डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
ज्यांना लिंबामुळे पित्ताचा
ज्यांना लिंबामुळे पित्ताचा त्रास होतो, त्यांच्या करता गाजराचा रस.
*अत्यंत अत्यंत महत्वाची आणि
*अत्यंत अत्यंत महत्वाची आणि महत्वाची बातमी*
पुणे मध्ये
ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे !!
कृपया फॉरवर्डिंगशिवाय हे काढून टाकू नका.
हे भारतीय लोकांपर्यंत पोहोचायला पाहीजे
'इमिटिनफ मेरसीलेट' हे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते.
*पुणे येथे यशोधो हेमॅटोलॉजी कर्करोग संस्था येथे विनामूल्य उपलब्ध आहे.*
*जागरुकता निर्माण करा.*
*हे कोणालातरी मदत करू शकते.*
आपण जितके शक्य तितके पुढे जा.
निंदनीय खर्च काहीही नाही.
पत्ता:
यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिक. 10 9, मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स, हिरबाग चौक,
टिळक रोड,
पुणे -411002.
फोनः
020-24484214 किंवा 0 9 05 9 0808080 किंवा 0 9 545027772 किंवा भेट दिल्यास www.practo.com ला भेट द्या.
*माझी नम्र विनंती: कृपया इतरांना पाठवा*
What is सापडले आहे?
What is सापडले आहे?
कोणी रिक्षा मध्ये विसरले होते ,ते याना सापडले आहे का?
Anusha Dandekar dislikes this
Anusha Dandekar dislikes this.>>> अरे काय हे
निंदनीय खर्च काहीही नाही.>>
निंदनीय खर्च काहीही नाही.>>
जर खर्च काहीही नाही तर निंदनीय का आहे
Anusha Dandekar dislikes this
Anusha Dandekar dislikes this. >>> हाहाहा!
धाग्याचे सार्थक झाले आज!
धाग्याचे सार्थक झाले आज!
Anusha Dandekar dislikes this
Anusha Dandekar dislikes this >>>
आफ्टर पुपो डाएट वैद्य अरविंद
आफ्टर पुपो डाएट वैद्य अरविंद जोशी strike अगेन....
#काय_अभ्यास__काय_अभ्यास
तिळगुळच का ?
दरवर्षीच्या निरीक्षणातून माझे असे लक्षात आले आहे की 22 डिसेंबर ते 10 फेब्रुवारी या काळात नैसर्गिक रित्या संडासला घट्ट होते किंवा खडा होतो, संडास करताना त्रास होतो संडासच्या जागी आग होते आणि नंतर बराच वेळ राहते. दिवसभर चिडचिड होते.
पण तिळगुळ खाल्ला की संडासला त्रास होत नाही असा अनुभव आहे. आम्ही गेले पंधरा वर्ष 22 डिसेंबर पासून दिवसाआड तीळगूळ खातो, तीळगुळ नसेल तर पाव चमचा तीळ व गूळ खातो यामुळे ह्या दिवसांमध्ये होणारा त्रास होत नाही व दिवस चांगला जातो, चिडचिड होत नाही, असा आमचा अनुभव आहे म्हणूनच समाजाच्या स्वास्थ्यासाठी आमच्या पूर्वजांनी तिळगुळ घ्या आणि गोड बोला ही प्रथा पाडली असावी
संडास साफ झाले की आपोआपच बोलण्यात गोडवा येतोच.
अरविंद जोशी. B.Sc.पुणे
9421948894
(No subject)
अरविंद जोशींचा फोन नंबरपण
अरविंद जोशींचा फोन नंबरपण दिलाय :O
लोक इतके भंपक आणि छदम
लोक इतके भंपक आणि छदम शास्त्रीय संदेश पुढे का ढकलतात याचे मला आश्चर्य वाटते आणि हसायलाही येते. कारण यात बरच वेळेस शास्त्रीय शिक्षण घेतलेले लोकही सारासार विचारबुद्धी गहाण ठेवून वागताना दिसतात.
22 डिसेंम्बर ते 10 फेब्रुवारी
22 डिसेंम्बर ते 10 फेब्रुवारी यांनाच बद्ध कोष्ठ का होते? आम्हाला कधी झाल्याचे आठवत नाही.))--((
अरविंद जोशी. तिळगुळ पोस्ट
अरविंद जोशी. तिळगुळ पोस्ट

कहर आहे.
कहर आहे.
तिळगूळ अती खाऊनच असा त्रास
तिळगूळ अती खाऊनच असा त्रास होतो.
(No subject)
हे पा त्यांना हसू नका,
हे पा त्यांना हसू नका, त्याकाळात मांस - मद्य प्राशन वाढते, होत असेल त्यामुळे त्रास.
संडास साफ झाले की आपोआपच
संडास साफ झाले की आपोआपच बोलण्यात गोडवा येतोच.
<<
वा!
Japan govt. has decided to
Japan govt. has decided to dispose of all the " Microwave Ovens" in the country before this year end.
Reason for this ban : University of Hiroshima's scientists researched and found that "Radio Waves" from microwave ovens cause greater harm to health over the last 20 years, than the US Atomic Bombs on Hiroshima and Nagasaki in Sep. 1945.
Experts found dat food heated in microwave ovens has very unhealthy vibrations and radiation.
All the factories of "Microwave Ovens" in Japan are being closed.
