले मध्ये 1 चमचा अश्रू 1 लिटर पाणी निर्जंतुक करतं वाचून बरेच दिवस घरी भांडण झालं की डोळ्याखाली चमचा धरून रडायचे.चमचाभर अश्रू जमले, पण त्याने शुद्ध झालेलं 1 लिटर पाणी कधी प्यायलं नाही.
<<
काकू ओरडल्या मला, मध्यरात्री भुताटकीसारखे कशाला हसाताय म्हणून! आईशपथ. कसला हस्तोय मी

ज्ञानसागरातील शिंपले एकदम भारी होते.

हे "सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई रात्री सिगरेटओढत असताना" वाचलं >> मी ही. कल्चरल शॉक होता.

{{{ वरचे सगळेच, प्लीज अवांतर टाळाल का?
Submitted by सायो on 3 July, 2018 - 23:22 }}}

मायबोलीच्या एखाद्या धाग्यावर अवांतर प्रतिसाद आले नाहीत तर कल्चरल शॉक वाटतो.

सगळेच सुटलेत

तो तोतया कनोजी ब्राह्मण होता सुखलाल त्याचे नाव आणि त्याला आणि पार्वतीबाईंना एकांत मिळाल्याचे उल्लेख नाहीत, त्याची चौकशी सुरू असतानाच त्याची तोतयागिरी पकडली गेली होती
अत्तराचे दिवे, सिगरेट वरून ओळखले म्हणजे कमाल झाली

आणि शनिवार वाडा सोडून पर्वतीवर देवळात कशाला एकांत हवा होता त्यांना

ज्ञानसागरातील शिंपले

वाह नॉस्टॅल्जिक झालो एकदम, ती हिरव्या निळ्या रंगाचे कव्हर आणि समुद्रातुन हातात मोत्याची ओंजळ घेऊन बाहेर येणारी बाई आठवली.

काहीही असायचे त्यात, हातावरचे शंख आणि चक्र मोजयचो ते आठवलं

अजून एक पुस्तक होते
थोडक्यात पण महत्वाचे
त्यात सचित्र घरगुती उपाय होते, काही चांगले होते काही काहीही होते

अहो, तो भाऊंचा तोतया फडवीसांनी की रामशास्त्री प्रभुण्यांनी पकडला होता ना?

माधवरावांनी खरमरीत भाषणास सुरूवात करून शेवटी भावनेस आव्हान दिल्यामुळं गांगरून जाऊन त्यानं कबुली दिली होती असं 'स्वामी' मध्ये वाचल्याचं आठवतं आहे.

पब्लिक,
1) खरे भाऊ आणि पार्वती बाई एकांतात असताना झालेली ती घटना त्या दोघांनाच माहीत होती.
2) तोतया इतका हुबेहूब होता की कोणला निर्णय घेता येईना
3) शेवटी पर्वतीबाईना परीक्षा घ्यायला सांगितले.
४) त्यांनी दोघांनाच माहीत असलेल्या घटनेचे संदर्भ दिल्यावर तोतया उघडकीस आला
5) ही कथा ऐतिहासिक सत्य आहे असा अजिबात दावा नाही, लहानपणी कुठल्यातरी मासिकात वाचली होती.

कृपया आता कल्चरल शॉक कडे परत जाऊया,

आणि हो.....
6 ) ज्ञान सागरातील शिंपले खास पुस्तक होते, Happy

बॅक टू अश्रू.
रांजणवाडी झालेला माणूस रडला तरी पाणी शुद्ध होतं?

मला नाही माहीत हो.ज्ञानसागरातील शिंपले वाळ्यानी ही केस कव्हर नाही केलेली ☺️☺️☺️
या पुस्तकाचे ऑनलाइन व्हर्जन मिळते का कुठे?

धमाल चाललीय इथे.
हे अवांतर साडीचे पडदे का अशाच काही प्रकरणावरून सुरू झालंय. म्हणून तिथून आणखी एक फाटा फोडतो.
पडद्याच्या कापडावर शोभेल असं डिझाइन असलेल्या कापडाचे शर्ट (चरागदिनच्या जाहिरातीत दिसायचे कधी कधी), ऑफिसला बडे साहेब भेट देणार म्हणून चकचकीत , झगमगीत, झुळझुळीत इ. कापडाचा शर्ट हे कल्चरल शॉक वाटलेले कधी काळी.

सोफा स्प्रेड बनवण्यासाठी माझा आईच्या पैठणीवर डोळा आहे >>>>>>

बाबौ..... भयंकर धाडसी विचार.... मिसेसचा पाठिंबा आहे का पण? नैतर सोफा स्प्रेड बनल्यावर तुम्हाला त्यावर बसायचे सुख लाभायचे नाही. Happy Happy

ते शिंपले सगळ्या भागांसकट होते आमच्याकडे. मी त्याच्याकडे कायम सुरस व चमत्कारिक गोष्टी म्हणून पाहिले.... त्यातले काही करून पाहायचा विचार कधीच डोक्यात आला नाही. मात्र धाडसी चंदू वाचून पुरलेले धन सापडेल या आशेने बागेतली घुशींची बिळे उकरलेली आहेत.

अवांतर समाप्त.

रच्याकने, मी धाडसी चंदू आधी वाचले. ते टॉम सॉयरचे भाषांतर आहे हे तेव्हा माहीत नव्हते. भाषांतर करतात हेच माहीत नव्हते. नंतर पाठ्यपुस्तकात टॉम सॉयरचा सुरवातीलाचा कुंपणाला रंग देण्याचा धडा आल्यावर खूप मोठा धक्का बसला.. कुणीतरी सॉयरसारखेच कसे काय लिहू शकते हे झेपलेच नाही Happy

आता सांस्कृतिक धक्के जाऊन नुसतेच धक्के येऊ लागले आहेत. मग कुणीतरी "दरदरून घाम आला, डावा हात दुखू लागला आणि हृदयात कळ आली" छाप धक्का लिहितील.
तर भभा "मी लहान असताना इलेक्ट्रिक सोकेटमध्ये खिळा घातला तर मला कसा मस्त धक्का बसला आणि तेव्हापासून मी रोज सकाळी सॉकेटमध्ये खिळा घालून शॉक खाल्ल्याशिवाय उठूच शकत नाही" असा किस्सा लिहितील.

पैठणी मटेरियल चे हे सगळं विकत मिळत असणार. एखाद्या पैठणी हातमागावर reject pieces पण असतील, ते अश्या प्रयोगांसाठी वापरता येतील. सूर्य पश्चिमेला उगवला परिस्थिती त पैठणी फाडायची ठरली तर घरातल्या बायकांचे कुर्ता, फ्रॉक, clutch, असे प्लॅन्स असणार.

पुण्यात चौपाटी आहे पण समुद्र नाही हा एक कल्चरल शॉक होता सुरूवातीला. नंतर वाटले कदाचित समुद्र नंतर बांधणार असतील. पण तिथे आता न्युक्लिअस मॉल झाल्याने ती शक्यता पण मावळली.

काँलेज कडुन 2005-06 साली वर्धा येथे गेलो होतो 10 दिवसां साठी तेव्हा सकाळी सकाळी रोड वरून ढोल ताशा चां आवाज ऐकुन सर्वजण पळत पळत बाहेर आलो नी बघतो तर अंत्ययाञा चालली होती. हा मीच नाही तर सोबत असलेल्या सर्व मुंला साठी कल्चरल शाँक च होता.

Pages