आजच सकाळी मला श्रीहरी कृपेने काही ओळी सुचल्या, त्या देत आहे. माझी ही पहिलीच कविता आहे त्यामुळे कशी वाटली, काय सुधारणा हव्या ते नक्की कळवा.
हरे कृष्ण...हरे कृष्ण...
ब्रम्ह, आदिमाया, महेश।
इंद्र, सूर्य, गणेश।
सर्व एकच श्रीविष्णुंचे अंश।
नित्य हरीनाम मुखी, दूर ठेवी भय सर्प दंश।।
म्हणत हरे कृष्ण हरे राम।
हरीचे झाले ज्ञानोबा, तुकाराम।
पीताच विष्णू भक्तीचे जल।
प्रल्हादाने आटवले दैत्यांचे बल।।
भृगु शोधण्यास गेले कोण त्रिमूर्तींत थोर।
प्रसन्न झाले पाहताच विष्णुंचे प्रेम मधुर।
ईश्वर हे होतात विपरीत भक्तीनेही प्रसन्न।
आपुली निःस्वार्थ भक्ती हेच त्यांचे अन्न।।
विचाराल तुम्ही भक्ती करू कशी विष्णूंची।
समर्थांसमान चिंता करुनी विश्वाची।
जर वाटत असेल विष्णूनेही घ्यावे तुमचे नाव।
तर उपाय एकच तो म्हणजे जगाशी सम भाव।।
साक्षात लक्ष्मीसुद्धा येते त्याच दारी।
ज्या घरातील जयघोष असतो हरी...हरी...हरी।।
वासुदेव हरी...पांडुरंग हरी...
छान!
छान!
>>> नित्य हरीनाम मुखी, दूर ठेवी भय सर्प दंश।।<<<
'दूर ठेवी भय सर्प दंश' ऐवजी मी 'दूर ठेवी भय चिंता दंश' असं वाचलं.
पुलेशु.
धन्यवाद आनंद! 'दूर ठेवी भय
धन्यवाद आनंद! 'दूर ठेवी भय चिंता दंश' हे वाक्यही योग्यच वाटतं. Thanks!
छान
छान
Thanks अक्षय!
Thanks अक्षय!