आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"किंबहुना फारश्या अपेक्षाच नव्हत्या ठेवल्या यंदा आरआर कडून. ते प्लेऑफमध्ये आले हाच बोनस होता" सहमत!! इथपर्यंत पोहोचले ही खरच कमाल होती. अर्थात ह्यात दिल्ली, मुंबई वगैरेंनी सुद्धा हातभार लावला.

RR हि 'स्वतः जिंकणार नाही नाही नि इतरांना जिंकणार नाही अशा टाईपची टीम आहे म्हणून तिचा कप्तान पण मराठी माणूस आहे' असे आमच्या community वरच्या पंजाबी लोकांचे म्हणणे आहे Lol

रहाणेने कितीही प्रयत्न केला तरी तो आता आयपीएल मटेरिअल होऊ शकणार नाही. बॅड पॅच समजू शकतो पण एक बॅट्स्मन म्हणून तो सध्या वन डे, टेस्ट आणि टी २० साठी लागणार्‍या स्पेसिफिक खेळात प्रचंड कनफ्युज्ड असल्यासारखा दिसतो. एक प्लेअर म्हणून सुद्धा तो काँट्रिब्यूट करू शकत नाही कॅप्ट्नचा रोल तर फार मोठी गोष्टं झाली. कॅप्टन म्हणून अचिवमेट नसल्याने अगदी गंभीर सारखा मेंटॉर सुद्धा तो होऊ शकणार नाही. रहाणेच्या लिमिटेशन्स ह्या स्पर्धेत फारंच दिसून आल्या.
मला वाटतं 'धिस ईज ईट' फॉर रहाणे. आयपीएल आणि ईंटरनॅशनल अश्या दोन्ही लेवलवर तो आता फार काही नाही करू शकणार. पुढच्या वेळी स्मिथ आल्यावर त्याचे ११ च्या फायनल टीममध्ये असणे सुद्धा मोठी गोष्टं असेल.

त्याने आणि अश्विनने सुद्धा खरंतर पुजारा आणि ईशांतच्या वाटेने जाऊन टेस्ट क्रिकेट साठी कोहली ई.चा विश्वास जिंकण्यावर/टेस्ट टीम मध्ये जागा मिळवण्यावर भर द्यायला हवा होता.

वॉर्न/धोनी/फ्लेमिंग एवढा क्रिकेट अ‍ॅक्युमेन असेल तरंच एखाद्या बॉलरने कॅप्टन्सी चा खुळा विचार डोक्यात आणावा. झिंटा/सेहवाग वगैरेंनी अश्विन वर विश्वास टाकला ह्यापेक्षाही अश्विनला स्वतःवर कसा विश्वास वाटला ह्याचे मला नवल वाटते .
प्लेअर्सच्या पोटेंशिअल पेक्षा त्यांचे लिमिटेशन्स ओळ्खण्यात मला वाटते पंजाब खूप खूप मागे होता... दिल्ली पेक्षाही.

बिन्नी Gowtham च्या आधी, really ?
>>>>
अगदी सेम reaction होती माझी आमच्या Fantsay League च्या whatsapp group वर बोलताना Wink

>>>>

+७८६
माझीही सेम पोस्ट होती आमच्या क्रिकेट व्हॉटसप ग्रूपवर...
बिन्नीला कसा पाठवू शकतात गौतमच्या आधी? यांना मॅच जिंकायचीच नाहीये ... मी चाल्लो बिगबॉस बघायला.

येनीवेज, फायनल कलकत्ता चेन्नईत बघायलाच मजा आहे. पुन्हा हैदराबाद नको. तीनदा हरले चेन्नईशी बस झाले. आता त्यांना पुन्हा हरवायला धोनीलाही लाज वाटेल.

एकीकडे कार्तिक विकेटकीपर कप्तान तर दुसरीकडे धोनी तेच..
नाही म्हटले तरी कार्तिकच्या मनात एक छुपी ठस्सन असणारच.. मजा येईल बघायला Happy

नाहि रे, कार्थिक तसा वाटत्नाही. त्याच्या जनरल जुआ मुलाखती वाचल्यात त्यावरून तो मनात काही ठेवून वागणारा वाटला नाही अजिबात. एकदम perfect team man वाटतो.

बर्गा तुझ्या राहाणे कॅप्टन म्हणून पोस्ट बद्दल अंशतः अनुमोदन, फक्त त्याने टेस्ट मधे केलेली कामगिरी जबरदस्त होती. त्यावरून इथे individual acumen पेक्षा support team ची लुडबुड हा भाग जास्त वाटला. मूळात RR कडे मधल्या फळीसाठी कोणीच नव्ह्ते हे आधीपासून उघड असताना त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही दिसला नाही त्यावरून problem systematic आहे असे अधिक वाटले.

