बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही, मुलाचं नाव बहुदा मानव आहे.
संदेश/सँडी जो आहे तो ३८ वर्षाचा आहे वगैरे म्हणत होती, सोशल मिडीयावर बॉ.फ्रे आहे म्हणतायेत, काय माहित खरं काय ! >>>> ओह्ह, मला वाटले तिचा मुलगा आहे संदेश

कालचा सर्वात महान किस्सा....
शर्मिष्ठा ची बहीण आली तेव्हा पुश्की कडु ला म्हणाला " ईज दॅट युर वाईफ ? " आणि कडु एकदम घाबरत घाबरत पुढे येउन म्हणतो "नाही"
आणि त्यावर त्या सुप्रिया ची काहीही प्रतिक्रिया नव्हती..एकदम ब्लँक फेस...
हसुन हसुन लोळलो आम्ही घरात...असं कोण कोणाला विचारेल का ? काहीही..पुश्की निरागस आहे की येडपट कळतच नाही कधीकधी..
मेघा ची मुलगी एकदम गोड...कडु चा मुलगा पण मस्त होता...कडु ची बायको मस्त आहे..चेहेरा गोड आहे...
मेघा ने काहीही केलं की अस्ताद ला का बरं खटकतं...आणि पुश्की लगेच री ओढतो त्याची...मेघा ला परत फ्रीज व्हायच्या आधी सई च्या आई ला काहीतरी सांगायचं असु शकतं ना....सई न ती बघुन घेतील बाकीच्यानी लगेच कशाला कमेंट करायची...कुचकटपण फार आहे आस्ताद मद्धे..मेघा विरुद्ध बाकी मेंबर्स मद्धे उगीच काड्या टाकतो...
मेघा ची आई कित्ती साधी आहे...आवडली.
आउं ना शो मधे आणण्यापेक्षा त्याच्या मुलालाच आणायचं ना...स्मार्ट्,हँडसम मुलांची कमीच आहे तसही बीबी मधे. Wink
पुश्की आणी त्याच्या बायकोची भेट बघुन एकदम भरुन आलं..खरच तो खुप प्रेम करतो बायकोवर आणि पोरीवर हे जाणवतं...
आज काळे टीचर काय शिकवतात बघु...

आज काळे टीचर काय शिकवतात बघु...>> त्यानी आधी स्वतःच्या मुलाला शिकवाव्यात चार गोष्टी मग ईतरांचे क्लास घ्यावेत.

मेघाची मुलगी एकदम आवडली. मेघा तिला घर बघायला घेऊन गेली हे फारच आवडलं. क्युट वाटलं.
भूषणची बायको एकदम सुलझी हुई आणि मॅच्युअर वाटली. तिचं ड्रेसिंग आणि ती ज्या पद्धतीने सर्वांशी बोलली तेही आवडलं.
सईच्या आईने आणि पुष्कीच्या बायकोनेही सई-पुष्की जोडी फोडायचं ठरवलेलं दिसतंय Lol सई तर काही आईचं ऐकणार नाही पण पुष्कीला बायकोचं ऐकावंच लागेल! Proud
आऊंचा चेहरा स्टॅच्यु झाल्यावर काहीतरी विचित्रच दिसतो, पाहिलंय का?

प्रमोद काळे आज स्पीच थेरपी आणि लॅन्ग्वेज अ‍ॅक्युरसीचा म्युट क्लास घेणार बहुतेक! कार्यशाळा घ्यायची सवय आहे त्यांना Proud

लोकहो, नवीन इक्वेशन्स होताना दिसतायेत का? शर्मिष्ठा एलिमिनेट होईल या वेळी बहुतेक.
मेघा-सई-स्मिता-आऊ एकीकडे आणि रेशम-आस्ताद-पुष्की-किशोर असं होईल असं वाटतंय मला. भूषण अ‍ॅज युज्वल ऑन द फेन्स. जिथे फायदा तिथे उडी मारणार तो.

खर तर भूषण ला मानलं पाहिजे ,बायकोला एवढा विश्वास दिलाय कि तिला वाटत कि आपला नवरा किती साधाभोळा आहे ,काही तरी टिप्स दे रे भूषण आम्हाला पण ,आमच्या घरी बायको तर आम्हालाच खाली मुंडी पाताळ धुंडी म्हणते. Wink

बाकी आज सईच्या आईने पुष्करला आणि पुष्करच्या बायकोने सईला फार काही गुड व्हाइब्ज नाही दिले असं वाटलं का कोणाला ? >>> हो डिजे. मला वाटलं. जास्मिन तर फार ऑबवियस होती. खरंतर सई सगळ्यात पहिलेच आणि अगदी समोर उभी होती. पण तुझ्याशी नंतर बोलते म्हणून बाकिच्यांकडे गेली. मग सईकडे जाऊन पुष्करला कश्या अनेक लेडीफ्रेंड्स आहेत म्हणाली. ते मुद्दाम कसला दाखवायला की तू कोणी त्याच्यासाठी स्पेशल नाहीस. पण ते ठीकच आहे. ती पुष्करची बायको आहे आणि सई-पुष्कीच्या मैत्रीमुळे तिला थोडं असुरक्षित वाटू शकतं.

