उन्हाळा म्हणजे आंबा. कैरीचा तक्कू, डाळ, लोणचे, पन्हे करून झाले. की महाशय झोकात एंट्री घेतात. लहान पणी सुट्टीत आई बाबा दुपारचे झोपले की चुपचाप उठून शिस्तीत दोन आंबे कापून ग्यालरीत सावलीत बसून लायब्ररी तून कायते किशोर, कुमा र, विचित्र विश्व जे काय आणले असेल ते वाचत तब्येतीत खायचे.
ह्याची आ ठवण आली कारण परवा घरात लेकीच्या मैत्रीणी च्या कृपेने खास रत्नागिरी हून देवग ड हापूस दोन डझन
घरी आले. केमीकल ने न पिकवलेले, घरच्या बागेतले आंबे अचानक आल्याने मला तर हर्ष वायूच झाला. आंब्याची नीट आढी लावून पहिले त्या सोनेरी केशरी वैभवाचा फोटू घेतला मग दोन शोधोन शिस्तीत कापायला घेतले.
उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. ( तंदुरी चिकन प्रिन्सिपल! वाया जाउ द्यायचे नाही!!!)
मग चार मोठ्या फोडी सावकाश, आत्मा तृप्त होईपरेन्त खायच्या. मग ब्रेक घेउन साई डच्या दोन खाउन टाकायच्या.
मग हात तोंड व्यवस्थित धुवून पाच मिनिटे शांत बसायचे. हा फळांचा राजा कधी कधी केशरी खुणा कपड्यांवरही
ठेवून जातो.
दुसरा प्रकार, थेट आमरस. चिमुट भर मीठ, मिरेपूड, दूध घालून फ्रिज मध्ये ठेवायचा. मग हात पाय धुवून खायचा.
पुरी बरोबर किंवा नुसताच. वासाला हापूस घ्यायचा व व्हॉल्युम साठी पायरी घालायचा.
तिसरा प्रकार : पहिल्या पद्धतीने आंबे कापून चौकोनी नीट तुकडे करून काचेच्या बोल मध्ये फ्रिज मध्ये ठेवायचे.
मग फ्रूट फोर्क किंवा साध्याच फोर्कने ऐटीत खायचे. ही जरा साहेबी ऐट. एक एक तुकडा जिभेवर विरघळ वत खाता येते व हात तोंड रंगत नाही.
चौथा प्रकार, : ह्याच तुकड्यांत आणिक फ्रेश क्रीम व साखर फेटून किंवा व्हॅनिला आइसक्रीम एक स्कूप घालून.
पाचवा प्रकारः मँगो मिल्क शेक. किंवा मॅन्गो बनाना मिल्क शेक.
अजून एक चोर प्रकार म्हणजे सुरी हपिसात ठेवायची. लंच करून यायचे. मग हळूच डेस्कात ठेवलेली सुरी काढायची. टिफिनच्या पिशवीतला आंबा काढायचा. पहिल्या पद्धतीने कापून गट्टं. !!!! मग कुठे केशरी रंगलागलेला नाही ना ते चेक करून साळसूद पणे कामात दंग व्हायचे.
सहावा प्रकारः हा लहान पणीच केलेला. आज परत करून बघेनः आंबा नीट हातात घेउन त्याचे सर्व साल काढून टाकायचे. काही ठिकानी तो कोरडा सुद्ध्हा दिसतो, चंद्रावर कसा एक सी ऑफ ट्रेंक्विलिटी आहे. तसा हा आंब्यातला सी ऑफ बेस्ट टेस्ट. काही ठिकाणी ओलसर. घरी कोणी नसेल तर तसाच उभे राहून खायचा. खाली ओट्यावर प्लेट ठेवायची. आयत्यावे ळी बेल वाजली तरा आंबेराव नीट प्लेटीत ठेवता यायला हवे. कींवा बेल मारणार्या अरसिक आदमीला इग्नोअर करून आंबा खाणे ध्यान चालू ठेवावे. ऑल एल्स इज जस्ट सेकंडरी.
