उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय
सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
मुंबैसाठी शुभशकुन घडतायेत भाऊ
मुंबैसाठी शुभशकुन घडतायेत भाऊ. काल पंजाब इतक्या वाईट पद्धतीनं हारली नसती नाहीतर.
>>केकेआर वि. डबल आर्स!
>>केकेआर वि. डबल आर्स!
डबल आर्स?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डॅनी मॉरीसन इश्टाईल
"डॅनी मॉरीसन इश्टाईल Wink" -
"डॅनी मॉरीसन इश्टाईल Wink" - येस्स!!
रहाणे नी माती खाल्ली. इतक्या चांगल्या मोमेंटम नंतर येऊन एका चांगल्या सुरूवातीवर पाणी ओतलं.
मुंबैसाठी शुभशकुन घडतायेत भाऊ
मुंबैसाठी शुभशकुन घडतायेत भाऊ. काल पंजाब इतक्या वाईट पद्धतीनं हारली नसती नाहीतर. >> एकंदर MI चा यंदाचा खेळ न बघता ते final चार मधे असणे अयोग्य ठरेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< एकंदर MI चा यंदाचा खेळ न
<< एकंदर MI चा यंदाचा खेळ न बघता ते final चार मधे असणे अयोग्य ठरेल >> असामीजी, त्यांचा खेळ बघून तर वास्तविक हें छातीठोकपणेच म्हणायला हवं ! पण... ये दिल जो पागल है, मानताही नही !! [ आणि , आतां , २२२ पैकी फक्त ३९ जागाच जिंकलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होवूं घातलाय; मग मुंबई final चार मधेच कां, फायनलही जिंकू शकते कीं !!
]
]
<< इतक्या चांगल्या मोमेंटम नंतर येऊन एका चांगल्या सुरूवातीवर पाणी ओतलं.>> खरंय. [ Incidentally, त्या सुनील नरैने पहिल्याच षटकात २१ धांवा फटकावल्या पण त्याचा चेहरा मात्र नेहमीप्रमाणे निर्विकार ! मागे एकदां सचिनची विकेट घेतल्यावरही त्याच्या चेहर्यावर प्रश्नचिन्हच होतं, ' कशाला एवढे नाचताहेत आपले संघ सहकारी ?' मी त्यावेळीं स्थितप्रज्ञ म्हटलं होतं त्याला. पण तो जाणूनबुजून गोलंदाजी व फलंदाजी करताना असं करून सगळ्याना बुचकळ्यात टाकत असावा असं आतां मला वाटतं. कुठे पवारसाहेबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला कोण जाणे !!
भाऊ
भाऊ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
भाऊ
भाऊ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाऊ, काहीही झालं तरी तो
भाऊ, काहीही झालं तरी तो 'नारायण' आहे, स्थितप्रज्ञ आहेच, पण थांग लागू द्यायचा नाही मनाचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज मुंबईसाठी सोपा पेपर आहे. आता मुंबई अशी खेळेल की सुरूवातीला खेळलेली टीम हीच होती का असा प्रश्न पडावा. न चुकता दर वर्षी हाच पॅटर्न फॉलो करतात. त्यांना ८व्या मॅच च्या पुढेच सपोर्ट करावा.
मुंबई मधे मॅच आहे हे विसरू
मुंबई मधे मॅच आहे हे विसरू नका.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खर तर आपल्यापैकी कोणाला सांगितले कि तुमच्या टीम साठी बॉलिंग युनिट उचला तर शेकडा ९९% लोकांनी बुमराह नि मुस्तफिझुरला उचलले असते, दोघांनी बर्यापैकी निराशा केली आहे ह्यावेळी.
आर आर च्या पावलावर पाऊल आहे
आर आर च्या पावलावर पाऊल आहे मुंबईचे!
Tournament is still wide open
Tournament is still wide open!
आज बुमराह खेळला, बोलाफुलाला
आज बुमराह खेळला, बोलाफुलाला गाठ म्हणायची का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१२ गुणवाले देखील प्ले ऑफ ला
१२ गुणवाले देखील प्ले ऑफ ला जाऊ शकतात . गुणतालिका पाहिल्यावर जाणवले ते..
12 पाँईटवर पुढे जाऊ शकणारे
12 पाँईटवर पुढे जाऊ शकणारे संघ मुंबई आणि बेंगलोरच. बाकीच्यांचे रनरेट फार गंडलेत.
