उन्हाळा म्हणजे आंबा. कैरीचा तक्कू, डाळ, लोणचे, पन्हे करून झाले. की महाशय झोकात एंट्री घेतात. लहान पणी सुट्टीत आई बाबा दुपारचे झोपले की चुपचाप उठून शिस्तीत दोन आंबे कापून ग्यालरीत सावलीत बसून लायब्ररी तून कायते किशोर, कुमा र, विचित्र विश्व जे काय आणले असेल ते वाचत तब्येतीत खायचे.
ह्याची आ ठवण आली कारण परवा घरात लेकीच्या मैत्रीणी च्या कृपेने खास रत्नागिरी हून देवग ड हापूस दोन डझन
घरी आले. केमीकल ने न पिकवलेले, घरच्या बागेतले आंबे अचानक आल्याने मला तर हर्ष वायूच झाला. आंब्याची नीट आढी लावून पहिले त्या सोनेरी केशरी वैभवाचा फोटू घेतला मग दोन शोधोन शिस्तीत कापायला घेतले.
उभा आंबा धरून दोन व्हर्टि़ कल कट घ्यायचे. मग साइडचे दोन कट. दोन मोठी अर्धुके असतात त्यांचे उभे दोन काप केले. चार मेजर फोडी हातात येतात. प्लस बारक्या दोन . आता कोय. हिच्या वर व खालच्या बाजूला पन साइजेबल खाण्याचा मॅटर असतो. तो वाया जाउ द्यायचा नाही. कोय मात्र चोखूनच खावी लागते. ( तंदुरी चिकन प्रिन्सिपल! वाया जाउ द्यायचे नाही!!!)
मग चार मोठ्या फोडी सावकाश, आत्मा तृप्त होईपरेन्त खायच्या. मग ब्रेक घेउन साई डच्या दोन खाउन टाकायच्या.
मग हात तोंड व्यवस्थित धुवून पाच मिनिटे शांत बसायचे. हा फळांचा राजा कधी कधी केशरी खुणा कपड्यांवरही
ठेवून जातो.
दुसरा प्रकार, थेट आमरस. चिमुट भर मीठ, मिरेपूड, दूध घालून फ्रिज मध्ये ठेवायचा. मग हात पाय धुवून खायचा.
पुरी बरोबर किंवा नुसताच. वासाला हापूस घ्यायचा व व्हॉल्युम साठी पायरी घालायचा.
तिसरा प्रकार : पहिल्या पद्धतीने आंबे कापून चौकोनी नीट तुकडे करून काचेच्या बोल मध्ये फ्रिज मध्ये ठेवायचे.
मग फ्रूट फोर्क किंवा साध्याच फोर्कने ऐटीत खायचे. ही जरा साहेबी ऐट. एक एक तुकडा जिभेवर विरघळ वत खाता येते व हात तोंड रंगत नाही.
चौथा प्रकार, : ह्याच तुकड्यांत आणिक फ्रेश क्रीम व साखर फेटून किंवा व्हॅनिला आइसक्रीम एक स्कूप घालून.
पाचवा प्रकारः मँगो मिल्क शेक. किंवा मॅन्गो बनाना मिल्क शेक.
अजून एक चोर प्रकार म्हणजे सुरी हपिसात ठेवायची. लंच करून यायचे. मग हळूच डेस्कात ठेवलेली सुरी काढायची. टिफिनच्या पिशवीतला आंबा काढायचा. पहिल्या पद्धतीने कापून गट्टं. !!!! मग कुठे केशरी रंगलागलेला नाही ना ते चेक करून साळसूद पणे कामात दंग व्हायचे.
सहावा प्रकारः हा लहान पणीच केलेला. आज परत करून बघेनः आंबा नीट हातात घेउन त्याचे सर्व साल काढून टाकायचे. काही ठिकानी तो कोरडा सुद्ध्हा दिसतो, चंद्रावर कसा एक सी ऑफ ट्रेंक्विलिटी आहे. तसा हा आंब्यातला सी ऑफ बेस्ट टेस्ट. काही ठिकाणी ओलसर. घरी कोणी नसेल तर तसाच उभे राहून खायचा. खाली ओट्यावर प्लेट ठेवायची. आयत्यावे ळी बेल वाजली तरा आंबेराव नीट प्लेटीत ठेवता यायला हवे. कींवा बेल मारणार्या अरसिक आदमीला इग्नोअर करून आंबा खाणे ध्यान चालू ठेवावे. ऑल एल्स इज जस्ट सेकंडरी.
