चांगले आणि खातरजमा केलेले उपयुक्त फॉर्वर्डस

Submitted by अतुल. on 22 June, 2018 - 02:31

मायबोलीवर भोंदू फॉर्वर्डस असा एक धागा आहेच. त्याच धर्तीवर, पण हा उपयुक्त असणाऱ्या फॉर्वर्डस साठीचा धागा.

सोशल मीडियामध्ये खोटे व दिशाभूल करणारे मेसेजेस जसे असतात तसेच अनेकदा आपल्याला उपयुक्त माहिती असणारे मेसेजेस पण वाचावयास मिळतात. खातरजमा करून ते मेसेज इथे शेअर केल्यास इतरांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते खातरजमा केलेले असावेत. त्यासाठी आधी आपण स्वत:हून खात्री करून संबंधित बातमीची अथवा विकिपीडियावरची अथवा तत्सम विश्वासू संकेतस्थळची लिंक द्यावी हि विनंती.

पण कृपया चांगल्या वा उपयुक्त माहिती व्यतिरिक्त अन्य Meme टाईपचे मेसेजेस (राजकीय अजेंडे, जाहिराती, विनोद, तत्त्वज्ञान, शुभेच्छा, ललित, परीक्षण, समीक्षण, आर्टवर्क इत्यादी इत्यादी) कृपया नकोत.

चांगली तसेच उपयुक्त माहिती केवळ आपल्यापाशीच का ठेवायची? Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडवट दुधीभोपळा/काकडी/कलिंगड खाताय? सावधान...

कालच पुण्यात एका निरोगी महिलेचा केवळ कडवट दुधीभोपळा खाल्ल्याने मृत्यू झाला. नियमित व्यायाम करणाऱ्या गौरी शहा या व्यवसायाने संगणक अभियंता असलेल्या पुण्यातील महिलेने व्यायामानंतर दुधी भोपळ्याचा रस घेतला. रस पिल्यानंतर त्यांना उलट्या आणि मळमळ सुरू झाली आणि हृदयविकाराचा झटका आला. पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार असताना त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पेशंटच्या ओळखीच्या एका डॉक्टरने दिली.

बातमी: http://abpmajha.abplive.in/videos/pune-woman-s-death-linked-to-bottle-go...

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर २०१० मध्ये एक संशोधन केले होते. त्या संशोधनातून दुधी भोपळ्याचा रस पिल्याने मृत्यू होऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. या संदर्भात इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजीएमआर) या नियतकालिकामध्ये जानेवारी २०१२ मध्ये संशोधन प्रकाशित झाले आहे. दुधी भोपळा, भोपळा, काकडी, कलिंगड, टरबूज, यामध्ये 'टेट्रासायक्लिक ट्रिटरपिनाइड क्युकरबिटॅसिन' नावाचे रासायनिक मूलद्रव्य असते. त्यामुळे हे पदार्थ काहीसे तुरट, कडू लागतात. या रासायनिक मुलद्रव्यांचे विषात रूपांतर होऊ शकतो. विशेषतः या पदार्थाचा रस मोठ्या प्रमाणावर प्यायल्यास जीवाला धोका होऊ शकतो, असा संदर्भ तज्ज्ञांनी दिला आहे.

होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे घरातघरात पोहोचलेले प्रख्यात सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांना सुद्धा दोन अडीच वर्षांपूर्वी केवळ अर्धा ग्लास दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने रक्ताच्या उलट्या होऊन आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. अक्षरश: मृत्युच्या दाढेतून ते परत आले.

link: https://www.youtube.com/watch?v=WIgNhKPeBNQ

तेंव्हा आपल्या सर्व प्रियजनांना व मित्रमंडळीना हा मेसेज नक्की शेअर करा. कडवट लागणारा दुधीभोपळा/काकडी/कलिंगड अत्यंत धोकादायक असून "थोडे कडू आहे त्याला काय होतंय" म्हणून दुर्लक्ष करू नका. जीवावर बेतू शकते!

पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने *दुधी भोपळ्याच्या रसाने प्राण जाऊ शकतो का?* याविषयी
टीव्ही 9 मराठी वाहिनीने प्रश्न विचारला. काही वेळातच त्या वाहिनीवर माझे उत्तर प्रसारित होईल. त्यांना दिलेले उत्तर आपल्यासाठीही येथे सामायिक करत आहे.

घरी स्वयंपाक बनवताना काकडी किंवा दुधी भोपळा चिरताना एखादी चकती कापून तिची चव बघितली जाते. ती कडू असेल तर त्या भाजीचा आहारात शक्यतो वापर होत नाही. असे का? तर cucurbitaceae कुटुंबातील भाज्यांमध्ये असलेले cucurbitacin हे कडू चवीचे द्रव्य अत्यंत विषारी असते. याची मात्रा धोकादायक प्रमाणात असल्यास ते प्राणघातक ठरू शकते. या भाज्यांचा रस तयार केल्यावर एकाच वेळेस या द्रव्याची खूप अधिक मात्रा पोटात गेल्याने विषबाधा होते. उलटी, अतिसार, चक्कर येणे, उलटी वा शौचावाटे रक्त पडणे यांसारखी लक्षणे या विषबाधेत दिसून येतात.

*काय काळजी घ्याल?*

cucurbitacin हे विषारी द्रव्य काकडी, लाल भोपळा, दुधी भोपळा, पडवळ, तोंडली, झुकीनी इत्यादि भाज्यांत आढळते. या साऱ्याच भाज्या खाताना त्या कडू नसल्याची खात्री करून घ्यावी.

भाज्या या शक्यतो शिजवूनच खाव्यात. भाज्या व फळांचे रस काढून घेणे हेच मुळात आरोग्यासाठी योग्य नसल्याचे आयुर्वेद आणि आधुनिक आहारशास्त्रदेखील सांगते.

त्यातही रस पिणे झाल्यास बाहेर मिळणारे रस पिणे टाळावे.

घरी रस तयार करतानाही भाज्या व फळांची नैसर्गिक चव कायम असल्याची खात्री करून मगच सेवन करावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय सल्ला न घेताच भाज्यांचे रस, स्मूदीज् यांचे सरसकट सेवन करू नये. किंबहुना; वैद्यकीय सल्ल्याव्यतिरिक्त अन्य कोणीही सांगितलेल्या ‘घरगुती उपायांचे’देखील अंधानुकरण करू नये.

*डॉ. परीक्षित स. शेवडे*
(आयुर्वेदज्ञ-लेखक-व्याख्याते)

।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
0251-2863835

*अमेरिकेत वास्तव्य असलेल्या एका भारतीय महिलेचा अनुभव -*

त्यांनी त्यांच्या लहान मुलाला शाळेत घातलं होतं. परिक्षेचे दिवस जवळ आले तरी परिक्षेचं टाईम टेबल नाही, काय अभ्यास करून घ्यायचाय मुलाकडून ते कळवलं नाही.

त्या घायकुतीला येऊन शाळेतल्या टिचरला भेटल्या. टिचरने शांतपणे सांगीतलं की मुलाची परीक्षा आहे त्यात पालकांनी लक्ष घालायची गरज नाही. मुलाचा अभ्यास ही आता आमची जबाबदारी आहे. त्याला काय येतं काय नाही हे आम्ही बघू. घरी त्याचा कसलाही अभ्यास घ्यायचा नाही.

बाईंना हे ऐकून धक्काच बसला. आपल्याकडे मुलांची परीक्षा म्हणजे आई वडीलांचीच परीक्षा असते. त्यांचा क्राफ्टचा घरी करून आणण्यासाठी दिलेला प्रोजेक्ट, काढून आणायला सांगीतलेलं चित्रं हे आई वडीलच पूर्ण करून देतात. शाळांनाही ते चालतं.

पण अजून धक्का बसणं पूर्ण झालेलं नव्हतंच. परीक्षा कधी विचारल्यावर उत्तर मिळालं की त्यांच्याकडे अशी कुठलीही तारीख किंवा वेळ ठरलेली नसते. वर्ग चालू असतांना एकेका मुलाला दुस-या खोलीत घेऊन जाऊन प्रश्न विचारले जातात. त्यांचा त्यावेळी उत्तर देण्याचा मूड नसला तर परत कधीतरी त्याची परीक्षा घेतली जाते. त्याला कुठल्या विषयात उत्तरं देता येत नाहीत ते बघून त्या विषयाची आवड कशी लागेल, त्याला तो विषय कसा समजेल त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं.

