Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उलटी कशी थांबवू शकतो कोणी?
उलटी कशी थांबवू शकतो कोणी? काहीहि चाललयं पुरेआचं
अरे त्या आस्ताद ला आवरा
अरे त्या आस्ताद ला आवरा कुणीतरी,चावतोय नुसता मघपासून
ती ढापणी बाई कोण आहे ? काल पण
ती ढापणी बाई कोण आहे ? काल पण आली होती सुमो बरोबर. किती वचावचा करत आहे कंटेस्टंट असल्यासारखी. काळेबाई शराला हळू आवाजात बोल म्हणत आहे स्वतः किती आरडाओरडा करत असतो. एकदम माजोरडा आहे तो, सगळ्यात होपलेस व्यक्ती घरातली. पुष्की न सै पण डोक्यात जात आहे.
ढापणी बाई कोण आहे >>>आतिशा
ढापणी बाई कोण आहे >>>आतिशा नाईक
आज अतिप्रचंड पीळदार एपिसोड होता. टीव्ही मधूनच चक्क म्यूट केला.
धन्यवाद ऑर्किड
धन्यवाद ऑर्किड
आपला तो बाब्या अन दुसऱ्या चे
आपला तो बाब्या अन दुसऱ्या चे ते कारटे या म्हणीचा अर्थ इथले काही प्रतिसाद बघून कळतो ☺️
लोकहो काल मेघा अन शराने हेच केले होते की, सईचे पोट खराब आहे माहीत असूनही शराने मुद्दाम तिला अडवून ठेवले , तेच मेघाने केले , पुष्कर ला खूप पाणी पाजले अन त्याला ही जाऊ दिले नाही. मग बायांनो आज का बरे इतक्या चिडताहात.
मेघा , प्रचंड चिडकी अन रडी ने खेळते. पण पुष्कर ने मस्त गेम केला तिचा, बोलायला न देऊन. मेघा या आधीही कधीच फेअर गेम खेळली नाही, पण आता खूप बोरिंग वाटते. शरा पण किती इरिटेट करते,, यावेळी जायला हवी ती
सगळ्यात बेस्ट, स्मिता, करायचा न टाइमपास अन सांगायची एखादी संख्या, अन जर रेशम बोलली की चूक तर मग तिलाच विचाराचे . पण ही आपली अगदी प्रामाणिकपणे मोजतीये पक्षी
सई आणि राधिका सुभेदार
सई आणि राधिका सुभेदार यांच्यात दिसलेलं साम्य.... चिडून बोलतात तेव्हा दात-ओठ खात आणि तोंड वाकडं करत बोलतात. अगदी बघवत नाही असं तोंड करतात.
Vb पूर्ण पोस्ट मस्त...आपला
Vb पूर्ण पोस्ट मस्त...आपला बाब्या तर भारीच...
अनिष्का.☺️
अनिष्का.☺️
अग , मला खूप आश्चर्य वाटते की लोक एका शो ला किती पर्सनली घेतात. त्यातील कलाकारांच्या बाजूने असे तावातावाने भांडतात की जणू त्यांनी यांना पगारावर घेतलंय.
कृपया कोणी राग मानू नये कारण हे फक्त इथेच नाहीतर सगळीकडे होतेय, अन सगळ्याचीच गंम्मत वाटते
आज फारच कलकलाट होता.... मंडई
आज फारच कलकलाट होता.... मंडई भरवली नुसती!
आणि गम्मत म्हणजे मेघा म्युट असून सुद्धा इतका आवाज होता!
केव्हढे ते प्लॅनिंग त्या आस्तादचे... प्राणी मोजा काय, पक्षी मोजा काय?.... अरे राजा, सासु सुनेचा टास्क आहे.... जरातरी थीमनुसार कामे निवडा
सगळ्यात आरडाओरडा करणारा माणूस बाकीच्यांना हळू आवाजात बोला म्हणून दमदाटी करत असतो..... त्याला एकदा पिळला पाहिजेल ममांनी यावरुन!
मग जरा लायनीवर येइल!
आज जेंव्हा सईने मेघाला विचारले की माझ्यामध्ये आणि शरामध्ये तु कुणाला निवडशील? तेंव्हा मेघानेही प्रतिप्रश्न करायला पाहिजेल होता की माझ्या आणि पुष्कीमध्ये कुणाला निवडशील?.... मजा आली असती सईचे उत्तर ऐकायला!
त्याला एकदा पिळला पाहिजेल
त्याला एकदा पिळला पाहिजेल ममांनी यावरुन!
