"कट्टी बट्टी" - झी युवा

Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43

झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
Katti-Batti-–-Zee-Yuva-Serial_0.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना. पूर्वाला स्वत:चे निर्णय घेता येत नाहीत वाटतं. तीची पीचडी तोंडी लावण्यापूरतीच आहे का. आप्पांना जर एवढी काळजी असते तिच्या शिक्षणाची तर तिची शिकवणी कशी बुडू देतात एवढ्या तेवढ्या कारणावरून. नी जे नोटीस करते ते पूर्वा का नाही करत, अनुष्काचं माॅड असणं, ती फक्त मैत्रिण आहे की आणखी काही, परागचा दुकानातला अस्वस्थपणा. खरंतर पूर्वा फक्त घरच्यांचं मन राखायला लग्न करतेय, तिला काहीच हौस नाही आणि तिच्या पीचडीच्या मुलाखतीत ती तसं म्हणतेही. सासू म्हणतेय दुकानाचा पत्ता लिहीलाय खोक्यावर तर ही म्हणते की आईला पत्ता सांगा, लहान आहे का ती हरवायला. आत्याच्या नव-याला कशा एवढ्या सुट्टया मिळतात. आत्या अजूनही नाखूषच आहे, मग कशाला जाते परत, एवढा तिला संशय असतो पण आप्पांनी सांगितल्यावर काहीच बोलत नाही. अनुष्का पुण्यातच वाढलेली असते ना की परदेशात. पुण्यात मुली अशा ऊठसूट मुलांच्या अंगचटीला येतात का, काहीही. ती अनुष्का फारच फुटेज खाते आजकाल, बोर करतात तिचे सीन. ईथेही घरातल्या मुली पंजाबी ड्रेस घालतात (पूर्वा आणि पुष्पा), पण नी पूर्वाच्या वयाची असून साड्याच नेसते. बैठकीत मला वाटलेलं खूप भांडणं होतील पण बैठक अगदीच फुसकी झाली. पराग बैठकीच्या आधीच खर्चाचं बोलत का नाही घरच्यांबरोबर की त्याला काही नकोय मुलीकडच्यांकडून. हितेशकाका मस्त शेर आणि गाणी म्हणतो प्रसंगानुरूप. हुश्श, झालं एकदाचं खूप दिवसाचं लिहून.

चंपा, सगळं एकदम लिहिलंस की. Happy

आप्पांना कुठे काळजी असते तिच्या शिक्षणाची?? फक्त पूर्वाच्या वडिलांच्या इच्छेखातर आणि पूर्वाच्या शिक्षणाच्या हौसेखातर शिकू देतात ते तिला.
पूर्वाचा क्लास बुडाला हे ऐकून परागची आई हळहळते नि परागचे एक्स्प्रेशन पण बोलके होते.

अनुष्का बद्दल +1. ती शाळेतली मैत्रीण असते परागची म्हणजे दहावीपर्यंत तरी नगरमध्येच असणार शिकायला. आता 26/27 ची दाखवली असेल तर दहा-12 वर्षांत ती नगरची संस्कृती विसरली असं कसं होऊ शकतं?? आणि येत जात असणारच की ती नगरमध्ये. तरीही कायम परदेशात वाढल्यासारखी का वागते.

हो ना अनुष्का अति फिजिकल होते, तरी तो मित्र सांगतो हे नगर आहे, पुण्यात पण इतकं उठसुठ कोणी करत नसावं. खूप ऑकवर्ड करते परागला. नशीब साडीच्या दुकानात तशी बरी वागते.

साडीच्या दुकानात आज तिची सगळ्यांशी ओळख झाली ते बरं झालं. साडीच्या दुकानात सर्वात जास्त मस्त acting नी आणि परागची होती.

नी साड्या नेसतेय पण पूर्वाची आत्या ड्रेस घालते की मग मुली आणि सुनांना वेगवेगळा न्याय आहे यांच्या घरात, असं ड्रेसिंग आणि इतर बाबतीतही दिसतं.

परागची आई आणि पराग खरंच हळहळतात पूर्वाचा क्लास बुडला म्हणून, तिथे जास्त महत्व आहे शिक्षणाला, ह्यांच्या घरापेक्षा असं दिसतंय. परागची आईपण फार सहज अभिनय करते.