हे ऐकून तर त्या बाईंची शुद्ध हरपायचीच बाकी राहीली. त्यांची तर त्यांची पण वाचतांना माझी पण.

या पुढची घटना तर आणखीनच थक्क करणारी.

काही दिवसांनी त्या बाईंनी सांगीतलं की एकदा मुलगा शाळेतून रडवेला होऊन आला. त्याला मित्रांनी चिडवलं होतं, ‘ब्राऊन’ म्हणून. आईवडीलांना पण हा धक्काच होता.

ते शाळेत गेले. टीचरला भेटले. तिने ऐकून घेतलं आणि त्यांना सांगीतलं की ही तर सुरूवात आहे त्याची जगाशी ओळख होण्याची. त्याची काहीतरी खोटी समजूत घालू नका, कणव वगैरे पण दाखवू नका. त्याला आणि तुम्हालाही ही गोष्ट फेस करायला हवीय. वर्गात काय करायचं ते मी बघते.

नंतर तिने वर्गातल्या मुलांना किंवा या मुलालाही त्या घटनेची ओळखही दाखवली नाही. त्यांना रागवली नाही किंवा याला जवळ वगैरे घेऊन समजूत पण घातली नाही… परत कधी असं झालं तरी.

नंतर उन्हाळ्यातल्या एके दिवशी तिने वर्गातल्या सगळ्या मुलांना साधे कपडे घालून यायला सांगीतलं. खेळाच्या वेळात सगळ्या मुलांना उन्हात कपडे काढून मैदानावर खेळायला लावलं.

थोड्याच वेळात मुलांची त्वचा लाल लाल व्हायला लागली. कोणाकोणाला पुरळ आलं. कोणाच्या अंगावर चट्टे उठले.

या ब्राऊन मुलाला मात्र कसलाच त्रास झाला नाही. मग त्या मुलांना वर्गात बसवून तिने जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमधलं हवामान कसं वेगवेगळं असतं आणि त्या हवामानाला साजेशी त्वचा, तिचा रंग निसर्गाने कसा तिथल्या लोकांना दिला आहे ते समजावून सांगीतलं. आणि या ब्राऊन मुलाला निसर्गानेच संरक्षण दिल्याने त्याला उन्हाचा कसा त्रास झाला नाही तेही सांगीतलं.

सगळेजण कौतुकाने आणि आदराने त्याच्याकडे बघायला लागले. त्याला सुद्धा स्वतःच्या कातडीच्या रंगाचं कौतुक वाटलं. सगळ्यांच्या नजरांनी त्याला स्वतःबद्दल खूप भारी भारी वाटलं. पुन्हा कोणी त्याला रंगावरून चिडवलं नाही.

हे ऐकल्यावर मला खरंच त्या टिचरचे पाय धरावेसे वाटले. मुलांना ती नुसतं पुस्तकी माहीती, पुस्तकी विद्या शिकवत नव्हती खरोखरच ज्ञानी करत होती. त्यांच्याही नकळत त्यांना माणूस बनवत होती.

*यालाच म्हणतात रचनावादी शिक्षण. ह्यातून आपण काहीतरी शिकणार आहोत का?*

*विचार करायला काय हरकत आहे?*
धन्यवाद

Dear All,
In need of any book(.pdf) relating to any subject/field or topic?
Go to your browser and type:
www.pdfdrive.net
You will get access to millions of  books you need, for free.
Unlimited downloads.

You may browse by title or author, etc.
Currently 274376478 books are available for free and every minute, around 50 new books are added to the database.
All downloads are free

Spread this message....

*_SOME USEFUL  WEBSITES  ONLINE EDUCATIONAL SUPPORT_*

www.khanacademy.org
www.academicearths.org
www.coursera.com
www.edx.org
www.open2study.com
www.academicjournals.org
codeacademy.org
youtube.com/education

*BOOK SITES*
www.bookboon.com
http://ebookee.org
http://sharebookfree.com
http://m.freebooks.com
www.obooko.com
www.manybooks.net
www.epubbud.com
www.bookyards.com
www.getfreeebooks.com
http://freecomputerbooks.com
www.essays.se
www.sparknotes.com
www.pink.monkey.com

*ONLINE EDUCATIONAL SUPPORT*
http://www.ocwconsortium.org/
http://www.ocwconsortium.org/en/courses/ocwsites
http://ocw.tufts.edu -Tuft University
http://ocw.upm.es -Univesidad Politechnica, Madrid
http://www.open.edu/openlearn/
http://ocw.usu.edu/ -Utah State University
http://open.umich.edu/ -University of Michigan
http://ocw.nd.edu/ -Nore Dame University

*ANSWERS TO QUESTIONS*
www.ehow.com
www.whatis.com
www.howstuffwork.com
www.webopedia.com
www.plagtracker.com
www.answers.com

*SEARCH SITES*
■ About.com (www.about.com)
■ AllTheWeb (www.alltheweb.com)
■ AltaVista (www.altavista.com)
■ Ask Jeeves! (www.askjeeves.com)
■ Excite (www.excite.com)
■ HotBot (www.hotbot.com)
■ LookSmart (www.looksmart.com)
■ Lycos (www.lycos.com)
■ Open Directory (www.dmoz.org)
■ Google (www.google.com)
■ Mamma (www.mamma.com)
■ Webcrawler (www.webcrawler.com)
■ Aol (www.aol.com)
■ Dogpile (www.dogpile.com)
■ 10pht (www.10pht.com)

*SEARCHING FOR PEOPLE*
■ AnyWho (www.anywho.com)
■ InfoSpace (www.infospace.com)
■ Switchboard (www.switchboard.com)
■ WhitePages.com (www.whitepages.com)
■ WhoWhere (www.whowhere.lycos.com)

*SEARCHING FOR THE LATEST NEWS*
■ ABC News (www.abcnews.com)
■ CBS News (www.cbsnews.com)
■ CNN (www.cnn.com)
■ Fox News (www.foxnews.com)
■ MSNBC (www.msnbc.com)
■ New York Times (www.nytimes.com)
■ USA Today (www.usatoday.com)

*SEARCHING FOR SPORTS HEADLINES AND SCORES*
■ CBS SportsLine (www.sportsline.com)
■ CNN/Sports Illustrated (sportsillustrated.cnn.com)
■ ESPN.com (espn.go.com)
■ FOXSports (foxsports.lycos.com)
■ NBC Sports (www.nbcsports.com)
■ The Sporting News (www.sportingnews.com)

*SEARCHING FOR MEDICAL INFORMATION*
■ healthAtoZ.com (www.healthatoz.com)
■ kidsDoctor (www.kidsdoctor.com)
■ MedExplorer (www.medexplorer.com)
■ MedicineNet (www.medicinenet.com)
■ National Library of Medicine
(www.nlm.nih.gov)
■ Planet Wellness (www.planetwellness.com)
■ WebMD Health (my.webmd.com)

*JOURNALS*
http://www.indexcopernicus.com Multidisciplinary
http://www.ajol.info/ - African Journal Online
www.africanjournalseries.com -
www.devconsortservices.com.ng
www.doaj.org - directory of open access journal
www.sabinet.co.za - South African Journals.
www.oajse.com - Open Access Journal Search Engine
http://www.lub.lu.se/en.html - Lund University
http://www.dovepress.com/ - Free Scientific & Medical Materials
http://www.copernicus.org/ - Access & Publication

ACADEMIC SEARCH/WEB RESEARCH TOOLS/REFERENCE MANAGERS
http://academic.research.microsoft.com - Multidisciplinary
http://www.scirus.com
www.scholar.google.com
http://dbis.uni-trier.de/DBL-Browser/ - Digital Bibliography Library Browser
http://academic.live.com - Live Search Academic
http://www.science.gov/ - USA government for Science
http://citeseerx.ist.psu.edu/index - Computing & Information Sciences
http://www.mendeley.com/ - academic social network/collaboration
http://www.worldcat.org/ - Multidisciplinary
http://libserver.cedefop.europa.eu - Voc & Tech Education
http://inspirehep.net/ - Stanford physics information retrieval system
hsystemv  www.ssrn.com/ - Social Science Research Network. M.Ravichandran.VKR PHARMA KRISHNAGIRI

पुण्यातील बस क्रमांक please share it all.

