Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43
झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे भाग नाही बघितलेत अजून.
सगळे भाग नाही बघितलेत अजून.
हो, ते लाच घेताना काय तो सीन
हो, ते लाच घेताना काय तो सीन मीपण बघितला होता पण सर्फिंग करताना. तेव्हा बघत नव्हते म्हणून नीट लक्ष दिलं नव्हतं.
हो ती आज्जी का बदलली, मलापण समजेना. आज्जी वेगळी का वाटतेय.
प्रांजल छानच दिसते.>>>हो..पण
प्रांजल छानच दिसते.>>>हो..पण काल लस्सीवरून तिचा समीरसोबत बोलणं सुरू होतं तेव्हा फारच गोड हावभाव..
हो मोक्षू, तेच म्हणायचं आहे
हो मोक्षू, तेच म्हणायचं आहे मला, प्रांजल नुसती दिसायला सुंदर नाही तर सगळ्या भावनांचं करेक्ट मिश्रण आहे ती, सासूला मान देणारी समंजस सून, नणंदेची निष्पाप मैत्रिण, नव-याला चिडवणारी खट्याळ बायको वगैरे वगैरे. मेन हिरवीण म्हणूनही शोभली असती. टोपी एवढी महत्वाची आहे तर अशी कुठेही का ठेवलेली असते. जावई का परस्पर निर्णय घेतो भारतीय बैठक वगैरे. ज्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि ज्यांचं घर आहे त्यांना नको का विचारायला. परागचे आईवडिल फारच संमजस आहेत, सगळ्यांना सांभाळून घेतात. पुभा दिसत नाही झी५ वर. काय होणारे उद्या, टोपी सापडली का.
नाही सापडली टोपी बहुतेक. ती
नाही सापडली टोपी बहुतेक. ती परागची बहीण पण कायम घोळ घालत असते.
पपी चे भाऊ वहीनी दोघे जबरदस्त आहेत, मस्त कपल, फार गोड.
परागकडे त्याच्या बाबांचा स्वाभिमान काही जण जपत नाहीत, तेव्हा ते दुखावले जातात आणि बोलतात तेव्हा त्याची आई छान सांभाळून सांगत असते.
नात्यांचे अनेक पैलू एकत्र कुटुंबातील दोन्हीकडे छान बघायला मिळतात.
टोपी एवढी महत्वाची आहे तर अशी
टोपी एवढी महत्वाची आहे तर अशी कुठेही का ठेवलेली असते.>> धुवुन वाळत घातलेली असते बहुधा!
परागची बदललेली आजी दिदोदु १
परागची बदललेली आजी दिदोदु मध्ये होत्या आणि तिथे पण त्या निकम आजीच होत्या.
काल चारू आंणि पुष्पा छान दिसत
काल चारू आंणि पुष्पा छान दिसत होत्या. चारूची ब्राईट कलरफुल साडी एरवी आवडली नस्ती पण तिच्यावर फारच खुलून दिसत होती. तिचे कानातलेही मस्त होते. पुष्पाला केशरी साडी छान दिसत होती. अनुष्काचे कानातलेही आवडतात मला, कपडे मात्र ती फारच लहान मुलींसारखे घालते कधीकधी. नीचे हावभाव फार आकर्षक असतात, ती पूर्वाला चिडवताना फार मोहक दिसत होती. आप्पा एकदाचे मुलीला काहीतरी बोलले, स्वत:ची वेगळी बैठक करू नका लक्ष्मी मूर्ख वाटावा ईतका भोळा आहे. थॅंक्यूचे संवाद टाईमपास असतात चारी आणि लक्ष्मीचे. बैठकीला घरातले सगळे का जात आहेत. बैठकीत वाजणार वाटतं दोन्ही घरातल्यांचं आणि पूर्वा-पराग प्रेमात पडणार.
चारू पुष्पा कोण. मला नावं
चारू पुष्पा कोण. मला नावं नाही माहिती किंवा लक्षात येत नाही. मी अमक्याची आत्या तमक्याची काकू लक्षात ठेवते. नी माहितेय, ते समजलं.
चांगली आहे का सिरीयल? वा वा
चांगली आहे का सिरीयल? वा वा बघा लोकहो.
ती वरच्या फोटोतली हिरोइण आहे का? ती मला लोलितासारखी दिसतेय. (सुहास परांजपे - नांसौभ मधली)
परागची नवीन आज्जी बोअर आहे,
परागची नवीन आज्जी बोअर आहे, ती D 3 मध्ये पण नव्हती आवडली.
चारूची ब्राईट कलरफुल साडी
चारूची ब्राईट कलरफुल साडी एरवी आवडली नस्ती पण तिच्यावर फारच खुलून दिसत होती. ..+१
सस्मित, अगं लोलिता कुठे???
