रूम मेट चे आई बाबा इथे अमेरिकेत घरी आले आहेत, आणि रोज बरोबर 6 वाजले संध्याकाळी की लाईट्स चालू करतात. इथे 9 पर्यंत सूर्यप्रकाश असतो, तरी हा प्रकार चालू आहे.
मी कारण विचारले तर म्हणे की लक्ष्मी येते 6 ला दिवे लावले की. वादात पडायची इच्छा नसतेच, त्यामुळे काही बोललो नाही.
मग हळूहळू नीट विचार केला आणि जाणवले की असल्या काही अंधश्रद्धा आपण कळत न कळत मानत असतो.
उदाहरणार्थ - काही लोक रोज दाबून मटण, चिकन खातात पण शनिवार आला की अंडे पण शिवत नाहीत.
आणखी एक- माझा मित्र कार सुरू करताना रिव्हर्स गियर टाकत नाही जरी 1 इंचावर भिंत असेल तरी आधी फॉरवर्ड गियर टाकणार, 1 mm पुढे नेणार गाडी आणि मगच रिव्हर्स.
इतकेच काय मी सुद्धा देवाला लाच देतो, हे काम होऊ दे, इतके पैसे दान देईन, ही सुद्धा अंधश्रद्धाच.
तुम्हाला आठवतायत का अशा अंधश्रद्धा ज्या इतक्या कॉमन आहेत की आपण नकळत follow करत असतो?
रस्त्यात कुत्रे भुंकत अंगावर
रस्त्यात कुत्रे भुंकत अंगावर आले तर हाताचा अंगठा मधले बोट आणि तर्जनी च्या मध्ये घालून मुठ आवळायची म्हणजे "कुत्र्याचे दात आंबतात" असे एक आमच्या लहानपणी कुणीतरी पसरवले होते
गाणे गायचे, नाच करायचा.
गाणे गायचे, नाच करायचा. कुत्रा जाऊ देतो. बादशाहमध्ये दाखवलेले. शाहरूख असे करून वाचलेलाही.
चप्पल उलटी पडलेली असते तेव्हा
चप्पल उलटी पडलेली असते तेव्हा पाहुणे येतात.
उलट्या चपलेचा मी जाम धसका घेतलाय.'2 जण येतो आणि पेशंट ला भेटून लगेच जातो' म्हणून मुलगा, मुलाची आई, भाऊ, बहीण, बहिणीचे मिस्टर, लहान बाळ हे सर्व येऊन जेऊन गेल्याची आठवण अजून मनात ताजी आहे.
साळुंख्यांची जोडी दिसली की,
साळुंख्यांची जोडी दिसली की, तर्जनी व मध्यमा एकत्र जोडून त्याची तिनदा पप्पी घ्यायची, दिवस चांगला जातो.
>>>>> हे खुप वेळा केलयं
शी येत असेल आणि ती थांबवायची असेल तर कडुनिंबाच्या झाडाला वाकडे दाखवावे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>>>
त्यापेक्षा बेंबीत बोट टाकून हलवावे. >>>>
आमच्याकडे बेंबीला थुंकी लावत हे पाहील आहे
घराजवळ कावळा ओरडला की पाहूणे
घराजवळ कावळा ओरडला की पाहूणे येतात ही खूप जूनी अंधश्रद्धा आहे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पण आमच्या घरासमोर एक विजेचा खांब आहे. त्यावर बसून कावळा ओरडला की हमखास पाहूणे येतात आमच्याकडे.
घार दिसली की नखे एकमेकांवर
घार दिसली की नखे एकमेकांवर घासत घारी घारी कवडी दे चा जप करायचा. नखावर पांढुरक्या रेशा दिसायला लागतात.
घुबडाला खडा मारायचा नाही, तो घुबड खडा घेऊण जातो आणी रोज नदीच्या काठी जाऊन उगाळतो. खडा जसजसा लहान होत जातो तसतसा मारणार्याची उंची कमी कमी होत जाते, शेवटी जेव्हा खडा संपतो तेव्हा ती व्यक्ति गायब झालेली असते.
