Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उद्या आस्ताद चे बाबा
उद्या आस्ताद चे बाबा सगळ्यांचा मराठीचा क्लास घेणारेत !>> अरे आवरा ह्या दोघांना.. काळे किती बिचिंग करतो, बायकांच्या वरताण आहे. मेघाच्या घरी बोलल्या जाणाऱ्या मराठीवरून काहीतरी पिंक टाकली त्याने. एकदम छपरी.
त्या भूषणची बायडी म्हणत होती भूषण साधा आहे गेम खेळता येत नाही, ह्यांव अन त्यांव. खरेतर भूषण एकदम बेरकी आहे ह्या सर्वात.
शर्मिष्ठा ची बहिण कशी काय
शर्मिष्ठा ची बहिण कशी काय आली? त्यापेक्षा अनेक दिवस जे कुटुंबाला भेटले नाहियेत त्यांच्या घरच्यांना प्रथम बोलवायला हवे होते ना?
शर्मिष्ठा जबरदस्तीए रडतेय असं वाटत होतं
पुष्कर ला नक्की काय खटकलं आहे? (मेघाचं वागणं) ती सईच्या आईला आत घेऊन गेली म्हणून का?
पुष्कर ला नक्की काय खटकलं आहे
पुष्कर ला नक्की काय खटकलं आहे? (मेघाचं वागणं) ती सईच्या आईला आत घेऊन गेली म्हणून का?>>सई न तिच्या आईला मेघाने एकांत वेळ दिला नाही म्हणून त्याची चिडचिड झाली.
सई-आई बरोबर मेघाने आत जायला
सई-आई बरोबर मेघाने आत जायला नको होतं,अगदी थोडावेळही.त्यांना प्रायवसी द्यायला हवी होती, असं पुष्करचं म्हणणं होतं.
पुष्कर ला नक्की काय खटकलं आहे
पुष्कर ला नक्की काय खटकलं आहे? (मेघाचं वागणं) ती सईच्या आईला आत घेऊन गेली म्हणून का?>>>
कदाचित त्याला वाटलं असेल की आता या दोघींना सईची आई आपल्या बद्दल काहीतरी सांगेल.
(मेघाची मुलगी बोलून गेली ना की पुष्कर काकापासून सेफ रहा.)
कोणीतरी भूषणच्या मुलाच नाव सांगा ना....
सर्वात इमोशनल दोन दिवस bb चे.
सर्वात इमोशनल दोन दिवस bb चे. मेघाची मुलगी फार गोड. भूषणचा मुलगा पण गोड.
मेघाच्या मुलीने नक्की काय सांगितलं की मे स पुष्करला बोलल्या.
शर्मिष्ठा ची बहीण मेसेज देऊन गेली तिला, गुलाम म्हणून राहू नकोस.
उद्या पुष्करचं बाळ येणार. आ चे बाबा काय रोखठोक शाळा घेणार काय सर्वांची.
कोणीतरी भूषणच्या मुलाच नाव
कोणीतरी भूषणच्या मुलाच नाव सांगा ना.>> +111 ..प्रकिर्त असं ऐकू येत होतं.
मेघाची मुलगी आतून प्रचंड
मेघाची मुलगी आतून प्रचंड नर्व्हस आहे बहुधा, तिने कुणालाही मिठी मारली की माईक मध्ये तिच्या हार्ट बिट्स ऐकू येतायत. असं दोन वेळेला झालं.
मेघाचा आताचा ड्रेस खूप बेढब आहे.
morpankhis बदाम तयार ठेवा....
morpankhis बदाम तयार ठेवा....
मेघाचा आताचा ड्रेस खूप बेढब आहे. >>>हाच ड्रेस तिने आधीसुद्धा घातला होता.
स्मिता बसली होती तेव्हा आस्ताद नेमका काय बोलत होता?
शर्मिष्ठा ची बहीण मेसेज देऊन
शर्मिष्ठा ची बहीण मेसेज देऊन गेली तिला, गुलाम म्हणून राहू नकोस.>> हे कधी झालं?? मी मेघाची आई आणि मुलगी आल्या त्या पॉईंटपासून पाहिलं
स्मिता बसली होती तेव्हा आस्ताद नेमका काय बोलत होता?>> mermaid म्हणाला तिला ते ऐकलं..
हाच ड्रेस तिने आधीसुद्धा
हाच ड्रेस तिने आधीसुद्धा घातला होता.>> नाही फक्त खालचं घातलं होतं, नारळ देऊन कॅप्टनसीच्या टास्क च्या वेळी, पण वरती वेगळं होतं. आजचं वरचं फारच बेढब आहे.