सातवा प्रकारः पहिल्या प्रका रातली दोन अर्धुके मोठी वाली असतील त्यात उभ्या आडव्या रेषा मारायच्या चाकू/ सुरीने हलक्या हाताने मग साल उलटे करून ते चौकोन स्वाहा करायचे. काय एलिगं ट दिसतो हापुस अश्यावेळी.
अजून आमच्या हैद्राबाद साइडला बैंगन पल्ली, मलगोबा वगैरे किलोच्या भावाने मिळतात. तिथ ल्या उन्हाळ्यात हे
कमी गोड गार आंबे बरे वाटतात.
अजून पहिला पाउस यायला दहा पंधरा दिवस आहेत तो परेन्त ही आंबा खायची ऐश करून घ्या. तुमची आंबा खायची पद्धत कोणती!!
अमा, छान लिहीलेय....
अमा, छान लिहीलेय....
पहीले ३ प्रकार वाचुन अगदी अगदी असे वाटले... आमच्याकडे असाच खाल्ला जातो आंबा.
पुर्वी खायची मी आंबा, पण हल्ली नाही आवडत ईतकासा, एखाद खाल्ला तर ठिक नाहीतर नाही.. पण तुमचा लेख वाचुन ईच्छा झालीये खायची , अन अनायसे घरी आहेत पण, सो आज खाईन म्हणते एखादा.
लहान असताना एकदा गावी गेले होते, तेव्हा मावशीने शंभरेक आंबे पिकायला ठेवले होते एका टोपलीत.. मी अन माझ्या मावसबहीणीने पैज लावुन एका दमात खाल्ले होते ते त्याची आठवण झाली मलातर अजुनही विश्वास बसत नाही की मी एकटीने ४५ आंबे खाल्ले होते... अर्थात आकाराने लहान होते आंबे... तरी ही
अजुन एक प्रकार
अजुन एक प्रकार
आंब्याच्या शक्य तितक्या मोठ्या दोन फोडी कापायच्या. त्यावर थोडे मिठ, मिरपुड, लाल तिखट आणि चाट मसाला लावायचा. पापड भाजायच्या जाळीवर फोडी पालथ्या ठेवायच्या आणि विस्तवावर (गॅस नाही) किंचित भाजायच्या. निव्वळ अप्रतिम लागतो हापूस.
हल्ली नाही आवडत ईतकासा, एखाद
हल्ली नाही आवडत ईतकासा, एखाद खाल्ला तर ठिक नाहीतर नाही.. >>> सेम
यंदा फारसे आंबे खाल्लेच नाहीत.
मला रायवळ सगळ्यात जास्त आवडतात . लुसलुशीत चावे मारत खायचा .
नाहीतर मग तोतापूरी . खोबर्यासारखा.
मला तर त्या फोडी वगैरे करुन
मला तर त्या फोडी वगैरे करुन खाण्यात काहि मजा वाटत नाहि.. देठाकडे काळा भाग काडुन डीग काढायचा अन यथेच्छ खायचा आंबा..... आताशे भरपुर आंबे असतात घरी वाटलं तर दह्यात आंब्याचा गर, साखर, थोडी वेलची घालुन लस्सी बनवायची त्यावर अजुन मग आंब्याच्या गराच्या फोडी अन काजु वगैरे टाकुन लस्सी प्यायची ... मस्त लागते. आंब्याचा गर टाकुन शिरा हि छान होतो... मी एकदा आंबा वापरुन खोबर्याच्या वड्याहि बनवल्या होत्या.
देवग ड हापूस हातात घेतला कीच
देवग ड हापूस हातात घेतला कीच एक रॉयल फीलिन्ग येतं. आणी त्यांचा एकत्रित दरवळ अमेझिंग.
देठाकडे काळा भाग काडुन डीग
देठाकडे काळा भाग काडुन डीग काढायचा अन यथेच्छ खायचा आंबा..... >>>
मलादेखिल चिरून पेक्षा असाच आवडतो! अगदी घरी अढी असली आंब्याची तरी मी त्या आढीत बसून खातो! चिरुन किंवा रस करून खाण्यापेक्षा!
