तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी मी आजोळी म्हणजे पुण्यात आल्यावर मामाला विविधभारती वर हिंदी गाणी ऐकत देव पुजा करताना पाहिले त्याचा मला कल्चरल शॉक बसला होता. तस तर पुण हाच माझ्यासाठी कल्चरल शॉक होता.

रच्याकने, पैठणीची सोफा कव्हर्स जरूर करा, पण त्या आधी साडीचे कव्हर्स करायला किती खर्च येईल आणि नंतर ती मेन्टेन करायचा, ड्रायक्लीन करायचा खर्च किती याचाही अंदाज घ्या, त्यानेच बर्‍यापैकी शॉक बसू शकतो Proud

माझ्या मैत्रिणीने तिच्या लग्नाच्या साड्यात एक काळी पैठणी घेतली होती ते पाहून मला जाम शॉक बसला होता. तेव्हा लग्नाकार्यात काळ्या साड्या नेसणं म्हणजे शांतं पापम. माझ्याकडे मी असं काही नुसतं बोलले असते तरी आजीने तोंड बंद केलं असतं माझं. मला तिच्या आई-आजीचं जाम कौतुक वाटलं होतं परवानगी दिल्याबद्दल आणि तिचा हेवा वाटला होता. असो. अखेर सामाजिक दबावापुढे ती झुकलीच. लग्नात आणि लग्नविधींना ती साडी नेसलीच नाही तिने, आई-आजी नाही, तर इतरच ज्ये ना मध्येमध्ये करतात अशावेळी त्यांनी कोणीतरी खोडा घातला!

घाटपांडे तुम्ही एक अट्टल पुणेकर असाल असे वाटले होते पण तुम्हीबी पौडाचे पावणेच निघाले Happy

पूनम,
नवर्‍यामुलाला काळी पँट्/बूट्/बेल्ट लग्नात घालू देत नाहीत तिथे काळी पैठणी म्हणजे बाबो!! Happy

१९८५ मध्ये मी एका नातेवाईकाच्या लग्नकार्याकरिता दूर्गम भागातील एका खेडेगावी गेलो होतो. पत्रात लिहिल्याप्रमाणे एसटी थेटपर्यंत पोचणार नसल्याने एका फाट्यावर उतरलो. आणायला गाडी पाठवतो असेही लिहिले होते. त्या काळात गाडी म्हणजे चैनच. त्यामुळे उत्सुकतेने वाट पाहत होतो. थोड्या वेळाने त्यांचा गडी बैलगाडी घेऊन आला. मोठाच धक्का होता. पाच मैल लांब असलेल्या गावी पोचेपर्यंत शरीराच्या प्रत्येक हाडाला धक्का बसला.

मी शाळेतल्या मित्रांना पुण्यात इंग्रज अजून शिल्लक आहेत व मी स्वतः ते पाहिले असल्याचे सांगितले होते. इतिहासाच्या पुस्तकात इंग्रजाचे चित्र असलेला फोटो पाहिला होता तसा गोरा, घारा, काळी पँट पांधरा शर्ट इन केलेला , डोक्यावर जनरल डायरची हॅट , पँट सायकल मधे अडकू नये म्हणून लावलेली स्टीलची क्लिप असा माणूस मी सायकलवर जाताना पाहिला होता. पुढच्या वेळी एकदा पुण्यात आलो तेव्हा तशा माणसाला चक्क मराठी बोलताना पाहिले होते तो एक मला शॉक होता.

आमच्या शेजारच्या काकूंची सून ब्राऊन कुरळे केस आणि थोडे परदेशी चेहरेपट्टी यामुले सेलेस्ते (https://www.imdb.com/title/tt0199197/) सिरीयल मधल्या नायिकेसारखी दिसायची.तेव्हा अमच्या एरियात तशी ती एकटीच होती.
नंतर पुण्यात आल्यावर हेअर कलर ची/निसर्गाची किमया असल्याने तश्या दिसणार्‍या अनेक मुली बाया पाहिल्या आणि आता खरे परदेशी आले/हॉटेलात स्विमींग कॉस्च्युम मध्ये दिसले तरी आपण मख्खपणे समोरुन निघून जातो.

