आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मागल्या पानावर कुणीतरी आर आर वगैरे टीम आय पी एलचे स्टॅंडर्ड कमी करत आहेत असे लिहिले होते Happy

फेफ म्हणाला होता

RR is probably the worst team. They should not even compete and bring the intensity down. May be RR and RCB can have their own bilateral series.

गतवर्षीचे विजेते पण राखण्यासाठी अजून तीन सामने खेळणे मुंबईकरांना शक्य नव्हते.. दमलेल्या संघाने कालचा सामना अक्षरशः खेळायचा म्हणून खेळल्या सारखा वाटला... अन्यथा रोहित आणि पंड्या केवळ २-३ षटके उभे राहिले असते तरी सामना जिंकू शकत होते... दमलेल्या बुमराहची गोलंदाजी.. थकलेले फलंदाज .. आणि पुन्हा नंतर परत ३ सामने खेळा कुणी सांगितले एवढे उपद्व्याप...

आरार ने आता मिळालेल्या संधीचे सोने करावे.... जिद्द आहे त्या संघात.. तरी चेन्नई जिंकेल अंतिम असे सध्या वाटते..

MI was not a deserving team. In fact Pandya brothers are good for nothing. MI should get rid of atleast one of them. Rohit's body language was very dull yesterday

राजस्थान रॉयल्स नेहमीच मिडटेबल जाउन बसतो आणि आपल्या प्लेऑफ प्रवेशासाठी दुसऱ्यांच्या निकालाची वाट बघत बसतो!
बऱ्याचदा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स तंगड्यात तंगडे अडकवून बसलेले असतात (आठवा आदित्य तरेने फॉकनरला मारलेला सिक्स आणि डगआउटमध्ये द्रवीडने उद्वेगाने फेकून दिलेली टोपी)... यावेळीही त्यांचा प्रवेश मुंबईच्या आणि पंजाबच्या परफॉर्मन्सवर अवलंबून होता... समोर दिल्ली असल्याने मुंबई आरामात जिंकून प्लेऑफमधली जागा पटकावेल अस बऱ्याच जणांचा अंदाज होता.... पण मुंबई हारले आणि पंजाबही!

कलकत्त्यात कलकत्त्याशी knock out लढत ही सोप्पी गोष्ट नाहीये पण गौथम, गोपाल आणि सोढी चांगले परफॉर्म करत आहेत.... त्यामुळे ही लढत चांगली होईल ही अपेक्षा आहे!

<< दमलेल्या बुमराहची गोलंदाजी.. थकलेले फलंदाज .. आणि पुन्हा नंतर परत ३ सामने खेळा कुणी सांगितले एवढे उपद्व्याप...>> १००% सहमत !! कधीही जिंकण्याची उमेद किंवा जिद्द जाणवली नाही मुंबैच्या खेळात !! Sad

आपण हे असले आधीपण केलय.... रादर आपली स्टाइलच आहे ती (अमिताभच्या पिक्चरसारखी आधी मार खाउन नंतर सगळ्यांना लोळवायची) असल्या काहीतरी समजातून खुप casually खेळले मुंबई असे नाही का वाटत?

असल्या काहीतरी समजातून खुप casually खेळले मुंबई असे नाही का वाटत? >> हो अजिबात काही नवीन करून बघण्याची इच्छा वाटली नाही. रोहित ४ वरच खेळत राहिला कारण जेंव्हा IPL जिंकले तेंव्हा तो ४ वर खेळत होता. मिल्ने ला का वापरले नाही ? पोलार्ड चे डेड वेट का कॅरी केले ? सुरुवातीच्या मॅचेस मधे कृणाल पांड्याला बॉलिंग का दिली नाही ? गेल्या वर्षी इशान किशन ला गुजराथ ने go express yourself license दिल्यावर तो कसा खेळला होता ते बघून त्याला तसे का वापरले नाही ? नुसतेच प्रश्न ! Not being able to close down opponents at right moments मधे मुंबई गेली. नंतरही सहाच सामने जिंकून We are happy about what we accomplished असे म्हणताहेत ह्यातच आले.

