उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय
सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
भारी !
भारी !
“दिव्याचा सध्या वणवा झालाय का
“दिव्याचा सध्या वणवा झालाय का रे ?“ - नाही रे, I’d say take IPL performances for what they are worth for. Don’t read too much into it. ती माझी प्रतिक्रिया ऋन्मेष च्या ज्या कॉमेंट वर आहे, ती आयपीएल व्यतिरिक्त परफॉर्मन्स विषयी आहे. आयपीएल मधे छान चाल्लय सगळं.
मुंबई ही आता या वेळची बकवास
मुंबई ही आता या वेळची बकवास टिम झाली आहे. पंड्या ब्रदर्स कुचकामी आहेत. त्यापेक्षा रायडुला रिटेन केले असते तर चालले असते.
मुंबै काही अगदी टाकाऊ टीम
मुंबै काही अगदी टाकाऊ टीम वगैरे झाली नाही. बहुतांश सामन्यात हरण्याची मार्जिन फार बारीक आहे. तिथे विनिंग मोमेंट साधले असते तर त्यातून मिळालेल्या विनिंग मोमेंटमच्या जीवावर आणखी चांगले परफॉर्म केले असते आणि पॉईट टेबल वेगळाच असता.
आणि पांड्या ब्रदर्स ऑलराऊंडर आहेत. असे प्लेअर टीमची स्ट्रेंथ असतात. फॉर्म कमी जास्त होऊ शकतो. प्रॉब्लेम असाय की ते फार भन्नाट फॉर्मातही नाहीत तसेच अगदी बकवास फॉर्मातही नाहीत जे त्यांना बदली करावे. किंबहुना काल शेवटच्या तीन ओवर आधी पांड्या ब्रदरसनी गोलंदाजी, फलंदाजी दोघांत चांगली कामगिरी केली होती.
एक पोलार्ड फक्त सध्या डोईजड आहे. त्याला रिटेनही उगाच केले. कोणी घेतले नसते त्याला लिलावात परत भेटला असता. काल पोलार्ड बाहेर असता आणि लुईस आत असता तर कदाचित लुईसने चांगली स्टार्ट मिळवून दिल्यावर सामना वेगळा असता.. सध्या तरी त्यांचे हेच टीम कॉम्बिनेशन बरोबर वाटत आहे. आता ईथून सहाच्या सहा सामने जिंकायचे आहेत. ऑल द बेस्ट !
फेरफटका,
फेरफटका,
बाकी कुणी कधी रिटायर व्हावं वगैरे सोशल मेडिया वरच्या मतांना काही अर्थ नसतो >>>> हे मान्य आहे. मुळात जोपर्यंत तुम्ही कोणाची जागा अडवत नाही आहात. म्हणजे बेस्ट ११ मध्ये तुमची जागा तुमच्या आजच्या खेळाच्या क्षमतेवर मिळवू शकत आहात तोपर्यंत तर कोणाच्या रिटायरमेंटबद्दल मत व्यक्त करायला जाऊही नये. कसोटीमध्ये धोनीने निवृत्ती घेतली आणि साहा आला या त्याच्या निर्णयाला मी स्विकारले. पण आजही एकदिवसीय फॉर्मेटमध्ये धोनीची जागा घेणारा विकेटकिपर जवळपासही नाहीये हेच फॅक्ट आहे. एखादा साहा किपिंग करू शकतो तर त्याच्यासारखी फटकेबाजी नाही. एखादा पंत फटकेबाजी करू शकतो तर धोनी किपिंगमध्ये उजवा ठरावा. एखाद्या कार्तिक दोन्ही थोडेफार जमवून दाखवावे तरी धोनीसारखे टेंपरामेंट आणि गेमची समज कोणी कुठून आणावी.. २०-२० तो ईतक्यासाठीच खेळतोय की मॅचप्रॅक्टीस राहावी. अन्यथा तिथे त्याने ईतरांना संधी देत निवृत्ती घेतली असती. २०१९ चा विश्वचषक झाल्यावर योग्य वेळी धोनी कुठला वैयक्तिक विक्रम दृष्टीक्षेपात आहे का हे न बघता निवृत्त होणार याची खात्री आहे. त्याआधी त्याने तसा विचारही केला तर कोहली स्वत: त्याचे पाय धरायला जाईल
दिल्ली राजस्थान मुंबई बाहेर
दिल्ली राजस्थान मुंबई बाहेर झाली
आता कोलकता, आरसीबी यांच्यात 4 थ्या स्थानासाठी लढत.. कोलकता ने जास्त मॅच जिंकल्याआणि दिल्ली राजस्थान मुंबईने प्रस्थापितांना अनपेक्षित धक्का दिला तर धमाल येईल.. अन्यथा चेन्नई, किंग्स पंजाब, हैदराबाद हे 3 स्थानांसाठी कायम होतील
चेन्नई, पंजाब, हैदराबाद
चेन्नई, पंजाब, हैदराबाद यांच्यात पहिल्या दोन क्रमांकासाठीही चुरशीची लढत होणार.. कारण त्यांना फायनलला जायला एक्स्ट्रा चान्स मिळतो, तर तिसर्या चौथ्याला एक्स्ट्रा सामना जिंकावा लागतो.