जपान मधे बर्‍याच बाबतीत कल्चरल शॉक बसला होता.
१) एखादा पता विचारला की वाट वाकडी करून बरोबर येउन दाखवतात ( ट्रेन अन सबवे चे एक्झिट्स अन तत्सम )
२) पिक टाइमला सबवे मधे माणसं ( अक्षरशः )कोंबायला एक माणूस असतो . तसच कितीही गर्दीच्या वेळी उतरणारे अन चढणारे यांची चेंगरा चेंगरी नसते.
३) ऑफिस मधे बायकाना दुय्यम वागणूक मिळते. Uhoh
४) मोठी माणसं प्रवासात कॉमिक्स वाचत असतात. ( मी ती मंगा बूक्स आधी पाहिली नव्हती कधी )
५) शिंतो मंदिरात देवासमोर , कोक , बीअर चे कॅन्स ठेवलेले असत.
६) अजिबात दंगा अन रडारड करणाअरी लहान मुल.

घाटपांड्यांचा इंग्रज भारी आहे की!! Biggrin

मी पण असाच अगदी पहिलीत वगैरे आजोळी पुण्यात आलो होतो. माझा मामेभाऊ मला घेऊन मंडईत गेला होता. तिथे एक जण जमिनीवर अथरलेल्या कापडावर उसाच्या बारक्या कांडक्या विकत होता. ऊस असा विकतात हा मला कल्चरल शॉकच होता.
आणि "ऊस कसा दिला टन" असं विचारून मी त्याला शॉक दिला होता.

टन Lol
जंगली महाराज रस्त्यावरच्या शिवसागरमध्ये रात्री ११ वाजता गेल्यावरसुद्धा वेटिंग आहे हे पाहून शॉक बसला होता.

आणी भर गर्दीत , चुलत भाऊ व बहीण न आल्याने आता मी जाते असे सांगुन शिवसागरच्या वेटरला कल्चरल शॉक दिला होता. Biggrin कारण १५ वर्षापूर्वी माझ्याकडे मोबाईल नव्हता, ( फोन करायला ) आणी टेबल अडवुन भावाची वाट बघुन मी कंटाळुन हॉटेल सोडले. वेटरचा चेहेरा बघण्यालायक झाला होता.

या वर्षीच्या रामनवमी ला मिरवणूकीची सुरवात Michael Jackson च्या Dangerous गाण्यानी झाली ! पुढे हिंदी गाण्यांचा धुमाकुळ होताच...मी आणि माझी मैत्रीण शॉक झालो ते बघून... रामाचा अवाढव्य पुतळा six-packs दाखवत होता
हे सगळे पुण्यात शनीपाराच्या रस्त्यावर घडले

मस्त आहे हा धागा !!

मला बसलेले क्ल्चरल शॉक

१. २००३ मध्ये पहिल्यांदाच युरोप मधे गेलो होतो. ब्रुसेल्स ते पॅरीस ट्रेन चं तिकिट होतं. आम्ही स्टेशन वर वेळेच्या आधी १० मिनिटे पोहोचलो. तिकडे एक गाडी लागलेली होती. आमचं तिकिट ८.१० मिनीटांचं होतं. तेंव्हा ०८.०५ झाले होते. आम्ही ती आमचीच गाडी समजुन त्यात बसलो. तर समजले की ही गाडी आधीची होती. आमच्या सिट्स वर दोन मुलांचा क्लेम होता. पण आम्हाला बसलेले बघुन ते दोघे शांत पणे शेजारच्या डब्यात जाउन बसले. आर्थात त्यानी रेल्वे अटेंडंट ची परवानगी घेतली. आम्हाला पत्ताच नाही, की आम्ही आधीची ट्रेन पकडली आहे. उतरताना तो ट्रेन अटेंडंट त्याच्या मोडक्या इंग्लीश मधे आम्हाला तसं म्हणाला. पण कोणी मध्ल्या स्टेशन ला उतरवुन नाही दिलं. आपल्याला येवढ्य टाईम टु टाईम गाड्यान्ची सवय नसते. तिकडे अगदी क्षाणा चा हिशोब!!!