2 कात्रज ते शिवाजीनगर
2 (ब) भिलारेवाडी ते शिवाजीनगर
2 (क) नऱ्हेगांव ते शिवाजीनगर
3 स्वारगेट ते पुणे स्टेशन
5 स्वारगेट ते पुणे स्टेशन
5 (अ) स्वारगेट ते ताडीवालारोड
7 स्वारगेट ते उरूळी कांचन
7 (अ) हडपसर ते उरूळी कांचन
8 हडपसर ते म्हातोबाची आळंदी
9 हडपसर ते प्रयागधाम - उरूळी रे. स्टेशन
10 स्वारगेट ते केशवनगर
11 मार्केटयार्ड ते गुरव पिंपळे
11 (क) कात्रज ते गुरव पिंपळे
12 अप्पर इंदिरानगर ते निगडी
13 अप्पर इंदिरानगर ते शिवाजीनगर
13 (ल) लेकटाऊन ते शिवाजीनगर
14 धायरी - मारूती मंदिर ते वाघोली केसनंद फाटा
17 शनिवारवाडा ते नऱ्हे आंबेगांव
18 शनिवारवाडा ते तुकाईनगर
19 कोंढवा खुर्द - हॉस्पीटल ते शिवाजीनगर
20 सहकारनगर ते पुणे स्टेशन
21 स्वारगेट ते सांगवी गांव
21 (न) स्वारगेट ते सांगवी गांव
22 खडोंबा मंदिर ते शिवाजीनगर
23 अप्पर इंदिरानगर ते पुणे स्टेशन
24 कात्रज ते समतानगर (म.हौ.बोर्ड)
24 (ब) कात्रज ते लोहगांव
26 धनकवडी ते पुणे स्टेशन
27 भारती विद्यापीठ ते शिवाजीनगर स्टेशन
28 कात्रज ते शिवाजीनगर स्टेशन
29 स्वारगेट ते आळंदी देवाची
30 मार्केटयार्ड ते घोटावडेफाटा
31 धनकवडी ,तळजाई पठार ते पुणे स्टेशन
33 धनकवडी तळजाई पठार ते न.ता.वाडी
36 मनपा भवन ते चिंचवडगांव
37 सहकारनगर ते न.ता.वाडी
38 धनकवडी ते नतावडी
39 धनकवडी ते पुणे स्टेशन
40 पटवर्धन बाग - साकेत सोसायटी ते म. फुले मंडई बसस्थानक
41 मार्केटयार्ड ते दापोडीगांव
42 (वज्र) कात्रज ते निगडी - भक्ती शक्ती
43 कात्रज ते निगडी (भक्ती शक्ती)
46 स्वारगेट ते लोहगांव मार्गे धानोरी
47 शनिवारवाडा ते सणसवाडी
48 पुणे स्टेशन ते वेणूताई चव्हाण कॉलेज
49 पुणे स्टेशन ते खानापूर
50 शनिवारवाडा ते सिहंगड पायथा
51 शिवाजीनगर स्टेशन ते धायरी - मारूती मंदिर
*52 स्वारगेट ते खानापुर-वरदाडे गांव
53 शनिवारवाडा - शिवाजीनगर ते डि.एस.के.विश्व
54 शनिवारवाडा ते वेणूताई चव्हाण कॉलेज
55 म. फुले मंडई ते आनंदनगर - सनसिटी
56 म. फुले मंडई ते वडगांव
57 पुणे स्टेशन ते वडगांव बुद्रुक
57 (अ) पुणे स्टेशन ते आनंदनगर
58 शनिपार ते गोखलेनगर
59 शनिपार ते निलज्योती सोसायटी
60 महात्मा फुले मंडई ते घुलेनगर
61 स्वारगेट ते नसरापूर
62 अप्पर डेपो ते संगमवाडी
63 स्वारगेट ते कल्याणीनगर
64 हडपसर ते वारजे माळवाडी
64 (अ) स्वारगेट ते वारजेमाळवाडी (दांडेकरपूल मार्गे)
64 (ब) अप्पर डेपो ते गुजराथ कॉलनी
65 अप्पर इंदिरानगर ते समतानगर म.हौ.बोर्ड
66 मार्केटयार्ड ते आगळंबे
67 स्वारगेट ते खराडी
68 (अ) कुंबरेपार्क ते स्वारेगट
68 (प) कोथरूड डेपो ते स्वारेगट मार्गे मंडई
68 (स) सुतारदरा ते स्वारेगट मार्गे मंडई
69 मार्केटयार्ड ते घोटावडेगांव
70 डेक्कन जिमखाना ते शेरेगांव मार्गे पौडगांव
71 कोथरूड डेपो ते अप्पर डेपो
72 सुखसागर ते कोंढवागेट
73 कोथरूड डेपो ते हडपसर गाडीतळ
75 डेक्कन जिमखाना ते विद्यानगर
76 कुंबरेपार्क ते मार्केटयार्ड
77 वारजे माळवाडी - शिवाजीनगर स्टेशन - वारजे माळवाडी (वर्तुळ)
78 मार्केटयार्ड ते कोंढवा गेट
80 म.न.पा. ते सिप्ला सेंटर
80 (अ) म.न.पा. ते गार्डन सिटी
81 कुंबरे पार्क ते पुणे स्टेशन
82 कोंढवा गेट म.न.पा. भवन कोंढवा गेट (वर्तुळ)
82 (अ) वारजे माळवाडी ते म.न.पा. भवन
84 डेक्कन जिमखाना ते सांगरूण
84 (अ) वारजे माळवाडी ते बहुलीगांव
85 म.न.पा. भवन ते अहिरेगांव
86 कोथरूड डेपो मनपा भवन कोथरूड डेपो
87 डेक्कन जिमखाना ते अभिनव कॉलेज गिरमे पार्क
87 (अ) डेक्कन जिमखाना ते सुतारवाडी
88 अप्पर डेपो ते मेडी पॉर्इंट
89 स्वारगेट ते निलज्योती
90 स्वारगेट ते गोखलेनगर
90 प स्वारगेट ते पांडवनगर
91 मनपा भवन ते ईशाननगरी
92 गुजराथ कॉलनी ते पुणे स्टेशन
93 डेक्कन जिमखाना ते पिंपळेनिलख
94 कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन
94 (अ) कुंबरेपार्क ते वडगांव शेरी
95 कोथरूड डेपो ते पिंपळेगुरव
95 (अ) गुजराथ कॉलनी ते सांगवी (मार्गे सेनापती बापटरोड, औंध)
96 वारजे (घरकूलवसाहत) ते पिंपळेगुरव
97 वारजेमाळवाडी ते सहकारनगर
98 कात्रज ते हिंजवडी-माण फेज-3
99 स्वारगेट ते हिंजवडी-माण फेज-3
100 मनपा भवन ते हिंजवडी-माण फेज-3
101 कोथरूड डेपो ते कोंढवा
102 कोथरूड डेपो ते लोहगांव
103 कात्रज ते कोथरूड डेपो
104 डेक्कन जिमखाना ते धायरी डीएसके विश्व
105 डेक्कन जिमखाना ते मेडी पॉईट
106 गालिंदेपथ (वारजेनाका) शिवाजीनगर गालिंदेपथ (वारजेनाका)
107 डेक्कन जिमखाना ते पिंपळेगुरव
108 शिवतीर्थ नगर - सुतारदरा ते पुणे स्टेशन
109 मनपा भवन ते मनपा भवन (वर्तुळ मार्ग पाषाण )
110 मनपा भवन ते मनपा भवन (वर्तुळ मार्ग मार्गे कर्वेरोड)
111 भेकराईनगर मनपाभवन भेकराईनगर
112 कोथरूड डेपो ते मंडई
113 अ.ब.चौक ते सांगवी गांव
113 (ब) म.न.पा. ते पिंपळे गुरव
114 मनपा ते म्हाळुंगे गांव
115 (प) पुणे स्टेशन ते हिंजवडी-माण फेज 3
116 मनपा भवन ते खडकीबाजार
117 स्वारगेट ते डि.एस.के विश्व
118 स्वारगेट ते वडगांव बुआ, वेणुताई कॉलेज
118 (अ) स्वारगेट ते सनसिटी
119 मनपा भवन ते आळंदी देवाची
120 मनपा भवन ते चाकण, एमआयडीसी
121 मनपा भवन ते भोसरी - टेल्को
122 मनपा भवन ते चिंचवडगांव
123 मनपा भवन ते निगडी - भक्ती शक्ती
125 बोपखले ते खडकीबाजार (मार्गे विश्रांतवाडी)
126 म्हस्के वस्ती ते पिंपळे निलख
128 म.न.पा. ते बोपखेल
129 पुणे स्टेशन ते मेडी पॉईट
130 येवलेवाडी ते शिवाजीनगर
132 मनपा भवन ते शुभम सोसायटी
133 मनपा भवन ते साईनाथनगर
133 मनपा भवन ते आनंद पार्क
134 पुणे स्टेशन ते विद्यानगर
135 पुणे स्टेशन ते वाडे बोल्हाई
136 पुणे स्टेशन ते वाडेगांव
139 शेवाळवाडी हडपसर ते निगडी
140 अप्पर इं.नगर ते पुणे स्टेशन
141 खंडोबा मंदिर ते पुणे स्टेशन
142 - पुणे स्टेशन ते सुसगांव
143 वारजेनाका ते पुणे स्टेशन
144 कोथरूड स्टॅण्ड ते पुणे स्टेशन
144 (अ) साईसयाजीनगर ते पुणे स्टेशन
144 (ब) कुंबरेपार्क ते चंदनगर - साईनाथनगर
145 पुणे स्टेशन ते एन.डी.ए. - गोलमार्केट
146 पुणे स्टेशन ते गोखलेनगर
147 मनपा भवन ते सांगवी सांडस
148 शेवाळवाडी ते पिंपळेगुरव
148 (अ) भेकराईनगर ते भोसरी
149 हडपसर ते पिंपरीरोड
149 (अ) हडपसर ते निगडी - भक्ती शक्ती
151 पुणे स्टेशन ते आळंदी देवाची
152 (ध) मनपा ते लोहगांव मार्गे धानोरी
153 पुणे स्टेशन ते बोपखेल
153 (अ) पुणे स्टेशन ते म्हस्केवस्ती
154 पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी - दत्तनगर
155 पुणे स्टेशन ते धानोरी
155 (ब) पुणे स्टेशन ते म्हस्केवस्ती - ग्रेफ सेंटर
155 (अ) पुणे स्टेशन ते धानोरी (मुंजाबावस्ती)
158 मनपा भवन ते लोहगांव
158 (अ) डेक्कन जिमखाना ते लोहगांव विमानतळ
159 मनपा भवन ते तळेगांव ढमढेरे
159 (प) मनपा भवन ते पाबळफाटा
159 (क) मनपा भवन ते पाबळफाटा
160 - मनपा भवन ते मुंढवा