शर्मिष्ठा एलिमिनेट होईल या वेळी बहुतेक. >>> bb ला नको असेल तर होईल, नाहीतर पब्लिक voting मिळेल जास्त. मे स चे सगळे fans पाठीमागे आहेत तिच्या.

ती पुष्करची बायको आहे आणि सई-पुष्कीच्या मैत्रीमुळे तिला थोडं असुरक्षित वाटू शकतं.
<<
अ‍ॅब्सोल्युट्ली !
सईची आई आणि जॅस्मिनच्या येण्याने इक्वेशन थोडी बदलणार असं वाट्तय !
आज बाकी शर्मिष्ठाच्या बहिणीने येऊन मिसगाइड केलं असं वाटलं, त्या दोघी (सई-मेघा)दिसतात , तू दिसतच नाही चालु होतं !
मला वाटत शर्मिष्ठाला मिळतय एक्स्पोझर आणि मेघा सपोर्टर्सना, सोशल मिडीयावर तरी खूप आवडतेय ती !

बायकांपेक्षा जास्त गॉसिप करतोय हा वळू अस्ताव्यस्त! पुष्कर सारखं अस्थिर मनाच्या माणसाचे kahi खरे नाही कधीही तळ्यात मळ्यात करतात! #voteforSharmishtha

विकेंडच्या एपीत एका सिनमधे स्मिता ममांला बोल्ली की तीने ठरविले की तीला काही ऐकु येत नाही यावर एवढे का रीअ‍ॅक्ट झाले ते Uhoh
मलाही आहे तशी सवय, एकादा ठरविले की दुर्लक्ष करायचे तर कानाजवळ येऊन किंचाळले तरी फरक पडत नाही.

बाकी ममांनी आता फक्त स्मिताला ओरडण्यापेक्षा दुसरे काहीतरी करावे, त्यांची शाळा खुपच बोर होतेय.

विकेंडच्या एपीत एका सिनमधे स्मिता ममांला बोल्ली की तीने ठरविले की तीला काही ऐकु येत नाही यावर एवढे का रीअ‍ॅक्ट झाले ते Uhoh
मलाही आहे तशी सवय, एकादा ठरविले की दुर्लक्ष करायचे तर कानाजवळ येऊन किंचाळले तरी फरक पडत नाही.

बाकी ममांनी आता फक्त स्मिताला ओरडण्यापेक्षा दुसरे काहीतरी करावे, त्यांची शाळा खुपच बोर होतेय.>>> +१
ममां तसेपन खार खाऊन असल्यासारखे राहतात स्मिता वर..
तीच जरा आय कँडी आहे घरात.. आणि नुसती बाहुली नाही तर फुल्ल फायटिंग स्पिरीट असणारी.. असो..

पुष्कर खूपच बावचळल्यासारखा वागतोय. सईला एकदा म्हणत होता मेघा तुझ्या आणि तुझ्या आईच्यामधे आली ते नाही आवडलं. इमोशन्स असतात ना वगैरे वगैरे.

आणि जेव्हा सई म्हणाली की मी इतकी खुष होऊन तुला सगळे करायला आले तर तू लगेच बाजूला झालास तर स्टॅच्यु होण्याच्या मातीचं स्पष्टीकरण देत बसला. मग आता सईच्या इमोशन्सचं काय झालं? आणि वर नंतर स्वतःच तिला म्हणे तू अस्तादला आधी हग केलंस. पार खुळखुळा झालाय त्याचा. असाही वाजतो आणि तसाही वाजतो.

मेघाच्या मुलीनं सावध केल्यामुळे मेघा आता पुष्करवर लक्ष ठेऊन राहील बहुतेक.

अस्तादच्या डोक्यात मेघा जाते कारण कोणी मुलगी त्याला भाव न देता स्वतःच्या अक्कल हुषारीवर, बाहेर आधीपासून काही फॅन्स वगैरे नसताना उत्तमपणे, चलाखीने, माणुसकीने वागून खेळात पुढे जात आहे हे झेपत नाहीये त्याला. त्यामुळे अत्यंत घाणेरडेपणे तो तिच्या बोलण्यावरून, मेकपवरून, स्ट्रॅटेजी आखते म्हणून, कामं कॅमेरा दिसावं म्हणून करते वगैरे कमेंट्स करत असतो. त्याचा फोकस सतत सबंधवेळ मेघा नाहीतर स्मितावर असतो. त्याच्या वडिलांनी येऊन त्यालाच झापावं खरंतर.

