तुम्ही आंबा कसा खाता?

Submitted by अश्विनीमामी on 25 May, 2018 - 05:08

उन्हाळा म्हणजे आंबा. कैरीचा तक्कू, डाळ, लोणचे, पन्हे करून झाले. की महाशय झोकात एंट्री घेतात. लहान पणी सुट्टीत आई बाबा दुपारचे झोपले की चुपचाप उठून शिस्तीत दोन आंबे कापून ग्यालरीत सावलीत बसून लायब्ररी तून कायते किशोर, कुमा र, विचित्र विश्व जे काय आणले असेल ते वाचत तब्येतीत खायचे.

ह्याची आ ठवण आली कारण परवा घरात लेकीच्या मैत्रीणी च्या कृपेने खास रत्नागिरी हून देवग ड हापूस दोन डझन
घरी आले. केमीकल ने न पिकवलेले, घरच्या बागेतले आंबे अचानक आल्याने मला तर हर्ष वायूच झाला. आंब्याची नीट आढी लावून पहिले त्या सोनेरी केशरी वैभवाचा फोटू घेतला मग दोन शोधोन शिस्तीत कापायला घेतले.

उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. ( तंदुरी चिकन प्रिन्सिपल! वाया जाउ द्यायचे नाही!!!)

मग चार मोठ्या फोडी सावकाश, आत्मा तृप्त होईपरेन्त खायच्या. मग ब्रेक घेउन साई डच्या दोन खाउन टाकायच्या.
मग हात तोंड व्यवस्थित धुवून पाच मिनिटे शांत बसायचे. हा फळांचा राजा कधी कधी केशरी खुणा कपड्यांवरही
ठेवून जातो.

दुसरा प्रकार, थेट आमरस. चिमुट भर मीठ, मिरेपूड, दूध घालून फ्रिज मध्ये ठेवायचा. मग हात पाय धुवून खायचा.
पुरी बरोबर किंवा नुसताच. वासाला हापूस घ्यायचा व व्हॉल्युम साठी पायरी घालायचा.

तिसरा प्रकार : पहिल्या पद्धतीने आंबे कापून चौकोनी नीट तुकडे करून काचेच्या बोल मध्ये फ्रिज मध्ये ठेवायचे.
मग फ्रूट फोर्क किंवा साध्याच फोर्कने ऐटीत खायचे. ही जरा साहेबी ऐट. एक एक तुकडा जिभेवर विरघळ वत खाता येते व हात तोंड रंगत नाही.

चौथा प्रकार, : ह्याच तुकड्यांत आणिक फ्रेश क्रीम व साखर फेटून किंवा व्हॅनिला आइसक्रीम एक स्कूप घालून.

पाचवा प्रकारः मँगो मिल्क शेक. किंवा मॅन्गो बनाना मिल्क शेक.

अजून एक चोर प्रकार म्हणजे सुरी हपिसात ठेवायची. लंच करून यायचे. मग हळूच डेस्कात ठेवलेली सुरी काढायची. टिफिनच्या पिशवीतला आंबा काढायचा. पहिल्या पद्धतीने कापून गट्टं. !!!! मग कुठे केशरी रंगलागलेला नाही ना ते चेक करून साळसूद पणे कामात दंग व्हायचे.

सहावा प्रकारः हा लहान पणीच केलेला. आज परत करून बघेनः आंबा नीट हातात घेउन त्याचे सर्व साल काढून टाकायचे. काही ठिकानी तो कोरडा सुद्ध्हा दिसतो, चंद्रावर कसा एक सी ऑफ ट्रेंक्विलिटी आहे. तसा हा आंब्यातला सी ऑफ बेस्ट टेस्ट. काही ठिकाणी ओलसर. घरी कोणी नसेल तर तसाच उभे राहून खायचा. खाली ओट्यावर प्लेट ठेवायची. आयत्यावे ळी बेल वाजली तरा आंबेराव नीट प्लेटीत ठेवता यायला हवे. कींवा बेल मारणार्‍या अरसिक आदमीला इग्नोअर करून आंबा खाणे ध्यान चालू ठेवावे. ऑल एल्स इज जस्ट सेकंडरी.

सातवा प्रकारः पहिल्या प्रका रातली दोन अर्धुके मोठी वाली असतील त्यात उभ्या आडव्या रेषा मारायच्या चाकू/ सुरीने हलक्या हाताने मग साल उलटे करून ते चौकोन स्वाहा करायचे. काय एलिगं ट दिसतो हापुस अश्यावेळी.

