डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
(No subject)
फारेंड... (आणि इतरही)
फारेंड...
(आणि इतरही) 
२१) गरम लिंबूपाणी
२१) गरम लिंबूपाणी
<<<
हे काय हात धुवायला काय सगळं वाचून झाल्यावर?
"सकाळी सकाळी चहा सुद्धा न
"सकाळी सकाळी चहा सुद्धा न घेता टोमॅटो खाण्याची प्रबळ इच्छा होते ती कंट्रोल करायला हे उपयोगी पडेल." -

"केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत." - सहावं फळ कुठलं?? बहुदा ते कुणीतरी सकाळी 'अनुशापोटी' खाऊन टाकलं
वाटतं.
"चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे." - इतर वेळी खाल्ला तर चालेल.
"थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें." - इतर वेळी सोयामिल्क पाहिलं रे पाहिलं की त्यात साखर आणी अंड घालण्याची जी उबळ येते ती दाबून टाकणं गरजेचं आहे.
"चिकन खाताना कोंबडी चा
"चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे." - इतर वेळी खाल्ला तर चालेल. >>> लोल फेफ. बाय द वे हे वाचून एखादा कोंबडा त्याच्या कोंबडीला आफ्रिकन अमेरिकन टोन मधे "you fine honey, your *** is safe" असे म्हणतोय असे डोळ्यासमोर आले
""you fine honey, your *** is
""you fine honey, your *** is safe"" -
जबरी रे फा!
फा आणि फे
फा आणि फे
"चिकन खाताना कोंबडी चा
"चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे." >>>
ह्यामागिल लॉजिक काय ते समजले नाही. कोणी सांगू शकेल का?
लॉजिक? ते काय असतं?
लॉजिक? ते काय असतं?
>ह्यामागिल लॉजिक काय ते समजले
>ह्यामागिल लॉजिक काय ते समजले नाही. कोणी सांगू शकेल का
चित्त्याचे किंवा बिबळ्याचे कान , काखेत घासले तर काखमांजर्या होतात, तसेच काहीसे असणार.
*दिनांक १ गुरुवार रात्री सर्व
*दिनांक १ गुरुवार रात्री सर्व बांधव होळी पेटवून सण साजरा करणार, तेव्हा प्रत्येकाने होळीमध्ये २ कापूर वडी आणि २ लहान वेलची टाकायची आहे, कापूर आणि वेलचीच्या सुगंधाने स्वाईन फ्लू चे विषाणू मरून* *जातात, होळी संपूर्ण भारतात साजरी करतात, जर प्रत्येकाने आपल कर्तव्य बजावल तर ७०% स्वाईन फ्लू चे विषाणू जळुन जातील आणि देश सेवा केल्याच समाधान मिळेल.....*
*जीवन आधार फाउंडेशन (रजि)*
*महाराष्ट्र राज्य*
*रजि क्रं. : महाराष्ट्र/३६५९५/को*
*।।जन सेवा हीच ईश्वर सेवा।।*
सम्पर्क - 9769945050
9372435050
ह्याच नक्की कापूर आणि वेलची च
ह्याच नक्की कापूर आणि वेलची च दुकान असणार..
लॉजिक? ते काय असतं? >>>
लॉजिक? ते काय असतं? >>> म्हणजे कोंबडीचा पार्श्वभाग खाल्ल्याने कॅन्सर कसा काय होऊ शकतो?
होळीचा संदेश मी कायप्पा वर
होळीचा संदेश मी कायप्पा वर पाठवणार !
रजिस्टर्ड संस्था असले चुकीचे,
रजिस्टर्ड संस्था असले चुकीचे, अशास्त्रीय मेसेजेस पाठवते म्हणल्यावर त्याबद्दल तक्रार करता येत असावी ना? की नाहीच?
सर्व कमेंट भयंकर आहेत १८
सर्व कमेंट भयंकर आहेत १८ अटींबद्दल :):)
फेरफटका...... "थोडेसे
फेरफटका...... "थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें." - इतर वेळी सोयामिल्क पाहिलं रे पाहिलं की त्यात साखर आणी अंड घालण्याची जी उबळ येते ती दाबून टाकणं गरजेचं आहे."

हे वाचून फारच हसू येत आहे!