>>दिल्ली राजस्थान मुंबई बाहेर
>>दिल्ली राजस्थान मुंबई बाहेर झाली
आता कोलकता, आरसीबी यांच्यात 4 थ्या स्थानासाठी लढत
bye the way, राजस्थानचे ७ सामन्यात ६ गुण आहेत आणि आरसीबीचे ८ सामन्यात तेव्हढेच गुण आहेत!
Looking at the pattern,
Looking at the pattern, राजस्थान जिंकेल बहुतेक आजची मॅच!
"Looking at the pattern,
"Looking at the pattern, राजस्थान जिंकेल बहुतेक आजची मॅच!' - पाऊस थांबायला हवा. मला निक शॉर्ट परत येईल असं वाटत होतं. बटलर आनी स्टोक्स फारसे चालत नसल्यामुळे, राजस्थान ला बॅटींग मधे फायर पॉवर हवी आहे. किंबहून कधीतरी बटलर च्या जागी क्लासेन ची वर्णी लागायची पण शक्यता आहे.
केवळ भरपूर पैसे मोजले आहेत, ते वसूल व्हायला हवेत, असं मारवाडी धोरण नसेल, तर उनाडकट ला बसवायला हरकत नाही. अत्यंत प्रेडिक्टेबल, एकाच प्रकारची आणी बंडल बॉलिंग करतो तो. बघवत सुद्धा नाही (२०११ च्या ईंग्लंड दौर्यात, झहीर खान पहिल्याच मॅच ला इंज्युअर्ड झाल्यावर, व्हेकेशन वर गेलेल्या आर. पी. सिंग ला मायामी हून बोलावून घेतलं होतं. तेव्हा तो जशी 'बघवत नाही' टाईप ची बॉलिंग करत होता, तशी). त्या उनाडकट पेक्षा तो अनुरीत सिंग सुद्धा परिणामकारक बॉलिंग करू शकेल असं वाटतं. आणी अगदीच पैसे वसूल करायचे असतील, तर उनाडकट ला बस च्या मागे धावायला लावून, शेन वॉर्न साठी चहा-सिगरेट आणायला पाठवून, सगळ्या टीम साठी फाफडा बनवायला लावून सुद्धा तो हेतू साध्य होऊ शकतो.
धवल कुलकर्णी ठीक-ठाक आहे. निदान प्रयत्न तरी करतो. पन धवल सुनील कुलकर्णी नावाचा माणुस जितपत फास्ट बॉलर होऊ शकतो, तितपतच. (कायद्याचं बोला मधे, अरुण नलावडे जसं, 'कुंथलगिरीकर! छ्या, असल्या नावाचा मानूस कधी वकील असतो का' म्हणतो, त्याच चालीवर, 'धवल कुलकर्णी! छ्या, असल्या नावाचा मानूस कधी फास्ट बॉलर असतो का?).
मुंबै काही अगदी टाकाऊ टीम
मुंबै काही अगदी टाकाऊ टीम वगैरे झाली नाही. बहुतांश सामन्यात हरण्याची मार्जिन फार बारीक आहे. >> पहिल्या चार सामन्यांपर्यंत ठीक होते रे. नंतर जे काही आहे ते अशक्य आहे समजून घेणे. अति analysis चा परीणाम वाटतो हा.
धू धू धूतायत राजस्थान ला. १८
धू धू धूतायत राजस्थान ला. १८ ओव्हर्स मधे २२५ वगैरे चेस करायला लागणार आहे.
परत बघा... दिल्लीची पिस काढली
परत बघा... दिल्लीची पिस काढली राजस्थानने
बटलर सुटलाय. आधी दिल्ली ने
बटलर सुटलाय. आधी दिल्ली ने राजस्थान ला आणी आता राजस्थान ने दिल्ली ला धुवायला काढलय. अजुनही १२ चा आस्किंग रेट आहे.
पंत पेटलाय यंदा
पंत पेटलाय यंदा
शॉ ने पुन्हा मजा केली.
दिल्लीचे सामने आता या दोघांच्या फलंदाजीसाठीच बघतो. मजा येते..
बटलर आणि शॉर्टला गवसलेला
बटलर आणि शॉर्टला गवसलेला फॉर्म याच फक्त राजस्थानसाठी जमेच्या बाजू!
आता हीच ओपनिंग पेअर खेळवली पाहिजेल.... त्रिपाठीला आता बसवून दुसऱ्या एखाद्या नवीन फलंदाजाला संधी दिली पाहिजेल.... अजिबातच फॉर्मात नाहीये तो!
रहाणे ओपनिंगला नाही आला तर
रहाणे ओपनिंगला नाही आला तर करणार काय हा त्यापुढचा प्रश्न आहे.
तसेच शॉर्टचे मॅच घालवल्यानंतर आलेले ते तीन सिक्सर, त्यावरून तो फॉर्ममध्ये आला म्हणने धाडसाचे ठरेल. फॉर्मपेक्षा भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेत चाचपडतोय असे त्याकडे सध्यातरी बघून वाटते.