अजून आमच्या हैद्राबाद साइडला बैंगन पल्ली, मलगोबा वगैरे किलोच्या भावाने मिळतात. तिथ ल्या उन्हाळ्यात हे
कमी गोड गार आंबे बरे वाटतात.

अजून पहिला पाउस यायला दहा पंधरा दिवस आहेत तो परेन्त ही आंबा खायची ऐश करून घ्या. तुमची आंबा खायची पद्धत कोणती!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा अमा !

एकेकाळी आंबा चोखूनच खायचो.
जे आंबे चोखून खायचे नसतात ते खायचोच नाही.

लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गल्लीत क्रिकेट खेळत असताना मध्येच आजी यायची आणि माझ्या हातात एक चोखायचा आंबा द्यायची. आंबा रेडी टू ईट असायचा. मस्त पिळून त्याचे एक टोक खुडून द्यायची. शबरीसारखे एक सिप मारत आंबा गोडच आहे हे चेक करूनही झालेले असायचे. त्यामुळे कसले टेंशनच नसायचे. फिल्डींग करता करताही दोनचार ओवर संपेपर्यंत एक आंबा मस्त हाणून व्हायचा. चिकट हात तसेच मातीत लोळसवून बॅटींगला तयार. बॅटींगवरून आठवले, आंब्याची बाट खायला जास्त मजा यायची. आणि त्या आधी चोखकाम पुर्ण झाल्यावर केळं सोलावे तसे त्या सालींचे वस्त्रहरण करून एकेक सालीचा तुकडा चापूनचोपून साफसूफ करायलाही मजा यायची. त्या साली फाडताना रस ओघळला की तो हावरटासारखा चाटायचा, त्याला गोल्डन सिप म्हणू शकतो.

नंतर थोडा मोठा झालो तसे अश्या प्रकारे चारचौघांसमोर खेळता खेळता आंबा खायची, आणि तो आंबा घेऊन येणार्‍या आजीची लाज वाटू लागली.

आणि नंतर नंतर जरा जास्तच मोठा झालो तसे फोडी वगैरे करून व्हाईट कॉलर लोकांसारखे सोफेस्टीकेटेड पद्धतीने खाऊ लागलो.

आमरसाशी मात्र आजवर कधीच पटले नाही. ज्यांना दात नाहीत अश्या लहान मुलांना वा म्हातार्‍यांना किंवा आजारी लोकांसाठीच हा प्रकार आहे असे वाटते.

ऑफिसमध्ये कोणीतरी आंबा आणते आणि शेअरींग करत एकेक फोड वाट्याला येते ती कदापि खात नाही. लोकं मला आंबा आवडत नाही म्हणून माझ्यावर हसतात. पण मला ते एखादी फोड खाऊन जीभेला चटक लावून थांबणे खरेच जमत नाही. वाट्याला किमान एक अख्खा आंबा नसेल तर आंब्याच्या वाटेला जात उगाच जिव्हा अतृप्त ठेवण्यात काही अर्थ नाही.

उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. ( तंदुरी चिकन प्रिन्सिपल! वाया जाउ द्यायचे नाही!!!)>> +१ घरचाच आंबा व्यवसाय असल्यामुळे घरभर आढया लावलेल्या असतात. त्या वासाने हैराण होऊन आता आंबा तेवढा आवडत नाही खायला.

अजून एक पद्धत, मोठा हापूस आंबा घेऊन त्याला सुरीने अर्ध्यातून आडवी गोल बाठीपर्यंत चिर द्यायची, मग वरचा अर्धा भाग जरा गोल फिरवून बाठ बाहेर काढुन चोखून टाकायची. दोन्ही अर्धे भाग फ्रीजमध्ये थंड करून चमच्याने गर खायचा.

मला तर त्या फोडी वगैरे करुन खाण्यात काहि मजा वाटत नाहि.. देठाकडे काळा भाग काडुन डीग काढायचा अन यथेच्छ खायचा आंबा....>१११११११११११. अस्सल मालवणी पद्धत .माझी आवडती.

आमरसाशी मात्र आजवर कधीच पटले नाही. ज्यांना दात नाहीत अश्या लहान मुलांना वा म्हातार्‍यांना किंवा आजारी लोकांसाठीच हा प्रकार आहे असे वाटते.+१२३४५६७८९१०

आमरस तयार करेपर्यंत पेशन्स कसा ठेवू शकतात लोक???? हा पण प्रश्न आहे.

