Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43
झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही आहेत .
नाही आहेत .
पुढे पुढे जाताना , मागचे भाग उडतात बहुतेक. >> आहेत की. मी तिथेच पाहतेय. आताशी 25 व्या भागापर्यंत आलेय बघत.
Old episodes असा ऑप्शन येतो. त्यावर मिळतात सर्व जुने भाग.
आमच्याकडे झी -५ दिसतच नाही.
आमच्याकडे झी -५ दिसतच नाही.
आजच्या भागात आप्पांची acting
आजच्या भागात आप्पांची acting जबरदस्त वाटली...
आप्पा सारखे पुराणिक पुराणीक
आप्पा सारखे पुराणिक पुराणीक का म्हणतात मुलाला?
पुराणिक : आप्पांचे
पुराणिक : आप्पांचे चंदूकाकासाठी संबोधन. कारण तो पुराणिकशी लग्न करून पुण्यात स्थायिक झालायं ( आप्पांच्या भाषेत घरजावई झालाय)
आप्पा जरा अतीच करतात, बैठकीला
आप्पा जरा अतीच करतात, बैठकीला बोलवायला हवं ना त्याला मुलगा म्हणून, फक्त सांगायचं मागे चेन वगैरे गिफ्ट करून त्यांना awkward केलंस तस परत करू नकोस. इथले जावई गरीब आहेत. मुन्याकडचे एकदम ताठा दाखवणारे आहेत.
अजून एक मुलगा कोणीतरी
अजून एक मुलगा कोणीतरी आप्पांचा घरातून पळून गेलाय, त्याची काहीतरी स्टोरी असेल पुढे, उमाकांत नाव.
आप्पा कर्तृत्ववान आहेत, बेरकी आहेत पण निर्णय लादणारे आहेत. पप्पी , तिचा भाऊ,तिची आई, लक्ष्मी काका हे स्वभावाने गरीब, समजुतदार म्हणून त्यांचं सगळं ऐकतात मान देतात आणि पपी family उपकार ओझ्याखाली पण आहे तिचे वडील लवकर गेले, आप्पानी केलं म्हणून. पप्पीवर मात्र जीव खूप आप्पा आणि सर्वांचाच.
आप्पांचा हेखेखोरपणा फकत
आप्पांचा हेखेखोरपणा फकत लक्ष्मीकाका, चंदुकाकासमोर. तोच आत्त्यांसमोर दाखवावा आणि तिला तिच्या घरी पाठवावं.
लीला डबल ढोलकी दिसतोय,
लीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. आप्पांनी लक्ष्मीला सांगितलं होतं की दोन दिवसात बैठक झाली पाहिजे, तेव्हा आप्पा का नाही सांगत बुधवारी मोठं काम आहे ते, बिचारा लक्ष्मीकाका. परागचा मित्र चांगला सल्ला देतो, होणा-या बायकोकडे लक्ष देण्याचा.
आप्पा लक्ष्मीकाकांना वागणूक
आप्पा लक्ष्मीकाकांना वागणूक देतात त्याची मला जाम चीड येते, तो पुणेवाला बरोबर उत्तरं देतो.
चैत्राली बरोबर, ती मुलगी वचावचा करते, तिला काहीच बोलत नाहीत.
परागचा मित्र खरंच चांगला सल्ला देतो, correct चंपा.
परागचा मित्र चांगला सल्ला
परागचा मित्र चांगला सल्ला देतो +१
आता आली का पंचाईत, बैठकीला
आता आली का पंचाईत, बैठकीला दोन्हीकडच्या मोठ्या लोकांनी निकम गुरूंजीच्या फोटोसमोर प्रसाद ठेऊन नमस्कार करायचा आत्या भारी रडली आज परागची, एकतर रड तरी नाहीतर बोल तरी काहीकाही संवाद नीट कळत नाहीत, आज पपी काहीतरी म्हणाली जे मला कळलंच नाही. आप्पा लक्ष्मीकाकाशी कधी सरळ बोलतच नाहीत, सतत पाणउतारा निकमांचा जावई भारी अक्कडबाज आहे, सतत स्तुती लागते त्याला. दोन्हीकडची माणसं एकसेबढकर एक आहेत पण खरी आहेत. बाकीच्या मालिकांसारखी अतार्किक नाहीत.
मला आवडायला लागलिये ही सिरियल
मला आवडायला लागलिये ही सिरियल, सगळे काम पण भारी करतायत, आज कपडा खरेदीच्या वेळेची चेश्टामस्करी पण भारी , एकदम नॅचरल.
हो. शेवटचा सिन भारी होता
हो. शेवटचा सिन भारी होता लक्ष्मीकाकाचा. वाटेत दुकान लागलं.पपी आलीये असं कळलं.म्हंटलं भेटुन जावं.. पुढे घोटाळा जास्तीचं बोलुन..