शॉर्ट विषयी ऋन्मेष शी सहमत
शॉर्ट विषयी ऋन्मेष शी सहमत आहे. ह्याच तीन सिक्सेस त्याने बटलर खेळत असताना किंवा आऊट झाल्या झाल्या मारल्या असत्या, तर कदाचित मोमेंटम गेला नसता. रहाणे ने काल ओपनिंग ला न येऊन शहाणपणा केला (योग्य निर्णय). पन दर वेळी इतकी पराकोटीची परिस्थिती असते असं नाही. पण एकंदरीत राजस्थान टीम कडे फायर पॉवर कमी पडतेय.
>>पण एकंदरीत राजस्थान टीम कडे
>>पण एकंदरीत राजस्थान टीम कडे फायर पॉवर कमी पडतेय.
Say something new buddy!
रहाणे वन डाउन किंवा फ्लोटींग पण खेळू शकतो.... पण पॉवर प्ले मध्ये बटलर पाहिजेच असे माझे मत झालय!
दुसऱ्या बाजूने जरा तरी सपोर्ट असता तरी गौथमने काढली असती मॅच!
राजस्थान हारले पण मस्त फाइट देउन हारले.... मजा आली मॅच बघायला!
<< तुमच्या व्यंगचित्रांशिवाय
<< तुमच्या व्यंगचित्रांशिवाय आयपीएल ची चर्चा रंगत नाही.>> फेरफटकाजी, तुमच्या या मताशी मात्र मीं एकटाच सहमत असण्याची शक्यता अधिक; तरी पण -
उन्हाळ्यात मुंबैबाहेर जावूया, म्हटलं तर नाहीं ऐकलत;
आतां मुंबैच गेली ना बाहेर !!!
>>तुमच्या या मताशी मात्र मीं
>>तुमच्या या मताशी मात्र मीं एकटाच सहमत असण्याची शक्यता अधिक;
बस्स का भाऊ!
तुमचे इथले फॅन फॉलोइंग रोहीत शर्मापेक्षासुद्धा जास्त आहे!
तो खेळला न खेळला तरी त्याच्या उल्लेखाशिवाय इथले एक पान सरकत नाही.... तसेच तुमचेही आहे...... तुम्ही आला नाहीत तरी तुमचे नाव निघतेच इकडे!
आज गेलला घ्यावे का फॅंटसी
आज गेलला घ्यावे का फॅंटसी टीममध्ये?
लैच कमी चेंजेस राहीलेत राव!
आणि भाऊंनी षटकार मारलेला आहे.
आणि भाऊंनी षटकार मारलेला आहे..
येस्स!! भाऊ इज बॅक .... विथ अ
येस्स!! भाऊ इज बॅक .... विथ अ बँग! आता मुंबई 'सुटणार' बहुदा!
आज मुंबई चा जिवन-मरणाचा प्रश्न आहे. आणी सहसा, अशा परिस्थितीत मुंबई जोरदार मुसंडी मारते असा इतिहास आहे.
काल कोलकता जिंकली
काल कोलकता जिंकली
त्यामुळे मुंबईचा पाय अधिक खोलात गेला आहे.. 200+ रन्स करून मोठी मार्जिन ठेऊन इतर सामने जिंकले तर त्यांची सरासरी + मध्ये येईल अन्यथा अंबानीच्या लग्नात वाढपी म्हणून
नेहमीप्रमाणे शेवटच्य over
नेहमीप्रमाणे शेवटच्य over मुळे मॅच घालवण्याचा प्रघात मुंबई जपणार असे पांड्याच्या शेवटच्या ओव्हर वरून वाटतेय.
भारी !!!
भारी !!!
जबरी कृणाल आणि रोहित !
आणि त्याआधी हार्दीक पण.
शेवटच्या ओव्हरचं काहितरी करा म्हणं!
शेवटच्या ओव्हरचं काहितरी करा
शेवटच्या ओव्हरचं काहितरी करा म्हणं! >> केलं ना, शेवटच्या ओव्हर मधे जाऊच दिली नाही मॅच
सूर्यकुमार यादव रोहित्चीच कॉपी वाटतो. केव्हढे ते डॉट बॉल असतात पण स्ट्राईक रेट नी स्टाईल शेवटी चांगला असतो. क्रूनाल पांड्ञाचे सिक्सेस गेलच्या लेव्हलचे होते आज.
अरे मुंबई बॉलींग करत असताना
अरे मुंबई बॉलींग करत असताना म्हणतो आहे.
मागच्या मॅचनंतर पांड्या
मागच्या मॅचनंतर पांड्या ब्रदर्सची पाठराखण केली ते त्यांनी आज लाज राखली
मुंबईसाठी कोलकतासोबतच्या दोन मेचेस महत्वाच्या आहेत. तसे तर त्यांना जवळपास सर्वच जिंकायच्या आहेत. पण कोलकत्यासोबतच्या दोन जिंकल्या तर कोलकता दोन हरल्या असे झाले.
Pages