सातवा प्रकारः पहिल्या प्रका रातली दोन अर्धुके मोठी वाली असतील त्यात उभ्या आडव्या रेषा मारायच्या चाकू/ सुरीने हलक्या हाताने मग साल उलटे करून ते चौकोन स्वाहा करायचे. काय एलिगं ट दिसतो हापुस अश्यावेळी.
अजून आमच्या हैद्राबाद साइडला बैंगन पल्ली, मलगोबा वगैरे किलोच्या भावाने मिळतात. तिथ ल्या उन्हाळ्यात हे
कमी गोड गार आंबे बरे वाटतात.
अजून पहिला पाउस यायला दहा पंधरा दिवस आहेत तो परेन्त ही आंबा खायची ऐश करून घ्या. तुमची आंबा खायची पद्धत कोणती!!
चोखून खाणे याला आम्ही चुफुन
चोखून खाणे याला आम्ही चुफुन खाणे म्हणतो. नशीब अजून काहीजण म्हणतात.
मी कोय न म्हणता बाठा पण म्हणते. मी कोवळ्या कैऱ्या येतात ज्यात कोवळी बी असते मस्त तुरट, तिला कोय म्हणते. आणि त्याची साल जाड झाली की बाठा म्हणते, माझं आपलं वेगळंच लॉजिक .
या निमित्ताने एक फारच
या निमित्ताने एक फारच इंटरेस्टिंग माहिती सापडली. चुंफून हा शब्द खूप जुना आहे. गुगल ने तो १८४७ मध्ये प्रकाशित झालेल्या एका शब्दकोशातून शोधून काढला
A Dictionary, English and Marathi: Compiled for the Government of Bombay
By James Thomas Molesworth, Thomas Candy
आमरस करायच्या आधी एका मोठ्या
आमरस करायच्या आधी एका मोठ्या पातेल्यात पाणि घ्यायचं...त्यात भरपूर बर्फ टाकून आंबे - हाताने हळू हळू दाबून - टाकून ठेवायचे मग अर्ध्या तासाने रस काढायचा..छान थंड होतो.. रस काढून फ्रिज मधे ठेवण्यात आणि या पद्धतीने थंड केलेल्या रसाची चवही वेगळी येते..
१.हापूस आंब्याचे साल काढून
१.हापूस आंब्याचे साल काढून त्याच्या फोडी करून फ्रीजमधे ठेऊन गार झाल्यावर खायला आवडायचा.एकावेळी निदान दोनतरी आंबे असले पाहिजेत.पण नंतर हा निवांतपणा नसल्याने हापूस, पायरी कापून आवडतात.
२.आंबा चोखून खायला तितकासा आवडत नाही.लहानपणी खाल्ले आहेत.रस केलाच तर फक्त आणि फक्त आंब्याचा गर घ्यायचा,तोही आंबा मऊ करून नाही.गराच्या गाठी लागल्या पाहिजेत.पण आता तूप घालून खाऊन पहाणार आहे.बाकी आंब्याचा इतर कुठल्याही पदार्थात वापर आवडत नाही.मिल्क्शेक,आईस्क्रीम,आम्रखंड इ.त्याला बिग नो.नो.
आंब्याचा मोसम सुरु झाला की हापूस,पायरीनंतर येणारे केसर आंबे खूप आवडतात.निरोप घेताना मग नीलम खाऊन घ्यायचा.पूर्वी दशहरी असायचे.
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे गोव्याचा मानकुराद आंबा एकदम मस्त लागतो.
मी कोय न म्हणता बाठा पण
मी कोय न म्हणता बाठा पण म्हणते>>> मीपण ग अन्जू!
आम्ही गोयंकर , त्यामुळे
आम्ही गोयंकर , त्यामुळे हापुसचे कौतुक आम्हाला नाहीच.
हापूस आंबे विकायलाच, हापुसची साठं करायला, किंवा मावा ( आटीव आंबा रस).
रसाला आणी चुंफून खायला मुख्य पायरी. बाकी गावठी आंबे सुद्धा असतात रायवळ( रत्नागिरीच्या नातेवाईकांकडून ), घरचे खोबरी, वाटोळा( गरगरीत गोल आणि मधुर पातळ रस) वगैरे.
गोव्यचा राजा ‘ मानकुराद‘ हा मनसोख्त खायलाच.
मानकुरादची बरोबरी हापुस बरोबर नाहीच हे कोणीही गोयंकर सांगेल.