161 डेक्कन जिमखाना ते विमाननगर
162 मनपा भवन ते करंदीगांव
163 पुणे स्टेशन ते खराडीगांव
164 स्वारगेट ते विमाननगर
165 मनपा भवन ते वडगांव शेरी
166 पुणे स्टेशन ते गंगापूरम म्हाडा
167 हडपसर ते वाघोली
168 मनपा भवन ते केशवनगर मार्गे घोरपडी
169 मनपा भवन ते केशवनगर - मुंढवा
170 पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द
174 पुणे स्टेशन ते एनडीए गेट - कोंढवा गेट
175 मनपा ते हडपसर मार्गे जहांगिरनगर
176 सारसबाग ते महंमदवाडी
177 पुणे स्टेशन ते साळुंके विहार
177 (अ) विश्रांतवाडी ते आझादनगर
177 (म) पुणे स्टेशन ते महंमदवाडी
179 महात्मा गांधी ते वडाची वाडी
180 नतावाडी ते हडपसर
181 नतावाडी ते कोंढवा खुर्द
181 (अ) नतावाडी ते एस आर पी कॅम्प
183 सारसबाग ते थेऊर फॅक्टरी
184 स्वारगेट ते भेकराईनगर
184 स्वारगेट ते फुरूसूंगी
185 हडपसर ते मांजरीगांव
186 सातवननगर ते पुणे स्टेशन
187 भेकराईनगर हडपसर ते पुणे स्टेशन
188 हडपसर ते कात्रज
189 हडपसर ते उरूळी देवाची
190 हडपसर ते फुरसुंगी गांव
191 पुणे स्टेशन ते कोंढवा हॉस्पीटल
192 हडपसर ते उंड्रीगांव
193 हडपसर ते लोणीगांव
195 हडपसर ते होळकरवाडी
196 स्वारगेट ते तुकाईनगर काळेबोराटेनगर
197 हडपसर ते कोथरूड डेपो
198 हडपसर ते मांजरी मार्गे केशवनगर
200 साडेसतरानळी ते स्वारगेट
201 हडपसर ते आळंदी दर्शन
202 हडपसर ते वारजेमाळवाडी - गणपतीमाथा
203 हडपसर ते पुणे स्टेशन
203 (प ) शेवाळवाडी ते पुणे स्टेशन
204 भेकराईनगर ते चिंचवड
205 हडपसर ते सांगवीगांव
206 हडपसर ते विशालनगर
207 स्वारगेट ते सासवड
207 (अ) हडपसर ते सासवड
208 हडपसर ते हिंजवडी फेज 3
213 कात्रज ते विमाननगर
214 कात्रज ते आंबेगांव पठार
215 स्वारगेट ते मोहननगर - साईसिध्दी
216 भारती विद्यापीठ ते शनिपार - मंडई - शिवाजीनगर
217 जांभूळवाडी ते गुजरवाडी
218 कात्रज ते बालेवाडी
226 पुणे स्टेशन ते वडगांव धायरी
227 मार्केटयार्ड ते मारणेवाडी
230 भारती विद्यापीठ ते पुणे स्टेशन
233 मार्केटयार्ड ते पौडगांव
234 मनपा भवन ते खराडी गांव
235 कात्रज ते खराडीगांव
236 मनपा ते खुळेवाडी
237 वारजेमाळवाडी ते खराडी
252 मनपा भवन ते चऱ्होली गांव
253 मनपा भवन ते विद्यानगर
256 मनपा भवन ते बालेवाडी मोझे विद्यालय
256 (ब) मनपा भवन ते बाणेरगांव
256 (स) मनपा भवन ते सोमेश्वरवाडी
257 मनपा भवन ते मरकळ
262 मनपा भवन ते देहूगांव
264 मनपा भवन ते बहूळगांव
276 वारजेमाळवाडी ते चिंचवडगांव
277 कोंढवा गेट ते खडकी बाजार
279 डेक्कन ते खांबोली
280 मनपा भवन ते वारजे (हनुमान चौक, कॅनॉल रोड)
281 वारजेमाळवाडी ते निगडी (भक्ती शक्ती)
282 वारजेमाळवाडी ते भोसरी
283 सहजानंद सोसायटी ते पुणे स्टेशन
284 कोथरूड डेपो ते निगडी (भक्ती शक्ती)
286 कोथरूड डेपो ते साळुंके विहार
290 कात्रज शनिनगर ते मंडई - शिवाजीनगर
291 कात्रज ते हडपसर गाडीतळ
291 (अ) अप्पर ते हडपसर गाडीतळ
292 स्वारगेट ते कोंढणपूर - अवसरवाडी - कल्याण
293 स्वारगेट ते खेडशिवापूर
294 कात्रज ते खडकवासला
295 आंबेगांव ते पुणे स्टेशन मार्गे गंगाधाम
296 जांभुळवाडी ते शिवाजीनगर
297 राजस सोसायटी ते शिवाजीनगर
298 कात्रज ते चिंचवड गांव - चिंतामणीचौक मार्गे वाल्हेकरवाडी
299 कात्रज ते भोसरी गांव
301 कात्रज ते हडपसर (बीआरटी)
302 पिंपरीगांव ते भोसरी
302 (अ) पिंपरीगांव ते बोपखेल
303 निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
304 चिंचवडगांव ते भोसरी
305 निगडी ते वडगांव
306 डांगेचौक ते हिंजवडी माण - फेज 3
307 चिंचवडगांव ते वाल्हेकरवाडी
308 निगडी ते घरकूल वसाहत चिखली
309 आळंदी ते देहूगांव
310 वाल्हेकरवाडी ते पुणे स्टेशन मार्गे येरवडा
311 पिंपरीगांव ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे
312 चिंचवडगांव ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे .
313 चिंचवडगांव ते मारूंजी.
313 (अ) चिंचवडगांव ते चांदखेड
314 निगडी (भक्ती शक्ती) ते म्हाळूंगे एम आय डी सी (चाकण)
315 भोसरी ते पुणे स्टेशन, येरवडा मार्गे
315 (अ) भोसरी ते पुणे स्टेशन, विश्रांतवाडी मार्गे
316 चिंचवडगांव ते हिंजवडी माण फेज 3 मार्गे माण-गांव
317 संभाजीनगर ते पुणे स्टेशन, वाकडेवाडी मार्गे
318 कृष्णानगर ते पुणे स्टेशन, औंध मार्गे
318 (अ) घरकूल चिखली ते पुणे स्टेशन, औंध मार्गे
319 आळंदी ते वडगांव मावळ
320 म्हाळुंगे ते आळंदी
321 सांगवी ते हिंजवडी माण फेज 3
321 (अ) पिंपळेगुरव ते हिंजवडी माण फेज 3
322 (क) म.न.पा. ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
322 (अ) वारजेमाळवाडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
322 (ब) पुणे स्टेशन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
323 चिखली ते म.न.पा.
323 (अ) घरकूल चिखली ते म.न.पा.
324 (वज्र) भोसरी ते हिंजवडी फेज 3
325 मासुळकर ते पुणे स्टेशन
326 पिंपरीगांव ते चिखली, कुदळवाडी मार्गे
327 आळंदी ते हिंजवडी
328 निगडी ते रूपीनगर
329 पुणे स्टेशन ते देहूगांव, वाक डेवाडी मार्गे
329 पुणे स्टेशन ते देहूगांव, येरवडा मार्गे
331 चऱ्होलीगांव ते राहाटणी
331 (अ) भोसरी ते राहाटणी
331 (ब) चऱ्होलीगांव ते राहाटणी
332 पुणे स्टेशन ते पिपरी मनपा, काळेवाडी, औंध मार्गे
333 पुणे स्टेशन ते हिंजवडी माण फेज 3
335 डांगेचौक ते जांबे
335 (अ) चिंचवडगांव ते जांबे
336 वाघोली ते निगडी मार्गे चंदननगर खडकी बाजार.
337 धायरी - मारूती मंदिर ते निगडी - भक्ती शक्ती डेपो
338 कोथरूड डेपो ते चिंचवड गांव
339 कात्रज ते संतनगर (इंद्रायणीनगर )
341 मनपा ते मोहननगर
344 पिपंळेनिलख ते आळंदी
345 पुणेस्टेशन ते थेरगांव मार्गे औंध
347 दापोडी ते आळंदी
348 निगडी ते पुणे स्टेशन, औंध मार्गे
350 देहूगांव ते तळावडे
351 जांबे ते आळंदी
354 पिंपरीगांव ते मार्केटयार्ड
355 चिखली ते डांगेचौक
357 पुणे स्टेशन ते राजगुरूनगर
358 भोसरी ते राजगुरूनगर
360 आळंदी ते बालेवाडी
361 भोसरी ते आळंदी
362आळंदी ते वाय सी एम शटल
363 निगडी ते किवळे
366 निगडी ते पुणे स्टेशन
367 निगडी ते भोसरी
367 (अ) आ.रे.स्टेशन ते संतनगर (इंद्रायणीनगर)
367 (ब) घरकूल वसाहत ते भोसरी
370 पिंपरीरोड ते पिंपरीरोड
372 निगडी ते हिंजवडी
373 वाकडपूल ते इन्फोसीस माण फेज 3
376 कात्रज ते निगडी
376 (अ) वारजेमाळवाडी ते भक्तीशक्ती मासुळकर मार्गे
376 (ब) निगडी ते हडपसर मार्गे गरवारे कंपनी, वाय. सी. एम.
वज्र 1 हडपसर ते धायरी - मारूती मंदिर
वज्र 2 वारजे माळवाडी ते वाघोली
वज्र 3 कोथरूड डेपो ते हडपसर
वज्र 4 कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी
वज्र 5 मनपा ते रावेत
रात्रौबससेवा कात्रज ते शिवाजीनगर
रात्रौबससेवा कात्रज ते पुणे स्टेशन
रात्रौबससेवा स्वारगेट ते हडपसर
रात्रौबससेवा हडपसर ते पुणे स्टेशन