अचानक-भयानक , बाकि काय --
अचानक-भयानक , बाकि काय -- मजेत
मालिकेचे शीर्षक गीत स्वानंद
मालिकेचे शीर्षक गीत स्वानंद किरकिरे आणि अमृता सुभाष यांनी लिहिले आणि गायले आहे.
आता आली का पंचाईत, बैठकीला
आता आली का पंचाईत, बैठकीला दोन्हीकडच्या मोठ्या लोकांनी निकम गुरूंजीच्या फोटोसमोर प्रसाद ठेऊन नमस्कार करायचा >>>>> हो ना. आक्का सांगत होती तर माझ्या डोळ्यासमोर एकदम आप्पांचा चेहरा आला. बोंबला !!!!
मी बघितला नाही. नेटवर बघेन.
मी बघितला नाही. नेटवर बघेन.
बघितला एपिसोड. सीन आणि सीन
बघितला एपिसोड. सीन आणि सीन एकेक भारी मस्त. परागच्या आत्याचं रडून बोलणं जबरदस्त. पप्पीच्या आत्याला काकूने दिलेलं उत्तर परफेक्ट. ती कशी काय संसारावरुन बोलते तिला. पप्पीचे डायलॉग मस्तच.
सर्वात धमाल शेवटचा लक्ष्मीकाका सीन.
मुन्याच्या घरात ते माळवाले दाखवतात ते कोण.
सगळं जावयाच्या
सगळं जावयाच्या म्हणण्याप्रमाणै चाललय म्हणतात,ते का अंजुताई?
ते आजोबा आहेत वाटतं परागचे.
ते आजोबा आहेत वाटतं परागचे. फार दाखवत नाहीत त्यांना.
चैत्राली ते तर काका म्हणाले
चैत्राली ते तर काका म्हणाले ना, ते नाही.
चंपा चुलत आजोबा असतील का बहुतेक.
लीला डबल ढोलकी दिसतोय,
लीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. >>> त्या चंदूकाका ला ही त्याचा राग येतो .
"दाढीवाला येतो का ? " असं विचरत होता मागे . त्याच्यामते , एक्दा आप्पा सगळं , लीलाच्या ताब्यात देणार आणि बाकी सगळे बघत बसणार .
लीला डबल ढोलकी दिसतोय,
लीला डबल ढोलकी दिसतोय, दोन्हीकडून बोलतो. >>>लीला बदमाश असेल बहुतेक...अाप्पांची जमीन कसतोय ती बळकवेल बहुधा...चारूच्या नवर्याला म्हणतो ना जमिनीचं काम आहे म्हणून..अन् प्रकाश महसूल कार्यालयात आहे..काळे कामंही करतो असं दाखवलं होतं..त्यावरून अंदाज आला...दोघं गोंधळ घालतील बहुतेक..
प्रांजल किती छान दिसत होती
प्रांजल किती छान दिसत होती काल...
चंपा चुलत आजोबा असतील का
चंपा चुलत आजोबा असतील का बहुतेक.>>>हो परागच्या वडिलांचे काका आहेत ते...अन् परागचा जो चुलत वकील काका आहे,त्याचे वडिल आहेत...पण ते परागकडेच रहात असतात..
थँक्स मोक्षु.
थँक्स मोक्षु.
मला एक सांगा बैठकीत आहेर देतात का मिन्स परागला कपडे घेतायेत ते. लग्न ठरल्यावर लगेच गिफ्ट द्यायचं असतं का बैठकीत. आमच्याकडे नाही ही प्रथा बघितली.
दोन्ही कडच्या आत्या छान आहेत
दोन्ही कडच्या आत्या छान आहेत स्वभावाने.पोरांच चांगलं व्हावं असंच त्यांना वाटत असतं. टिपीकल एक्ता कपुर सिरीयल सारखं स्वतःचा संसार सोडुन माहेरी येऊन वचावचा भांडणे, भाचा-भाचीसाठी बघितलेला मुलगा- मुलगी स्वतःच्या मुला-मुलीसाठी पळवणे. असले उद्योग न करणार्या आहेत.
लक्श्मीकाका तर जाम मजा आणतात.
मोक्षू, काय काळी कामं करतो.
मोक्षू, काय काळी कामं करतो. हे कधी दाखवलं. प्रांजल छानच दिसते. पहिल्या भागात पराग त्या भाजीवालीला जास्त पैसे देतो ते मला जाम आवडलं. तो टोमॅटो चोरणारा मुलगाच फोटो काढत होता ना त्यादिवशी.
काय काळी कामं करतो. हे कधी
काय काळी कामं करतो. हे कधी दाखवलं.>> त्यांची एन्ट्री आहे तेव्हाच ते लाच घेताना दाखवलेयत.
ती परागची आक्का आज्जी का बरं बदलली मधेच?? पहिलीच छान होती की..
Pages