मी खाण्या-पिण्याच्या संस्कृती [ इंदौर ] ची असल्या कारणाने अधून- मधून माझ्या बटव्यात हा विषय सापडणारच ! अमेरिकेत आम्ही दोन्ही प्रकारच जेवण म्हणजे पश्चिमी आणि भारतीय आम्ही बनवतो. दोन –तीन दिवस पश्चिमी डीशेष खाल्ल्या कि तिसऱ्या दिवशी मात्र झणझणीत भारतीय खायची इच्छा होते, पण सुमारे ८-१० तास बाहेर काम करून आल्यावर घर ची इतर काम, भांडी इत्यादी आपली वाट बघत असतात तेव्हां आपलं चारी–ठाव जेवण करणे शक्य होत नाही. इथे रोज धुणं – भांडी करणारी बाई येत नसते, काही लोकांकडे आठवड्याची साफ-सफाई करायला क्लिनिंग कृ असतो .
असो, तर मग इथे आम्ही पश्चिमी आणि भारतीय दोन्ही फ्लेवर असलेली काही वन डिश-मील बनवतो, ते बघूया , आणि आवडल्यास तुम्हाला पण करता येण्या सारख्या आहेत.
वरण मुटकुळे: मी भारतात असताना माझी आवडती डिश होती. इथे आम्ही पास्ता मुटकुळे करतो. तूर डाळी ची आमटी हिंग, राई, कढीपत्ता आणि त्यात थोड्या फ्रोझन अगर फ्रेश गाजर, वाटाणे, ग्रीन बिन्स इत्यादी घालून करायची. चिंच अगर कोकम आणि गूळ घालावा, आवडत असल्यास चवी प्रमाणे गोडा मसाला घालावा आणि आमटी ला उकळी आणावी. [ आमटी जर आधी केलेली फ्रीज मध्ये असेल किंवा तूर डाळ शिजवलेली असेल तर ही डिश झटपट तैयार होते ] आता त्यात तुमच्या आवडता पास्ता अगर रावियोली [ हा पास्त्याचा प्रकार आहे आणि त्यात छोट्या करंजी प्रमाणे चीज, पालक इत्यादी भरलेलं असत ] पाण्यात उकडून गाळून उकड्त्या आमटीत सोडा, वरून कोथिंबीर आणि साजूक तूप घालून खावं. ह्या एकाच डिश मध्ये प्रोटीन, भाज्या आणि ग्रेन्स असं फूड पिरामिड पूर्ण होतं.
क्रेप्स – डोसा : इथे क्रेप्स हा प्रकार ब्रंच मध्ये खायची पद्धत आहे. मी तर त्याचा झट-पट डोसाच करते. १/२ कप पालक चिरलेला [ मी फ्रोझन वापरते] एक माईक्रोवेव सेफ भांडया मध्ये थोडसं पाणी घालून ४-५ मिनिट शिजवायचा, त्यात १/२ वाटी दही, १ वाटी रवा, १/४ वाटी प्रत्यकी सगळ्या प्रकार चे पीठ, चण्याच, मुगाच, उडदाच, तांदळाच इत्यादी घालून त्यात चवीला मीठ घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि नॉन-स्टिक तव्यावर थोडस तेल घालून डोसा टाकायचा . दोन्ही बाजूने भाजून ताटात काढून आपल्या आवडत्या लोणच, केचप, चटणी बरोबर खायचं. ही पण पुष्कळ पौष्टिक डिश आहे . एखादी शिजवलेली भाजी फ्रीज मध्ये शिल्लक असल्यास, मग हा डोसा थोडासा जाड टाकायचा आणि त्यावर उत्तपा प्रमाणे ही भाजी पसरवायची आणि दोन्ही बाजूनी हा डोसा शिजवायचा.
ऐश्वर्या कोकाटे, संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स.com
अगदी सेम अशी नाही पण
अगदी सेम अशी नाही पण वरणातल्या पास्त्याची रेसिपी इथे फार पॉप्युलर झाली होती काही वर्षापूर्वी !
हा सखिप्रियाचा फेमस वरणातला पास्ता:
https://www.maayboli.com/node/10484
बापरे ९ वर्षं झाली पण ? अत्ता अत्ता वाचल्यासारखी वाटतेय !
तुम्ही कॉस्को तले फ्रोजन
तुम्ही कॉस्को तले फ्रोजन पदार्थ आणत नाही का? इथे ऑथें टिक् राविओली फर्स्टक्लास मिळते.
वर दिपांजलीने दिलेली
वर दिपांजलीने दिलेली वरणातल्या पास्त्याची रेसिपी माझी अत्यंत आवडती आहे आणि मी खूपदा केलीही आहे.
अमा, तुम्हांला अमेरिकेतलं
अमा, तुम्हांला अमेरिकेतलं सगळं इतकं व्यवस्थित कसं हो माहित?
अमांचे माहित नाही , पण बाकी
अमांचे माहित नाही , पण बाकी जनतेला तरी TPP वाचून कळते
Tpp पब्लिक साठि ओपन कधी बोणार
Tpp पब्लिक साठि ओपन कधी बोणार।
आता अमांनी कॉस्कोत कोणत्या
आता अमांनी कॉस्कोत कोणत्या आयलमध्ये काय मिळतं हे सांगितलं की मी सुडोमि. (अमांनी लाईटली घ्यावे)
च्रप्स- कधीच नाही. तशी काही गरज नाही. ज्यांना वाचायचं ते वाचू शकतातच गृप जॉईन करुन.
च्रप्स, तुम्ही आम्रविकेत
च्रप्स, तुम्ही आम्रविकेत आयुष्य घालवता ना? मग ते आयुष्य जॉईन करा की!
अमितव - नाही समजला प्रतिसाद.
अमितव - नाही समजला प्रतिसाद.
मला सायोचा रोकठोकपणा
मला सायोचा रोकठोकपणा इम्प्रेसिव्ह वाटतो!
तशी उत्सुकता माझ्या मनात नव्हती असं नाही पण कदाचित असतील कोणी जवळचे नातेवाईक त्यामुळे असेल इत्थंभूत माहिती असा विचार करून सोडून दिलं.
अहो च्रप्स, अमित तुम्हाला "
अहो च्रप्स, अमित तुम्हाला " अमेरिकेतील आयुष्य" हा गृप जॉईन करण्याचा सल्ला देत आहे.
ओह... धन्यवाद ☺️
ओह... धन्यवाद ☺️
रावियोली टाकून आमटी करून बघा
रावियोली टाकून आमटी करून बघा ......मस्तच
ऐश्वर्या, माझं खरं मत सांगू
ऐश्वर्या, माझं खरं मत सांगू का? रॅविओलीत जर चीज आणि स्पीनच वगैरे असेल तर ते आपल्या आमटीत खास लागणार नाही असं मला वाटतं. त्यापेक्षा दुसरा साधा प्लेन पास्ता चालू शकेल.