५००० दंड हा विषय बाजूला ठेवून.. तुमचा अंतकरणाला विचारून बघा.. जे लिहीले आहे ते पटतंय का..

FORWARDED POST..

बेकायदा प्लास्टिक बाळगणाऱ्याला 5,000 दंड काय झाला......
जिकडे तिकडे हाहाःकार झाला...

जोक काय.....
पहिली विकेट पडली...
व्यवस्थेचे धिंडवडे काय?

बरंच काही ऐकू यायला लागलं..!

"वारे जनता"...!
नक्की घाबरताय कशाला .? दंडाला की बदलाला...?

आज प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक चा वापर होतो 100 गोष्टीं मध्ये 80 गोष्टी प्लास्टिकच्या असतात.
ज्या इतक्या घातक आहेत, की जगभरातील देशांना प्रश्न पडलाय की...
या सहजा सहजी नष्ट न होणाऱ्या, पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय...?
प्लास्टिकच्या वापराला विनाकारण बंदी का आणेल कुणी...?

कापड...कागद यांवर बंदी आहे का हो...?
नाहीये ना...?
कारण ते नष्ट होऊ शकतं..पर्यावरणाला घातक ठरणारं नाहिये...!
परंतु, प्लास्टिक जाळलं तरी नष्ट होत नाही.
प्लास्टिक आहे तसं जमिनीत गाडलं, तरी वर्षानुवर्षे तसंच राहतं ...!
यामुळे पर्यावरणाचं नुकसान किती होतंय ते महितीये का कुणाला???
शाळेत शिकलात ना??
विज्ञाना मध्ये शिकवलं ना आपल्याला...?
" प्रदूषणावर 3-3 पानं निबंध लिहिले ना आपण...?"

कि नुसतेच लिहिले...
त्यावर काही विचारच नाही केला????

बदलावं म्हटलं की..
थट्टा मस्करी सुचते आपल्याला...!
इथे कोणती गोष्ट आपण गंभीरपणे स्वीकारतो का?
तर नाही आजिबात नाही..!
"प्लास्टिक" बंद केलं तर, मटण कसं आणायचं,
कुक्कर घेऊन जायचं का..??

व्वा....
हसले सगळे...
झालं..संपलं ...
जोक होता...!
सुपिक जमिन नापीक झाली...
बोललं का कुणी.?
नद्या नाले तुंबले.....
गाई-वासरांच्या...इतर जनावरांच्या पोटात किलोने प्लास्टिक सापडलं....
बोललं का कुणी??
कधीतरी प्रत्येक शहरातल्या कचरा विघटन करणाऱ्या जागेत जाऊन बघा...
कळेल अवस्था....काय आहे ते...!
सतत जळत असतं..
ते पूर्ण नष्ट होत नाही.
त्या वर लिहिलं का रे कुणी...?

"किलो भर मटण"
आठवलं फक्त...!

यावर उपाय काय...?
तर,
माहिती नाही ..
पर्यायी व्यवस्था काय..?
तर,
माहिती नाही...

नाही...
आम्हांला काय करायचंय..?
फक्त एक पोस्ट कॉपी पेस्ट करायची...
ज्यावर 50 जण हसले की आम्ही खुश....!

आपण कधीच बदलणार नाही का?
मुळात आपल्याला घाणीत तोंड खुपसून बसायची सवय लागलीये ना...
तीच घातक ठरतीये...!

स्वतः बदलू नका...।
फक्त पोस्ट करा...
" माझा देश बदलतोय"
चांगले likes मिळतील...!

पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला
******************************
कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच
एकाकी सोडत नाही.
******************************
ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते.
****************************
ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो..
*****************************
ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते..
***************************
काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल".
******************************
ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास
प्रोत्साहित करते..
******************************
ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?"
त्यावेळेस निश्चितच तुमचा राग
उफाळून येत असेल.
पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय?
******************************
वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!
******************************
पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या !
****************************** तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय..... *****************************तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा **************************n****
सर्व विवाहितांपर्यंत हा संदेश पोचवा
*****************************
*आज "जागतीक पत्नी कौतुक सोहळा दिनाच्या "सर्व महिलाना हार्दिक शुभेच्छा!*

वजाबाकी करण्याची एक ट्रिक : ____

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

10, 100, 1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

आपण आणखी एक उदाहरण पाहू.