२. आम्ही एकदा अ‍ॅम्स्टर्डॅम ला एका हॉटेल मधे राहिलो होतो. रात्री उशीरा चेक इन केलं. बघीतलं तर बेडशीट वर डाग होता. आम्ही रीसेप्शन वर तक्रार केली. पण अत्ता हाउस किपिंग मध्ये कोणी नाही उद्या पाहु असे उत्तर मिळाले. जरा राग आला. मग त्या भागात सरळ टॉवेल टाकुन झोपलो. सकाळी ९ वाजता निघायचे होते. म्हणुन आवरुन खाली आलो. ब्रेकफास्ट करुन, बील द्यायला गेलो. हॉटेल चा मालक होता. त्याला ही घटना सांगीतली. त्याने एकही क्षण न घालवता बील फाडुन टाकले व आम्ही आधी भरलेली रक्क्म आम्हाला परत केली. आणि फार इंग्लिश येत नसुनही १०० वेळा सॉरी म्हणाला.

३. जपान मधली टॉयलेट्स हा एका लेखाचा विशय आहे. त्यात सगळं बटणांनी ऑपरेट होतं. परत थंड, गरम, मेल, फीमेल असे अनेक ऑप्शन्स असतात. बाय्का व पुरुषां साठी बरोब्बर जागे वर पाणी येतं. ( हा हा हा)....

हे असे अनेक आहेत.... वरचे वानगी दाखल.....

अखेर सामाजिक दबावापुढे ती झुकलीच. लग्नात आणि लग्नविधींना ती साडी नेसलीच नाही तिने, आई-आजी नाही, तर इतरच ज्ये ना मध्येमध्ये करतात अशावेळी त्यांनी कोणीतरी खोडा घातला!
<<
पहिल्या संक्रांतसणाला म्हणून घाल असं सांगून समजूत काढली असेल.

***

बादवे शिवसागर हे अत्यंत ओव्हर हाइप्ड रेस्टौरंट आहे.
<<
असल्या बर्‍याच ओव्हरहाईप्ड मस्तान्या आहेत पुण्यात, पण अमुक गोष्ट ओव्हरहाईप्ड आहे, असं पुणेकरांना सांगणं हा त्यांच्याकरता एक भल्ला मोठ्ठा कल्चरल शॉकच असतो. Lol

***

या वर्षीच्या रामनवमी ला मिरवणूकीची सुरवात Michael Jackson च्या Dangerous गाण्यानी झाली ! पुढे हिंदी गाण्यांचा धुमाकुळ होताच...मी आणि माझी मैत्रीण शॉक झालो ते बघून... रामाचा अवाढव्य पुतळा six-packs दाखवत होता
हे सगळे पुण्यात शनीपाराच्या रस्त्यावर घडले
<<
रामनवमीला मिरवणूक निघते, हाच मोठा कल्चरल शॉक आहे माझ्यासाठी.

अरे इतके कंमेंट्स - आज वाचले सर्व.
माझे 2 ऍड करतो -
1. अमेरिकेतील ड्राईव्ह थ्रू सर्विस - मी चकित झालो होतो.
2.ऑटोमॅटिक कार वॉश

स्थळ कर्नाटक
कार्यालयात असताना एका मित्राचा फोन आलेला, नवीन आलेल्या ज्युनिअर shadow करत होत्या, त्यांना थोडं शिकवायचं पण होतं. मित्राला मी म्हटलो "तुला नंतर कॉल करतो" त्याला ऐकू येईना म्हणून अजून दोन तीनदा तेच वाक्य बोलून फोन ठेवला. एव्हाना त्या juniors गालातल्या गालात मिश्किल हसत होत्या, मी विचारलं काय झालं दात काढायला तर अजूनच खसखस करत होत्या.
शेवटी मागे बसलेल्या एका colleague ने त्या पोरी गेल्यावर कन्नड मध्ये "तुला" म्हणजे काय ते समजावलं. त्यानंतर कधीच ऑफिसात फोन वर मराठी बोललो नाही.

तुला म्हणजे योनी. मी थोडा मोठ्याने बोलत असेल म्हणून जास्तच खुसफूस झाली,

शिवाय कालच एक तेलगू दुसऱ्याला चुम्मा चुम्मा काहीतरी म्हणत होता, अर्थ समजला नाही, पण यावेळी मी जोरात हसलो.