सस्मित, अगं लोलिता कुठे??? तो पैलवानच.
ही हिराॅइन छान आहे.. नाजूक एकदम.
अन्जूताई, चारू म्हणजे परागची आत्या आणि पुष्पा म्हणजे पूर्वाची आत्या.
ओहह thank u निधी.
ओहह thank u निधी.
हो परागच्या आत्याला ती साडी छान दिसत होती, ती फार गोड आहे. मला आवडते. पूर्वाची आत्या ok पण परागची खूप आवडते.
टोपी वर टोपि
टोपी वर टोपि
आज टोपीपुराण फक्त.
आज टोपीपुराण फक्त.
आप्पा अगोदरच म्हणतायेत ,
आप्पा अगोदरच म्हणतायेत , "निकम गुरुजी चं पुराण चालू केलं तर कठीण आहे. " आता बैठकीत खरचं कठीण आहे. आक्का मोठे पणा ऐकवणार आणि आप्पा चिडणार. बाकी त्या प्रकाश रावांच बेअरिंग भारी घेतलयं.
चांगली सिरीयल आहे
चांगली सिरीयल आहे
पुर्वा क्लासमधे रोज खोटी
पुर्वा क्लासमधे रोज खोटी कारणं का सांगतीये? लग्नाची तारीख ठरली, क्लास सोडावा लागला तर तेव्हा तर खरं काय ते सांगावं लागेलच. मग आत्ता ही लपवालपवी का चाललीये?
पूर्वा नगरमध्येच राहणार आहे
पूर्वा नगरमध्येच राहणार आहे आणि लग्नानंतर चालू ठेवणार आहे शिक्षण, क्लास सोडावा लागणार नाही, पाठक सर कडक आहेत वाटतं, म्हणून गंभीर कारणं देत असते पूर्वा, आजारपण वगैरे. आप्पा लहान मुलांसारखेच वागतात, आपलं हित कशात आहे हेही कळत नाही त्यांना. लक्ष्मीला नीट समजावता येत नाही लीलासारखं, आप्पांचा ईगो कुरवाळला जाईल असं, म्हणून ते लीलाला जवळ करतात. आज म्हणे मी नमस्कार करणार नाही, लग्न मोडलं तरी चालेल, असं कसं चालेल. अथर्व अगदी मार्मिक बोलला, पूर्वा बैठकीला जात नाही पण पराग असतो, म्हणजे तिचं मत विचारात घेतलं जाणार नाही, मग ऊपयोग काय त्या शिक्षणाचा. मला मोठं व्हायचं नाही कारण मोठी माणसं भांडतात, किती निरीक्षण करतात लहान मुलं. पेढे आले नाहीत म्हटल्यावर जावयाचा पापड लगेच मोडतो, मिशीवरून हात फिरवायची लकब भारी आहे त्याची. अनुष्का येऊन घोळ घालणार बहुतेक. पुढचे दोनतीन भाग तरी बैठक चालेल.
लग्नासाठी मोठी सुट्टी तर
लग्नासाठी मोठी सुट्टी तर घ्यावीच लागेल ना तिला.तेव्हा काय सांगणारे?
मला एवढच खटकलं की एरवी शिक्षणाला महत्त्व देणारी मुलगी त्याच शिक्षणाचा क्लास बुडवतीये, त्यासाठी खोटं बोलतीये.
आणि ते कडक सर तिला शिकवताना एकदा तरी दाखवा.ती फक्त घरातुन क्लाससाठी बाहेर पडलीये,क्लास वरून घरी आलीये ईतकच दाखवतात नेहमी. आणि ईतर वेळी लग्न एके लग्न. क्लासमधे ती काय शिकतीये ते पण दाखवा की.
ती अनुष्का तडमडणार मध्ये. तो
ती अनुष्का तडमडणार मध्ये. तो पराग पण अति करतो. फोन बंद नाही का ठेवता येत त्याला. ती लग्न मोडणार ह्या दोघांचं.
छोटा मुन्या मस्त आहे हा
छोटा मुन्या मस्त आहे हा मोठ्या मुन्यापेक्षा . मोठ्याला काही अक्कलच नाही.
छोटा मुन्या मस्त आहे हा
छोटा मुन्या मस्त आहे हा मोठ्या मुन्यापेक्षा>>>> एकदा सासरच्या लोकांसमोर पूर्वाने छोट्या मुन्न्याला ओरडावे , मग सगळ्याचे चेहरे बघण्यासारखे होतील
कट्टी बट्टी मध्ये ती आत्या
कट्टी बट्टी मध्ये ती आत्या पूर्वाची तिच्या घरी जाईल असं वाटत नाहीये. घरी जाऊन श्राद्धाला परत येऊ शकते की ती, आप्पा का ऐकतात तिचे. मुलाची शाळा किती बुडतेय.