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

तुमचं उत्तर तयार आहे- 5672

उदा:3)
100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.
*शेअर करा.*

नमस्कार मित्रहो!!!
मी. प्रा. ललित खैरनार
(National level Motivational speaker, Counselor And Advisor, व्याख्याता)
Cell: 99220 072566

मला
नेहमी अनेक पालक काही
एक प्रश्न विचारतात त्याचे उत्तर
आज आपल्या सर्वांसमोर लेखणीच्या माध्यमातून सादर करीत आहे
आपण जरूर वाचाल अशी अपेक्षा कारण जोही वाचेल त्यात बदल नक्कीच होईल!!!!
कारण परवा 12 वी चा निकाल लागलंय आणि काही दिवसात 10 चाही लागणार म्हणून हे प्रश्न :-
माझा पाल्याने कोणत्या शाखेत जावे , मेडिकल ,व्हेटरीनरी, इंजिनिअरिंग , फार्मसी , ऍग्री कोणत्या युनिव्हर्सिटीत घालणे चांगले राहील , मार्गदर्शन करावे

उत्तर :-
१) करिअर म्हणजे काय हे मूलभूत समजून घ्या. डॉक्टर, इंजिनिअर इ होणे म्हणजे करिअर नव्हे. समजा तो डॉक्टर झाला पण प्रॅक्टिस चाललीच नाही किंवा इंजिनिअर झाला पण नोकरीच नाही लागली तर . करिअर म्हणजे बाजारात विकायला असलेली पदवी घेणे म्हणजे करिअर नव्हे , तर करिअर म्हणजे एक बुद्धिवान व कौशल्यावाण व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय.

२) पैसा हा तर महत्वाचा आहेच पण ते साध्य नाही ते साधन आहे, तुमचा मुलगा जेव्हा त्याची सर्वोच्च क्षमता सिद्ध करेल तेव्हा तो त्या क्षेत्रातला मास्टर असेल व पैसा त्याच्या मागे येईल , त्याला पैस्याच्या मागे धावण्याची गरज नाही . आपण जेवढे पैश्याच्या मागे धावतो तेवढा पैसे लांब पळतात हे ९९% लोकांना समजतच नाही.

३) गर्दीचा भाग होऊ नका, आज १३ लाख इंजिनिअर पास होतात व फक्त लाख भरणा नोकरी मिळते तीही १०/१५ हजाराची, प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल टाकत नाही, नोकरी करणाऱ्या डॉक्टर वर टारगेट ची तलवार असते , किती BAMS डॉक्टर कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्या इतपत पैसे कमवितात.

४)युनिव्हर्सिटी की युनिव्हर्स :- कृत्रिम पुस्तकांचा टीवल्या बावल्याचा खेळ म्हणजे युनिव्हर्सिटी , नाहीतर पदवीधर ५-१० हजाराच्या नोकरीची भीक मागत फिरला असता का ? एवढे इंजिनिअर आहेत म्हणे मग प्लॅम्बर, सुतार, इलेकंट्रीशीअन, गवंडी ई हे सगळे बाहेरून का आणावे लागतात, कारण आपल्या इंजिनिअरला फुजपण लावता येते का ? का लगेच ए सि केबिन पाहिजे. युनिव्हर्स म्हणजे घर व शाळा या बाहेरची दुनिया, प्रॅक्टिकल, मार्केट, बाजार, समाज ई ई , उद्या ह्याच जगात त्याला लढायचे व जिंकायचे आहे त्यामुळे त्याला १२ वि नंतर युनिव्हर्स मध्ये पाठवा.

५) नेमके काय करावे :- त्याची आवड , क्षमता, संधी व तुमची पैसे खर्च करण्याची तयारी याचा विचार करून स्किल ओरिएंटेड असे कोर्स करा, self education ला महत्व द्या, पदवी पेक्षा घेतलेले शिक्षण त्याला self reliance करेल हे महत्वाचे, जसे उंचावरून फेकलेले मांजर चार पायावरच बरोबर उभे राहते तसे मुलाला सक्षम बनवायला हवे , कारण उद्याच्या जगात डॉक्टर होवो इंजिनिअर होवो नाही आणि काही होवो , कुणाचे काय होईल हे आज सांगता येत नाही , कोणत्याही स्थितीला सामोरे जाणारी personality हवी . तो खेळाडू, हॉटेलिएर, डिझायनर , ऍड मेकर , लेखक, शेतकरी , पेंटर , व्यापारी , exporter, ई ई ई हजारो पर्याया पैकी का नाही होऊ शकत . डॉक्टर इंजिनिअरलाच टिळा लावलाय का ?

६) शिक्षण घेण्यावर किती खर्च करावा याचे व्यवहारी तारतम्य हवे , शिक्षनाच्या अड्ड्यावर जुगार खेळू नका , पदव्या ऐवजी ज्ञान घेण्यावर भर हवा. १० लाख पदविवर खर्चून त्याच्या व्याजा एवढ्या पगाराची नोकरी लागू नये हा तर स्वतःच डोळे बांधून खेळलेला जुगार नव्हे का ? ज्या जुगारात पैसे व मुलांचे आयुष्य ही हरते .

आपल्या पाल्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी त्याच्या अभ्यासाच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करा.
१) कमीतकमी पाठांतर ,समजून घेण्यावर अधिक भर द्यायला सांगा.
२) प्रत्येक घटकाचे आकलन होईल याची काळजी घ्या.
३) वाचन केलेल्या घटकांचे विश्लेषण (analysis ) करण्याची सवय लावा .
४) पुस्तके(text books) वाचून, स्वतःच्या भाषेत प्रश्नांची उत्तरे तयार करायला सांगा .
५) प्रत्येक धडा समजून घेऊन सारांश लक्षात ठेवता आला तर अतिउत्तम.

काळजी घ्या, सद्याचे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या विकासाला पूरक असण्याऐवजी मारक ठरत आहे .आपल्या पाल्याची प्रगती त्याला मिळणाऱ्या एकुण गुणामधून शाळा अंतर्गत गुण (internal marks ) वजा करून राहीलेल्या गुणावरून ठरावा आणि यावरूनच पुढील शिक्षणासाठीची योग्यता ठरवा.
याचा गांभीर्याने विचार करा नाहीतर पुढच्या पिढ्या बरबाद होतील. अधिक माहिती तसेच इतर प्रश्न असतील तर संपर्क करू शकता 99220 072566 व youtube वर देखील बघू शकता:

https://youtu.be/KmCWD6vyKd0

*निर्जला एकादशी*

ज्येष्ठ शु. एकादशीला निर्जला किंवा भीमसेनी एकादशी असे नाव आहे.

*या व्रताचा विधी असा :-*

एकादशीला आचमनाव्यतिरिक्त पाणी न पिता व काहीही न खाता उपवास करावा. रात्री विष्णूच्या सुवर्णमूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. नृत्य-गायनाने ती रात्र जागवावी.
दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूची यथाविधी पूजा करुन ब्राह्मणभोजन घालावे व जलकुंभ, सुवर्ण, छत्र, वस्त्र, व पादत्राने या वस्तू दान द्याव्या.
फल-दीर्घायुरारोग्य व स्वर्ग यांची प्राप्ती.