मुंबईला पंजाबशी जिंकणे कंपलसरी होते. दिल्लीशी हरली तरी जाऊ शकते पुढे.
त्यासाठी बेंगलोर आज हैदराबादशी हरायला हवे. मग बेंगलोरने राजस्थानला हरवायला हवे. आणि मग पंजाबला चेन्नई हरवेलच.
याच केसमध्ये बेंगलोर सुद्धा आजचा हरूनही 12 पॉईंटवर पुढे जाउ शकतात. पण राजस्थानला दणक्यात हरवून रनरेट मुंबईच्या पुढे न्यावा लागेल. आणि मुंबई प्लस पंजाब हरायची वाट बघावी लागेल.
थोडक्यात मुंबई सपोर्टर म्हणून आज माझा सपोर्ट हैदराबादला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच्या सामन्यात मुंबैने
कालच्या सामन्यात मुंबैने जिंकण्यासाठी << सचिनची पुण्याई व माझ्यासारख्या अगणित खुळ्या व हट्टी पाठीराख्यांच्या शुभेच्छा >> पूर्णपणे खर्ची घातल्या आहेत; त्यामुळे, आतां मात्र त्याना स्वतःच्या कामगिरीवरच पुढची मजल मारावी लागणार आहे !!
काल एबीडी ने घेतलेला एक झेल
काल एबीडी ने घेतलेला एक झेल अफलातून होता!
![ABD_catch.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u54/ABD_catch.jpg)
काल आमची केकेआरच्या रसेल, नारायण, शुभमन, टॉम आदी खेळाडूं सोबत जिओ पुरस्कृत कार्यक्रमात भेट झाली! रसेल समोर नारायण अगदीच लहान वाटतो पण षटकार त्याच ताकदीने मारतो!
कृष्णा - सही!
कृष्णा - सही!
मुंबईवाले जाणार का पुढे?
गेल जेव्हा फिल्डिंग करताना बॉल चेस करतो तेव्हा लहान मुलाला सायकल शिकवताना पालक जसे थोडे मागे राहून सावकाश पळतात तसा पळताना दिसतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"गेल जेव्हा फिल्डिंग करताना
"गेल जेव्हा फिल्डिंग करताना बॉल चेस करतो" - दोन धादांत आरोप केले गेले आहेत ह्या वाक्यात गेल वर (मिलॉर्ड, मेरे काबिल दोस्त मेरे मुअक्किल पर यह सरासर झूठे और बे-बुनियाद, इल्झामात लगा रहे है).
पूर्वी क्रिकेट चा एक बोर्डगेम मिळायचा, ज्यात प्लास्टिक च्या फिल्डर्स ना त्या हिरव्या कापडी मैदानावर उभं केलं गेलेलं असायचं आणी बॉल बेअरिंग च्या बॉल ला एका रँप वरून घरंगळत सोडायचं. मग प्लास्टीक च्या छोट्या बॅट ने तो बॉल फटकवायचा. तो कधी मधी जर त्या फिल्डर्स च्या बाहुलीवर धडकला तर तो थांबायचा, नाहीतर सगळ्या बाऊंड्रीज असायच्या. त्याच पद्धतीनं गेल च्या जनरल दिशेनं मारलेला बॉल जर त्याच्यामुळे अडला, तर त्यालाच गेल ने फिल्डिंग केली असं मानायचा प्रघात आहे. बाकी तो बॉल मागे, किंवा रनिंग बिटवीन विकेट्स च्या वेळी पळतो वगैरे सगळ्या एक तर अंधश्रद्धा तरी आहेत किंवा त्याने फिटनेस साठी केलेल्या जॉगिंग वर लावलेले आरोप आहेत. असं सगळं यथासांग असताना गेल फिल्डींग करतो असं म्हणवतच कसं तुला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फा ला गेल कोण हे माहित नसावा
RCB vs SRH कसली perfect T20 match होती. मजा आली एकूणच. पांडेने मधे मारलेले काही शॉट्स बघून तो असा consistently खेळत नाही ह्या frustration मला फे फे ला रोहित च्या खेळामूळे होते त्यापेक्षा अधिक होते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज लुटूपुटीची मॅच सुरू आहे.