आता रोज नाश्त्याला, पानपोळो( अंबोळी सारखाच पदार्थ), किंवा शिरवळ्या -पायरी रस, गवसणी-आमरस.
मुंबईत तर इडली आमरसात कुस्करून सुद्धा खातो.
जोडीला पाहिजे तितके मानकुराद, पायरी नुसते खायला प्रत्येकाला.
हा नाश्ता , त्यात कापलेला आंबा आहे तो “मानकुराद”
, पिरगंटून काढलेला पायरीचा रस, पोळो.
कवळी ती कोय आणि जूण झाली की
कवळी ती कोय आणि जूण झाली की बाठा आसं आम्ही म्हणतो.
कवळी ती कोय आणि जूण झाली की
कवळी ती कोय आणि जूण झाली की बाठा आसं आम्ही म्हणतो. >>> हो गं हो. आहे कोणीतरी माझ्यासारखं.
मानकुराद कधी खाल्ला नाही त्यामुळे माहीती नाही. माहेरी हापुस नाही, फक्त रायवळ पण त्याचे खूप प्रकार, बिट्टी, दहीआंबा, साधे रायवळ इ, ते चुफुनंच खायचो, मी कमी खायचे, मला बिट्टी इवलासा बघायला आवडायचा. हल्ली एक झाड हापुसचं आहे, काही वर्ष. मला समहाऊ लहानपणापासून हापुस त्याचा वास आवडायचा, बाबा माझ्यासाठी विकत घ्यायचे पेटी. सासरी हापुसंच हापुस आणि पायरी, नवरा दीरांना वेड रायवळचं. आंब्याचे असे किस्से, अशा आठवणी.
कवळी ती कोय आणि जूण झाली की
कवळी ती कोय आणि जूण झाली की बाठा आसं आम्ही म्हणतो.
<<
कोय म्हणजे आंब्याची बी.
कोवळी असते तेव्हा तिला बाठ धरलेली नसते, नुसतेच एक तपकिरी सालीसारखे बारीक आवरण असते. बाठ = कोयीचे लाकडासारखे कडक आवरण. बाठीला धरू लागला, अर्थात, आतल्या बी ला कडक कवच धरू लागले की ती कैरी; आंबा बनायच्या रस्त्यावर येते. बिनाबाठीची ती बाळकैरी. या बाळकैरीचे अनेकदा कोयीसोबत किंवा -कोयीविनाचही- लोणचे घालतत. मेथ्या घालून. नेहेमीच्या मसाल्यापेक्षा थोडे वेगळे.
मोहोर झडतो तशाच अर्ध्याकच्च्या बाळकैर्या मोठ्या प्रमाणावर गळून पडतात अन त्या वाया घालवायची जिवावर येते. म्हणून बाळकैरीचे लोणचे. लोणच्यात मुरलेला कोयीतला गर छानच लागतो. अन तसाच मुरलेल्या लोणच्याच्या बाठीसकट फोडीतला बाठीचा तुकडा जेवणाच्या शेवटी चघळत बसायची चव.. म्म... मस्त!
अनेक ठिकाणी पक्क्या आंब्याची कोय भाजून आतला गर खातात. कधी ती बाठ फोडून (लोणचं घालताना सुडा उर्फ मोठ्या भयंकर धारदार आडकित्त्याने कोय फोडून फोडी केल्यानंतर उरलेला) आतला गर मिठाच्या पाण्यात उकडून वाळवतात अन सुपारीसारखा खातात. छान लागतो.
कोयीचा गर, (यालाही काहीतरी शब्द आहे. आत्ता डोक्यात येईना) फणसाच्या बिया, असल्या गोष्टी खाण्याच्या असतात, हेच आजकालच्या लोकांना ठाऊक नाहिये. अगदी खरबूज टरबूज सूर्यफुलाच्या बियाही खाणे हा कसला मस्त टाईमपास असतो..
हे देखिल आंबा कसा खातात, त्याच्यात मोजायला हवं. नैका?
.
आंब्याच्या वड्या, पोळ्या, साठं, मेथांबा, साखरांबा, लोणची, आमचूर, कांदा-कैरीची कोशिंबीर काय अन कशाकशात कच्चापक्का आंबा घालून केलेल्या रेस्प्या काय. अन काय काय.. इति आम्रपुराण!!