*कथा*

भीमसेनाने विचारले,
'हे पितामह व्यासा, तुम्ही महाबुद्धिवंत आहात. मी काय म्हणतो ते ऐका. युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही भोजन करीत नाहीत. ते मला म्हणतात की,
'हे वृकोदरा, तूही एकादशीला जेवू नकोस.'
आजोबा, मी त्यांना म्हणतो की, मला भूक सहन होत नाही.
'मी दाने देईन, केशवाची विधीपूर्वक पूजा करीन. पण उपवास केल्याशिवाय एकादशी व्रताचे फळ कसे लाभेल ते सांगावे.'
भीमसेनाचे हे बोलणे ऐकून व्यास म्हणाले,
'भीमसेना, तुला नरक अनिष्ट वाटत असेल, व स्वर्गाची इच्छा असेल तर शुक्ल आणि वद्य पक्षातील एकादशांच्या दिवशी तू भोजन करू नकोस.'
भीमसेन म्हणाला,
'आजोबा, तुम्ही तर महाबुद्धिवंत आहात. मी तुम्हाला खरे सांगतो की मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मग माझ्याकडून उपवास कसा काय होणार? माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा तो थोडा वेळ शमतो. मला वर्षातून एकच उपवास कसातरी करता येईल. तेव्हा मला नक्की करून सांगा की मी हा एकच उपवास कोणता करावा. ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशींच्या उपवासाचे फळ मिळेल असा उपवास सांगा.'
व्यास म्हणाले,
'भीमा, तू मनुष्याने पाळायचे नियम ऐकले आहेस. वैदिक धर्म काय आहे, हेही तू ऐकले आहेस. पण हे राजश्रेष्ठा, हे धर्म कलियुगात आचरणे शक्य नाही.
थोड्या उपायात, थोड्या खर्चात, व अगदी कमी श्रमाने महाफल देणारे सर्व पुराणांचे सार मी तुला सांगतो. ऐक. शुक्ल व कृष्ण या दोन्ही एकादशांना भोजन करू नये. जो एकादशीला उपवास करतो, तो कधीही नरकाला जात नाही.'
व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमसेन खूप घाबरला. आणि पिंपळाच्या पानासारखा थरथर कापू लागला. तो म्हणाला, 'आजोबा, मी उपवास करण्यास समर्थ नाही. म्हणून पुष्कळ फळ देणारे एकच एकादशी व्रत मला सांगा.'व्यास म्हणाले, 'ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते, तिचा उपवास पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक करावा. स्नान आणि आचमन या कामापुरताच पाण्याचा उपयोग करावा. तसे न केल्यास व्रतभंग होईल. हे व्रत करणाऱ्याने एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे. त्याने हा नियम पाळला तर त्याला प्रयत्न केल्याशिवाय बारा एकादशा केल्याचे फळ मिळते.द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करावे, ब्राह्मणाला विधीपूर्वक जलदान किंवा सुवर्णदान द्यावे. नंतर आवश्यक कृत्ये करून आणि इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ब्राह्मणांसह भोजन करावे.भीमसेना, अशा प्रकारे व्रत केल्यामुळे कोणते पुण्य मिळतेते ऐक.सर्व वर्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व एकादशाचे फल ही एकादशी केल्यामुळे मिळते, यात संशय नाही. कारण तसे मला शंखचक्र गदाधारी केशवानेच सांगितले आहे. या एकादशीचा उपवास पाणीही न घेता केल्यास त्याचे काय फळ मिळते ते ऐक. हे वृकोदरा, सर्व तीर्थाचे जे पुण्य, सर्व दानांचे जे पुण्य ते या एकादशीनेच मिळते. सर्व वर्षातील शुक्ल व वद्य पक्षातील ज्या धनधान्य देणाऱ्या पुण्यकारक, पुत्र वआरोग्य वगैरे फळे देणाऱ्या अशा सर्व एकादशांचे उपोषण केल्याचे एकत्र फळ या एकच एकादशीच्या उपवासाने मिळते. हे नरव्याघ्रा भीमा, मी तुला हे अगदी सत्य सांगत आहे. या एकादशीचे उपोषण करणार्याला त्याचे अंतःकाळी मोठ्या शरीराचे अक्राळ-विक्राळ, काळे, पिंगट दंड व पाश धारण करणारे भयंकर यम दृष्टीस पडत नाहीत. हे नरव्याघ्रा, याच्या उलट त्याच्या अंतःकाळी पीतांबर धारण करणारे, सौम्य, शंखचक्र धारण करणारे व मनोवेगाने जाणारे विष्णुदूत येतात आणि त्याला विष्णुलोकाला घेऊन जातात. म्हणून सर्व प्रयत्न करून या एकादशीचे व्रत पाणी न पिता करावे व गाईचे दान करावे. म्हणजे मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.'हे जनमेजया, व्यासाचे हे बोलणे ऐकून सर्व पांडवांनी या एकादशीचे उपोषण विधीपूर्वक केले. भीमानेही त्या दिवसापासून या कल्याणकारक एकादशीचे व्रत केले म्हणून तेव्हापासून ही निर्जला एकादशी 'पांडव एकादशी' किंवा 'भीमसेनी एकादशी' या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध झाली.हे पृथ्वीच्या राजा, भीमसेनाने ज्यावेळी निर्जला एकादशीचे व्रत सुरू केले, त्यावेळी तो भुकेने व तहानेने व्याकुळ झाला. त्याने दिवसाचे दोन प्रहर कसेतरी काढले तिसऱ्या प्रहरी भीमाला उपोषण व तहान सहन होईना तेव्हा तो गंगेत जाऊन पुष्कळ वेळ पडून राहिला. नंतर त्याने खूप वेळ स्नान केले. तेव्हा त्याला थोडीशी हुषारी वाटली. उपवासाची रात्र त्याने फार कष्टात काढली याप्रमाणे त्याने व्यासाने सांगितल्याप्रमाणे व्रत पाळले. या निर्जला एकादशीच्या भीमाने केलेल्या स्नानाचे स्मरण म्हणून दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी पुन्हा एकदा स्नान करावे हे राजा तूही सर्व पापाचे शमन व्हावे म्हणून हा उपवास प्रयत्नपूर्वक कर. आणि भगवंताची आराधना कर.एकादशीच्या दिवशी सकाळी शुद्ध होऊन पुढील प्रमाणे संकल्प करावा.' हे देवेशा. आज हरिदिन आहे म्हणून मी पाणीही प्राशन न करता उपोषण करीन व दुसऱ्या दिवशी पारणे करीन.' असा संकल्प करुन सर्व पापांच्या नाशासाठी इंद्रियांचे संयमन करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास करावा. स्त्रियांचे किंवा पुरुषांचे पाप मेरू किंवा मंदार पर्वताएवढे जरी मोठे असले तरी या एकादशीच्या प्रभावाने भस्म होऊन जाते. हे राजा, ज्याला धेनू दान करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने घटात सुवर्ण घालून आणि तो वस्त्राने गुंडाळून दान द्यावा.या एकादशील पाणी न पिण्याचा जो नियम करतो तो मोठाच पुण्यवान होतो. कारण त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरागणिक चार कोटी तोळे सोने दिल्याचे पुण्य मिळते. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करुन दान, जप, होम वगैरे कर्मे करतो त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही, असे श्रीकृष्णानेच सांगितले आहे. निर्जला एकादशीचे उपोषण भक्तीने केले असता वैष्णवपद प्राप्त होते. मग इतर नेम, नियम हवेतच कशाला? उपोषण करून जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी सोने, अन्न व वस्त्र दान देतो, त्याला त्याचे फळ अक्षय मिळते. या एकादशीच्या दिवशी जो अन्न जेवतो तो जणू पापच भक्षण करतो व त्याला शेवटी दुर्गती मिळते. जे एकादशीला उपवास करून द्वादशीला दाने देतात, ते अंती मोक्ष मिळवतात.ब्रह्मघातकी, मद्यपान करणारे, चोर, गुरूचा द्वेष करणारे, नित्य खोटे बोलणारे असे सर्व पातकी या निर्जला एकादशीचे व्रत करतील तर ते सर्व पापातून मुक्त होतील.निर्जला एकादशीच्या दिवशी इंद्रिय-निग्रह करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्त्री-पुरुषांनी आणखी काय करावे ते मी सांगतो, ऐक. त्या दिवशी जलशायी नारायणाची पूजा करावी आणि धेनू दान द्यावी. किंवा त्याऐवजी तुपाचे दान द्यावे. मोठ्या दक्षिणा देऊन व मिष्टान्न देऊन ब्राह्मण संतुष्ट करावे. हे धर्मश्रेष्ठा राजा, ब्राह्मणसंतुष्ट झाले म्हणजे त्यामुळे मोक्ष देणारा नारायण संतुष्ट होतोच.जो हे निर्जला एकादशीचे व्रत करीत नाही, तो आत्मद्रोही असतो. तो पापी, दुराचारी व दुष्ट असतो, यात संशय नाही.जे शांत, दानपर लोक जागरण करून हे उपोषण करतात, व त्या दिवशी वासुदेवाची पूजा करतात ते आपल्या शंभर पूर्वजांसह विष्णुलोकाला जातात.या एकादशीचे पारणे करतना अन्न, पाणी, शय्या उत्तम आसन, कमंडलू व छत्र ही दाने द्यावीत. जो मनुष्य पारण्याच्या दिवशी सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो, तो निश्चितपणे सुवर्णाचे विमानात बसून स्वर्गाला जातो. जे कोणी या एकादशीची कथा सांगतात किंवा भक्तिभावाने ऐकतात ते सर्व स्वर्गलोकाला जातात, याविषयी शंका नाही. कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहणात श्राद्धविधी केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य हे माहात्म्य ऐकल्याने मिळते.
॥श्रीभारतातील व पद्म पुराणातील निर्जला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

>> कसे ववाटेल फॉरवर्डस? माझ्याकडे खजिना आहे उपयुक्त माहितीचा.

हो चांगले आहेत. वाचतोय अजून. धन्यवाद Happy मध्यंतरी एक आला होता बँकांचे नंबर दिले होते Account Balance जाणून घेण्यासाठी. मिळाला तर पहा. हाताशी असावी अशी उपयुक्त माहिती एकत्र होईल या धाग्याच्या निमित्ताने.