ऑफिसचा दुसराच दिवस, आमच्या ऑफिसात तेलगू जास्त आहेत, हा पहिला धक्का (जवळपास नव्वद टक्के).
तर, दुसराच दिवस, आणि एक मुलगा दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या मुलीला हाताने इशारा करत रंडी रंडी म्हणत होता, मुलगी काहीही react न करता गेली. आमच्या डोक्यात किडा घुसला, हे काय चाललंय! तिसऱ्या दिवशी असाच किस्सा पुन्हा घडला. मग एका हिंदी भाषिकाला बोललो याबद्दल तेव्हा समजलं रंडी म्हणजे इकडे ये!

हा..... असले ट्रीकी शब्द असतात.
नॉर्थ मध्ये पुच्ची म्हणजे पप्पी.
पुच्ची दो बेटू असे लहान बाळाला म्हणणे खुप कॉमन आहे.

आमच्याकडे वेंगुर्ला, सावंतवाडी भागात साखरपुड्याला नवर्यामुलीला दीर अंगठी घालतो.

कल्चरल शॉक बसला का?

प्रतिज्ञा जी बसला शॉक.
माझ्याबरोबर एक साऊथ चा मुलगा आहे त्याने साऊथ ला मामा भाचीशी लग्न करतो हे सांगितल्यावर मोठा शॉक बसला होता.
अजून नॉर्थ च्या मित्राला मी आम्ही मामाच्या मुलीशी लग्न करतो सांगितल्यावर त्याला मोठा शॉक बसला होता. जसा मला मामा भाचीच लग्न एकूण बसला.

अमेरिकेत अगदी सढळ हाताने टिप दिली जाते हे बघुनही जरा शॉकच बसला होता.
अगदी सुरुवातीला जॉब सुरु केलेला तेव्हा एका अमेरिकन कलीग बरोबर शहरा बाहेर कामासाठी जायचा योग आला. आम्ही हॉटेल्/कार वैगरे एकत्रच बूक केलं. म्हणजे तशी तिनेच रेक्वेस्ट केली. माझ्या कडे क्रेडीट कार्ड वर सध्या पैसे नाहीयेत म्हणुन तुच बुक कर अस तिने मला सांगितल. विचित्र वाटल पण केलं. आमच्या १ वीक च्या स्टे मधे तिने तिच्या बद्दल बरच काही सांगितले. तिच्या एक्स बॉय फ्रेड ने कस तिला पैश्याने फसवल तिचा क्रेडीट स्कोर कसा मेस अप केला वैगरे. एकदा तर तिने माझ्या समोर ईलेक्ट्रिक कंपणी शी २ तास फोन वर बोलुन तिने पैसे न भरल्यामुळे कट केलेले कनेक्शन परत कनेक्ट करुन घेतले होते. हे सगळ तिची आर्थिक परीस्थिती तळाला पोचली होती हे कळावे म्हणुन सांगतेय. परत घरी निघतांना तिने आठवणीने २/३ जणांना( क्लिनींग स्टाफ ई.) टिप दिली अगदी १०० डॉलर च्या नोटां मधे. तेच तिने प्रत्येक वेळी रेस्टॉरंट मधे पण केले.

ब्राझिलमधे असताना माझ्यामुळे आमच्या ह्यांना शॉक बसला होता.
एका नातेवाईकाच्या लग्नासाठी त्या एकट्याच १५ दिवस भारतात आल्या होत्या. मी तिकडे एकटाच. त्या परतल्यावर शेजारच्या बंगल्यातल्या दोन आज्यांनी आमच्या ह्यांना सांगितल,
"तुझा नवरा किती चांगला आहे ग, तू नसताना एकटाच रहात होता. वेळेवर यायचा, कुणाला घरी आणल नाही आणि एकदाही रात्री बाहेर राहिला नाही." Happy

बाप रे! त्या आज्या आपल्या पाळतीवर होत्या हे तुम्हाला माहीत होते काय! एखाद रात्र स्नेह्यांकडे घालवली असती तर काय रिपोर्ट गेला असता Happy

Pages