पण यात जे दाखवतायत ते बहुतेक घरात असत तसच आहे , मुलिनी माह्रेरी असताना ड्रेस घालायचे, सुनानी साड्या नेसायच्या वैगरे नियम बर्‍याच घरात असतात... पण जे काय खेळकरपणाने दाखवलय ते मस्तय, पुर्वाची वहिनी किती गोड आहे आणी चेहरा पण खुप बोलका आहे तिचा, अगदी झरझर हावभाव बदलत असतात तिच्या चेहर्‍यावर.

मंगेश देसाई माझा अतिशय आवडता कलाकार आहे Happy पण तो खरंच पंचावन वर्षांचा असेल का. त्याला या मालिकेत बघून खूप आनंद झाला. जावयाने छान भडकवलं बोराड्यांच्या जावयाला. चारूआत्याची गुलाबी साडी परत खूप छान. नशिब आज ती अनुष्का नव्हती. मितालीचा आज परत प्रवेश झाला, ती मजा आणेल तिचा पुणेरी ठसका दाखवून, फक्त तिला लवकर नाही जाऊ दिली पाहिजे पुण्याला.

मिताली फक्त श्राध्दासाठी आली असावी.

मंगेश देसाईला आणलाय म्हणजे काहीतरी मोठा टर्न असणार मालिकेत. मे बी तो positive किंवा negative असू शकतो.

तिथल्या जावयाला अति माज असतो आणि इथला अगदीच गरीब बिचारा, राबणारा. दोन टोकं. आता भडकवल्यावर इथला काय करतो बघूया.

चारूआत्या फार गोड आहे, लवली chara.

पपीला असंच पाहिजे, लाडू वळणे आणि साडी बदलणे ही कारणं आहेत का क्लास बुडवायची. लक्ष्मीकाकाची दया आली काल, घरी तर वाट्टेल तसे बोलतातच पण काल पाठारे सरपण रिकामटेकडा म्हणाले. चिठ्ठी घेऊन जाणे निव्वळ प्राथमिक शाळा होतं. पराग आपला बघावं तेव्हा अनुष्काबरोबर. अनुष्का काय काम करते अफेअर करण्याशिवाय, कधी दाखवत नाहीत. पपीने नीट बोलायचं ना परागशी की आत्ता नाही बोलू शकत. घडाघडा बोलतच नाही ती. नी आणि समीर गोड आहेत.

कडक शिस्तित वाढल्याने तिच्यात आत्मविश्वास कमी आहे अस वाटत , चिठ्ठी ? ? काहिपण.सरही उगाच ताणतायत , २-३ क्लास बुडले म्हणून काही लगेच कुणि पीएचडी कॅन्सल करत काय?

हो ना सरांना काय अधिकार होता काकाला रिकामटेकडे म्हणायचा, मला पण नाही आवडलं.

अनुष्का सारखी शिरा ताणून आणि साधं पण वरच्या आवाजात का बोलत असते.

परागच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचे पठारे सर मित्र आहेत त्यामुळे पराग सांगणार सरांना, त्यामुळे तिचा क्लास सुरु होईल कदाचित परत.

मग आता तिला परागशी लग्न करावेच लागेल! नाहीतर कृतघ्न म्हणतील लोक.
एक जबरदस्त खळबळजनक कलाटणी - पठारे सर म्हणतील, माझ्याशी लग्न कर, किंवा मी सांगतो त्या मुलाशी लग्न कर.
किंवा पुराणिक काकांचा मुलगा येईल आणि तिला घेऊन एकदम अमेरिकेला जाईल, तिथे ती पी एच डी करेल. पण तिथे दुसराच कुणि भेटेल तिला, मग लै त्रांगडे - वर्‍हाड निघालय लंडनला सारखे काहीतरी घुसडायला चान्स!

Lol

युवा सोडून दुसऱ्या channel वर असती तर असं होण्याचे प्रचंड chances. पण युवा वर असल्याने कदाचित इतपत भरकटत नेणार नाहीत, होप सो.

हो पण एक आहे सरांचं chara निगेटिव्ह असेल तर सांगता येत नाही स्टोरीचं, कारण महत्वाचं दिसतंय.

ते सीताफळाचं लोणचं काय प्रकार होता, म्हणजे अपमान, मस्करी की विषय बदलणे. पण लक्ष्मी फार साधा आहे त्यामुळे अपमान करेल असं वाटत नाही. एवढा ऊशीर झालेला असताना परागने पहिले काॅलेजला जायला पाहिजे, होणा-या बायकोचं काम करायला, तर नेहेमीप्रमाणे तो पहिले अनुष्काला भेटायला गेला. पुभा बघितलं का, तो आगाऊ पोरगा, फोटो काढणारा म्हणतो की तुमची भानगड नंबर एक आली आहे Proud तारीख ठरवायला भेटत का नाहीत, आता परत तो जावई रुसणार.

