बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप बेटे अतीच करताहेत, महापकाऊ आहेत दोघंपण, आजचा प्रोमो पाहिला, म्हातारा पकवतोय सगळ्यांना, नावडत्या विषयाच्या लेक्चरला बसल्यासारखे चेहरे होते सगळ्यांचे. चार गोष्टी/शब्द बाकींच्यांपेक्षा जास्त माहीत आहेत असा (गैर)समज झालाय त्यांचा. त्यात भरीस भर म्हणजे माकड म्हणतो माझाच लाल ही मनोवृत्ती.

हो रिया. माझा शब्द चुकला, मला ते वेगळं वाटलं असं म्हणायचं होतं मला. अर्थात ते त्यांचं खाजगी आहे. सैची आई निघाली तेव्हा कदाचित ती स्टॅचू नसेल आणि तसंही सैचं काही सांगता येत नाही, शराला तिने फ्रिझ असताना मिठी मारली होती. डंब हा शब्द मलाही आवडत नाही. त्यापेक्षा मूर्ख हा सौम्य शब्द आहे. अति भाबडेपणा आणि बावळटपणा यातली सीमारेषा फार धूसर आहे. कितीही टक्केटोणपे खाल्ले तरी काही लोकं आपला मूळ चांगुलपणा सोडू शकत नाहीत. तेवढ्यापुरतं ठरवतात परत फसायचं नाही पण नाहीच जमत त्यांना ते.

दक्षि आज खुश होईल Lol

अगो मलापण वाटतंय की मे स पुष्कर मैत्रीत आत्तापर्यंत मेघा लॉयल आहे, बाकी दोघे अधूनमधून मेघाशी लॉयल नसतात.

अस्तादचा बाबा त्याला आणखी खड्ड्यात घालून गेलाय की काय. प्रोमोवरून तरी आमचा बाब्या ..... टाईप भाषण दिलेलं दिसलं. Rofl

बाकी bb मध्ये जास्तीत जास्त मराठी बोलावं अस मला वाटतं अगदी प्रमाण मराठीच हवं असं नाही, कोणी घरी बोलीभाषेत बोलत असेल तर तेही चालायला हवं पण इंग्लिश आणि हिंदी जास्त असू नये.

Lol Rofl सगळ्यांच्या पोष्टी भारी आहेत.

सगळ्यांच्या घरचे येऊन नुसते मुळूमुळू रडून आणि पाप्या घेऊन गाल ओले करून गेलेत.
अस्तादचे बाबा थोडा खर्डा/ठेचा घेऊन येतील म्हणून म्हणतेय मजा येईल म्हणून.

बाकी माझे बदाम आहेतच अस्त्यासाठी... Proud

अन्जू हे जरी बरोबर असलं तरी २४ तास असं कोणी विचार करकरून फक्त मराठी बोलू शकणार नाहीत. जर तसं हवं तर मग केवळ अस्ताद सारखी शुद्ध मराठी बोलणारी लोकंच निवडून सदस्य म्हणून घ्यावी लागतील. इंग्रजी शाळेतून शिकलेल्या लोकांना शुद्ध मराठी बोलता येणार नाही. आपण तरी कुठे बोलतो?

आ चे बाबा खरंच आ ची वाढलेली लोकप्रियता कमी करणार का असं प्रोमोवरून वाटतं.

पुष्की ची बायको आ वर खुश होती कारण तो सईला बोलत असतो म्हणून बहुतेक Lol

मामी शुद्ध किंवा प्रमाण पाहिजे असं नाही ग, पण अति इंग्लिश होतं कधी कधी. ह खा अति हिंदी बोलत होती.

हो ना तो ही सतत पुष्की, पुष्की करत कामे सांगते, किती जोरात ओरडतेस सई असं म्हणत असतो.

मामी तुझा मुद्दा एकदम बरोबर आहे. पण बिग बॉसचा आग्रह आहे की, जे आपण रोज बोलतो ते मराठीत असावे. अगदी शुद्ध पुस्तकी नव्हे; तर, बोली मराठी भाषा. अस्ताद एक टोक आहे, जो अट्टहासाने अति शुद्ध मराठी बोलतो. बाकीचे दुसरं टोक, शुद्ध सोडा पण मराठी सुद्धा बोलत नाहीत.
प्रोमोत अस्तादचे वडील काहीतरी बोलल्याचं आठवतंय की जो एक मराठी बोलतोय त्याच्या विरूद्ध तुम्ही सगळे गेलाय की असंच काहीतरी... ही मात्र अतिशयोक्ती आहे. त्याला (अस्तादला) शुद्ध बोलायचं आहे, बोलता येतं तो बोलतो. बाकिच्यांनी शुद्ध मराठीच बोललं पाहिजे असं नाही. आणि भाषेच्या बाबतीत कुणिही अस्तादच्या विरूद्ध गेलेलं किन्वा त्या बाबतीत त्याची चेष्टा केल्याचं निदान मी तरी पाहिलेलं नाहिये. आता आजचा भाग पाहूनच कळेल की मोठे काळे नक्की काय म्हणतायत ते.
पण बिबॉ च्या आग्रहाप्रमाणे घरातल्या सदस्यांनी निदान मराठी बोललं पाहिजे हे माझं सुद्धा ठाम मत आहे.