बुधवारी माहेरवाशिणीने सासरी परतू नये.
कायच्च्या काई अंधश्रद्धा ऐकलेल्यात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्या दिवशी घर छान आवरुन
ज्या दिवशी घर छान आवरुन ठेवावे त्यादिवशी हमखास पाहुणे येतात आमच्याकडे.
घरासमोर शेवग्याचे झाड नको पपईचे झाड नको. अर्थात याला कारण ही आहे. शेवग्याचे झाड ठिसुळ असते. पपईचे तर आतुन जवळजवळ पोकळ्च.
सापाला दगड मारला कि तो डूख
सापाला दगड मारला कि तो डूख धरून ठेवतो आणि मग आपल्या घरी येतो ..
शिवाय चोपई दिसली कि लगेच " चोपई चोपई नागाला बोलावू नको तुला रामाची शपथ आहे !" असं म्हंटल कि साप येत नाहीत असा समज होता
चोपई? म्हणजे काय?
चोपई?
म्हणजे काय?
आस्तिक मुनीची शपथ लिहिलं की
आस्तिक मुनीची शपथ लिहिलं की साप व कांची नरद राजा लिहिलेलं असलं की पाली येत नाहीत म्हणे!
मांजराची झार घरात पडली की समृद्धी येते.
घोरपडे व म्हशीची दृष्टादृष्ट होता कामा नये. म्हैस वांझ होते..
चोपई?>>>> तो नई का .
चोपई?>>>> तो नई का ..सरड्यासारखा दिसणारा पण गुळगुळीत पाठीचा चॉकलेटी रंगाचा पाली सदृश प्राणी असतो .. दुसरा नाव नाही माहिती मला.. शोधते न सापडला कि टाकते इथे
चोपई म्हणजे पाल किंवा
चोपई म्हणजे पाल किंवा सरड्यासारखा एक प्राणी. जास्त सडपातळ आणि चपळ असतो.
चोपई?
चोपई?
म्हणजे काय?>>>> सरपटणारा एक प्राणी. पाल वर्गातला म्हटला तरी चालेल. पालीपेक्षा थोडा आकाराने मोठा. तोंड, बाकी अंग आणि शेपटी सापासारखीच दिसते. फक्त चार पाय असतात. किळसवाणा.
साप सुरळी पण म्हणतात तिला
साप सुरळी पण म्हणतात तिला
त्याला काही ठिकाणी गणपती
त्याला काही ठिकाणी गणपती असेही नाव आहे. इथे वाचा.
त्याला काही ठिकाणी गणपती
त्याला काही ठिकाणी गणपती असेही नाव>> मी आता हीच लीक द्यायला आलेले
.. किंवा साप सुरळी असा google सर्च देऊन इमेजेस बघा
माझी मुलगी लहान असताना माझ्या
माझी मुलगी लहान असताना माझ्या सासूबाई तिचे बाहेर वाळत घातलेले कपडे न चुकता रात्री घरात परत आणायच्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लहान मुलांचे बाहेर वाळत असलेले कपडे घुबड घेऊन जातो आणि नदीवर धुतो. जसंजसं तो कपडे धुतो, तसं तसं बाळ अशक्त होत जातं. घुबड कपडे धूत असेल तर आपण वॉशिंग मशीन घेण्याची गरजच नाही. (असं मात्र मी सासूबाईंना म्हटलं नाही.)
मी पाहिलेल्या ऐकलेल्या काही
मी पाहिलेल्या ऐकलेल्या काही अंधश्रद्धा....![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
*ताटात पदार्थ एकदाच वाढू नये, दुसर्यांदा किमान एक शित (जर भात वाढत असू तर) तरी वाढावे.
* तिन्हीसांजेला तरूण मुलींनी केस विंचरू नयेत, कारण विचारले असताना उत्तर मिळाल्या की तसल्या बायका फक्त तिन्हीसांजेला केस विंचरतात.