अमा लेख खासच एकदम. सगळे प्रकार करून पहायला आवडतील, पण बोल मध्ये फोडी करून फ्रुट फोर्क ने खाणे अगदीच सायबी स्टाईल वाटते, आंबा खाण्याची मजा त्यात मिळू शकत नाही.
१. मोठे मोठे पायरी किंवा हापूस पाण्याने स्वच्छ धुवून, देठाकडे तो एक काळा ठिपका असतो ना तो काढायचा, आंबा थोडा पिळून ४-५ थेंब देवाला दाखवायचे आणि चोखत चोखत सगळा रस संपवायचा मग साली काढून शेवटी कोय चोखायची.
२. मोमोपाकिहा घ्यायचे आणि देठाचे ४-५ थेंब दिल्यावर डायरेक्ट साल काढायची. सालिला गर नसल्याने ती थेट फेकली तरी चालेल किन्वा मग थोडी चोखून टाकून द्यायची. आणि तो गराने भरलेला गरगरीत आंबा फस्त करायचा.
३. मोमोपाकिहा घेऊन पुर्ण दाबून गर सैल करून पातेल्यात रस काढायचा, साली आणि कोयी थंड दुधात पिळून त्याचा ही रस काढून घ्यायचा आणि ते घट्टसर दुध आंब्याच्या रसात शेवटी मिक्स करायचे, साखर घालून योग्य तितका गोड करून घेऊन मग फ्रिजात थंड करून पोळी, पुरी सोबत किन्वा नुसता खायचा.
आंबा पहिल्यापासून नीट पिळला की रस एकसारखा दाट होतो, गराचे काही तुकडे पातेल्यात पडले तरिही ते हाताने चुरडायचे. काही लोक साल काढून आम्ब्याचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याचे बारा वाजवतात. मला त्या तसल्या रसाचे टेक्श्चर, चव आणि रंग तिन्ही आवडत नाही. रसात मिरी वेलदोडे असले फाजिल प्रकार मला आवडत नाही. दुध साखर चालते. केशर ला पण बिग नो नो.

या उप्पर आंबा खाण्यासाठी इतर कोणताही प्रकार मला कृत्रिम वाटतो.
हॅप्पी आंबा इटिंग Happy

लहानपणी कोयीशी वाकडे होते. आंबा खायला हातात घेतला की आंब्याची साल मधुनच चिरायची आणि त्यातुन कोय बाहेर येऊन नाकाला लागुन खाली पडायची. पुन्हा हातात घेतली की हातातुन निसटुन पडायची असे पाच सहा वेळा व्हायचे शेवटी तिच्यावरचा गाभा संपल्यानंतर मला चैन पडायची तोपर्यंत बाकिंच्यांचे दोन खाऊन झालेले असायचे.

मला फक्त हापुस आंबा आवडतो आणि तो सोलून खायला आवडतो, चुफूनही आवडतो पण हल्ली कापून खायला लागतो. आमच्या गावचे आंबे हवामानामुळे आतून खराब निघतायेत. बाहेरुन छान दिसतात पण आतून कितपत चांगला निघेल याची खात्री नसते म्हणून कापुन खातोय. चवीला मधुर आहेत अतिशय पण एखादा चांगला निघतो, एखादा नाही असे.

रस पुरी बेत करते. मी खूप नाही खात मात्र. मला आंबा सोलून किंवा चुफून खायलाच आवडतो.

बाठा चुफायला किंवा खायला नाही आवडत फारसा.

मी पण Happy
चुफून शब्द पहिल्यांदाच ऐकला, अंजू

अमा, तुम्ही बेसिक पद्धत लिहीली नाहीत. चोखून खायची.
मला आंबा कसाही आवडतो. वर लिहिलेले सगळे प्रकार. शिवाय आमरस पोळी, पुरी, आणि भात सुद्धा.

पण माझ्या लहानपणीचा अजून एक प्रकार मला खूप आवडायचा. त्यासाठी मात्र घरी खूप पाहुणे मंडळी यायची वाट पहायला लागायची.
कोणीतरी मोठे पिकलेल्या आंब्याची मोठी अढी घेऊन बसायचे. घरी ५० माणसांसाठी आमरसाचा बेत असायचा.
मग रस पिळणार्‍या भोवती आम्ही लहान मुले बंबे होउन बसायचो. आमच काम फक्त आमरसाच्या पातेल्यातल्या कोयी बाजूला काढणे आणी साफ करणे. सालीतला राहीलेला रस पण आमचाच. आता त्यातला बराच पोटात जायचा ही वेगळी गोष्ट. Happy तेंव्हा आंबा कुठला आहे वगैरे किरकोळ चिंता नसायच्या. Happy
हा कार्यक्रम झाल्यावर परसातल्या विहिरीवर आंघोळ.