सई चा फोटो अप्रतिम आहे.
morpankhis बदाम तयार ठेवा....
morpankhis बदाम तयार ठेवा....
नवीन Submitted by 카버 on 13 June, 2018
>>>>>>>>>>>>>>
o m g...
कसली सुंदर दिसतेय ती. .... डोळ्यात बदामच बदाम..
थॅन्क्स 카버 ....
इथ डोळयात बदाम असलेली स्मायली
इथ डोळयात बदाम असलेली स्मायली कशी टाकयची माहीत आहे का?, तशी सोय आलेली आहे का ?
सगळे ज्याप्रकारे आपल्या
सगळे ज्याप्रकारे आपल्या घरच्यांना बीबाॅचं घर दाखवताहेत, या सगळ्यात रेशम सगळ्यात शांत वाटते, ना तीने मुलीला घर दाखवलं ना तिच्या मुलीने तिला काही विशेष सूचना केली. भूषण निष्पाप आणि साधा आहे त्याच्या बायकोच्या मते सुशांतला खरंच असं वाटतंय की भूषण जिंकेल, सुशांत आणि आस्ताद म्हणजे मूर्खांचं नंदनवन आहेत.
स्मिताला कळलं नाही की तो आऊंचा मुलगा आहे कारण तो पहिलाच होता त्यादिवशी कोणाच्या तरी घरून भेटायला येणारा, नसेल वाटलं तिला धावत जाऊन बघावसं. भूषणची बायको मला विभावरी देशपांडेसारखी वाटली. भूषण त्याच्या बायकोला सारखा विचारत होता की कुणी त्रास देत नाही ना ते विचित्र वाटलं. सुप्रियाने पटकन सांगायचं ना की ती शराची बहिण आहे, किती तो गैरसमज.
पुष्कर super jealous आणि
पुष्कर super jealous आणि super insecure !!
स्मिताला कळलं नाही की तो
स्मिताला कळलं नाही की तो आऊंचा मुलगा आहे कारण तो पहिलाच होता त्यादिवशी कोणाच्या तरी घरून भेटायला येणारा
>>
अर्थात ना.. आपल्याल तरी कळालं का तो कोण आहे ते
पण बाहेरुन कोणी तरी आलंय तर ते कुठे आहे किंवा इतर मेंबर्सना माहित आहे का हे वाटून रिलिज झाल्या झाल्या त्यांच्याकडे धावत सुटणं ही प्रतिक्रिया असते जनरली लोकांची.
ही म्हणजे .... !!! असो!!!
भूषण त्याच्या बायकोला सारखा विचारत होता की कुणी त्रास देत नाही ना ते विचित्र वाटलं. >>> आपल्याला काय माहीत त्यांच्या आयुष्यात काय चालूये.. आपल्याला दिसतंय म्हणून ;अगेच आपल्याला विचित्र बिचित्र वाटतं
बोर झाला हा टास्क... अधे मधे
बोर झाला हा टास्क... अधे मधे घरातले लोक फ्रीझ होत होते तर मधे मधे व्हिडिओ फ्रीझ होत होता. वैताग!!!
आज मोहंमद अली रोड वर खादाडी
आज मोहंमद अली रोड वर खादाडी करायला गेलो होतो आम्ही तेव्हा अभिजित नाडकर्णी अगदी बाजूला उभा होता माझ्या ... तो आणि बहुदा ते फ्रेंड्स असावेत ते सगळे उभे राहून गप्पा टप्पा करत होते... माझ्या मम्मी चं लक्ष गेलं. ( "शी मी नाही ते तुमचं बिग बॉस बघत" असं म्हणणाऱ्या माझ्या मतोश्रींनी च त्याला ओळखलं हे नवल च )
मस्त दिसतो तो. पण उंची नॉर्मल वाटली मला , म्हणजे माझ्यापेक्षा 2 ते 3 इंचानी कमी आहे त्याची उंची..म्हणजे तो उंच नाहीय इकडे सगळे बोलतात त्या प्रमाणे... पण गोरा वगैरे आहे ...उ ना चा मुलगा म्हणून शोभत नाही... त्यांच्या मानाने फार च सात्विक वगैरे दिसतो..
सईची आई जाताना सगळे फ्रिज
सईची आई जाताना सगळे फ्रिज होते तरी सई गप्पा कशा मारत होती आणी घरात कशी आली?
भूषण साधा आहे गेम खेळता येत
भूषण साधा आहे गेम खेळता येत नाही,
>> Lol..त्याच्या पार्श्वभागावरच्या खोबर्याच्या वाट्यांवर लाथ घालून हाकलले पाहिजे.