देठाकडे काळा भाग काडुन डीग
देठाकडे काळा भाग काडुन डीग काढायचा अन यथेच्छ खायचा आंबा >>> आम्ही ते १०० आंबे असेच फस्त केले होते , रस पिवुन, चोखुन खायचा, पण त्यासाठी अस्सल गावठी आंबे हवेत... हापुस नाही
पण त्यासाठी अस्सल गावठी आंबे
पण त्यासाठी अस्सल गावठी आंबे हवेत... हापुस नाही>>>
आम्हाला हापूस देखिल पळतो!!
६वा प्रकार ऑल टाईम फेव्हरेट
६वा प्रकार ऑल टाईम फेव्हरेट (अर्थात घरी एकटा असताना)
घरच्याच बागा असल्याने आंबे कधी विकत आणावे लागतच नाहीत. पण व्यक्तिशः देवगड हापुसपेक्षा केसर आंबा अधिक आवडतो. साईज मोठा अन् निव्वळ रसाळ गोड गोड साखर नुसती !
त्यामुळे देवगडच्या बहुतांश पेट्या मार्केटला जातात पण केसरचा सगळा माल फक्त घरी
सही आहे हे. यातले बरेच प्रकार
सही आहे हे. यातले बरेच प्रकार करून बघितलेले आहेत. माझा साउथ इण्डियन मित्र सालासकट आंबा खाताना पाहून आश्चर्य वाटले होते पहिल्यांदा. रस काढताना कोयीतून आता यापुढे रस येणार नाही हे ठरवायच्या काही पद्धती असतील तर सांगा
अमा - "हळूच डेस्कात ठेवलेली सुरी काढायची" वाचून चॅण्डलर चे ऑफिस मधले स्मोकिंग आठवले अशी लपून आंबे खातानाची क्लिप भारतातील ऑफिसेस मधे या सीझन ला हमखास सापडेल एखादी.
लहानपणी चोखून, फोडी करुन
लहानपणी चोखून, फोडी करुन वगैरे खाल्ला आहे. हल्ली मात्र फक्त रसच आवडतो. बाकी आंबा आईस्क्रिम, शेक वगैरे चालतात. आंब्याच्या रसात मात्र किंचीत साखर आणि चिमूटभर मीठ ह्याखेरीज दुसरी भेसळ चालत नाही.
अर्ध्या भागाचे साल उडवायचे.
अर्ध्या भागाचे साल उडवायचे. आडव्या उभ्या चिरामारून चौकोनी तुकडे काढून द्यायचे. मग हात कडेने धरून दुसरीकडच्या भागाचे तुकडे काढून द्यायचे. मग दोन बोटात कोयीला दोन्ही बाजुने धरून बाजुचे साल सोलून त्यातूनही तुकडे मिळवायचे. कमीतकमी रस हाताला लागून तुकडे मिळतात. सर्व आंब्यांचे काम झाल्यावर कोयी चोखायला घ्यायच्या. तुकडे वाटीत घालून खायला देता येतात.
रायवळ आंबे झाडाखाली पडलेले खाण्यात मजा. ती राजमाची वाटेला मिळते. पण यावर्षी वटवाघळांनी पाडलेले आंबे खाऊ नका आदेश आल्याने ती मजा गेली.
आंबा थोडा गरम असताना म्हणजे पिकतापिकता खाण्यास चांगला असतो. पूर्ण गोड झाल्यावर चव उतरते. सालीसहही खातो. रायवळ आणि हापुसची साल मात्र बेकार लागते. इतरच बरे.
मला आंबा असा कापून खायला
मला आंबा असा कापून खायला आवडतो.
आईच्या आजोळी घरासमोर एक
आईच्या आजोळी घरासमोर एक छोटासा मळा होता. त्यात पाण्याच्या पंपाच्या बाजूला एक रायवळ आंब्याचं झाड होतं . त्याचे आंबे लहानसे असायचे. पण पातळ साल आणि कोय पण छोटीशी असायची. झाडावरुन आंबे टपटप पडायचे. खाली सुकं गवत पसरलेलं असायचं. आंबे पडल्याचं आवाज आला की धावत जाऊन हात / आम्बे काही न धुता आंबे सोलून खायचे किंवा ते माचून मग चोखत चोख खायचे. इकडे तिकडे डाग वगैरे लागत असतीलच पण कधी त्याची काळजी वाटली नाही. क्वचित देठाजवळचा चीक लागून फोड पण आले असतील. पण दॅट डिड्न्ट मॅटर !