* उंबर्यावर शिंकू नये. (कारण माहिती नाही)
* अंधार पडल्यावर केर काढू नये (पुर्वी वीज नव्हती त्यामुळे घरातील एखादा मौल्यवान दागिना नकळत केरातून जाऊ नये म्हणून)
* बाहेर गेलेला माणूस लवकर घरी परतावा म्हणून उंबरठ्यावर फुलपात्र उपडे घालणे.
* पाल अंगावरून गेली तर अंघोळ करून मारूतीच्या देवळात जाऊन त्याला तेल घालणे
* मुल घाबरले की त्यांच्या कानात फुंकर घालणे
* लहान मुलांना अंघोळ घातल्यावर बादलीतल्या उरलेल्या पाण्याने त्याच्या भोवती तीन वेळा फिरवणे ( नैवेद्याच्या ताटाला फिरवतो असे)
*लहान बाळाचे खूप कौतुक केले तर दुसर्या व्यक्तीने त्याला ते बघ तिकडे काय आहे.. असे खोटे लक्ष वेधून पायाशी थूथू करणे.
* कुणी बाहेर जाताना "कुठे चाललास्/लिस असे विचारू नये (काम होत नाही म्हणे)
* काही एरवी मांसाहार करणार्या घरात पडवळाला सक्त प्रतिबंध होता का तर म्हणे त्यात साप असतो.
* रात्री तेल आणि विरजण मागू नये
* बुधवारी फुटाणे खाऊ नयेत, पुढचा जन्म गाढवाचा मिळतो
अंधश्रद्धा कशाला म्हणायचे
अंधश्रद्धा कशाला म्हणायचे इथपासून सुरूवात असते.
>>ताटात पदार्थ एकदाच वाढू नये
>>ताटात पदार्थ एकदाच वाढू नये, दुसर्यांदा किमान एक शित (जर भात वाढत असू तर) तरी वाढावे.
Haha agdi agdi he mi wisarloch hoto![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अंधश्रद्धा कशाला म्हणायचे
अंधश्रद्धा कशाला म्हणायचे इथपासून सुरूवात असते.>>> अंधश्रद्धा हा शब्द पिवळा पीतांबर सारखा आहे. कठोर नास्तिकाचार्य श्री य.ना.वालावलकर म्हणतात श्रद्धा व अंधश्रद्धा यात एकच फरक आहे. पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा शब्द चार अक्षरी
मागचे काही वर्षे दोन
मागचे काही वर्षे दोन अंधश्रद्धा --- पक्षी सवयी --- मझ्याकडून स्वत:च बनवल्या गेल्या आहेत त्याचा मी बळी झालोय पण त्यातून सुटका कशी करावी समजत नाही.
पहिली---: टाईप करताना एखाद्या शब्दातले एखादे अक्षर चुकले कि फक्त तेच एक अक्षर डिलीट न करता अखंड शब्दच डिलीट करायचा. इतकेच नाही तर त्या शद्बा आधीचा स्पेस पण डिलीट करायचा. आणि स्पेस सहित तो शब्द नवीनच टाईप करायचा. त्या स्पेस सहित त्या शब्दातली अक्षरे एकत्रच येत असतात. त्यामुळे डिलीट करायचे तर सर्वानाच करायचे अन्यथा ते योग्य होणार नाही असे काहीसे मनात येते. यात माझा वेळ खूप जातो पण असे केले नाही तर चैन पण पडत नाही.
दुसरी अंधश्रद्धा---: काही गोष्टी मूळ संख्येतच करायच्या. उदाहरणार्थ बाटलीतले पाणी प्यायचे तर तीन, पाच, सात वगैरे घोटच घ्यायचे. ब्यांकेत पैसे भरायचे तर ते पण मूळ संख्याच असावी. डोक्याला तेल लावायचे तर ते हि थोडे थोडे तीन पाच सात वेळा वगैरे. याचे कारण असे कि जर मूळ संख्या नसेल तर ती संख्या विभागू शकते. म्हणजे केलेल्या कामाचे भाग होतील व ते विभागेल व त्याची शकले होतील असे काहीसे मनात येते.