राजस्थान रॉयल्स बद्दल फे फे नि स्वरुप च्या पोस्ट्स मला तरी पूर्ण पणे पटतात. मुंबई एव्हढेच विचित्र निर्णय कोणाचे असतील तर राजस्थान रॉयल्स चे. त्रिपाठी सुरूवातीपासून का ओपन करून गेला नाही नि शॉरर्ट्ला एव्हढा extended spell का दिला नाही ह्याची उत्तरे भयंकर interesting असतील.

मुंबई complacent वाटले पूर्ण टूर्नामेंटभर.

टवणे सर, माझी राजस्थान बद्दलची जी कॉमेंट वर दिलीये, त्यामागचा उद्वेग त्यांच्याबद्दलच्या सॉफ्ट कॉर्नर मधून आला होता. ते क्वालीफाय झाले ह्याचा प्रचंड आनंद आहे. पण पुढचा प्रवास सोपा नाहीये. बटलर गेल्यामुळे बॅटींग मधे फायर पॉवर खूप कमी झालीये. क्लासेन ला लवकरात लवकर फॉर्म गवसावा ही इच्छा. रहाणे कॅप्टन म्हणून असलेले रिसोर्सेस कसे वापरतो, ते बघायला आवडेल.

आज चेन्नई जिंकून अंतिम फेरीत धडकतील.. त्यामुळे चार दिवस विश्रांती घेऊन ताजे तवाने राहतील अंतिम सामन्यासाठी!
उद्या राजस्थान रहाणे जिंकावा अशी सदिच्छा!!

"आता खरा कस लागेल हैद्राबादच्या लोअर मिडल ऑर्डरचा!" - हैद्राबाद कडे लोअर / अप्पर मिडल ऑर्डर वगैरे असं काही नाहीये. सगळ्या अंधश्रद्धा आहेत. त्यांच्याकडे धवन - विल्यमसन आहेत आणी रशीद - भुवनेश आहेत. धवन-विल्यमसन गंडले आहेत, आता रशीद-भुवनेश वर मदार आहे. त्यांना त्यांची कला दाखवण्याइतपत स्कोअर व्हायला हवा.

I would much rather have KKR or RR in finals against CSK as CSK have a clear edge over SRH.

Hmmm..... Now few early wickets can make match a bit interesting..... But CSK has a depth in batting!

मजा आली. कार्लोस ऐवजी संदीप शर्मावर अधिक विश्वास दाखवायला हवा होता. part timer vs full time मधे फरक पडतो. फायनल मधे आता दुसरे पाटा पिच असेल तेंव्हा धमालच येईल.

अंतिम सामन्याचे प्रक्षेपण स्टार प्रवाह वर देखिल असून. मराठी मध्ये समालोचन असणार आहे!
समालोचनासाठी संदीप पाटील, सुनंदन लेले, चंद्रकांत पंडीत ह्या क्रिकेट तज्ञांसोबत माधुरी दिक्षित आणि स्वप्नील जोशी हे देखिल असणार!

राजस्थान च्या टीम मधे फक्त ४ बॅट्समेन आहेत - त्रिपाठी, रहाणे, क्लासेन, सॅमसन. नंतर एकदम बिन्नी, गौथम वगैरे. त्यांना बॅटींग डेप्थ हवी - जर ते पुढे गेले तर - एक अजून बॅट्समन हवा, किंवा ४ वर्षांपूर्वीचा बिन्नी हवा.

बिन्नी Gowtham च्या आधी, really ? Gowtham ला थोड वेळ सेट व्हायला द्यायला हवा वगैरे असा विचार करण्याची गरज नाही का ? RR च्या bizarre decisions मधे अजून एक भर.

रॉयल्स आता बिन्नी ला काढतील, मग तो सीएसके कडे जाईल आणी पुढच्या आयपीएल मधे अभेद्य ऑलराऊंडर म्हणून नावारूपास येईल. Happy

फेफ......समहाउ यंदा मला फारसे वाईट वाटले नाही..... किंबहुना फारश्या अपेक्षाच नव्हत्या ठेवल्या यंदा आरआर कडून
ते प्लेऑफमध्ये आले हाच बोनस होता

Pages