हापूस आंबे असतील तर त्याचा रस , साखर, वेलची+ केशर . आणि वाटीत घेतल्यावर त्यावर तूप. सढळ हाताने तूप लावलेले फुलके . आमरस पुरी वगैरे लग्ना मुंजीच्या जेवणातले पदार्थ ...
काय मस्त आठवणी काढल्यात अमा. तुम्हाला अजून दोन पेट्या बक्षिस !
अजून एक प्रकार म्हणजे धारदार सुरीने आंब्याची साल सोलून काढायची. हळू हळू आंबा गोल फिरवत एकसंध एक लांबच लांब रिबिनीसारखी साल काढायची. मग त्या आंब्याचे क्यूब्स कापायचे. ताज्या फोडलेल्या/ खोवलेल्या नारळाच्या दाट दुधात आंब्याच्या फोडी, थोडा आंब्याचा रस, गूळ आणि वेलची पूड. हे आंब्याचे हशाळे आणि तव्यावरुन ताटात तुपावर काढलेले डोसे ...
स्वर्ग , स्वर्ग तो हाच...
>>> तुम्ही आंबा कसा खाता?
>>> तुम्ही आंबा कसा खाता?
काही आठवत नाही. म्हणजे आंबा समोर होता, हातात घेतला होता, त्याचा सुवास जाणवला होता, हे सगळं आठवतंय. नंतरचं काही आठवत नाही. भानावर आले तेव्हा समोर सालं आणि कोय पडली होती. माझे हात सोनकेशरी होते, माझ्या बोटांचे ठसे कदाचित सालींवर सापडतील. कदाचित सुरीवरही. पण मला काही आठवत नाही मिलॉर्ड!!
स्वाती , मस्तच हं
स्वाती , मस्तच हं
मला अजून ही असा खायला सर्वात आवडतो आंबा .. रात्रीच काम सगळं आटपल की एक बेस्ट आंबा निवडायचा , धुवून सगळ्या बाजूनी मऊ करायचा , डेख काढून , पिळून चीक काढून टाकायचा आणि अगदी सावकाशपणे एकटीने चोखुन चोखुन खायचा . अशी समाधी लागते ना खाताना . रस सम्पला की मग कोय साफ करणे सुरू. तेव्हा तर जास्तच समाधी लागते. चोखुन चोखुन कोय पांढरी धोप करायची. यजमानाना हे सहन नाही होत. त्याच्या कडे कोय खायची पद्धत नाहीये . ते कापून बाजूच्या दोन दोन फोडीच खातात बाकीचा आंबा नाही खात. ते म्हणतात दुसरा घे आणि खा ... पण कोय खाण्यात काय मजा येते त्याना काय माहीत.
स्वाती म्हणते तसंच. फक्त
स्वाती म्हणते तसंच. फक्त त्यात एक अॅडिशन म्हणजे कुठल्याही तर्हेने खात असलो, तरी न चुकता अंगावर सांडवून खातो.
ममो, अचूक वर्णन! असा आंबा
ममो, अचूक वर्णन! असा आंबा खाणे हेच खरे स्वर्गसुख!
बाकी मला पायरीचा रस आणि थोडा दाटपणाकरता हापूसचा रस असा मिश्र रस आवडतो. रायवळ बिट्टी आंबा चोखून खायला आवडतो.
एकूण आंब्याच्या मौसमात घरात जो पिकलेल्या आंब्याच्या आढीचा सुक्ष्म गंध दरवळत असतो त्याच्या मी प्रेमात!