खरंच..कोण इतकं रेग्युलरली सॉय मिल्क पितं.....!! काहीही...!!
घ्या अजून एक
घ्या अजून एक
*डोकेदुखी :-
* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.
*अर्धशिशी (मायग्रेन) :-
* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.
*पूर्ण डोके दुखणे :-
* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.
*सायनस :-
*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.
*केसगळती :-
* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.
*डोळ्यांसाठी :-
* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.
*नाकातील हाड वाढल्यास :-
* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.
*सर्दीचा त्रास झाल्यास :-
* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.
*वजन कमी करण्यासाठी :-
* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.
*हृदय मजबूत होण्यासाठी :-
* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.
*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-
* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.
*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-
* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.
*अपचनाचा त्रास :-
* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.
*हार्ट ॲटॅक आल्यास :-
* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.
*अपचनाचा त्रास :-
* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.
*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-
* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.
*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-
* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.
*मूळव्याध :-
* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.
*मूतखडा (किडनी स्टोन) :-
* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.
*कोठा साफ होण्यासाठी :-
* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.
*दातांच्या बळकटीसाठी :-
* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
*हिरड्या फुगल्यास :-
* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.
*गालगुंड :-
* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.
*चेहरा धुण्यासाठी :-
* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.
*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-
* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.
*संधिवात व हाडांचे दुखणे :-
* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.
*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-
* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.
*टकलावर केस येण्यासाठी :-
* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.
कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.
*झोपेत घोरण्याची समस्या :-
* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.
*माथा उठणे :-
* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.
*त्वचेला खाज येत असल्यास :-
* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.
*मधुमेह (शुगर) :-
* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.
जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.
*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.
*लूज मोशन :-
* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.
लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-
* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.
आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.
स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.
स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.
स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.
गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.
कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.
*रोज शक्य होईल तितके चालावे.*
*स्मरणशक्ती :-
* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.
*कॅन्सर :-
* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.
यात "आलेला" हार्ट अटॅक "जाण्यासाठी" पण औषध आहे
नैसर्गिक उपचार सगळेच सरसकट
नैसर्गिक उपचार सगळेच सरसकट खोटे वा अपायकारक नसतात. लगेच मोडीत काढण्यात अर्थ नाही. असो...
सध्या आशीर्वाद कणिक, लक्ष्मी रवा हे पाण्यात भिजवून ते कसे पुर्ण विरघळत नाहीत कारण त्यात बाकी सर्व प्लास्टिक असते असे व्हिडियो फिरत आहेत त्यात कितपत तथ्य आहे ते कुठे शोधावे?
सुनिधी, माझ्यामते तरी ते
सुनिधी, माझ्यामते तरी ते ग्लुटेन आहे. गव्हातील इलॅस्टीक, ग्लुसारखा भाग, ज्यामुळे पाव फुगतो वगैरे. तद्दन संतापजनक व्हिडिओ आहे तो.
हो, बरोबर. तेच डोक्यात आले ,
हो, बरोबर. तेच डोक्यात आले , चिकटपणा यायला.
नैसर्गिक उपचारांत कितपत तथ्य
नैसर्गिक उपचारांत कितपत तथ्य आहे, हे कुठे शोधावे?
पीठ,रवा पाण्यात मीठ, साखरेसारखे विरघळायला हवेत का?
नैसर्गिक उपचार सगळेच सरसकट
नैसर्गिक उपचार सगळेच सरसकट खोटे वा अपायकारक नसतात. लगेच मोडीत काढण्यात अर्थ नाही. असो...
<<
या वाक्याला अर्थ किंवा वजन येण्यासाठी सदर फॉरवर्ड मधील कोणते सो कॉल्ड "उपचार" खरे आहेत, व का, याची सायंटिफिक कारणे द्यावी लागतात.
अन हो. सायंटिफिक. शास्त्रीय म्हटलं की आपल्या "शास्त्रात" होळीची बोंब शास्त्रोक्त पद्धतीने कशी ठोकावी तेही लिहिलेलं आहे म्हणे.
आपला नम्र,
आरारा शास्त्री
सिम्बांच्या वरील पोस्टीत काही
सिम्बांच्या वरील पोस्टीत काही उपाय चांगले वाटत आहेत.
