कविता माझी उर्वशी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 22 April, 2018 - 04:41

कविता माझी उर्वशी

रागातच लटक्या ती दूरदेशी निघून गेली
आर्जवे शब्दांची लाख लाख जरी केली

शपथा किती किती घातल्या अर्थाच्या
धमक्याही खूप दिल्या जीव देण्याच्या
बधली ना ती जराही विव्हळ मज केले
जाता जाता माझे तीने सर्वस्व हो नेले

तुटले अन्नपाणी गोड काही काही लागेना
तिच्याशिवाय जळीस्थळी कोणीही दिसेना

शब्दांचे घनदाट जंगल पिंजून मी काढले
भावहीन काटे मज ठायी ठायी टोचले

उपाय सारे जरी थकले हाथ मी टेकणार नाही
घेतला वसा शब्दांचा सारस्वत टाकणार नाही

धुक्यासारखी मृदु ती बी सारखी उत्कटता
रुजते खडकातही जरासेही पाणी मिळता

उजाडता उजाडता घुंगरू वाजेल नभी
अचानक मजसमोर असेल उर्वशी उभी
असेल माझी उर्वशी उभी

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

छान!
बहुत सुकृतांची जोडी । म्हणुनी काव्यानंदी गोडी।।

अनंतजी खरच असचं आहे अगदी ... बहुत सुकृतांचीच जोडी आहे . मी स्वतःला भाग्यवान समजतो . " लाभले आम्हास भाग्य ......... " खूप धन्यवाद .