क. लिंबू सर्वात आधी
क. लिंबू सर्वात आधी शर्मिष्ठाची बहीण आली होती.
काल सकाळी उठल्यावर काचेवर बहुतेक bb घर काढून स मे ने त्यांच्या grp ची नावं लिहिली, त्याभोवती स्मिताने लव चिन्ह काढून पूर्ण केलं, कित्ती गोड. रेशम मात्र चिडली तिचं नाव नाही म्हणून. कित्ती फरक आहे रे आणि स्मिता स्वभावात.
रे वैतागली ते येऊन सईने पुष्करला सांगितलं, तर पुष्कर म्हणाला त्यांची नावं लिहायला हवी होतीस, कोणाला hurt कशाला करायचं, तो पण कित्ती गोड.
मला पण भूषणच्या बायकोत विभावरी देशपांडेचा भास झाला.
कालचा भाग खरंच बोअर झाला.
कालचा भाग खरंच बोअर झाला. प्रत्येकवेळी कोणतरी येऊन मग त्यांच्या इमोशन्स आणि सगळ्यांच्या रडारडी, मग एकमेकांना समजवणे. पण यामुळे त्यांचे एकमेकांत बॉन्डींग होतंय का ते आता बघावे लागेल. बाकी आता पुढील खेळाला मजा येणार आहे कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी टीप्स मिळाल्या आहेत.
पुष्करची बायको आल्यावर सगळेजण किती सुंदर्, छान दिसते असे काहीतरी म्हणत होते पण तिचा मेकअप बघून तसे काही वाटले नाही. ती सईला पुष्कर हा बायकांना खूप आवडतो, He has lot of girls fans असे काहीतरी सांगत होती. त्यावेळी सईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. पण तिने सईला ओव्हरऑल काहीच रेस्पेट दिला नाही असे वाटून गेले. पुष्करची बायको हे सांगता सांगता सईच्या झिंज्या उपटेल काय असेही वाटत होते.
मेघाच्या मुलीने मेघा आणि सईला पुष्करपासून सावध रहा असे सांगितले. हे म्हणजे तिला बिग बॉस टीम कडून असे सांगावे असा प्रस्ताव मिळाला असावा असे वाटले.
ती काहीतरी dady ने सांगितलं
ती मेघाची मुलगी काहीतरी dady ने सांगितलं असं म्हणाली ना तो निरोप देताना.
पुष्करच्या बायकोचा मेकअप मला पण नाही आवडला पण मागे फोटो बघितलेले लग्नाचे बहुतेक, तिथे आवडलेली मला.
शर्मिष्ठाच्या बहिणीचा मेकअपपण जास्त वाटला मला.
होय. केवळ रेशमची मुलगी,
होय. केवळ रेशमची मुलगी, कसलाही हेतू न घेता आली होती असे वाटले. बाकी सगळे गेमच्या दृष्टीने कसले तरी सिग्नल्स देत होते, तिने तसे काही केले नाही. मेघालासुद्धा रेशमशी मैत्री कर असंच सांगून गेली ती. छान बोलली एकदम. रेशमने तिला, माझे सगळे पैसे उडवू नको, थोडे ठेव मला असे म्हणने मस्त वाटले एकदम. भूषणची बायको भारी वाटली.
स्मिताची आई छान आहे खूप .
स्मिताची आई छान आहे खूप . मस्त गप्पा मारल्या , लेकीला पण समजावले .
सई ची आई थोडी लाऊड वाटली . आऊचा मुलगा पण छान . रेशमी ची मुलगी पण गोड, निरागस .दोधींचे बॉण्डिंग छान आहे एकदम.
भूषण ची बायको ठीक. मुलगा क्युट आहे एकदम.
मेघा ची मुलगी आणि आहे किती छान आहेत . मेघा सर्वात आवडते आता . तीच जिंकायला हवी .
मामी माझ्याकडून मेघा ला वोट करा .
पुष्कर ची बायको पण ठीक . पुष्कर किती रेस्टलेस वाटत होता . खूप इन्सिक्युअर वाटत होता .
लवकर जा म्हणा आता .. खूप sacrifice केला फॅमिली साठी . सई ला ह्ग करायला पण घाबरत होता .
शरा ची बहीण पण मस्त बोलली .
मेघालासुद्धा रेशमशी मैत्री कर
मेघालासुद्धा रेशमशी मैत्री कर असंच सांगून गेली
<<
तोच तर सल्ला होता
ऑब्झर्व्ह केलं का? बर्याच फॅमिली मेंबर्सना अर्थात माहितेय बाहेर सर्वात पॉप्युलर मेघा आहे, सगळे मेघाची स्तुति करत होते आणि मेघाशी छान रहा, मैत्री ठेवा टाइप सल्ले मिळत होते !