S. Korea announced plans to close all "Microwave Ovens" factories by 2021, and China by 2023.
A conference on cancer prevention held @ Kashira Cancer Center recommended :
1. No Refined oil
2. No Milk of animal origin (recommended soy milk)
3. No Food cubes (chicken broth spices like Maggie etc)
4. No Soda (32 pieces of sugar per liter)
5. No Refined sugar
6. No Microwave ovens
7. No mammogram b4 birth, except echocardiography
8. No Very narrow underwear and bra
9. No Alcohol
10. Do not re-freeze thawed food.
11. Do not drink chilled water kept in plastic bottles stored in the fridge.
12. Avoid deodorants usually used after shaving or baths because they cause cancer.
The conference advise adding these to your diet :
1. Vegetables
2. Honey moderately used instead of sugar
3. Plant proteins (beans instead of meat)
4. 2 cups of water at body temp on empty stomach before brushing teeth
5. Food should be warm and not very hot
6. Aloe vera juice + ginger + parsley + celery + bromalin (Mix and drink on an empty stomach)
7. Carrot juice daily
8. Tomato, garlic onion with meals.
Note : The American Physicians Association found the causes of cancer:
1. Do not drink anything hot in plastic cups
2. Do not eat anything hot wrapped in paper or cardboard or in a plastic bag (e.g. fried potatoes)
3. Don't eat in plastic or microwave dishes
Note:
When plastic is exposed to heat, chemicals that can cause 52 cancer types are released.
You must also avoid drinking all kinds of soft drinks such as "Cola, Pepsi, Av, Fanta and all concentrated juices because cancer feeds on sugar. Eat fresh pineapples n avoid pineapple mix. Don't eat heavy food after 7pm.
Drink more water in the morning and less in the evening. Do not take a horizontal position (lying down/sleep) immediately after eating.
Share this with your loved ones
मायक्रोवेव्ह ओव्हन अत्यंत
मायक्रोवेव्ह ओव्हन अत्यंत वाईट आहे. डॉक्टरांचा दाखला:
https://www.youtube.com/watch?v=_uRZ5aRkYpA
https://www.youtube.com/watch?v=6mXfQSL4I8w
अरविंद जोशी रॉक!!!!
अरविंद जोशी रॉक!!!!
मध्यंतरी मायक्रोवेव्ह मधे गरम करू नये अशा पन्नास-एक पदार्थांची यादी वाचली होती. ह्या रेट नी लंच ला 'थंडा फराळ' च करावा लागेल.
आजचा ताजा ताजा फॉर्वर्ड...
आजचा ताजा ताजा फॉर्वर्ड...
माझा अमेरिकन मित्राचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे
वयाच्या 50 व्या नंतर
आपण अनुभवू शकतो
अनेक प्रकारचे आजार.
परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर.
कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि,
कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल....
एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले
की त्याच्या एका डॉक्टर मित्राने
त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.
अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...
* 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे
* 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे
* 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे
* 4 * दमा कमी करणे
* 5 * जवळची दृष्टी चांगली करणे
* 6 * कान गुंजने कमी करणे
* 7 * घसा कमी खराब होणे
* 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे
* 9 * झोप चांगली लागणे
व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे....
दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा:
* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा *
मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या आठवण शक्तीमधे सुधारणा झाली.
माझे डोके हलके आणि ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही आहेत ...
1 जवळचे नीट दिसायला लागले
२ शरीर संतुलन राहायला लागले
3. तब्येत व्यवस्थित राहणे
4. चांगले पचन
5. सर्दी खोकला कमी होणे
मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झाले.
टिप
जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते...
वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा BIG ब्रेनशी संबंध आहे. जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्याचदा आपण जीभ चावतो.
जिभेचा वारंवार व्यायाम
मेंदूला उत्तेजित करेल,
आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.
वृद्ध मित्रानो
"मी हे संदेश प्राप्त करणार्या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करते , किमान एक जीव वाचवेल ... मी माझा भाग घेतला आहे, आशा आहे की आपण आपला भाग करण्यास मदत करू शकाल. धन्यवाद!
थॅंक्यू मनिम्याऊ.
थॅंक्यू मनिम्याऊ.

१० जणांना नव्हे तर माझ्या कॉ लिस्टमधील सर्वांना हा मेसेज पाठवतो. त्यातले दहा टक्के तरी जीभ काढून व्यायाम करतीलच.
ह्यामुळेच लहानपणी एकमेकाला
ह्यामुळेच लहानपणी एकमेकाला जीभ बाहेर काढून वाकुल्या दाखविण्याचा खेळ खेळला जायचा!
निसर्ग देवता लहानपणीच
(No subject)
जिभेच्या व्यायामाबद्दल एका
जिभेच्या व्यायामाबद्दल एका व्यक्तीने मला प्रत्यक्ष भेटीत सांगितले होते. डेमोही दिला होता.
टकलावर केस उगवण्यासाठी बोटांची नखं एकमेकांवर घासायची. हा प्रकार करणारे लोक पाहिलेत.
या शोधाचे जनक बाबा रामदेव आहेत म्हणे.
"या शोधाचे जनक बाबा रामदेव
"या शोधाचे जनक बाबा रामदेव आहेत म्हणे." - हे खूप लहानपणी ऐकलं होतं (मला टक्कल नव्हतं)
त्यामुळे रामदेवबाबांचं कनेक्शन नसावं. अर्थात त्याचं क्रेडिट ते घेत नसावे असंही सांगता येत नाही.
हा जीभवाला मेसेज आजच सकाळी
हा जीभवाला मेसेज आजच सकाळी वाचला एका ग्रुपमधे जे भक्तीभावाने असले मेसेजेस पाठवतात आणि सगळे त्यावर अंगठे देतात.
Pages