मग जरा लायनीवर येइल!>> शक्य नाही ते.
Vb हो खरं आहे. लोक स्मोक
Vb हो खरं आहे. लोक स्मोक करतात तर करू दे की....त्यांना त्रास होईल...किंवा तिचं थोबाड वाकडं च आहे किंवा असं च आहे असं का बरं कोणाला बोलावं... त्यांना पैसे तरी मिळतात आपल्याला काय मिळतं??? शिवाय मेघा किती पण चिडकी आहे... मला गेले काही दिवस डोक्यात जातेय ती.... काल चा एपी मी पहिला नाही...पण इथे वाचून असं वाटतंय की पुष्की ला लोक इकडे शिव्या देतात तेच मेघा ने ही केलं...त्याला सु ला नाही जाऊ दिले किंवा सई ला नाही जाऊ दिले....मग इतका आरडाओरडा का करतात.... बघा एपी आणि सोडून द्या...एखाद्याच्या शरीरावर, चेहऱ्यावर, पैश्यावर पर्सनल कमेंट का कराव्यात....असाही शो scripted आहे .... मेघा खोटं खूप बोलते... मी असे लोक बघितलेत की आता एक बोलतील मग मी असं बोले नाही, मी हे केलं नाही करत बसतील...मुळीच एक्सेप्ट नाही करत चूक....मला खरं च मेघा आवडायची आधी खूप..पण तिचा खोटारडेपणा डोक्यात जातोय...
आज जेंव्हा सईने मेघाला
आज जेंव्हा सईने मेघाला विचारले की माझ्यामध्ये आणि शरामध्ये तु कुणाला निवडशील? तेंव्हा मेघानेही प्रतिप्रश्न करायला पाहिजेल होता की माझ्या आणि पुष्कीमध्ये कुणाला निवडशील?.... मजा आली असती सईचे उत्तर ऐकायला!-------------– ती पुष्की ला च निवडेल..... तसं ही ती मेघा च्या खूप विरोधात गेलीय...
त्याला एकदा पिळला पाहिजेल
त्याला एकदा पिळला पाहिजेल ममांनी यावरुन!
मग जरा लायनीवर येइल!>> शक्य नाही ते.>>>> खरंय. कारण ममांसुद्धा बर्याच वेळा त्याच पट्टीत बोलतात. प्लस रे गृप फॅक्टर.
आज जेंव्हा सईने मेघाला
आज जेंव्हा सईने मेघाला विचारले की माझ्यामध्ये आणि शरामध्ये तु कुणाला निवडशील? तेंव्हा मेघानेही प्रतिप्रश्न करायला पाहिजेल होता की माझ्या आणि पुष्कीमध्ये कुणाला निवडशील?.... मजा आली असती सईचे उत्तर ऐकायला!>>>> मेघाला उत्तर माहीती आहे.
काल बादली पुर्ण न भरता पण
काल बादली पुर्ण न भरता पण फुसक्याला diamond दिला.फुस्क्या राग काढतोय.आस्त्याला रे ची सवय लागली तोंड वाकडं करायचीं.स्मिताला पण तिच्या ग्रुपमधुन दणका बसू शकतो असं दिसतंय.मेघाने पण सई आणि शरामध्ये शरा लाच support करावा.ही आतिशा (हाणी) ढापणी बाई स्वत:च bb contestant असल्याप्रमाणे वागतेय.रे ने सुमोचे म्हणनं चांगलंच मनावर घेतलंय कित्ती ते फुटेजसाठी मध्ये मध्ये नाक खुपसणे.रात्रभर विचार करुन आ सगळ्यांना plan सांगत होता आणि तोच रे ने स्मि ला दिला.आ चे चमचेच वाटले सगळे.
Vb हो खरं आहे. लोक स्मोक
लोक स्मोक करतात तर करू दे की....त्यांना त्रास होईल...किंवा तिचं थोबाड वाकडं च आहे किंवा असं च आहे असं का बरं कोणाला बोलावं... त्यांना पैसे तरी मिळतात आपल्याला काय मिळतं??? शिवाय मेघा किती पण चिडकी आहे... मला गेले काही दिवस डोक्यात जातेय ती.... काल चा एपी मी पहिला नाही...पण इथे वाचून असं वाटतंय की पुष्की ला लोक इकडे शिव्या देतात तेच मेघा ने ही केलं...त्याला सु ला नाही जाऊ दिले किंवा सई ला नाही जाऊ दिले....मग इतका आरडाओरडा का करतात.... बघा एपी आणि सोडून द्या...एखाद्याच्या शरीरावर, चेहऱ्यावर, पैश्यावर पर्सनल कमेंट का कराव्यात....असाही शो scripted आहे .... मेघा खोटं खूप बोलते... मी असे लोक बघितलेत की आता एक बोलतील मग मी असं बोले नाही, मी हे केलं नाही करत बसतील...मुळीच एक्सेप्ट नाही करत चूक....मला खरं च मेघा आवडायची आधी खूप..पण तिचा खोटारडेपणा डोक्यात जातोय...................>>>>> प्रचंड सहमत.
