Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2018 - 08:10
घडो संतसंग
तुकोबाचा भाव । जिही सामावला । मज तो भावला । पांडुरंग ।।
ज्ञानियाचे प्रेम । मूर्तिमंत ठाके । विटेवरी निके । भीमातीरी ।।
नामदेव सखा । स्वयमेव झाला । कोण त्या विठ्ठला । जाणू शके ।।
संतांचे संगती । जाई पंढरीसी । अर्पावे स्वतःसी । विठूपायी ।।
न जाणे निर्गुण । नाकळे सगुण । एकचि ते खूण । शुद्ध भाव ।।
शुद्ध भाव एक । रूजता अंतरी । स्वये तो श्रीहरी । ठायी पडे ।।
संतमुखे वर्म । कळो आले साचे । येर ते न रूचे । कृत्रिमसे ।।
घडो संतसंग । सर्वदा विठ्ठला । न मागे तुजला । दुजे काही ।।
----------------------
निके = चांगले
साचे =खरोखर, नेमके
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
_/\_
_/\_
छान!
छान!
अतिसुंदर !
अतिसुंदर !
शशांकजी छानच . परत परत
शशांकजी छानच . परत परत वाचावंस वाटत आणि नवा नवा अर्थ सापडू लागतो
न लगे मुक्ती आणि संपदा,
न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा
खुप सुंदर
खुप सुंदर
॥ जय हरी विठ्ठल ॥
॥ जय हरी विठ्ठल ॥