एका वीकेंडच्या वाराला रेशमला मेघानं जे थुत्तरफोड उत्तर दिलं होतं "मी पाच तास कार्पेट साफ करते ते सगळं दाखवतील असं वाटण्याइतकी मी मूर्ख नाही" यानंतर मेघा दाखवण्यासाठी कामं करते हा मुद्दा ड्राॅप झाला आपोआप. चांगली थोबाडीत बसली व्हिमंच्या.

मेघाच्या आईनंपण मस्तपैकी सगळ्यांसमोर "तू बोल मला आवडतं तू बोललेलं" असं बोलून धमाल चिमटा काढला.

तीच जरा आय कँडी आहे घरात.. आणि नुसती बाहुली नाही तर फुल्ल फायटिंग स्पिरीट असणारी.. असो.. >>> +११११

ती खुप छान आहे , मनानेही साफ वाटते. पण तीचा डंबपणा नडतो.

ती खुप छान आहे , मनानेही साफ वाटते. पण तीचा डंबपणा नडतो.>> मी कधीच तिला ह्या शब्दाने हिणवणार नाही..मला तो शब्द अज्जिब्बात आवडत नाही.. ती डंब नाहीए.. ती सार्यांच मन राखायला जाते ते चुकतं.. मेघाच्या मुलीने स्मिताला जे म्हटलं ते खुप आवडल मला.. ऑ मोमेन्ट होता तो मस्त..

टीना म मां अतिच करतात स्मिताबाबत, बिचारी बावचळते जास्त, तिने धसकाच घेतलाय त्यांचा. मला तर संशय येतोय की कडूला मतं कमी असतील तरी तो फेवरेट आहे म मां चा, बिचारी स्मिता सॉफ्ट टारगेट. हिचा बळी देतील यावेळी अशी मला भीती वाटतेय.

मी कधीच तिला ह्या शब्दाने हिणवणार नाही..मला तो शब्द अज्जिब्बात आवडत नाही.. ती डंब नाहीए.. ती सार्यांच मन राखायला जाते ते चुकतं.. मे >>> टीना, मलाही आवडते स्मिता, पण आपण नेहमी प्रत्येकाला आंनदी नाही करु शकत , हे कळायला हवे तीला . म्हणुन मी डंब बोल्ले तीला.

टीना म मां अतिच करतात स्मिताबाबत, बिचारी बावचळते जास्त, तिने धसकाच घेतलाय त्यांचा. मला तर संशय येतोय की कडूला मतं कमी असतील तरी तो फेवरेट आहे म मां चा, बिचारी स्मिता सॉफ्ट टारगेट. हिचा बळी देतील यावेळी अशी मला भीती वाटतेय. >>>. अंजुताई +११११११

मेघाला बाहेर काय चाललय हे जाणुन घेण्यात जास्त ईंटरेस्ट होता मुलीकडून.सो तिने मुलगी हा ईंफोर्मेशन सोर्स सोडला नाही.मुलीला नाचत घेऊन गेली रुम दाखवायला.
आईलाही हाताला धरुन न्यायला हवं होतं.आई एकटीच फिरत होती.
बाकी तो मेघाचा ड्रेस त्यावेळचा फनी होता.

हो आस्ताद खुपच जळतो मेघावर, तिला खाली पाडायची एक संधी सोडत नाही. काल मे ची मुलगी नीट मराठी बोलली तर त्यावरून हा लगेचच घरातल्यांना सांगत होता की 'मेघा तर बोलते आम्ही घरी मराठीत बोलत नाही, बरी तर बोलतेय की तिची मुलगी' आणि त्यावर कोत्या मनाचा भुषण पण लगेच 'तिने स्वतःची डिक्शनरी बनवली आहे' असे म्हणाला.
अरे हो बोला काय तुम्हाला तिच्याविषयी बोलायचे आहे ते पण जरा तिच्या घरातल्यांना बाहेर तर जाऊदे.किती ती मळमळ.