नाहि रे, कार्थिक तसा वाटत्नाही. त्याच्या जनरल जुआ मुलाखती वाचल्यात त्यावरून तो मनात काही ठेवून वागणारा वाटला नाही अजिबात.
>>>>
माणूस म्हणून चांगला वाईट नाही हो म्हणायचेय. ठस्सनचा अर्थ तसा काढू नका. जेव्हा राष्ट्रीय संघात एका जागेसाठी दोन खेळाडू स्पर्धा करत असतील तर हुमायुन नेचरला अनुसरून त्यांच्यात ईथेही स्पर्धा असणारच..

गंमत म्हणजे आजवर धोनीचे पारडे निर्विवादपणे जड असेल पण मधल्या काळात त्याच्या वयावर आणि कामगिरीवर प्रश्न उठायला सुरुवात झालीय. अश्यात आपण संधी साधू ही आशाही असेलच.

तिथे तो पंतही आला आहे या कीपरच्या स्पर्धेत. आणि यंदा बरेचदा दिल्लीच्या दोन विकेट लवकर पडल्यावर पुढे येत डाव सांभाळून त्याने टेंपरामेंट आणि इनिंग बिल्ड करायचा गुणही छान दाखवला आहे.

आरार ला उनाडकट पैसे आणि धावा देणे दोन्ही बाबतीत महाग पडला.. काल देखील केकेआर ची धावगती वाढवून देण्यास त्याने मदत केली..

"नाहि रे, कार्थिक तसा वाटत्नाही. त्याच्या जनरल जुआ मुलाखती वाचल्यात त्यावरून तो मनात काही ठेवून वागणारा वाटला नाही अजिबात. एकदम perfect team man वाटतो." - मागे एकदा संजय मांजरेकरच्या एका लेखात त्याने ह्याच्या विरूद्ध लिहीलय. लिंक मिळाली तर पाठवतो.

रहाणे ला नेक्स्ट द्रविड वगैरे म्हटलं गेलं होतं आणी त्याच्या खेळात एक नजाकत देखील आहे, पण हायझेनबर्ग ने लिहील्याप्रमाणे तो कन्फुझ्ड वाटतो.

उनाडकट आणी स्टोक्स - दोघांवर लावलेले पैसे वाया गेले, फरक इतकाच आहे की स्टोक्स कडून पुढच्या वर्षी अपेक्षा तरी ठेवता येतील.

आणखीन एक पूर्वानुभवः हे सगळे आयपीएल मधे गाजलेले स्टार्स, पुढच्या इंटरनॅशनल असाइनमेंट ला ढपणार.

उनाडकट आणी स्टोक्स - दोघांवर लावलेले पैसे वाया गेले, फरक इतकाच आहे की स्टोक्स कडून पुढच्या वर्षी अपेक्षा तरी ठेवता येतील.>> ऊनाडकटला एवढे पैसे देऊन घेतले ह्यामागे ऊनाडकटचे दिसलेले पोटेंशिअल ( डोमेस्टिक कंडिशन्स खुबीने वापरू शकेल असा) पेक्षाही मला ईतर टीम्सच्या थिंकटँकने बोली वाढवत नेत राजस्थानला युक्तीने नको तिथे जास्ती पैसे मोजायला लावले आणि मग त्यांना बाकी प्लेअर्सच्या ऑक्शनमध्ये पडतं घ्यावं लागलं असं वाटतंय. कुलकर्णी आणि आर्चर असतांना ऊनाडकटची गरजच नव्हती.
सॅमसन राहूलसारखी बर्‍यापैकी किपिंग करतो ना मग बटलर पण आणि पुन्हा क्लासनपण कश्याला हवे होते? ते सुद्धा एकही एस्टॅब्लिश्ड ओपनर घेतलेला नसतांना ?

कोलकाताने राणा आणि ऊथप्पा पैकी एकाला बसवून डेलपोर्टला संधी दिली पाहिजे पण कार्तिक बहूतेक अशी रिस्क घेणार नाही.

"सॅमसन राहूलसारखी बर्‍यापैकी किपिंग करतो ना मग बटलर पण आणि पुन्हा क्लासनपण कश्याला हवे होते? ते सुद्धा एकही एस्टॅब्लिश्ड ओपनर घेतलेला नसतांना ?" - सॅमसन ने विकेटकिपींग सोडलीये - इंज्युरीमुळे.

"ऊनाडकटला एवढे पैसे देऊन घेतले ह्यामागे ऊनाडकटचे दिसलेले पोटेंशिअल" - उनाडकट मधे वगैरे पोटेन्शियल दिसायचं म्हणजे, ह्याला दिव्य दृष्टीच हवी. त्याच्यापेक्षा गुर्बानी, सैनी वगैरे चांगले ऑप्शन्स होते. गेला बाजार इश्वर पांडे सुद्धा चालला असता.

