Submitted by अतुल. on 22 June, 2018 - 02:31
मायबोलीवर भोंदू फॉर्वर्डस असा एक धागा आहेच. त्याच धर्तीवर, पण हा उपयुक्त असणाऱ्या फॉर्वर्डस साठीचा धागा.
सोशल मीडियामध्ये खोटे व दिशाभूल करणारे मेसेजेस जसे असतात तसेच अनेकदा आपल्याला उपयुक्त माहिती असणारे मेसेजेस पण वाचावयास मिळतात. खातरजमा करून ते मेसेज इथे शेअर केल्यास इतरांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण ते खातरजमा केलेले असावेत. त्यासाठी आधी आपण स्वत:हून खात्री करून संबंधित बातमीची अथवा विकिपीडियावरची अथवा तत्सम विश्वासू संकेतस्थळची लिंक द्यावी हि विनंती.
पण कृपया चांगल्या वा उपयुक्त माहिती व्यतिरिक्त अन्य Meme टाईपचे मेसेजेस (राजकीय अजेंडे, जाहिराती, विनोद, तत्त्वज्ञान, शुभेच्छा, ललित, परीक्षण, समीक्षण, आर्टवर्क इत्यादी इत्यादी) कृपया नकोत.
चांगली तसेच उपयुक्त माहिती केवळ आपल्यापाशीच का ठेवायची?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही लोक पूर्वी मूर्खासारखे
काही लोक पूर्वी मूर्खासारखे चित्रपटगॄहात लेझर मारीत आणि आपण वळून पाहीलं तर आपल्याला लाल लाईट दिसे. ते ही चूकीचच मग.
कितीही लो पॉवरचा लेझर
कितीही लो पॉवरचा लेझर डोळ्यावर मारणे/ पडणे हे अत्यंत धोकादायक असते. + १
म्हणूनच DVD player, संगणकात वापरला जाणारा DVD drive (writer) यांच्यावर सुद्धा पिवळ्या रंगाचा एक स्टीकर असतो त्रिकोणात उद्गारवाचक चिन्ह असलेला, ज्यावर Class 1 Laser Product असे लिहिलेले असते. वास्तविक DVD drive मधला laser तर DVD आत गेल्याशिवाय सुरुच होत नाही, तरीही त्यावर warning असते! मग विद्युत रोषणाई साठी वापरलेल्या laser लाईट ने किती नुकसान होत असेल!
लेझर लाईतमुळे व्हिडिओ मोड मधे
लेझर लाईटमुळे व्हिडिओ मोड मधे कॅमेरा सेन्सर खराब झाल्याच्या बातम्या आधीही वाचल्या होत्या. ( काही वर्षांपूर्वी)
डोळे खराब होतील का असं तेव्हा वाटलं होतं पण नेमकी माहिती नव्हती.
अलीकडे बहुधा जास्त पॉवर चे लेझर आले असावेत त्यामुळे एकाच वर्षी बऱ्याच ठिकाणाहून केसेस दिसत आहेत.
दोनेक महिन्यांपूर्वी कोणत्यातरी बीचवर मुलांसाठी खेळणे म्हणून लेझर लाईट पॉइंटर विकत होते, ( लहान लहान मुलंच येऊन टुरिस्टच्या गळ्यात घालत होती) . तसा एक आम्ही पण आणला.
मात्र आता न्युज वाचल्यावर पुन्हा नीट पाहिल्यावर त्यावर बारीक अक्षरात डेंजर वोर्निग लिहिलेली आहे. लहान मुलांना देऊ नका असेही आहे आणि less than १००mW अशी पॉवर लिहिलेली आहे. वर कोणीतरी दिलेल्या लिंकमध्ये लिहिलं आहे की ५mw पेक्षा जास्त असेल तर डोळ्याला इजा होण्याची शक्यता खूपच वाढते. आणि हे तर चक्क १००mw पेक्षा कमी म्हटलंय म्हणजे बरच जास्त असणार...
हे प्रॉडक्ट मेड इन चायना आहे.
हे प्रॉडक्ट मेड इन चायना आहे>
हे प्रॉडक्ट मेड इन चायना आहे>>> वाटलंच होतं. माणसाच्या जिवाशी तब्बेती शी खेळ करणारी उत्पादनं ह्या देशात प्रामुख्याने बनवतात
नकली पनिर चा साठा जप्त करणारी टोळी पकडली गेल्याची ही १ बातमी वाचली एफडीए कडून. त्यांचे अभिनन्दन!
हो लहान मुलांना ही लेझर
हो लहान मुलांना ही लेझर आजिबात देऊ नये. सांगितले तरी त्यांना किती गंभीर परिणाम होतील समजेलच असे नाही. आणि बालसुलभ उत्साहाने लेझर पॉइंट स्वतःच्या डोळ्यांकडे करून बघणे हे सहज होऊ शकते...
Pages