जो एक मराठी बोलतोय त्याच्या विरूद्ध तुम्ही सगळे गेलाय की असंच काहीतरी... ही मात्र अतिशयोक्ती आहे. >>> हो ते अतिच आचरट वाक्य होतं. म्हणजे तो मराठी शुद्ध बोलतो म्हणून त्याच्या विरोधात बोलायचं नाही असं सरसकटीकरण केल्यासारखं वाटलं. खखो काय ते आज रात्री कळेलच.

ऐकीव माहितीप्रमाणे भूषण आणि फॅमिली खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. म्हणून त्याच्या अनुपस्थितीत कोणी येऊन त्रास देत नाही ना अशी विचारणा तो बायकोला करीत होता.
(हा प्रतिसाद देऊ कि नको असा खूप वेळा विचार करून मग टाईप केलं. नियमांत बसत नसेल तर उडवला तरी चालेल.)

पुष्करची बायको किती सुंदर आहे असे सगळे म्हणत होते (घरातले) पण मला ती कोणत्याही कोनातून सुंदर वाटली नाही. तिने परिधान केलेला वेष आणि जोडे खूप चांगले होते आणि ते तिला शोभून दिसत होते. ती मुळात हवाईसुंदरी असल्याने तिला थोडं प्रभावी वेषभूषे विषयी ज्ञान असावं. (किन्वा ती ते शिकली असावी)
दुरून छान नक्कीच दिसली... आकर्षक... पण सुन्दर नक्कीच नाही.

दक्षि चौगुले आणि बऱ्याच जणांनी ठरवलं की व्हिलन त्याला त्याच्या प्रमाण मराठी आणि तेही सविस्तर बोलतो त्यावरून.

अर्थात मराठी, मराठीच्या बोलीभाषा चालायला हव्यातच. उलट मस्त वाटेल ऐकायला.

बादवे, जास्मिन जरी बरेचदा इंग्रजीत बोलत होती तरी जेव्हा जेव्हा ती मराठीत बोलली तेव्हा अगदी व्यवस्थित उच्चार होते तिचे. झ, च वगैरे अक्षरांच्या उच्चारात अमराठी पब्लिक फुल झोल करतं. तसं नाही केलं तिनं.

अस्ताद एक टोक आहे, जो अट्टहासाने अति शुद्ध मराठी बोलतो.<< मला कधी त्याचं मराठी अति शुद्ध वगैरे वाटलं नाही. नॉर्मल आहे. अट्टाहासानेही वाटलं नाही. असे कुठलेच उगाचचे जडजंबाल शब्द नसतात त्याच्या बोलण्यात.

आणि भाषेच्या बाबतीत कुणिही अस्तादच्या विरूद्ध गेलेलं किन्वा त्या बाबतीत त्याची चेष्टा केल्याचं << ते बहुतेक त्या किशोर चौगुलेने म्हणले होते ना खूप मराठी बोलतो म्हणून माज वगैरे.. तो संदर्भ आहे. काळ्यांचं सात्विक संतापलेलं फेबु स्टेटसही होतं त्यावरून.

ऐकीव माहितीप्रमाणे भूषण आणि फॅमिली खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. म्हणून त्याच्या अनुपस्थितीत कोणी येऊन त्रास देत नाही ना अशी विचारणा तो बायकोला करीत होता. >> ओह, असं आहे का? अरेरे, या विवंचनेतून तो लवकर बाहेर येऊ दे.

दक्षि चौगुले आणि बऱ्याच जणांनी ठरवलं की व्हिलन त्याला त्याच्या प्रमाण मराठी आणि तेही सविस्तर बोलतो त्यावरून. >> अर्रे! हो मी विसरलेच.. अस्ताद मराठी बोलतो तेव्हा बातम्या दिल्याप्रमाणे बोलतो असं म्हणाला होता तो चौघुले.

मी पण एक सांगते की माझं माझ्या भाषेवर प्रेम होतं.. पण मी स्वत: इतकी आग्रही नव्हते... मायबोलीवर आल्यानंतर माझं मराठी खूप सुधारलं आणि भाषा प्रेम पण खूप दृढ झालं. Happy

मला कधी त्याचं मराठी अति शुद्ध वगैरे वाटलं नाही. नॉर्मल आहे. अट्टाहासानेही वाटलं नाही. असे कुठलेच उगाचचे जडजंबाल शब्द नसतात त्याच्या बोलण्यात. >> अगं म्हणजे इतरांच्या मानाने म्हणतेय मी. मला ही त्याचं बोलणं उच्चार ऐकायला फार आवडतं. क्ष चा उच्चार तो सुधिर आणि श्रीधर फडक्यांसारखा करतो Happy

काळ्यांचं सात्विक संतापलेलं फेबु स्टेटसही होतं त्यावरून. > हो का नी? फॉलो करायला पाहिजे त्यांचं पेज.

दक्षे, पुष्करची बायको ४-५ च महिन्यांपूर्वी बाळंत झालीये. त्यामुळे चेहर्‍यावर बेबी फॅट असणार ना थोडं तरी.

Pages