उनाडकट ला तो left arm आहे म्हणून अधिक डिमांड आहे. नाहितर मुंबई ने तरी सांगवान ला कशाला घेतले असते. पुण्याकडून उनाडकट चाम्गला खेळला होता ती पुण्याई कामाला आली.

तिथे तो पंतही आला आहे या कीपरच्या स्पर्धेत >> पंत कीपर म्हणून अजून सिद्ध व्हायचाय असे मला वाटते. बॅट्समन म्हणून पंट घ्यायला हरकत नाही पण धोनी च्या जागी असेल तर कार्थिक सध्या तरी उजवा ठरेल, फिनिशर म्हणून पण खेळतोय.

उनाडकट ला तो left arm आहे म्हणून अधिक डिमांड आहे. >> स्पीड नाही, स्विंग नाही आणि अ‍ॅक्यूरसी तर आजिबातच नाही. असा कोणता 'मिलिअन डॉलर आर्म' होता त्याच्याकडे जो रारॉ मालकांना दिसला काय माहित.

पंतच्या आधी राहूल आहे ना लाईनमध्ये? ... बॅटिंग च्या बाबतीत राहूल ऊजवा वाटतो.. किपिंग मध्ये तुलना करायची झाल्यास राहूल पंतपेक्षा फार डावा नसावा. डोमेस्टिक लेवल वर करतो पण ईंनॅशनल लेवलवर (टेस्ट मध्ये तर फार अवघड वाटते ?) फूल टाईम किपिंग करायची त्याची तयारी आहे की नाही काय माहित. साहाचे दिवसही तसे भरतच आले आहेत .

बॅटिंग च्या बाबतीत राहूल ऊजवा वाटतो.>> पण पंत डावा आहे ना ? pun intended Wink पंत मधल्या फळीत हाणामारी करायला चांगला वाटतो, जिथे राहुल रखडतो. (का ते कळत नाही)

पण पंत डावा आहे ना ? >> Lol गूड वन. त्याच्या नंतर ईशान किशन पण डावाच आहे.

राहूलला रहाणेचा A स्टेटस देऊन टाका आणि शर्माच्या जागी धवन बरोबर ओपनिंगला पाठवा.. शर्माला युवराज आणि रैना बरोबर 'वेट लॉस' प्रोग्राम मध्ये घाला. रायुडू ला रैना च्या आणि पंतला केदार जाधवच्या जागेवर आत घ्या.

मला ईशान किशन अधिक उजवा वाटतो. त्याचा बेस जास्त स्टेबल असतो त्यामूळे अधिक शॉट्स खेळू शकतो. अर्थात पंत ने ज्या पटित धावा काढल्यात त्या पटीत नाही हि खरी गोष्ट आहे. पंतला दिल्ली च्या पिचवर खेळण्याचा फायदा मिळतो हे धरूनही.

राहूल फक्त आयपीएल ला विकेटकिपींग करतो. कर्नाटक चा विकेटकीपर गौथम आहे (हा गौथम आणी रॉयल्स चा गौथम वेगवेगळे). इशान किशन पेक्षा पंत ने डोमेस्टिक मधे खूप जास्त रन्स आणी खूप जास्त स्ट्राईक रेट ने काढल्या आहेत.

हायझेनबर्गा, रहाणे वर फारच चिडलायेस. इतका ही वाईट नाहीये तो. टेक्निकली साऊंड आहे, डोक्यातला 'केमिकल लोचा' सुधारायला हवा.

युवराज ने तर आता रिटायर व्हायला हवं (२ वर्षांपूर्वीच). शर्मा च्या बाबतीत मी काही बोलत नाही. त्याच्या नावानी सुद्धा मला 'कंटाळा' यायला सुरूवात होते (ही कॉमेंट त्याच्या चेहर्यावर कायम स्वरूपी मुक्कामाला आलेल्या 'कंटाळा भावा'वर आहे).

>>पण पंत डावा आहे ना ? pun intended Wink
हाहाहा..... हा भारी आहे!

राहुलची किपींग अगदीच कामचलाऊ वाटते मला..... तो फक्त बॅट्समन म्हणूनही संघात येउ शकतो
कार्तिक आणि पंत मध्ये खरी फाईट असेल असे वाटतेय!

पण सध्या इंटरनॅशनलमध्ये येण्याआधी खेळाडूंना "India A" कडून खेळून स्वताला प्रूव्ह करावे लागतेय.... बरीच टीका पण चाललीय यावर!