बाळंतीणीने पडवळाची भाजी खाऊ
बाळंतीणीने पडवळाची भाजी खाऊ नये. ज्या घरी बाळंतीण असेल तिथे पडवळ शिजवु नये.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कारण पोटातलं होतं.
आता 'पोटातलं काय?' असं विचारलं तर, 'काय माहित असतं काहीतरी. पोटातलं असंच म्हणतात'
उंबर्यावर शिंकू नये. (कारण
उंबर्यावर शिंकू नये. (कारण माहिती नाही) >>> शिंकण्याचा आवेग इतका जोरात असतो, की दरवाजाला किंवा चौकटीला आपलं डोकं धडकू शकत म्हणून. (असा माझा कयास आहे)
सापसुरळी = सापाची मावशी.
मूळ संख्या नसेल तर ती संख्या
मूळ संख्या नसेल तर ती संख्या विभागू शकते
>> लोल. मूळ संख्या विभागू शकतच की. फक्त equal नाही. आता 19 जमा केले बँकेत, घेणारे 10 ,9 असे वाटून घेऊ शकतात. अशी बरीच कॉम्बि आहेत.
पण मस्तय अंधश्रद्धा ☺️
मी पाहिलेल्या चिनी लोकाच्या
मी पाहिलेल्या चिनी लोकाच्या अंधश्रद्धा...
१> पोर्णिमेला अमावसेला रात्री घरी लवकर जाणे, ह्या दिवशी काही शुभ कार्याची सुरवात न करणे. (यात फक्त कोजागिरी पोर्णिमेचा अपवाद आहे. हा दिवस मुन केक फेस्टिवल म्हणुन साजरा करतात. )
२> चिनी कॅलेडरच्या ७व्या महिन्यात ( भारतिय कॅलेंडर प्रमाणे भाद्रपद) काही मोठे काम करायचे नाही. ह्या महिन्यात घरे विकली जात नाहीत, व्यापार सुरु केला जात नाही. हा पुर्ण महिना त्याचा साठी पितृपक्ष असतो.
३> ४ थ्या माळ्यावर घर न घेणे
४> घर, ईमारत, रस्त्याचा नंबर मध्ये ४ असल्यास ते घर न घेणे. पण तेच ८ नंबर असेल तर त्या घराला जास्त किंमत देउन घेणे.
५> संध्याकाळी ४ वाजता जर घरात सुर्यप्रकाश येत असल्यास ते घर न घेणे.
अंधश्रद्धा इतक्या खोलवर
अंधश्रद्धा इतक्या खोलवर गेलेल्या असतात ना की आपली लोकं त्याचं अंधानुकरण करतात आणि जर असं का विचारलं की ," तसंच असतं ते" , "अधिपासून असंच होतं." अशी उत्तरं मिळतात...
जसं मी विचारलेलं आजीला आणि मम्मी ला की मधल्या बोटात अंगठी का घालायची नसते... तर म्हणे चांगलं नसतं ते नाही घालावी
चप्पल उलटी ठेवलीअसेल तर भांडण
चप्पल उलटी ठेवलीअसेल तर भांडण होत
कैची शी काम नसताना खेळत बसले तरी भांडने होतात,
केरसुणी कोपरयात उभी ठेवली तर भांडने होतात
मधल्या बोटात अंगठी नही घालत
मधल्या बोटात अंगठी नही घालत कारण त्यावर शनि का प्रभाव असतो, अस मला ही सांगितलं होत
मधल्या बोटात अंगठी नही घालत
मधल्या बोटात अंगठी नही घालत कारण त्यावर शनि चा प्रभाव असतो, अस मला ही सांगितलं होत
Pages