किती तो कलकलाट. मेघा जिंकली
किती तो कलकलाट. मेघा जिंकली आहे वाटतं. जिगरा पाहिजे जिगरा हे परत परत दाखवताहेत. कोणती सासू ही असली कामं सांगते, काहीही बोर करताहेत. रेशम आणि आस्तादची मजल कळली. आस्ताद टीमला प्लॅन सांगत होता तेव्हा किती कौतुकाने बघत होते सई, रेशम आणि पु. एकानेही म्हटलं नाही की हे काय येड्यासारखं काहीही आणि म्हणे तिस-या चुकीनंतर दुसरा टास्क. सासवा अशा बोलतात का की हे तीनवेळा करून बघ आणि जमलं नाही तर दुसरं काम कर. आस्तादला का नाही कुणी सांगत की तू पहिले तुझा आवाज कमी कर. बायकांनी त्याच्यापुढे आवाज चढवलेला त्याला सहन होत नाही हे पूर्वीही दिसून आलंय. भाग्यश्री मालिकेत आवडत नाही पण यात आवडली. मेकप खूप जास्त करून आली होती पण आज. अतिशा छान दिसत होती. तिला बघायला आवडेल बीबाॅमध्ये स्पर्धक म्हणून. तो चोरलेला हिरा दिला का परत. शर्मिष्ठाला काही शब्द बोलता येत नाहीत नीट हे बाकीच्यांना माहित असेल आणि वेलचीची अॅलर्जी, बिचारी. मेघाच यांच्या दादागिरीला पुरून ऊरू शकते. मला वाटलं स्मिता आता सगळं सांगून टाकणार रेशमला गेममध्ये काय काय करायचं ठरलंय ते पण नाही सांगितलं. उद्याही हाच गोंधळ असेल अर्धा वेळ.
>> ती पुष्की ला च निवडेल
>> ती पुष्की ला च निवडेल
हो पण तस तिला मेघाच्या तोंडावर म्हणण जड गेले असते आणि जर तिने मेघाचे नाव घेउन नंतर पुष्कीला निवडले असते तर मेघाला बोलायला पॉइंट मिळाला असता!
मला ते हिरे प्रकरण कळलं नाही
मला ते हिरे प्रकरण कळलं नाही नीट कदाचित मी काल पाहिलं नसल्यामुळे असेल...आणि आज पण सगळे एक च वेळेस बोलत होते....बरोबर नव्हता आज चा एपी...
इकडे जे जे डिस्कशन होतात ते लगेच शनिवार च्या एपी मध्ये दाखवले जातात... bb टीम चे कोणी वाचतेय वाटते इथले....
आस्तादचं planning छान होतं
आस्तादचं planning छान होतं एकंदरीत.
पण जसं काल toilet ला जाऊ नाही दिलं हे चूक होतं तसं उलटी करू नको हे सांगणे पण चूक होतं. दोन्हीकडून खालच्या levelला जातायेत. आज खूप कलकलाट होता मात्र.
स्मिता बिचारी काही न करता आता सर्वांच्या डोळ्यात येतेय, तिच्या टीमच्याही. आ रे उगाच संशय, आ बोलायचाच स्मिताला आता रे पण विरुद्ध.
सगळ्यात बेस्ट, स्मिता, करायचा न टाइमपास अन सांगायची एखादी संख्या, अन जर रेशम बोलली की चूक तर मग तिलाच विचाराचे . पण ही आपली अगदी प्रामाणिकपणे मोजतीये पक्षी >>> हे भारी. एवढा विचार कुठे करते ती.
हिरे मिळवणे वैयक्तिक लाभ पण
अनिष्का, हिरे जास्त मिळवणे वैयक्तिक लाभ पण कालच्या आधीच्या वेळेपेक्षा जास्त जणांना आऊट करणे हा सामुहिक लाभ.
जिंकलेल्या टीममधून जास्त कॅप्टन्सीचे उमेदवार असतात ना तिथे हिरे जास्त कोणाकडे आहेत ते दोघे असतील आणि हरलेल्या टीम मधून एक असेल.