हापूस, रायवळ, केसर, गोटी,
हापूस, रायवळ, केसर, गोटी, गावरान इ. प्रकार चा आंबा माचवून खायला आवडतो. माचवलेल्या आंब्यांचा रसही आवडतो जरा गुठळ्या + रेषा असलेला. मिक्सरमधून केलेला पार गुळगुळीत रस शक्यतो खात नाही आवडतही नाही; पण बदाम, बैंगनपल्ली इ प्रकारचा आंबा असेल तर असा मिक्सरमध्ये फिरवून रस केल्या जातो. मिठाची कणी असलेला आमरसच शक्यतो आवडतो; साखर पण नको असते शक्यतोवर; तरीही आंबा जर आंबट असेल तर तेव्हड्यापुरती घातल्या जातेच (शक्यतो गावरान आंबा बेभरवश्याचा असतो)
बदाम, हापूस च्या फोडीही खायला चालतात; कोय मात्र सोत्ताच खातो; ते प्रकरण चोखचोखून खाण्यात जी मज्जा आहे ती अवर्णनीय आस्ते.
रेषांचा आंबा असेल आणि रस झाला असेल तर आई/आजी कोयी न पिळता (त्यांचा रस न निपटता) तश्याच ठेवायला सांगतात. या कोयींच; पाणी फोडणीला घालून हळद, तिखट, जरा गोडा मसाला, गूळ, मीठ घालून एक चवीष्ट प्रकरण जमवायच्या. ते ही अफलातून लागतं. कोयींना असलेला रस + फोडणीचं पाणी असं एकत्र लय भारी चव जमवतं; रेषा भरपूर असल्यानी त्या कोयी पाण्यात बुडवून चोखून खायला मजा येते.
बाकी सासंव, पिकलेल्या आंब्याचा मुरंबा वगैरे प्रकार अजून चाखलेले नाही.
मुरंबे प्रकार करेपरेंत घरात आंबेच उरत नाहीत म्हणा...
आंबापोळी ही प्रवासात, जाता येता अशी चघळायला आवडतेच.
रेडीमेड/आयती/विकत आणलेली आंबा कँडीही ठीकच; कारण यात य क्वांटीटीमध्ये साखर असते आणि साखरेचीच चव असते.
शेक्स प्रकार आताशा बारमाही मिळतात सो काही नवीन नाही त्यात, तरीही फ्रेश फ्रोजन आंबा स्मूदी + व्हॅनिला आइसक्रीम स्कूप मस्तच लागतं.
आंब्याचे हशाळे इंटरेस्टींग प्रकरण वाटतंय करून पाहायला हवं एखादवेळेला.
ह्या २१ तारखेलाच तारकर्लीला
ह्या २१ तारखेलाच तारकर्लीला गेलो होतो तिथून तीन डझन देवगड हापूस आणले आणि अक्षरशः हादडले. आज अखेर केवळ दोनच उरलेत तेही रात्रीच्या जेवणानंतर गट्ट्म होतील...
प्रकार क्रमांक एक आपला एकदम आवडता.
हापूस खाताना सहा माणसे असली की तीन कापायचे ठरवून ते एकदा संपले की न राहवून नंतर वन प्लस वन कापून घेण्यातली मजा औरच!
सही बात छेडी है अमा
ममो, अचूक वर्णन! असा आंबा
ममो, अचूक वर्णन! असा आंबा खाणे हेच खरे स्वर्गसुख!>>+१
काही आठवत नाही. म्हणजे आंबा
काही आठवत नाही. म्हणजे आंबा समोर होता, हातात घेतला होता, त्याचा सुवास जाणवला होता, हे सगळं आठवतंय. नंतरचं काही आठवत नाही. भानावर आले तेव्हा समोर सालं आणि कोय पडली होती. माझे हात सोनकेशरी होते, माझ्या बोटांचे ठसे कदाचित सालींवर सापडतील. कदाचित सुरीवरही. पण मला काही आठवत नाही मिलॉर्ड!! >>> हात सोनकेशरी म्हंटल्यावर रंगे हाथ उगाच नाही म्हणत असे लक्षात आले. आम तौर पर उसे सबूत माना जायेगा
>>> आम तौर पर
>>> आम तौर पर
मला आपूस (ॲक्चुअली आफोंस!)