वाह, काय भारी पॅकेज होतं सुट्टीचं. आता कित्येक वर्षात गंजीफ्रॉक आमरसाने भिजलेला नाही.

पण माझ्या लहानपणीचा अजून एक प्रकार मला खूप आवडायचा. त्यासाठी मात्र घरी खूप पाहुणे मंडळी यायची वाट पहायला लागायची.
कोणीतरी मोठे पिकलेल्या आंब्याची मोठी अढी घेऊन बसायचे. घरी ५० माणसांसाठी आमरसाचा बेत असायचा.>> अगदी अगदी. माझ्या बाबांचा पेन्श नर गृप होता. त्यांना आमरस पुरी करायचे ठरले. तर आईला कोण मदत करेल म्हणून घरच्या सर्वांना पण बोलवायचे ठरले म्हणजे दोन काकू व मोठ्या ताया वगैरे होतील मदतीला म्हणून. मग लिटरली मोठे पितळेचे पातेले भरून रस केलेला. फक्त चार पाच कोया जमवून खाल्ले तर पोट भरून गेले माझे तर. मी जेन्युईन लिंबो टिंबु होते. वन ऑफ द हॅपिएस्ट मेमरीज. ते पंचवीस व घरचे पंच वीस. वे लोग और वे आम कहांगये.

लिटरली आजच विचार करत होते कोणी यायचे तर घरी फ्रूट सलाड व्हायचे दूध आ टऊन फळे घालून. ते कापायचे काम मजकडे असायचे व नंतर कचरा टाकताना वाटायचे आज आपल्या घरात किती श्रीमंत कचरा आहे. मोसंबी, चिक्कू अ‍ॅपल्स ग्रेप्स मँगो बनाना संत्री ह्यांची साले. दर्शन मधला चिकू मिल्कशेक पण ट्रीट होती. साखर पुडा झाल्याव्रर गेलो होतो प्यायला.

आज माझ्या घरातले संपले. फ्रिजातले शिल्लक असले तर मॅम्गो मिल्कशेक करेन नाहीतर अलविदा फ्रेंड बॅक टू कलिंगड व पेरू अ‍ॅपल्स. आमच्या पुण्यासारखे पेरू ब्रम्हां डात मिळत नाहीत.

चोखून खायचे आंबे चोखून खातो. पण कापून खायच्या आंब्यासाठी चमचा वापरतो. मला माहित आहे अनेक जणांना हि पद्धत आवडणार नाही. पण मला हीच पद्धत छान वाटते Happy

HowIEatMango.jpg

कसा खाता हे जाऊद्या पण किस्सा आंब्याशी संबंधित आहे म्हणून लिहितोय.

गोष्ट गोव्याची. पंचतारांकित हॉटेलच्या स्टाफ कॅफे मधे आंब्यांच्या दिवसात आठवड्यातून दोन-तीनदा 'मानकुराद' देत असत. कापून वगैरे नाही तर प्रत्येकी एक आख्खाच्या आख्खा. पण हात बरबटेल म्हणून कोणी तो आंबा खाईच नात. मी त्यावेळी गोव्यात जरा नवीनच होतो. कोणीच खात नाही आणि 'हा कुठला आंबा' म्हणून मी देखिल सुरुवातीला खाल्ला नव्हता. पण एकदा बाहेर मित्राकडे मानकुरादची अप्रतीम चव चाखायला मिळाली. आणि मग काय माझ्याच्याने इतका चांगला आंबा न खाता राहवेना. असा आख्खा मानकुराद समोर आला असताना त्याला अव्हेरणे म्हणजे पापच की. मग काय मी इतरांचे ही आंबे घेऊन अगदी साग्रसंगीत कोयी सालं चुंफुन खाऊ लागलो. पण काही दिवसच कारण माझे पाहून इतरही आपापले आंबे खाऊ लागले आणि मला फक्त माझ्याच एका आंब्यावर समाधान मानावे लागले.

@mi_anu: हात आणि कपडे डागांपासून सेफ राहतात >> अगदी अगदी Happy कोयीचा गर खाताना जी काय चार बोटे चिकट होतात तेच.

>> चुंफून, चुफून, चुपून इ. शब्द वापरतात. तेही शक्यतो आंब्याच्या बाबतीतच वापरले जातात
+१११ ... चापून चुपून खाणे हा शब्दप्रयोग कॉमन आहे तसा विशेषतः रस वा गर असलेल्या फळांच्या बाबत. चुंफून, चुफून वगैरे त्याचीच भावकी.

Pages