पुष्की व्हाइनी बेबी झाला आहे. काहीही तक्रारी असतात त्याच्या. किती ती इन्सिक्युरिटी!! हग देणार होतो पण फ्रीझ झाले असते, मग तू आस्तादलाच ५ मिनिटे हग केले, मग काय मेघा तुझ्या आईशी का बोलली. अरे काय प्रॉब्लेम आहे याचा Uhoh ( अजून २-३ महिने इथेच राहिला तर बहुधा सईवर बायकोसारखा हक्क दाखवायला लागेल!)
सईची आई नीट बोललीकी पुष्कीशी. आपण आइसक्रीम खायला जाऊ वगैरे. जास्मिन ने मात्र सईला गुड व्हाइब्स दिल्या नाहीत याला +१११! जरी ती सईला तू छान खेळतेयस म्हणाली तरी ती आऊला जे बोलली त्यावरून क्लियर होतं तिला काय वाटतंय ते. ते आता पुष्कीला कळल्यावर रड्या अजून घाबरतोय का ते बघायला लागेल Happy
भूषण चा "त्रास आहे का कुणाचा" हा प्रश्न मीही नोटिस केला. काय भान्गड आहे कुणास ठाऊक. त्याचा मुलगा गोड आहे एकदम. तो आत आला आणि भूषण ला काय करावे सुचले नाही ते क्यूट होते एकदम. बिचारा बाबाला रडताना बघून कसनुसा होऊन रडायला लागला.
शर्मिष्ठाच्या बहीणीने तिला जरा अति पुश केले असे वाटले. बिचारीचा आहे तो कॉन्फिडन्स जायचा अशाने.
प्रोमो मधे आस्तादच्या बाबांचे बोलणे ऐकून मज्जा आली. मलाही तसेच वाटते नेहमी त्याच्या शुद्ध भाषेची टिंगल होते तेव्हा.
बाकी बास बाबा आता रडारड. फार बोअर झाले आता.
या फॅमिली ड्राम्याने ग्रुप ची इक्वेशन्स खूप बदलतील असे तरी नाही वाटले पण काही लोक मेन्टली वीक होऊ शकतात.

कोण तो संदेश आहे त्याच्याशी कॅमेर्‍यासमोर वय १८ असल्यासारखे लाडे लाडे बोलत होती रेशम. सेम हेच बोलणे आणि हीच नजर राजेश सोबत बोलताना असायची असे वाटून गेले नाही म्हटले तरी. त्या संदेश ला फार स्ट्राँग असावे लागेल इन्सिक्युअर न होण्यासाठी! असो.

आस्ताद, भूषण आणि आऊ सोडले तर कुणीच १०० % शुद्ध मराठी बोलत नाही त्या घरात. आऊंचं मराठी बरं असलं तरी पुस्तकी प्रमाण भाषा नाही, हेल आहे. रेशम अजिबात शुद्ध बोलत नाही. तिचं मी आली-मी बोलली खटकत नाही का आस्तादला ?! बाकी सगळ्यांचीच भिस्त कमी जास्त प्रमाणात मिंग्लिशवर आहे तर मेघाच्या मराठीवर एवढा आक्षेप का हेच मला कळलं नाही. तिच्या मिंग्लिशमध्ये जेवढं मराठी असतं तेवढं ती उत्तम पद्धतीने आणि ठामपणे बोलते. खरं तर स्मिता, सई किंवा पुष्करइतकं मिंग्लिश नाही बोलत ती.
मेघाबद्दल बाकी किती निगेटिव्हिटी प्रत्येकाच्या मनात आणि इतक्यांदा खेचतात तिची पण बर्‍याचदा ती हसून दुर्लक्ष करतानाच दिसलीय आत्तापर्यंत, एक आऊटबर्स्ट सोडला तर ! पुष्करला मेघा अजिबात आवडत नाही ( सई सुद्धा कितपत आवडते प्रश्नच आहे ! ) दुसरा काही पर्याय नाही म्हणून त्यांना चिकटून आहे एवढंच. अजिबात लॉयल नाही तो. सई सुद्धा मेघाबद्दल भरपूर बोललीय मागून पण मेघा मात्र सई-पुष्करच्या मागून त्यांची बाजू घेतानाच दिसलीय कायम.
स्ट्रॅटेजी असली तरी ती कंसिस्टंसी दाखवू शकलीय इतके दिवस ह्याचे श्रेय तरी तिला मिळायला हवेच. शेवटी हे काही खरे घर आणि खरी आपली माणसं वगैरे नाहीत, चोवीस तास कॅमेर्‍याखाली राहणारे एकमेकांचे स्पर्धक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही पण अभ्यास करुन यायचा होता... कुणी अडवलं होतं !

पण एकूणच घरातल्या सर्व मुली मी आली, मी गेली, मी बोलली असंच मराठी बोलतायत.
अस्ताद चे वडिल कधी येणार आहेत? आज ना? मज्जा येणार खूप. Proud

सुशांत, थत्ते व जुई या तिघांचं मराठी छान होतं. बाकी, आस्तादच्या वडिलांनी त्याचेदेखिल चुकीच्या गोष्टींबद्दल कान उपटले तर ते चांगले वाटेल. केवळ इतर स्पर्धकांवर डाफरणे उगाच लोकांमध्ये वाईट संदेश देईल असे वाटते. मग, पुणे, ब्राह्मण अश्या नाही नाही त्या वळणांवर जाईल हा आस्तादचा विषय.

Pages

Back to top