"पांडेने मधे मारलेले काही
"पांडेने मधे मारलेले काही शॉट्स बघून तो असा consistently खेळत नाही ह्या frustration मला फे फे ला रोहित च्या खेळामूळे होते त्यापेक्षा अधिक होते " - सही पकडे है!
"आज लुटूपुटीची मॅच सुरू आहे." - पण मुंबै चे सपोर्टर्स देव अगदी पाण्यात घालून नाही तरी देवांवर प्रोक्षण केल्यासारखं थोडंसं पाणी शिंपडून बघत असावेत. दिल्ली जिंकली तर मुंंबई चा पाया बळकट होईल. कदाचित दुसरे पण जातील का?
संदीप लामिच्छाने ची दुसरी मॅच
संदीप लामिच्छाने ची दुसरी मॅच. बहुदा रात्री मॅच संपायला उशीर होत असल्यामुळे त्याला घेत असावेत. रात्रीच्या जागरणाची सवय, दुसरं काय?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्यावरून सुचलं, नेपाळ ला टेस्ट स्टॅटस मिळणं अवघड आहे - सगळेच 'नाईट वॉचमन'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेफ - कहर आहे ती पोस्ट!
असं सगळं यथासांग असताना गेल फिल्डींग करतो असं म्हणवतच कसं तुला? >>> फेफ -
कहर आहे ती पोस्ट! फेफ्/असामी - सर्व आरोप/टीका/जॅब्ज मान्य. माझे गेल-अज्ञान दूर करतो आता.
. रात्रीच्या जागरणाची सवय,
. रात्रीच्या जागरणाची सवय, दुसरं काय? >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
यावरून सुचलं, नेपाळ ला टेस्ट स्टॅटस मिळणं अवघड आहे >> असच् काही नाही रे. day night test cricket आलय कि![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"day night test cricket आलय
"day night test cricket आलय की" - नाईट-नाईट टेस्ट येऊ दे, मग बघ नेपाळ वर्ल्ड चँपियन्स होतात की नाही ते. त्यांची एकच टीम फक्त 'जागते रहो' मोडमधे असेल.
असो, आजच्या मॅच मधे अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे.
गेल स्थितप्रज्ञ असल्याने तो
गेल स्थितप्रज्ञ असल्याने तो बॅटींग करताना जसा सीमारेषेपार जाणार्या बॉलकडे बघत राहतो, त्याचप्रकारे फिल्डींग करतानाही बॉलला सीमारेषेकडे जाताना बघत राहायचं धोरण त्याने अवलंबलेलं आहे. गीतेत भगवंतांनीच त्याचे तसे लक्षण सांगितले आहे -
धावणे भ्रमली बुद्धि तुझी लागूनी नि:श्वास
स्थिरा'गेल' क्रीजवर तेव्हा, हाणेल तोच तो
(श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय ।
स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो
- ह्या गीताईमधल्या श्लोकाची अन् विनोबांची क्षमा मागून)
दिल्ली नंतर आता आर सी बी
दिल्ली नंतर आता आर सी बी बाहेर...
धावणे भ्रमली बुद्धि तुझी
धावणे भ्रमली बुद्धि तुझी लागूनी नि:श्वास![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्थिरा'गेल' क्रीजवर तेव्हा, हाणेल तोच तो >>
बंगलोर ने नेहमी प्रमाणे खेळून दाखवले आज.
भा, मस्तच!!
भा, मस्तच!!
आज आरसीबी हारेल असं वाटतच नसताना अचानक हारले. अर्थात श्रेयस गोपाळ ने मस्त बॉलिंग केली. बाकी कुठल्याही विकेटपेक्षा एबी ची विकेट खास होती. एबी त्याला सिक्स मारताना बाऊंड्रीवर कॅच वर वगैरे आऊट झाला असता तर इतकं अप्रूप नसतं वाटलं, पण एबी सारख्या बॅट्समन ला गूगली वर फसवून स्टंप करवणं ही कमाल होती.
केकेआर छान जिंकले. उद्या उरलेल्या दोघांचा निकाल कळेल. आत्ता तरी मुंबई फेव्हरिट आहे.
संपले मुंबई चे आव्हान..
संपले मुंबई चे आव्हान..
RR in playoffs..... हुर्रे!
RR in playoffs..... हुर्रे!
Pages