आ रा रा छान माहिती, कोय आणि
आ रा रा छान माहिती, कोय आणि बाठाबद्दल. बाठा शब्द खूप कमी ऐकायला येतो म्हणून मला वाटायचं मी चुकतेय का. बहुतेक सरसकट सर्वांनाच कोय म्हणतात. मी मात्र बाळकैरीतली कोय आणि मग साल जाड झालं की बाठा म्हणते पण बाठ नाही म्हणत. कोय मला खूप आवडते, मी नुसती तिखटमीठ लावून पण खाते.
सुपारी आई करायची, तुम्ही वर लिहिलंत ती.
छान आम्रपुराण.
डॉ आरारा,
डॉ आरारा,
हल्ली खरबूज लाल भोपळा सूर्यफूल बियांना स्टार स्टेटस आहे.LCHF ketos snack म्हणून मॉल मध्ये छान पाकिटात 50 रुपयात मूठभर मिळतात.
व्हॉटसप वर 'आंब्याच्या बाठ्या(बाठे) भाजून खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते असे एक वाक्य टाकून बघा, धपाधप बालपणी चा काळ डेल मोंन्टे किंवा डॉ ओटेकर किंवा केलॉग वाले रंगीत पाकिटात लामीनेट करून तिप्पट भावाने विकायला लागतील.
(कमी पब्लिक ला माहिती आहे तोवर या दर वाढीपासून लोक सेफ आहेत ☺️☺️☺️)
लहानपणापासून शिकलेली एकच
लहानपणापासून शिकलेली एकच गोष्टः आंबा फोडी करून खा, चोखून खा, आमरस खा किंवा कसाही खा, पण तळहात कोरडा राहिला पाहि़जे आणि कपड्यांवर डाग पडता कामा नये. अजूनही आंबे तसेच खातो.
तुम्ही आंबा कसा खाता?
तुम्ही आंबा कसा खाता?
इश्श ...!!
:लाजून चूरः
कोयीचा गर, (यालाही काहीतरी
कोयीचा गर, (यालाही काहीतरी शब्द आहे. आत्ता डोक्यात येईना) फणसाच्या बिया, असल्या गोष्टी खाण्याच्या असतात, हेच आजकालच्या लोकांना ठाऊक नाहिये. >>>>>बाठ्याच्या गराबाबत ऐकले होते.खाल्ले नाही.फणसाच्या बिया (ज्याला आठळ्या न म्हणता कोकणात गोट्या म्हणतात.) उकडून झकास लागतात.गर्यागोट्यांची भाजी एकदम मस्त.
बाकी आम्रपुराण मस्तच.
आम्ही आंब्याच्या कोयीदेखील
आम्ही आंब्याच्या कोयीदेखील भाजून खातो मस्त लागतात!
आंम्ही ह्या फणसाच्या
आंम्ही ह्या फणसाच्या गोट्यांमध्ये थोडा जवला घालुन भाजी बनवतो... काय छान लागते.
उकड्या तांदळाची पेज अन या गोट्यांची भाजी.. मस्तच
आंम्ही ह्या फणसाच्या
आंम्ही ह्या फणसाच्या गोट्यांमध्ये थोडा जवला घालुन भाजी बनवतो.>>>>>नवीन धागा काढून रेसिपी द्या.
आम के आम गुठलियों के दाम
आम के आम गुठलियों के दाम
हापूस कापून, पायरी कापून/ रस काढून, रायवळ आंबे चुफून. पण लहानपणची भावंडांबरोबर टोपल्या-टोपल्या रायवळ आंबे संपवायची मजा आता गेली. आता आपले हापूस आणि पायरी आंबे पेटीत भरून आणायचे आणि खायचे. सोसासोसाने रायवळ आणले तरी टिकत नाहीत जास्त आणि नासायच्या आत संपतही नाहीत.
आम्ही पण कोवळी ती कोय आणि कडक, जून ती बाठ असंच म्हणतो. लहानपणी कधीतरी भाजून खाल्लीही आहे.
आंब्याच्या रसात मीरपुड आणि
आंब्याच्या रसात मीरपुड आणि किंचित मीठ घातले की बाधत नाही.
हल्ली खरबूज लाल भोपळा
हल्ली खरबूज लाल भोपळा सूर्यफूल बियांना स्टार स्टेटस आहे.LCHF ketos snack म्हणून मॉल मध्ये छान पाकिटात 50 रुपयात मूठभर मिळतात.
<<
अरेच्चा!
हे नव्हतं ठाऊक.