मला आपूस (ॲक्चुअली आफोंस!) आंबा चावे मारून खायलाच आवडतो. साल अगदी पातळ, कागदासारखी जरी असली तरी सोलताना ती स्वत:बरोबर गराचा टवका येऊ देत नाही. आंब्याच्या पाव हिश्श्यावरची साल काढावी आणि उघड्या झालेल्या भागाचे लपके तोडावे . चावा मारता येईनासा झाला की पुन्हा थोडीशी साल काढावी. हळूहळू खोलवर चावे घेत बाठीपर्यंत पोचावें. आपूसचा घट्ट गर दातांनी तोडताना मजा येते. आपूसचा जड घट्ट रस आवडत नाही. मिक्सरमधून काढलेला तर अजिबात नाही. एक तर तो जिभेला फारच गुळगुळीत लागतो . दुसरे म्हणजे इतका दाट होतो की त्यात पुरीचा तुकडा अक्षरश: ढकलावा लागतो. चांगल्या पिकलेल्या पायरीचा सुगंधी, प्रवाही आणि गुठळ्या असलेला रसच खरा रस. बाकी मऊ करून चोखून खाण्यासाठी रसदार पायरी आणि रायवळ बरा.
केसर आंब्याचा एक गुण म्हणजे तो सहसा खराब निघत नाही. नुकताच दोन मराठी व्यापाऱ्यांनी जाहिराती वगैरे देऊन अमेरिकेत आपूस निर्यात केला. पण तिकडे पोचल्यावर त्यातली पुष्कळच फळे खराब निघाली. जवळजवळ विचकाच झाला सगळ्या निर्यातीचा. पण केसर मात्र खराब निघत नाही.
हापूस आंबा मला चिरून आणि
हापूस आंबा मला चिरून आणि शुध्ध आमरस त्यात वरून थोडे पातळ तूप...(बाकी त्यात वेलची, मिरपूड, केशर, दुध, ड्रायफुट्स हे काही नको) एवढ्या दोनच प्रकारांनी खायला आवडतो.
उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. >>>>>>>>>>>>>>>> agadi agadi assaach chirun.. ani jarahi kharab kimva laglela nako...
रविवार दुपार , आमरसाचा बेत,
रविवार दुपार , आमरसाचा बेत, स्वतःहुनच मदतिचा हात वैगरे , मोठ पितळी पातेल बाहेर आलेल त्यात कळशिभर गार पाणी ओतुन आन्बे सोडलेले मग १ परात , एक स्टिल्च पातेल रस ठेवायला,हात पुसायला पन्चा वडिल आणी मी, आन्बे बिलबिले झाले की नाक काढुन रस हातावर घेवुन बघायचा , डोळ्याची खुणवाखुणवी की एवज लपवला जायचा, दुसराही नाक काढुन हातावर रस, हाताने नरो वा कुन्जोरावा मग त्याचा रस पातेल्यात, सगळे आबे रस करुन सपले की एवज बाहेर आणि गनिम थेट गच्चित !
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
मी 2 मोठ्या फोडी कापून चमच्याने त्यातल्या गराचे पीस खाते, ते खाऊन झाले की धुतलेली साल खाते, ते खाऊन झाले की 2 छोट्या सायडर फोडी सालासहित मटकवते.
शेवटी कोय खाताना मात्र हात खराब व्हावे लागतात, ते करून कोय पांढरी फटक करते, मग कोय स्वच्छ धुवून मातीत टाकायला वाळायला ठेवते.