पराग दिवसेंदिवस जास्त आवडू लागलाय आणि अनुष्काचा कंटाळा आलाय.
पूर्वाच्या क्लासचं कोणालाच महत्व नाहीये, ती परागला का नाही मेसेज करत की अमुक ते अमुक क्लास असतो, त्यानुसार वेळ adjust करूया साडी बदलायची.
इथे मात्र मोस्टली साडी बदलून हवी असेल तर दुपारीच जायला लागतं.
पूर्वाच्या क्लासचं कोणालाच
पूर्वाच्या क्लासचं कोणालाच महत्व नाहीये, >> तिच्या घरातल्यांनाच महत्त्व नाहीये गं. परागकडच्यांना तर क्लासबद्दल माहितच नाहीये, नाहीतर त्यांनी स्वतःहून अॅडजस्ट केलं असतं.. असं वाटतं. कारण बैठकीच्या दिवशी पण पुष्पाआत्या पूर्वाला काॅल करत असते तेव्हा परागची आई तिला म्हणते की पूर्वा अभ्यासाला बसली असेल तर तिला डिस्टर्ब नको करायला म्हणून. पण पुष्पात्या कसली ऐकायला.
पूर्वाच्या आईला फक्त एकच
पूर्वाच्या आईला फक्त एकच वाटतं पोरीनं लग्न करून सासरी जावं नि सुगरणीसारखा स्वयंपाक करून, सगळ्यांच्याच खायच्याप्यायच्या आवडीनिवडी जपून करून घालावं. बाकी शिक्षण काय महत्त्वाचं नाहीच.
पराग अनुष्का समोर असा dumb
पराग अनुष्का समोर असा dumb boy सारखा का वागतो? हा नक्की काय शिकव्तो कॉलेजमधे अणि कसा शिकवत असेल?
पराग दिवसेंदिवस जास्त आवडू
पराग दिवसेंदिवस जास्त आवडू लागलाय आणि अनुष्काचा कंटाळा आलाय. >>> + १०० .
ती बैठकीच्या वेळी किती डोक्यात जात होती . नुसती आपली " मी पर्याला जाउन भेटते" किती उथळ्पणा .
आणि पुण्यात राहिलेली आहे ना ही कुठे परदेशी तर नाही ना .
पाहुणे आले आहेत सांगितलं तरी "मग काय झालं , मला त्याच्याशी बोलायचय . "
छायाला मुलंबाळं नाही त्यामुळे तिला रेवाचं एक्दम कौतुक वाटतं , ती तिला प्रेमाने बळंच जवळ घेउन बाजूला बसवते.
छायाची तणतण योग्य वाटली . आप्पा सारखे लक्ष्मी काका आणि तिला डावलतातं , आणि त्याना त्याबद्दल काही चुकीचही वाटत नाही.
उलट , जेवणं टाकून निघून गेले , डोक्यात राग घातल्यासारखे आणि नंतर छायाची समजूत घालत होते.
बैठकीचा फार गाजावाजा झाला त्यामानाने काही विशेष झालं नाही . आणि ते अर्गुणे कशाला आलेले बैठकीला ?
परागच्या रुखवत न घेण्याच्या निर्णयाच माधवरावानी कौतुक केलं तेन्व्हा तो म्हणते , हे तुमचेच संस्कार आहेत , जी गोष्ट चुकीची आहे ती स्प्ष्टपणॅ सांगायची म्हणून . तेन्व्हा वाटलं , अनुष्काच्या वेळेला याचे "उसुल और आदर्श" कुठे जातात ? तेन्व्हा कशी लपवालपवी करत असतो ?
परागची आई आणि पूर्वा दोघी फोनवर बोलतात ते फार आवडलं. पूर्वा एक्दम गोन्धळते आणि आई एक्दम होणार्या सुनेशी मायेने,कौतुकाने बोलतात.
आता प्रकाशराव जन्मशताब्दीचा खर्च बोराड्यांकडून उचलणार वाटतं , हुंड्याच्या बदल्यात .
आप्पा नेहेमीच लाक्ष्मिकाका
आप्पा नेहेमीच लाक्ष्मिकाका आणि त्या काकूवर अन्याय करतात, बरोबर बोलते ती. लक्ष्मी बिचारा आप्पांजवळ टिकून आहे, त्याचं त्यांना काहीही नाही. एक मुलगा देवाघरी गेला, बाकी दोन ह्यांना सोडून गेले तरी ह्याची हुकुमशाही सुरूच.
Pages