हे म्हणजे पामोलिन तेलाला सध्या ऑलिव्ह ऑइलपेक्षा भारी किंमत येते तसलं आहे. जेव्हा भारतात हे तेल पहिल्यांदा आयात झालं, तेव्हा रेशनवर मिळतंय, ते फक्त गरीब खायचे, अन मध्यमवर्गीय लोक पणत्यांत जाळायचे. आता हे पहायलाही मुष्किल आहे.
एक इयत्ता दुसरी लेवल जोक...
एक इयत्ता दुसरी लेवल जोक...
चिनी माणूस आंब्यांचे दुकान काढतो. त्याचं नाव काय?
उ - चुन फुन चुन फुन खा
आ.रा.रा. काय लिहीलंय! वाचूनच
आ.रा.रा. काय लिहीलंय! वाचूनच भूक लागली. लहानपणी हे सगळे खाल्लेले आहे. मंचर च्या बाजारात अगदी स्वस्त रायवळ मिळत. तेथे कधी कधी इतके भारी चवीचे आंबे आणि इतके स्वस्त मिळाले आहेत की (किमान पुन्हा हापूस खाईपर्यंत) हापूस काय चीज आहे असे वाटे.
व्हॉटसप वर 'आंब्याच्या बाठ्या(बाठे) भाजून खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते असे एक वाक्य टाकून बघा, धपाधप बालपणी चा काळ डेल मोंन्टे किंवा डॉ ओटेकर किंवा केलॉग वाले रंगीत पाकिटात लामीनेट करून तिप्पट भावाने विकायला लागतील. >>>
बाय द वे कोणी वरती वस्त्रगाळ आमरसाबद्दल लिहीले आहे का? आमच्याकडे नातेवाईकांचा एक प्रोग्रॅम असतो दर उन्हाळ्यात. पण मला तो न गाळलेला रसच आवडतो.
वस्त्रगाळ आमरसाबद्दल>> दॅट
वस्त्रगाळ आमरसाबद्दल>> दॅट इज अ बिट लाइक......... एव्ढा आमरस वस्त्रात वाया का बरे घालवतात लोक? फायबर इज गुड फॉर य' आल.
या पहा भोपळ्याच्या भाजलेल्या
या पहा भोपळ्याच्या भाजलेल्या बिया.धुळे नंदुरबार कडे गाड्यांवर पुडीत 20 रु ला मिळत असतील.हेच रोस्टवे फूड्स किंवा डेल मोंन्टे ने ऑरगॅनिक बिया वापरून केले की यांची किंमत 2 सर्व्हिंग 190 रु इतकी होते.
सहा महिन्यांपूर्वी
सहा महिन्यांपूर्वी भोपळ्याच्या बिया ८०० रु किलो होत्या.८-१० वर्षांपूर्वी एका ग्राहक पेठेशी संलग्न असण्यार्या वक्तीने म्हटले होते,की लाल भोपळा विकत घेता त्यावेळी त्यात बिया असतात का? नाही म्हटल्यावर त्यांनी म्हटले नसणारच कारण त्या हॉटेलला पुरवतात.त्यावेळी रेट ४०० होता.
आमच्याकडे मिळतो बियांसकट लाभो
आमच्याकडे मिळतो बियांसकट लाभो. अम्ही बिया वाळवून फोडून खातो.
बिझनेसमन मोड ऑन
बिझनेसमन मोड ऑन
- फोडून स्वतः खाण्याऐवजी 'हँड पिक्ड, हायजिनिक्,लो फॅट, हाय ओमेगा, हाय प्रोटिन ऑरगॅनिक पंपकिन सीड्स' म्हणून चिठ्ठी टाकून सोलून ठेवून पाकिटे केलीत तर ५० रु ला मूठभर विकता येतील
बिझनेसमन मोड ऑफ
अग इतके भोपळे कोण खाणार????
अग इतके भोपळे कोण खाणार???? खानावळ नाही चालवत मी
भोपळे काळ्या रंगाच्या कपिला
भोपळे काळ्या रंगाच्या कपिला गाईला खाऊ घालायचे.
पौष्टिक देशी दूध देते.
(माणसाने एका मूळ विषयाला कुठच्याकुठे कसे न्यावे याचे मी उत्तम उदाहण ठेवते आहे )
बियांच्या बिजनेससाठी खर्च लई
बियांच्या बिजनेससाठी खर्च लई येईल ओ ताई.. गाय, तिला राखणारा(दुध काढून ते विकणारा) शिवाय गायीला घर?
(माणसाने एका मूळ विषयाला कुठच्याकुठे कसे न्यावे याचे मी उत्तम उदाहण ठेवते आहे Happy ) >>> हो हो..
Pages