तारीख ठरवायला भेटत का नाहीत, आता परत तो जावई रुसणार.>>> किवा फोनवर का बोलत नाही , हे ह्याच ह्याच आपल्या घरी ठरवतात आणी मग बसतात मन्धरणी करत, जावई अगदी टिपिकल आहे.
पुर्वा ! इतकी का गडबडते बोलताना , साध्या दोन वाक्यामधे तिची आता कस बोलु अन काय बोलु होत.

जावयाला काम आहे तर तेवीसला करू सापु असं चारू का नाही सांगत, ते तयार असतात की दोन्ही तारखांसाठी. उगा बळंच भांडणं वाढवू राहिले शीर्षकात आहे म्हणून. अनुष्काचा पीए कम केअरटेकर आहे का पराग. त्याचं लग्न ठरलंय तर त्याला कामं असतील, त्याला त्याची स्पेस द्यावी असं वाटत नाही का तिला, एवढं तर त्या जावयाला पण समजतं. तो विद्यार्थी काय तिला घेऊन जातो, तिला त्याला दरडावता येत नाही का. ती सोनी स्वत:ला खापरतोंडी म्हणते का कालच्या भागात, काहीतरी उद्योग करत राहते सतत. तो मधुभाई जोतिषीपण आहे का, त्याला काय विचारायला जातात चारू आणि पराग. चारूसाठी होलसेलमध्ये साड्या घेतल्यात सेम पॅटर्नच्या Happy

अनुष्काला रस्त्यात तरी नीट वागावं परागशी हे कसं कळत नाही. त्याचे विद्यार्थी आजुबाजुला असतात.

आज नुसतं खाण्यात एपिसोड संपला.

तो विद्यार्थी दाखवलाय तो किल्ला आणि अमिताभच्या मुवीत बालकलाकार होता तो आहे का.

हो ना, तारीख आपल्या आपल्यात कशी काय ठरवतात. जावई अगदी नमुने आहेत दोन्ही. त्या वहीनीला पूर्वा "नी" का म्हणते तिचं नाव तर प्रांजल आहे ना ? वहिनीचा शॉर्ट्फॉर्म का ?

प्रांजलवहिनी चा शाॅफाॅ "नी" केलाय पूर्वाने.
या दोघा नणंद-भावजयीचं नातं छान दाखवलंय यात. नाहीतर नणंदा भावजयीविरोधी कटकारस्थान करणे या एकमेव उद्देशाने जगत असतात सिरियलींमध्ये. Happy
तसं छाया नि पुष्पीचं वाजत असतं सारखं पण कटकारस्थानं नसतात.

ती सोनी स्वत:ला खापरतोंडी म्हणते का कालच्या भागात>> चंपा अगं सोनी स्वतःला कशाला खापरतोंडी म्हणेल?? Lol ती परागच्या फोनवर काहीतरी करत असताना अनुष्काचा काॅल येतो.. तिला म्हणते लगेच आला खापरतोंडीचा फोन. Happy

सापुची तारीख ठरवायला चारू नि पराग मधुभाईंकडे जातात तर तिथेच का नाही ठरवूनच परस्परांना कळवत.
कोकणात (आमच्याइकडे) सापु मुलीच्या घरी असतो त्यामुळे मुलीकडच्यांच्या सोयीने तारीख मुलीकडचेच ठरवतात नि मुलाकडे कळवतात.
सोनीने काल काय नवीन पराक्रम केला का?? मी सुरुवात मिसली.
झी5 आमच्याकडे ओपनच होत नाहीये कालपासून.

ती सोनी म्हणते की माझं खापरतोंडीचं नशीब किती चांगलय, लगेच आला तिचा फोन, असं काहीतरी मी ऐकलं. हो अंजू, तो मुलगा असतो वाटतं कशाकशात, पण नक्की कशात ते आठवत नाही. अनुष्का किती लाडात येते, किती ते जवळ जाणं, मला वाटलं किस घेईल त्याचा आता.

किमान रस्त्यावर कसं वागावं ही रीत अनुष्काला नाहीच, का उगा पुण्याचे नाव बदनाम करते. पुण्यात वाढली म्हणून असं न तसं आणि कायम शिरा ताणून का बोलते.

अभिज्ञा माझी लाडकी अभिनेत्री आहे, पण ह्या भूमिकेने आवडत नाहीये मला. फार overacting गरज नसताना.

युवावर पण लिहून येणार आहे मी हे.

Pages