सईची आई तर कित्ती वेळा सांगत होती , मेघा बरोबर रहा , मेघाशी का भांडलीस वगैरे.. शिवाय मेघाच्या मुलीकडून निरोप पाठवला कि पुष्करपासून सावध रहा म्हणून !
मेघाची मुलगी मेघा सारखीच सॉलिड होती, मस्तं सल्ले दिले सगळ्यांना आणि पुष्कीला, अस्तादला भारी टोमणे मारले तिनी, मेघाला म्हंटली जास्तं गॉसिप करु नकोस
पुष्कीची जॅस्मिन आवडली, बोले तो क्लासी .. मस्तं ड्रेस आणि शुज !
पुष्की किती तो ढसाढसा रडतो, नळ सुट्ल्या सारखा, टु मच ड्रामा, इतकं कस काय रडु येतं ?
पुष्करला हार्मोन्स वर कंट्रोलची एकंदरीतच फार गरज आहे , किती पझेसिव सईशी मैत्रीच्या बाबतीत , अस्तादला हग का दिलीस , मेघा आत का आली तुझ्या आई बरोबर , व्हॉट नॉन्सेन्स ! किती जेलस !
तरी नुकतीच मांजरेकरांची बोलणी खल्ली म्हणून निदान आमने सामने तरी बोलला मेघाशी !
मेघावर तर सगळेच कित्ती जळतात.. पुष्की आणि आस्तादही वेळोवेळी जळजळ दाखवतात, ज्याचा काही उपयोग होणार नाही असे टिव्ही सिरियल्स मधल्या सासू/जेठानी टाइप टोमणे मारतात !
Btw रेशमचा ‘संदेश’ कोण आहे ? रिअल बॉयफ्रेंड का ?
बाकी आज सईच्या आईने पुष्करला आणि पुष्करच्या बायकोने सईला फार काही गुड व्हाइब्ज नाही दिले असं वाटलं का कोणाला ?
पुष्कीची बायको आउंना म्हंटलीही कि तुम्ही त्याला करेक्ट सल्ले देता (रीड : सईच्या मागे न करायचा, बायकांच्या डोक्यात एकदा संशय गेला कि पट्कन बाहेर निघत नाही. )
सईला सुरवातीला म्हंटली : आय विल गेट बॅक टु यु लेटर (रीड : तुला तर मी बघतेच महामाये ,थांब )
बाकी उद्या , लुकिंग फॉरवर्ड टु प्रोफेसर काळेंची शाळा, मजा येणार , आउंचीही शस्ळा आहे
मस्त लिहिलंय डीजे
मस्त लिहिलंय डीजे
पुष्कीची बायको आउंना
पुष्कीची बायको आउंना म्हंटलीही कि तुम्ही त्याला करेक्ट सल्ले देता (रीड : सईच्या मागे न करायचा, बायकांच्या डोक्यात एकदा संशय गेला कि पट्कन बाहेर निघत नाही. )
सईला सुरवातीला म्हंटली : आय विल गेट बॅक टु यु लेटर (रीड : तुला तर मी बघतेच महामाये ,थांब ) Proud >>>
गेल्या दोन दिवसांचे एपी नाही बघीतलेत, अन ईकडच्या कमेंट्स वाचुन बघावेसे वाटत पण नाहीये.
Btw रेशमचा ‘संदेश’ कोण आहे ? रिअल बॉयफ्रेंड का ? >>> तीचा मुलगा आहे बहुतेक
रेशमचा ‘संदेश’ कोण आहे ? रिअल
रेशमचा ‘संदेश’ कोण आहे ? रिअल बॉयफ्रेंड का ? >>> तीचा मुलगा आहे बहुतेक
<
नाही, मुलाचं नाव बहुदा मानव आहे.
संदेश/सँडी जो आहे तो ३८ वर्षाचा आहे वगैरे म्हणत होती, सोशल मिडीयावर बॉ.फ्रे आहे म्हणतायेत, काय माहित खरं काय !
आज चक्क मेघाचा गेटप नाही आवडला, क्रॉप टॉप शोभत नव्हता, मुळात इन जनरल तो शिअर स्कर्ट तसा टॉप या सगळ्या एकदम टिनेज फॅशन्स आहेत , सगळ्यांना नाही शोभत.
मुलगा मानव. तो आला नाही तर
मुलगा मानव. तो आला नाही तर फार काही वाटलं नाही पण दुसरं कोण संदीप का संदेश नाव समजलं नाही नीट, तो यायला हवा होता म्हणाली काल कॅमेऱ्यासमोर रेशम.
Pages