Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 March, 2018 - 05:04
वेदना ( शेतकरी मोर्चा )
मुकी वेदना ही माझी
उरातच दबलेली
प्राण कंठाशी हा येता
टाहो फोडत बोलली
नशिबीचे काटेकुटे
फुलं मानून वेचले
कष्टकरी या हाताने
घास तुम्हा भरविले
आता भेगाळला जीव
सारे आभाळ फाटले
मातीतल्या माणसाने
माणसाला हाकारले
दैव दैव कसे असे
देव भिकारी हो झाला
रानोमाळ गोट्यातून
लाल पूर प्रगटला
आता सबूरी असावी
उखडील संरजामी
दिशा दिशा पेटविल
ठिण्गी फुले अंतर्यामी
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर वर्णन
सुंदर वर्णन
भिडणारी सहसंवेदना !
भिडणारी सहसंवेदना !
जान्हवीजी , अनंतजी धन्यवाद !!
जान्हवीजी , अनंतजी धन्यवाद !!!
भिडणारी सहसंवेदना ! >>> + 999
भिडणारी सहसंवेदना ! >>> + 999
शशांकजी धन्यवाद !
शशांकजी धन्यवाद !