*चमत्कार!* *चमत्कार!!* *चमत्कार !!!*

औरंगाबाद जवळील एका गावामध्ये *अभ्यास* करण्याचा चमत्कार.
गावच्या वाचनालयात एक मूलगा *अभ्यास* करीत होता.
वाचन करताना त्याने ,शाहू - फुले - आंबेडकर,अब्दुलकलाम तसेच शिवरायांचे शैक्षणिक विचार वाचले व मूलाने मन लावून अभ्यास केला व तो मूलगा *JUDGE(जज)* झाला व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या व तो आता चांगले जीवन जगतो. त्या मूलाने ही गोष्ट त्यांच्या मित्रांना सांगितली व त्याचे मित्र सूद्धा उत्तीर्ण झाले काही मित्रांनी हे खोट समजलं व ते मंदीरात भजन करीत देवाला नवस करीत बसले आज अडाणी आहेत व चाकरी करतात .
*त्याच गावांमधल्या अनेक तरुणांनी अभ्यास करून पोलीस भरतीची तयारी केली असता आज अनेक तरुण पोलीस झाले*
तसेच
*लातूर येथील एका मुलाने ही गोष्ट ऐकून *अभ्यास* केला तो आता पुणे येथे Class 2 च्या पोस्टवर आहे...

*यवतमाळ येथील एका बेरोजगार युवकांना हा msg कळाला त्यांनी अभ्यास केला व त्यांना सरकारी नौकरी लागली*.
*तेव्हा त्याने अभ्यास करण्याचा संदेश 10 जणांना पाठविला*.

*एका माणसाने हे खोटे आहे असे समजले तर त्याचा मुलगा निरक्षर झाला*.

*हा मेसेज डीलेट करू नका*.

*Knowledge is Power. Power is Knowledge*

*हा मेसेज १० जणांना पाठवा उद्या संध्याकाळ पर्यंत अनेक जण अभ्यासाला लागतील...!*

*शिका, संघटित व्हा, संघर्ष करा*

नवराबायको सारखे नाते नाही. एकमेकांच्यशी एकनिष्ठ राहिले तर संकटे आली होती की नाही असे वाटते
पुल देशपांडे

*BE PROUD OF YOUR HIGHLY APOLITICAL & TOTALLY PLURALISTICALLY RELIGIOUS ARMED FORCES*
==============
Sharing a piece by *Lt Gen Ata Hasnain*.

It shows in unambiguous ways that the *Indian Army is the highest example of true secularism*. This is a must read piece.

Excerpts:

As Muslims, both my spouse and i invariably led the puja of our army unit in its temple every other Sunday...Personally, I come from a regiment which is purely Hindu and has a regimental deity in *Lord Badri Vishal*, the personification of *Lord Vishnu* at the Badrinath shrine. As the head of the regiment i have invoked the blessings of Lord Badri Vishal by personally travelling to the shrine many times for the opening puja of the season after winter. As a senior commander in Kashmir some of *my most satisfying moments were those when i did a round robin of all gurdwaras of the units on Guru Purab*, ending with langar with the unit usually deployed in the most difficult area.

Once in a Muslim Grenadiers unit, its *Hindu company commander* put me to shame when i saw that he was *keeping all 30 rozas with his men and even reading all five namaz* which he knew perfectly.

When *my fauji father* was questioned during Partition about his choice of armies, he said: *“While the nation formed on basis of faith will celebrate now but won’t last forever, the nation formed on basis of respect for every faith will have a difficult beginning but will always celebrate.”* He remained with the Indian Army and *rose to be its first Muslim GOC*. When India has doubts about itself and the future course of inter faith relations it should *just turn to its army for inspiration;* there nothing changes, it only becomes better.
==============
*JAI HIND*
*जय हिंद*
==============

मधुरांबे, पांचट फॉरवर्ड साठी वेगळा धागा काढा. सदर धाग्याचा विषय चांगले खातरजमा केलेले उपयुक्त फॉरवर्ड असा आहे. म्हणजे उपयोगी सल्ले, उपाय, इत्यादी.

हेला तुमच्यासारख्या विद्वान लोकांनी इग्नोर करावे, ब-याच जणांना ही माहीती उपयुक्त वाटते. बाकी तुम्ही त्या टोळक्याचेच ड्युआय असणार..

मला कुठेच जायचे नाहीये पण रेफरन्स करिता यादी हाताशी असावी तर एवढ्या मोठ्या यादीत १ नंबरची बस कशी नाही हा माझा साधा प्रश्न आहे.

त्या "भोंदू फॉरवर्ड्स" अशा नावाच्या धाग्यापेक्षा हा धागा जास्त खतरनाक वाटतो आहे.
"खातरजमा केलेले" अशा टायटल च्या धाग्यावर टाकलाय म्हणून आता इथे टाकलेली कुठलीही माहिती बाय डीफॉल्ट खरी वाटू लागेल हो लोकांना ! खातरजमा कोणी केलीय , केलीय की नाही की हे ही इतरांसारखेच भोंदू फॉरवर्डच आहेत हे कोण आणि कसं बघणार?
मधुरांबे, ते पुरणपोळी डाएट वगैरे पण टाका आता इथेच. काय फरक पडतोय!

ते पुरणपोळी डाएट वगैरे पण टाका आता इथेच >> खरंच विचारताय कि तिरकस आहे हे ? खरंच असेल तर देईन रविवारपर्यंत.

>> "खातरजमा केलेले" अशा टायटल च्या धाग्यावर टाकलाय म्हणून आता इथे टाकलेली कुठलीही माहिती बाय डीफॉल्ट खरी वाटू लागेल... हे ही इतरांसारखेच भोंदू फॉरवर्डच आहेत हे कोण आणि कसं बघणार?

म्हणूनच मी धाग्याच्या विषयात म्हटले आहे कि माहिती खरी आहे याचा आधार म्हणून एखाद्या प्रमुख वृत्तपत्रातली लिंक अथवा अन्य युट्युब वगैरे जेणेकरून आपण त्याची स्वत: कशी खात्री केली आहे हे इतरांना कळेल. जसे पहिल्या प्रतिसादात मी मूळ फोरवर्ड मध्ये एबीपी माझा वर आलेली ती बातमी आणि युट्युब वरचे प्रत्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलेले निवेदन या दोन्ही लिंक दिल्या आहेत.

काही फोरवर्ड ना अशी लिंक देता येत नाही हे मान्य (समजा "कफ सर्दी वर हमखास उपाय") पण पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने स्वत: तरी ट्राय केला असेल. कफ सर्दी वर व्हाट्सप वर आलेला एक उपाय: कोमट पाण्यात लिंबू+मध टाकून पिणे. मला ह्या उपायाचा खरंच एकदोन वेळा गुण आला मगच मी इतरांना सांगितले. असे.

अजून एक उदाहरण, गरम पाणी पिण्याचे फायदे. हे सुद्धा मी स्वत: करून पहिले. खरंच, थंड ऐवजी कोमट/गरम पिल्याने होणारे फायदे मी स्वत: अनुभवलेत. तेंव्हापासून मी ते सर्वाना सुचवतो.

अशा प्रकारे या धाग्याचा उपयोग होईल असे वाटते.

उपयुक्त फॉरवर्ड हाच विरोधाभास आहे. फॉरवर्ड हे प्रचारकीच असतात.
अतुल, गरम पाणी पिण्याचे तोटे असं शोधलं किंवा मधातील भेसळ असं शोधलं तर सर्वार्थाने भिन्न गोष्टी वाचायला मिळतील. ओपिनिअन टाईप काही असेल तर मग आणखी डेंजर.
काहीही करण्यापूर्वी स्वत: शोध घेऊन बरं वाईट वाचून मग ठरवा असं मला तरी वाटतं.

>> फॉरवर्ड हे प्रचारकीच असतात.

जास्तीकरून. पण नेहमीच नाही. मला अनेकदा उपयोग पण झाला आहे. Account balance चेक करण्याचे सर्व बँकांचे नंबर्स असलेला एक मेसेज आला होता. मला त्याचा उपयोग झाला. फायद्याबरोबर तोटे पण असतात काही गोष्टींचे. "मला तरी उपयोग झाला" असेही असेल. ठीक आहे. पण तो मेसेज अगदीच "भोंदू फोरवर्ड" नाही हे महत्वाचे.

Pages