हो त्याने मागच्या दोन-तीन वर्षात खूप भ्रमनिरास केला , मला त्याचे शॉट सिलेक्शन आता बघवत नाही... अगदी बॉल स्टंपच्या लाईनमध्ये आला की बुडाला चटका बसल्यासारखा बॅट आणि पायांचा काही तरी गोंधळ घालत घाईघाईत बॅट फिरवतोय असं वाटतं. शून्य कॉन्फिडन्स. सगळ्यात वल्नरेबल तर तो एल बी डब्ल्यू आऊट होतो किंवा अपील होते तेव्हा वाटतो. अतिशय हास्यास्पद बॉडी लँग्वेज असते त्याची तेव्हा.
ऑफ स्टंप वरचा बॉल रिस्ट वापरून फ्लिक करत ऑन वर खेळला समजू शकतो पण ऑफच्या पाचव्या-सहाव्या स्टंपवरचा बॉल तो ऑनसाईडला कसा मारू शकतो.. गावस्कर ही भरपूर टीका करतो त्याच्यावर.. त्याची तंत्रशुद्धता पूर्णपणे हरपली आहे.. आणि कोहलीचा त्याच्यावर विश्वास दिसत नाही.

शिवम मावी - you beauty!! जबरदस्त बॉलिंग! परफेक्ट लेंथ पकडलीये. साहा चा कॅच घ्यायला हवा होता कार्थिक ने. मावी चा कॉन्फिडंस वाढला असता.

केकेआर ने मस्त सुरूवात केलीये. पण धवन सुद्धा मस्त खेळतोय. मोठी इनिंग खेळायचा निश्चय करून आल्यासारखा खेळतोय.

हायझेनबर्ग, तुझं रहाणेविषयी निरीक्षण बरोबर आहे. कुठेतरी मेंटल स्ट्रेंथ मधे गंडलाय तो. रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं तर, 'कुठल्यातरी चांगल्या गुरू-गिरू चे पाय धर आणी ती गाणी (शॉट्स) नीट बशीव की रे. नस्ता हुंबपणा कशाला?, अरे गाण्याचा (क्रिकेट चा) कुळधर्म संभाळ की रे'.

रशिद खान ला युसुफ च्या आधी पाठवले असते तर दोनशे पण झाले असते बहुधा. Happy

पण सध्या इंटरनॅशनलमध्ये येण्याआधी खेळाडूंना "India A" कडून खेळून स्वताला प्रूव्ह करावे लागतेय.... बरीच टीका पण चाललीय यावर! >> मला हे पूर्ण पणे पटतेय. त्यामूळे प्लेयर खरच चांगला आहे कि fluke आहे ते उघड होतेय.

राहाणे बाबत कोहली च्या मधल्या (रोहित शर्माच्या inning change करण्यार्‍या ) हव्यासामधे राहाणे नि पुजारा गंडले. पुजारा परत ये रे माझ्या मागल्या म्हणत सेटल झाला पण राहाणे अजूनही त्यातच अडकलेला वाटतोय.

मी आधीही म्हणालो होतो राशिद, गौतम, अक्षर वगैरे लोकांना पावरप्ले मध्ये ओपनिंग न देऊन पंजाब, राजस्थान आणि हैद्राबाद टीम्स कोलकत्त्याला नरेन च्या बाबतीत जमलेली ट्रिक मिस करत आहेत. ह्या लोकांना पीच, बॉलर, ड्यू , टॉस वगैरे गोष्टींनी काही फरक पडत नाही त्यांच्या विकेट लवकर गेल्याने ही काही फरक पडत नाही. तुमच्याकडे रायडू, बटलर, राहूल नसतील तर धवन, रहाणे बरोबर कंपल्सरी राशिद, गौतम सारख्यांनी ओपन केले पाहिजे.
राज्स्थानने आर्चरला पाठवून एक हाफ बेक्ड एक्सपिरिमेंट केला होता...जो गौतम बरोबर केला पाहिजे होता....
धोनी ने वरती हरभजन आणि चहार ला पाठवुन एका दगडात चार पक्षी मारले त्यादिवशी पंजाब विरूद्धं.

अंतिम सामन्यात कुणाला विशेष रस वाटत नसावा; १७८ चा पाठलाग करताना चेन्नई १० षटकात ८६-१ व रैना फॉर्मात. म्हणजे, निकाल जवळ जवळ निश्चित !
[ लेगब्रेक व गुगली टाकताना चेंडूवरची रशिदच्या हाताची पकड कशी बदलते, याचं छान प्रात्यक्षिक कुंबळेने दाखवलं; मनात आलं, स्वतः गुगली टाकायला मात्र हा महान लेगस्पीनर कारकिर्दीच्या शेवटापर्यंत कां बरं थांबला होता !! ]

Pages