उलटी करू न देणे हे जीवावर
उलटी करू न देणे हे जीवावर बेतू शकते, हे कोणीच बोलले नाही. ती अमृता घाडगे आलेली तिने तो point मांडायला हवा होता. अर्थात काल toilet ला जाऊ न देणं हेही मला फार चुकीचं वाटलेलं, काल ते अतिशाने बोलायला हवं होतं.
Smita is too good to be in
Smita is too good to be in big boss. तिथे थोडे कंनिंग , चॅप्टर , पॉलिटिकली करेक्ट बोलणारे लोकं लागतात . >>> हम्म खरं आहे.
Ok anju got it thanks dear
Ok anju got it thanks dear
उलटी करू न देणे हे जीवावर
उलटी करू न देणे हे जीवावर बेतू शकते, हे कोणीच बोलले नाही. ती अमृता घाडगे आलेली तिने तो point मांडायला हवा होता. अर्थात काल toilet ला जाऊ न देणं हेही मला फार चुकीचं वाटलेलं, काल ते अतिशाने बोलायला हवं होतं.
>>>
तुम्ही खरच अशा सासवा बघितल्या नाही आहेत का?
मला त्यात काही चुकीचं नाही वाटलं, 'जाच' करणं हे टास्क होतं आणि ते सासवा करत होत्या आणि तुम्ही क्विट करा आणि काय करायचंय ते करा हा ऑप्शन होताच की
उलटी मात्र रोखता येत नाही, कोणासाठी होतं टास्क माहीत नाही, त्याने/ तीने त्या जागीच उलटी करायला हवी होती...
बिबॉ ने कोणाला तरी साफ करायला पाठवलं असतंच , शिवाय ज्याने/ जीने टास्क दिला तिला ओरडा पण पडला असता.
शी, शु बरीच आधी पासुन लागते सो आपल्याला कंट्रोल करायचंय का गिव्ह अप हे आपल्या हातात असतं
रिया पुष्करने मेघाला दिलेला.
रिया पुष्करने मेघाला दिलेला. उलटी रोखणे कठीण आहेना, पण काल तिनेही खूप वेळ त्याला toiletला जाऊ दिले नव्हतं. समहाऊ दोन्ही नाही आवडले. गेम होता म्हणा पण माझं माणुसकी thinking आड येतं .
कम्पेअरली उलटी रोखू शकत नाही हे बरोबर. केल्या उलट्या मेघाने.
अंजूतै, स्मिता अशीच उगाच
अंजूतै, स्मिता अशीच उगाच माणुसकी दाखवायला जाते आणि मागे पडते.
प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं
मेघाला का म्हणे उलट्या होतायेत
मेघाला उलट्या, सईला जुलाब.. पाणी खराब येतंय का काय घरात?
आणि सासरे कधीच सुनेला जाच करत नाहीत, पुष्करने कसं प्रेमाने वागवायला हवं होतं बरं सुनेला
मेघाला बहुतेक दुधाची allergy
मेघाला बहुतेक दुधाची allergy असावी. सई दर रविवार सोमवारी आजारी पडते या ना त्या कारणाने.
स्मितावर आता टीममधले ( taskवाली टीम नाही, grp तिचा आ रे ) पण संशय घेतायेत. तिची अवस्था वाईट.
सासू सारख्या थिकिंगने कोणी
सासू सारख्या थिकिंगने कोणी फार विचार नाही असं दिसतय, काहीही टास्क आलं तरी सगळ्यांची गाडी टॉर्चर-सरेंडर प्रकारात शिरते, थीम रिलेटेड काहीच नाही.
पुष्करला किंवा आस्तादला सोवळं नेसून स्वयंपाक करायला लावयला हवा होता १० लोकांचा, पुरणपोळी पंचपक्वन्न , पोळीभाजी टाइप, नक्की क्विट केलं असतं यापेक्षा लवकर , एखाद्या नास्तिक स्पर्धकाला दिवसरात्र पूजापाठ मंत्रपठण करणारी , स्तोत्रं म्हणणारी सूनबाई बनवायच, ज्याल्स स्तोत्रं पाठ नाही त्यांनी गिव्हपच केलं असतं !
पण इथे पक्षी मोजणे काय, पाणी/ताक्/दूध भलतच काहीतरी, खेळणी टास्क मधेही काहीच थीमशी संबंध नव्हता, इथेही तेच !
उषा नाडकर्णींची आयकॉनिक सासु या टास्कला हवी होती.
Pages