ममोला मम! आजोळी आमराई होती पण
ममोला मम! आजोळी आमराई होती पण सगळे रायवळ आंबे! उन्हाळ्यात आजोळी जायचोच अगदी लहान असल्यापासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत... तर लहान असताना नाश्त्याला आंबे. एका मोठ्या पाण्याच्या लोखंडी/पितळी बादलीत सकाळीच आंबे टाकून ठेवल्या जायचे. मुली बॉडीफ्रॉक व मुले चड्डी बनियन घालून आंबे खायला बसायचे. व र ममोने केल्याप्रमाणे खायचो. मोजदाद करण्याची पध्दत नव्हती. दुपारच्या जेवणात रस. पण जेवणापूर्वी कोयी चोखायच्या. कोयी पाण्या/दुधातून काढायची पध्दत नव्हती. संध्याकाळी रिपीट एपिसोड अऑफ सकाळ. रस उरला असेल तर त्याच्या पोळ्या. आंबे एकदम पिकायला लागले की चुलीवर रस आटवून साठा करून ठेवल्या जायचा जो वर्षभर टिकायचा. जेव्हा पाहिजे तेव्हा आंबावडी करून खायची। इति आम्रपुराण सफळ संपूर्ण
मनीमोहोर +१ फरक हाच की
मनीमोहोर +१ फरक हाच की रात्रीची वाट नाही पहात अश्या कामासाठी, धीर धरवत नसतो.
मी अगदी सकाळी नाश्त्याला सुद्धा चार आंबे खाउ शकते. मग परत दुपारी जेवणात आणि रात्रीला सुद्धा.
कोणाची कोय किती सफेद हा खेळ खेळायचो. नाहितर ती टणटणीत कोय खावुन जपून ठेवायची आणि मग विहिरीवर जो कोणी हात पाय धुवायला जाईल आंबे खाल्य्यवर त्याच्या टाळक्यात नाहितर पाठीवर..
फक्त, आंब्याची जात व आंबा खयची पद्धत बदलते मूड नुसार. कधी चार पाच सलग हापूस, नाहितर पायरी नाहितर रायवळ नाहितर कशी फक्त गावठी आंबे जसे खोबरी, बिटकी, पिचक्या( खूप पातळ रस).
मला हापुस नंतर गोडीला, केसर आवडतो. मग पायरी, रायवळ, खोबरी, तोतापुरी, बिटक्या( मुठीत मावेल असा लहान ) , पिचक्या , बिगैनपैली ....
आमरसाला फक्त हापुस ; हापुस मध्ये नो भेसळ.
हापुस नसेल पिकलेले तर पायरी आणि केसर आमरस हा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. फक्त आम्ही केसर नाहि लावत मग ओळखीच्या माणसाकडून मागवतो.
>>>>>नाश्त्याला आंबे. एका
>>>>>नाश्त्याला आंबे. एका मोठ्या पाण्याच्या लोखंडी/पितळी बादलीत सकाळीच आंबे टाकून ठेवल्या जायचे. मुली बॉडीफ्रॉक व मुले चड्डी बनियन घालून आंबे खायला बसायचे. व र ममोने केल्याप्रमाणे खायचो. मोजदाद करण्याची पध्दत नव्हती. दुपारच्या जेवणात रस. पण जेवणापूर्वी कोयी चोखायच्या. कोयी पाण्या/दुधातून काढायची पध्दत नव्हती. संध्याकाळी रिपीट एपिसोड अऑफ सकाळ. रस उरला असेल तर त्याच्या पोळ्या. आंबे एकदम पिकायला लागले की चुलीवर रस आटवून साठा करून ठेवल्या जायचा जो वर्षभर टिकायचा. जेव्हा पाहिजे तेव्हा आंबावडी करून खायची। इति आम्रपुराण सफळ संपूर्ण >>>>>
+११११११११११११११११११
सेम टू सेम
>>>>>हापूस आंबा मला चिरून आणि शुध्ध आमरस त्यात वरून थोडे पातळ तूप...(बाकी त्यात वेलची, मिरपूड, केशर, दुध, ड्रायफुट्स हे काही नको) एवढ्या दोनच प्रकारांनी खायला आवडतो.<<<<<
+१११११११
>>>>मिक्सरमधून काढलेला तर अजिबात नाही<<<. हॉरीबल पद्धत. काही लोकं आमरसात तर मणभर साखर, मूठभर वेलची आणी दूध घालून असा काही मलदा करून देतात की खावत नाही ......
हायला, बर्याच लोकांच्या सारख्या सवयी आहेत आणि आंबा हा जीवलग आहे.
आंबा न आवडणारे आहेत का कोणी? ( असेल तर येवु नका इथे;) )
Pages