आरारा, तुमचा विश्वास नाहीये ,
आरारा, तुमचा विश्वास नाहीये , नका ठेऊ. मी कोणाला पटवायला जात नाही की हेच करा, तेच करा. धन्यवाद.
अन हो. सायंटिफिक. शास्त्रीय म्हटलं की आपल्या "शास्त्रात" होळीची बोंब शास्त्रोक्त पद्धतीने कशी ठोकावी तेही लिहिलेलं आहे म्हणे. >> असलं बिनकामाचं तर माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणुन लिहूच नका.
सुनिधी - हे जे चालले आहे ते
सुनिधी - हे जे चालले आहे ते असले मेसेजेस आणि त्यातले अचाट क्लेम्स यावर आहेत. नैसर्गिक उपचारांवर या कॉमेण्ट्स नाहीत. मुळात यातले वरचे कोणते नैसर्गिक उपचार तरी आहेत, की कोणी सहज आपले लिहून व्हॉअॅ नदी मधे सोडून दिले आहे काहीच कल्पना नाही.
*जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही. >> यात "साखर वाढत नाही (गूळ वाढतो)" असे सायलेण्ट मधे आहे असे वाटले वाचताना.
संदेश ऋषींचे अमाप पीक
संदेश ऋषींचे अमाप पीक भरतखंडात उगवले आहे
सिम्बा - "माथा उठणे" म्हणजे
सिम्बा - "माथा उठणे" म्हणजे काय? डोके दुखण्याचे तीन प्रकार वरती कव्हर झाले आहेत. हा चौथा का?
>>अर्धशिशी (मायग्रेन) :-
>>अर्धशिशी (मायग्रेन) :-
* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.>> म्हणजे सलग दहा दिवस हा उपाय करुन बघाय ल्चा? आणि उपयोगी नसेल तर कुणाला बदडायला जायचं? त्यापेक्षा दोन मायग्रेनच्या गोळ्या घेऊन गप पडावं.
>>कॅन्सर :-
* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.>> असलं काहीबाही फॉर्वर्ड करणार्यांना ठोकलं पाहिजे. मूर्ख लेकाचे.
अशा प्रकारचे फॉरवर्ड अगदीच
अशा प्रकारचे फॉरवर्ड अगदीच धन्यावाद असतात.
त्यातले उपाय कितीही प्रॅक्टिकल वाटले तरी रँडमली अनुसरू नयेत.
मध्ये एक फॉरवर्ड बरेचवेळा येत होते,
)
मेथी, ओवा, सैंधव विशिष्ट प्रमाणात घेऊन भाजावे, रोजरात्री एक चमचा पाण्यात भिजवावे , सकाळी ते पाणी प्यावे, वगैरे काहीतरी होते, याने वजन हमखास कमी होते म्हणे.
आमची एक जवळची नातेवाईक, या प्रकाराला भुलली.
जवळच्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातून ते पदार्थ घेऊन आली. दुकानदाराने पण त्या स्पेसिफिक वजनाची पाकिटे तयार ठेवली होती, हल्ली खूप लोक हे विकत घ्यायला येतात म्हणून,
ते कडूजार पाणी तिने नेटाने 8 10 दिवस प्यायले, त्यानंतर तिला उष्णतेचा त्रास सुरू झाला, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर मुरुमे येणे वगैरे झाले, तरीही खाज गेली नाही,
या लक्षणांवर तिने आयुर्वेदिक उपचार सुरू केले ( ती असले काही पित होती हे त्या वैद्याला ना सांगता
नंतर 15 20 दिवसांनी वैद्याने खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा बाईसाहेब हे बोलल्या, मग वैद्याने भयंकर खडसावले.
त्याच्या म्हणण्यानुसार मेथी, ओवा प्रकार भयंकर उष्ण असतात, आपली प्रकृती कशी आहे ते न पाहता त्याच्याशी अ जुळणारे उपाय केल्याने हा त्रास होत होता.
तेव्हांपासून तीने अशा उपयाबद्दल कानाला खडा लावला आहे.
तात्पर्य:- कितीही व्यवहार्य आणि सोपे वाटले तरी असले उपचार स्वतः चे स्वतः करू नयेत.
Pages